// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 298/2014
दाखल दिनांक : 30/12/2014
निर्णय दिनांक : 03/03/2015
संतोष पी. क्षीरसागर, तर्फे अधिकारपत्र धारक
श्री. गजानन सुखदेवराव येवतकर
रा. अंजनगाव बारी,
ता.जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
राणा लॅन्डमार्क प्रा.लि.
तर्फे संचालक, योगेश नारायणराव राणा
लक्ष्मीनारायण निवास, कॅम्प, अमरावती
ब्रॅंच ऑफीस – राजा कॉम्पलेक्स, दुसरा माळा
राणा नगर, कॉंग्रेस नगर रोड, अमरावती
ह.मु. भगीरथ अपार्टमेंट, प्लॉट क्र. 3 विंग – बी,
भारत नगर चोक्, अमरावती रोड,
नागपुर : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : स्वतः
विरुध्दपक्ष तर्फे : एकतर्फा आदेश
ग्राहक तक्रार क्रमांकः 298/2014
..2..
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 03/03/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याने विरुध्दपक्षा सोबत दि. ३१.१२.२०१२ रोजी करार केला होता. ज्या अंतर्गत विरुध्दपक्ष हा मौजा कठोरा ता. जि. अमरावती येथील शेत सर्व्हे क्र. 58/1 या जागेवर श्री. लक्ष्मी नारायण राणा रेसिडेंसी ही इमारत बाधणार होता व ज्यातील सदनिका क्र. 204 क्षेत्रफळ 535 स्के.फुट तक्रारदारास विकण्याचे विरुध्दपक्षाने कबुल केले होते. सदनिका रु. ८,२५,०००/- होती ज्यापैकी रु. २,०६,२०५/- हे धनादेश क्र. ९४९६९६ दि. २२.११.२०१२ ला विरुध्दपक्ष यांना या सदनिकेच्या रकमेपैकी किंमत म्हणून दिली होती. सदनिकेचे बांधकाम हे करारनाम्यात नमुद केल्याप्रमाणे 2 वर्षात पुर्ण करुन त्याचा ताबा तक्रारदार यांना द्यावयाचा होता.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे सदनिकेची उर्वरित किंमत ही करारनाम्यात नमुद केल्याप्रमाणे विरध्दपक्ष यांना द्यावयाची होती. परंतु करारनाम्यानंतर 2 महिन्याने तो ज्यावेळी
ग्राहक तक्रार क्रमांकः 298/2014
..3..
सदर जागेवर गेला असता त्यास त्या ठिकाणी कोणतेही बांधकामाची सुरुवात झाल्याचे दिसले नाही. तक्रार दाखल करेपर्यंत विरुध्दपक्षाने सदनिकेचे बांधकाम सुरु केले नव्हते. विरुध्दपक्षाने तक्रारदारास दि. ३०.६.२०१३ रोजी संबंधीत पत्र देवून असे कळविले की, सदनिका घ्यावयाची नसल्यास तो 10 टक्के व्याज दराने घेतलेली रक्कम परत करण्यास तयार आहे. ती रक्कम विरुध्दपक्षाने परत केली नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि. १५.९.२०१४ रोजी विरुध्दपक्ष यांना पत्र/नोटीस दिली. त्यानंतरही विरुध्दपक्षाने तक्रारदाराकडून घेतलेली रक्कम परत केली नाही किंवा सदनिकेचे बांधकाम पूर्ण करुन त्याचा ताबा तक्रारदाराला दिला नाही. विरुध्दपक्षाच्या या कृतीमुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झाला. सदनिके संबंधी घेतलेली रक्कम विरुध्दपक्ष हा स्वतःच्या फायद्यासाठी वापरीत आहे. विरुध्दपक्ष हा करारा प्रमाणे वागला नाही त्यामुळे तक्रारदारास आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास होत आहे त्यामुळे त्याने हा तक्रार अर्ज दाखल केला.
4. निशाणी 1 वरील दि. १२.२.२०१५ च्या आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज विरुध्दपक्षाच्या विरुध्द एकतर्फा चालविण्यात आला. विरुध्दपक्ष यांना या तक्रार अर्जाची नोटीस पाठविली असता ती Unclaimed या शे-यासह परत आली. तक्रारदाराने निशाणी 7
ग्राहक तक्रार क्रमांकः 298/2014
..4..
ला शपथपत्र दाखल केले त्यावरुन विरुध्दपक्षाच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
5. तक्रारदाराने निशाणी 8 ला त्याचा लेखी युक्तीवाद दाखल केला.
6. तक्रारदाराने तक्रार अर्जात ज्या बाबी नमूद केल्या त्या शाबीत करण्यासाठी निशाणी 2 सोबत दस्त दाखल केले. त्यावरुन असे दिसते की, विरुध्दपक्षाने तक्रारदारास श्री. लक्ष्मी नारायण राणा रेसिडेंसी येथील सदनिका क्र. 204 क्षेत्रफळ 535 स्के.फुट ही रु. ८,२५,०००/- विकण्याचा करार दि. ३१.१२.२०१२ रोजी केला होता व ज्यापैकी रु. २,०६,२०५/- तक्रारदाराकडून विरुध्दपक्ष यांना मिळाले होते ज्याबद्दल विरुध्दपक्षाने पावती दिलेली आहे. करारा प्रमाणे सदनिका बांधकाम 2 वर्षात पुर्ण करुन द्यावयाचे होते. तक्रारदाराने असे कथन केले की, तक्रार दाखल करे पर्यंत विरुध्दपक्षाने त्या जागेवर इमारतीचे बांधकाम सुध्दा सुरु केलेले नाही तसेच घेतलेली रक्कम त्यास परत सुध्दा केली नाही. तक्रारदाराचे हे कथन विरुध्दपक्षाने नाकारले नाही. सदरचे कथन शाबीत करण्यासाठी दस्त दाखल असल्याने तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेल्या बाबी हया स्विकारण्यात येतात.
ग्राहक तक्रार क्रमांकः 298/2014
..5..
7. तक्रारदाराकडून विरुध्दपक्ष यांना घेतलेली रक्कम रु. २,०६,२०५/- ही परत करावयास पाहिजे होती, परंतु त्यांनी ती परत न करता स्वतः जवळ ठेवून घेवून आर्थिक लाभ मिळविला आहे तसेच विरुध्दपक्ष हा करारनाम्या प्रमाणे वागला नाही त्यामुळे खचितच तक्रारदाराला आर्थिक नुकसान सहन करावे लागले तसेच मानसिक त्रास त्यास झालेला आहे. विरुध्दपक्षाची एकंदर कृती ही सेवेतील त्रुटी ठरते त्यामुळे खालील आदेशा प्रमाणे तक्रार ही अंशतः मंजूर करण्यात येते.
अंतीम आदेश
- तक्रारदारांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला रु. २,०६,२०५/- त्यावर दि. २२.११.२०१२ पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत द्यावे.
- विरुध्दपक्ष यांनी नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार यांना रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रु. 1,000/- द्यावे.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 03/03/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष