// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 306/2014
दाखल दिनांक : 01/01/2015
निर्णय दिनांक : 17/06/2015
शांतीरक्षक अर्जुनराव डोंगरदिवे
वय 41 वर्षे, धंदा – नोकरी
रा. साई नगर, त्रिमुर्ती कॉलणी,
पो. दर्यापुर जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
योगेश नाराणराव राणा (प्रोप्रा.)
राणा लॅण्ड मार्कस प्रा.लि.
रा. राणा कॉम्पलेक्स दुसरा माळा,
राणा नगर, कॉंग्रेस नगर रोड, अमरावती
जि. अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. पुरोहीत
विरुध्दपक्षा तर्फे : एकतर्फा
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 17/06/2015)
मा. रा.कि. पाटील, सदस्यः
1. तक्रारदार याने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
ग्राहक तक्रार क्रमांकः 306/2014
..2..
2. तक्रारदाराचे थोडक्यात म्हणणे आहे की, त्यांनी विरुध्दपक्षाकडे 1 बीएचके फ्लॅट घेण्याकरीता गेले असता विरुध्दपक्ष हे शेगांव टाऊनशिप येथील श्री लक्ष्मीनारायण राणा रेसिडेन्सी या नावाने बांधकाम करणार होते व त्याची माहिती त्याने तक्रारदाराला दिली. त्यानुसार तक्रारदाराने या स्कीम मध्ये सदनिका नं. ए 406, 535 चौ.फुट विरुध्दपक्षाकडून खरेदी करण्याचा करार केला त्यानुसार सदनिकेची किंमत रु. ७,५१,०००/- करारानुसार ठरली होती. ज्यापैकी तक्रारदाराने एकूण रु. १,८७,७५०/- या सदनिकेच्या बुकींगसाठी विरुध्दपक्ष यांना दिले होते, त्याबद्दल विरुध्दपक्षाने ते मिळाल्याबद्दल तक्रारदाराला पावत्या दिल्या होत्या.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष यांनी दि. २.५.२०१२ पासुन सदनिकेचे बांधकाम 2 वर्षात पुर्ण करुन त्याचे खरेदी खत तक्रारदाराला करुन द्यावयाचे होते. परंतु त्यांनी बांधकाम पुर्ण करुन दिले नाही त्यामुळे दि. १७.११.२०१४ रोजी तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना वकीला मार्फत नोटीस पाठविली परंतु सदर नोटीस परत आली. त्यामुळे दिलेली रक्कम रु. १,८७,७५०/- 18 टक्के व्याजासह मानसिक शारिरीक त्रासापोटी रु. २,००,०००/- व या तक्रारीचा खर्च रु. १५,०००/- मागणी करण्याकरीता तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली.
ग्राहक तक्रार क्रमांकः 306/2014
..3..
4. विरुध्दपक्ष यांना या मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आली असता ती नॉट क्लेम या पोष्टाचे शे-यासह परत आली. त्यामुळे दि. 4.4.2015 च्या आदेशान्वये प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले.
5. तक्रारदारातर्फे अॅड. श्री. पुरोहीत यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रार अर्ज, दाखल दस्त विचारात घेतले.
6. तक्रारीत दाखल असलेल्या कागदपत्राची पाहणी केली असता असे दिसून आले की, तक्रारदाराने सदनिका नं. ए 406, 535 चौ.फुट विरुध्दपक्षाकडून खरेदी करण्याचा करार केला त्यानुसार सदनिकेची किंमत रु. ७,५१,०००/- करारानुसार ठरली होती. ज्यापैकी तक्रारदाराने एकूण रु. १,८७,७५०/- या सदनिकेच्या बुकींगसाठी विरुध्दपक्ष यांना दिले. सदरील रक्कम विरुध्दपक्ष यांना मिळाल्याचे दाखल दस्तावरुन दिसून येते. विरुध्दपक्षाने सदरील फ्लॅट 2 वर्षाच्या कालावधीत पूर्ण न करता अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असल्याचे दिसून येते. त्यावरुन मा. मंचास असे वाटते की, विरुध्दपक्षाने स्वतःच्या वैयक्तीक फायद्याकरीता तक्रारदाराच्या रक्कमेचा उपयोग घेतला. त्यामुळे तक्रारदारास सहाजिकच मानसीक व शारिरीक त्रास सहन करावा
ग्राहक तक्रार क्रमांकः 306/2014
..4..
लागला. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन सेवेत प्रचंड त्रुटी केलेल्या आहेत.
7. वरील विवेचनावरुन तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला रु. १,८७,७५०/- (एक लाख सत्याहंशी हजार सातशे पन्नास फक्त) दि. २०.३.२०१३ पासुन द.सा.द.शे. 10 टक्के व्याजासह परत करावी.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास मानसीक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. ५,०००/- (अक्षरी रु. पांच हजार फक्त) व या तक्रारीचा खर्च रु. २,०००/- (रु. दोन हजार फक्त्) द्यावे व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
- आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामुल्य द्यावी.
दि. 17/06/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष