// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 108/2015
दाखल दिनांक : 05/05/2015
निर्णय दिनांक : 02/06/2015
रझीक अहमद शेख नासीर
वय 38 वर्षे, धंदा – नोकरी तर्फे पॉवर ऑफ अॅटार्नी
विनायकराव गुलाबराव पाटील
रा. केवल कॉलनी, शेगांव रोड, अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
श्री योगेश नारायणराव राणा (डायरेक्टर)
राणा लॅंड मार्कस् प्रा.लि.,
रा. लक्ष्मी नारायण निवास कॅम्प,
आयएमऐ हॉल समोर, अमरावती
दुसरा पत्ता
श्री योगेश नारायणराव राणा (डायरेक्टर)
राणा लॅंड मार्कस् प्रा.लि.,
रा. भगीरथ विहार यामुन, फ्लॅट नं. 3,
ग्राऊन्ड फ्लोअर बी-विंग रविनगर चौक समोर,
भारत नगर चौक, एसबीआय समोर, अमरावती रोड,
नागपूर : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. भंडारी
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 02/06/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 108/2015
..2..
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याला त्याच्या व कुटुंबियांसाठी सदनिका घ्यावयाची होती. विरुध्दपक्ष हे सदनिका बांधकामाबाबत प्रतिष्ठीत आहे व त्याने त्यासाठी ग्राहकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचे व सदनिका बांधून देण्याबाबत एक सेमीनार घेतले होते. विरुध्दपक्ष हे शेगांव टाऊनशिप येथील श्री लक्ष्मीनारायण राणा रेसिडेन्सी या नावाने बांधकाम करणार होते व त्याची माहिती त्याने तक्रारदाराला दिली. त्यानुसार तक्रारदाराने या स्कीम मध्ये सदनिका नं. ई 407, 535 चौ.फुट विरुध्दपक्षाकडून खरेदी करण्याचा करार दि. १.६.२०१२ रोजी केला होता. सदनिकेची किंमत रु. ८,५१,०००/- करारानुसार ठरली होती. ज्यापैकी तक्रारदाराने दि. १.६.२०१२ रोजी धनादेशा व्दारे रु. २,००,०००/- व दि. १२.९.२०१२ रोजी नगदी रु. १२,७५०/- या सदनिकेच्या बुकींगसाठी विरुध्दपक्ष यांना दिले होते, त्याबद्दल विरुध्दपक्षाने ते मिळाल्याबद्दल तक्रारदाराला पावत्या दिल्या होत्या.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष यांनी दि. १.६.२०१२ पासुन सदनिकेचे बांधकाम 2 वर्षात पुर्ण करुन त्याचे
ग्राहक तक्रार क्रमांकः 108/2015
..3..
खरेदी खत तक्रारदाराला करुन द्यावयाचे होते. तक्रारदाराने वेळोवेळी ताबा व खरेदीखत बाबत विरुध्दपक्षाकडे चौकशी केली परंतु विरुध्दपक्षाने बांधकाम पूर्ण करुन सदनिकेचा ताबा देणे शक्य नाही असे सांगुन दि. १०.१०.२०१४ रोजी तक्रारदाराने या सदनिके बाबत दिलेली रक्कम रु. २,१२,७५०/- धनादेशाव्दारे तक्रारादारास परत केली. तक्रारदाराने हा धनादेश बॅंकेत जमा केला असता तो वटविल्या गेला नाही. तक्रारदाराचे कथना प्रमाणे यावरुन विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदाराने दि. १७.२.२०१५ रोजी विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठवून त्याने विरुध्दपक्षास दिलेले रु. २,१२,७५०/-, झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु. ५०,०००/- त्यावर १८ टक्के व्याज दर व रु. ३,०००/- नोटीस खर्चासह तक्रारदारास परत मिळावे अशी मागणी केली. सदरची नोटीस नॉट क्लेम या शे-यासह परत आल्याने तक्रारदाराने हा तक्रार अर्ज विरुध्दपक्षा विरुध्द दाखल केला त्यात त्यांनी अशी मागणी केली की, विरुध्दपक्षास दिलेली सदनिकेची बुकींग रक्कम रु. २,१२,७५०/- त्यावर दि. १.६.२०१२ पासुन १८ टक्के व्याज व रु. २,००,०००/- नुकसान भरपाईसह विरुध्दपक्षाने द्यावे.
ग्राहक तक्रार क्रमांकः 108/2015
..4..
4. तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. भंडारी यांचा प्राथमिक युक्तीवाद ऐकला. त्यावरुन खालील मुद्दा उपस्थित करण्यात आला.
मुद्दा उत्तर
- तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे का ? नाही
- आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा ः-
5. प्राथमिक युक्तीवाद दरम्यान तक्रार अर्ज व त्यासोबत दाखल केलेले दस्त पाहिल्यानंतर या मंचाने तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहक कसा होतो अशी विचारणा तक्रारदाराचे अॅड. श्री. भंडारी यांना केली. त्यांनी याबाबत असे कथन केले की, विरुध्दपक्षाने दिलेला धनादेश हा वटविल्या गेला नाही व त्यामुळे तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे.
6. तक्रारदाराने तक्रार अर्जात असे नमूद केले आहे की, त्याने जेव्हा वारंवार विरुध्दपक्षाकडे सदनिकेचा ताबा व खरेदीखत करुन देण्याबाबत चौकशी केली असतांना विरुध्दपक्षाने सदनिकेचे बांधकाम पूर्ण करुन ताबा देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली व त्यामुळे विरुध्दपक्षाने रु. २,१२,७५०/- चा धनादेश दि. १०.१०.२०१४ रोजी तक्रारदाराला दिला. याचा अर्थ तक्रारदार व
ग्राहक तक्रार क्रमांकः 108/2015
..5..
विरुध्दपक्ष यांचे मध्ये सदनिके संबंधी जो करार झाला होता तो तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून रु. २,१२,७५०/- चा धनादेश स्विकारल्यामुळे संपुष्टात आला आहे. त्यानंतर विरुध्दपक्ष याला सदनिके संबंधी कोणताही व्यवहार हा तक्रारदारा सोबत करण्याचे बाकी राहिले नव्हते. अशा परिस्थितीत तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून स्विकारलेला धनादेश हा स्वइच्छेने स्विकारला असल्याने व करार संपुष्टात आल्याने तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत नाही. कारण विरुध्दपक्षाला कराराप्रमाणे कोणतीही कार्यवाही करावयाची नसुन कोणतीही सेवा तक्रारदाराला द्यावयाची नाही.
7. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्षाने दिलेला धनादेश हा अनादरीत झालेला आहे अशा परिस्थितीत तक्रारदार हा विरुध्दपक्षा विरुध्द योग्य त्या न्यायालयात योग्य त्या कायद्या अंतर्गत कारवाई करु शकतो.
8. तक्रारदाराने या तक्रार अर्जात अशी विनंती केली आहे की, विरुध्दपक्षाने त्यास रु. २,१२,७५०/- त्यावर १८ टक्के व्याजासह तसेच नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च विरुध्दपक्ष यांनी द्यावा. त्यांनी अशी विनंती केली नाही की, विरुध्दपक्षाने करारात ठरल्याप्रमाणे कार्यवाही करावी. वरील
ग्राहक तक्रार क्रमांकः 108/2015
..6..
विवेचनावरुन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत नसल्याने तक्रार अर्ज या मंचात चालु शकत नाही. सबब तो खालील आदेशा प्रमाणे रद्द करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो.
- खर्चा संबंधी आदेश नाही.
- आदेशाची प्रत विनामुल्य द्यावी.
दि. 02/06/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष