निकालपत्र (पारित दिनांक 15 नोव्हेंबर, 2010) व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा. तक्रारकर्ताश्रीमती नाशिका मोरेश्वर नाकाडे यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा थोडक्यात आशय असा की, ..2.. ..2.. 1. तक्रारकर्ता यांचे पती श्री मोरेश्वर हिरामण नाकाडे यांनी विरुध्दपक्ष यांच्या ब्रम्हपूरी येथील कार्यालयातून 3 पॉलिसी घेतल्या होत्या. तक्रारकर्ता यांच्या पतीचा दिनांक 03/01/2007 रोजी अकस्मीत रित्या मृत्यू झाला. तक्रारकर्ता यांचे पतीने खरी माहिती लपविल्याचे बनावटी कारण दाखवून विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांचा मृत्यूदावा खरीज केला. 2. तक्रारकर्ता यांनी विमा लोकपाल यांचेकडे अर्ज केला असता विमा लोकपाल यांनी तक्रारकर्ता यांना संधी न देता दिनांक 28/11/2008 रोजी त्यांचा अर्ज खारीज केला. 3. तक्रारकर्ता मागणी करतात की, रुपये 7,00,000/- ही रक्कम दिनांक 03/01/2007 पासून त्यांना प्राप्त होत पर्यंत 18% व्याजाने मिळावी तसेच तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष यांचेकडून शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5000/- मिळावेत. 4. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता यांचे पती श्री मोरेश्वर नाकाडे यांनी पॉलिसी घेतेवेळी त्यांना असलेले आजार हे लपविले होते त्यामूळे विम्याच्या अटीचा भंग झाल्यामूळे तक्रारकर्ता यांचा विमादावा हा नामंजूर करण्यात आला. विरुध्दपक्ष यांच्या सेवेत त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही उचीत शुल्कासह खारीज करण्यात यावी. कारणे व निष्कर्ष 5. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांचे पती श्री मोरेश्वर नाकाडे यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून अ) पॉलिसी क्रमांक 974368906, आशा दिप पॉलिसी, रुपये 1,00,000/-, दिनांक 28/03/2004 ब) पॉलिसी क्रमांक 974374915, कोमल जीवन, रुपये 1,00,000/- दिनांक 15/07/2004 व क) पॉलिसी क्रमांक 974811229, जीवन श्री, रुपये 5,00,000/- , दिनांक 28/03/2005 या पॉलिसी घेतल्या होत्या. विरुध्दपक्ष यांनी दिनांक 22/12/2007 च्या पत्रान्वये तक्रारकर्ता यांचा या पॉलिसीसंबंधीचा विमादावा हा खारीज केला आहे. 6. विरुध्दपक्ष यांनी डॉ. सतीश मेंढे, ब्रम्हपूरी यांचे दिनांक 1 जानेवारी, 1999 चे प्रिस्क्रीप्शन रेकॉर्डवर दाखल केले आहे. विरुध्दपक्ष यांच्या अनुसार तक्रारकर्ता यांना हायपर टेंशन व डायस्लीपीडोमीया या रोगासाठी डॉ. मेंढे यांचेकडून उपचार घेतले होते व ही बाब त्यांनी प्रपोजल फॉर्ममध्ये नमूद केली नाही. मात्र तक्रारकर्ता हे 7 दिवसाकरीता काय तर 1 दिवसाकरीता सुध्दा डॉ. मेंढे यांचे हॉस्पीटलमध्ये भरती झाल्याचा पुरावा नाही. डॉ. मेंढे ..3.. ..3.. यांचे वैद्यकिय दस्ताऐवज हे 1 जानेवारी, 1999 चे आहे तर पॉलिसी हया 2004-05 मध्ये म्हणजेच 5 वर्षानंतर घेण्यात आलेल्या आहे. हायपर टेंशन चा डॉ. मेंढे यांच्या प्रिस्क्रीप्शनमध्ये उल्लेख नाही तर प्रपोजल फॉर्ममधिल प्रश्नात डायस्लीपीडोमीया याचा उल्लेख नाहीञ त्यामुळे तक्रारकर्ता यांनी प्रपोजल फॉर्म भरतांना खोटी माहिती दिली हे विधान स्विकारता येत नाही. शिवाय तक्रारकर्ता यांचे मृतक पतीला तो रोग होता तर त्या रोगामुळे त्यांचा मृत्यू झाला ही बाब सिध्द करण्यास विरुध्दपक्ष हे सर्वथा अपयशी ठरले आहे. 7. पॉलिसी या 2004 व 2005 मध्ये घेण्यात आलेल्या आहे व दोन वर्षानंतर मृतक यांनी प्रपोजल फॉर्म भरतांना खोटी माहिती दिली या कारणावरुन विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांचा दावा खारीज केलेला आहे. विमा कायदा 1938 च्या कलम 45 प्रमाणे खोटी माहिती दिल्याच्या कारणावरुन दोन वर्षानंतर विमादावा हा खारीज करता येत नाही. 8. आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने भारतीय जीवन विमा निगम व इतर विरुध्द श्रीमती आशा गोयल या AIR 2001 SC 549 मध्ये प्रकाशीत झालेल्या न्यायनिवाडयामध्ये असे प्रतिपादन केले आहे की, "कलम 45, विमा कायदा 1938 याच्या दूस-या भागात मुख्य तीन अटी आहेत. 1) विधान हे महत्वाच्या बाबी बद्दल असायला पाहीजे अथवा महत्वाची बाब लपविली गेली असायला पाहीजे. 2) माहिती लपविल्या जाणे याचा उद्देश हा फसवणूक करणे असा असला पाहीजे व 3) पॉलिसीधारक यांनी विधान करते वेळी माहिती असायला पाहीजे की जी बाब ते लपवित आहे ते उघड करणे हे महत्वाचे आहे. प्रपोजल फॉर्म मधिल काही बाबतीत असलेली असत्यता ही विमादावा नाकारण्यास पुरेशी नाही". 9. विमा लोकपाल यांनी तक्रारकर्ता यांचा विमादावा हा खारीज केलेला आहे. आदरणीय राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, न्यु दिल्ली यांनी कमलेश्वरी प्रसाद सिंग विरुध्द भारतीय जीवन विमा निगम, I (2005) CPJ 107 NC या न्याय निवाडयामध्ये असे म्हटले आहे की, "विमा लोकपाल यांनी पारीत केलेला आदेश हा तक्रारकर्ता यांचेवर बंधनकारक नसतो, कारण विमा लोकपाल हे न्यायीक कर्तव्य पार पाडत नाही". 10. तक्रारकर्ता यांनी 2008(2) ALL MR (JOURNAL) 52 हा केस लॉ रेकॉर्डवर दाखल केला आहे तर विरुध्दपक्ष यांनी खालील प्रमाणे 8 केस लॉ रेकॉर्डवर दाखल केलेले आहेत. अ) I (1998) CPJ 115 (NC) ब) Revision Petition No. 947/1997 Order dated 3/10/2001 क) III (2002) CPJ 56 (NC) ड) Revision Petition No. 430/2001 Order dated 10/7/2002 ..4.. ..4.. इ) AIR 2008 SC 424 प) Revision Petition No. 1878/2007 Order dated 31/10/2007 फ) Revision Petition No. 1203/2003 Order dated 26/3/2008 भ) II (1995) CPJ 62 NC विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेले केस लॉ हे तथ्य व परीस्थीत भिन्न असल्यामुळे सदर प्रकरणास लागू होत नाहीत. 11. खोटी माहिती दिल्याच्या कारणावरुन पॉलिसी अस्तीत्वात आल्यावर दोन वर्षानंतर विमादावा नाकारणे ही विरुध्दपक्ष यांचे सेवेतील न्युनता आहे . असे तथ्य व परिस्थिती असतांना खालील आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश 1. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी पॉलिसी क्रमांक 974368906, रुपये 1,00,000/, पॉलिसी क्रमांक 974374915, रुपये 1,00,000/- व पॉलिसी क्रमांक 974811229, रुपये 5,00,000/- यांची रक्कम तक्रारकर्ता यांना प्राप्त होत पर्यंत दिनांक 20/12/2007 पासून 9% व्याजासह दयावी. 2. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 5,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000 दयावेत. 3. विरुध्दपक्ष क्रमांक 1ते3 यांनी आदेशाचे पालन हे आदेशाचे तारखेपासून एक महिण्याचे आत करावे.
| [HONORABLE Smt. Patel] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT[HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member | |