// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 275/2014
दाखल दिनांक : 10/12/2014
निर्णय दिनांक : 17/06/2015
सौ. रंजना कमलदास तेलग
वय 40 वर्षे, धंदा – नोकरी
रा. व्दारा अजय सोनटक्के जि.प. शाळेजवळ
साई नगर दर्यापूर
ता. दर्यापुर जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
श्री योगेश नारायणराव राणा
राणा लॅंड मार्कस् प्रा.लि.,
कार्यालय राणा कॉम्पलेक्स, दुसरा माळा,
राणा नगर, कॉंग्रेस नगर रोड, अमरावती
ता.जि. अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. मेटानकर
विरुध्दपक्ष तर्फे : एकतर्फा आदेश
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 18/06/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 275/2014
..2..
मा. रा.कि. पाटील, सदस्य
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष हा राणा लॅंड मार्कस् या नावाने बांधकाम व्यवसाय करतो. तक्रारदारास सदनिका खरेदी करावयाची असल्याने त्याने विरुध्दपक्षाकडे जाऊन विरुध्दपक्ष बांधित असलेल्या शेगांव टाऊनशिप येथील श्री लक्ष्मीनारायण राणा रेसिडेन्सी यातील सदनिका क्रमांक 410 मध्ये 535 चौ.फुट रु. ७,५१,०००/- ला खरेदी करण्याचा करार विरुध्दपक्षा सोबत केला, ज्या करारनाम्यातील शेडुल ‘ए’ व ‘बी’ मध्ये या सदनिकेचे विवरण दिलेले आहे. तक्रारदाराने दि. २८.५.२०१२ रोजी रु. १,२०,०००/- पावती क्र. 1135 नुसार विरुध्दपक्ष यांना देवून सदनिकेची नोंदणी केली व यानंतर विरुध्दपक्षाने दि. ११.६.२०१२ रोजी अलाटमेंट लेटर तक्रारदाराला दिले.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष यांनी सदनिकेचे बांधकाम 2 वर्षात पुर्ण करुन त्याचे खरेदी खत तक्रारदाराला करुन द्यावयाचे होते. खरेदी खताबद्दल त्याने विरुध्दपक्ष यांचेकडे विनंती केली. परंतु ते करुन देण्यात आले नाही.
ग्राहक तक्रार क्रमांकः 275/2014
..3..
तक्रारदाराने शेवटी विरुध्दपक्ष यांना दि. ३.११.२०१४ रोजी नोटीस देवून दिलेले रु. १,२०,००/- व नुकसान भरपाईची मागणी केली. नोटीस मिळूनही विरुध्दपक्षाने पुर्तता केलेली नाही. विरुध्दपक्षाची ही कृती अनुचित व्यापार प्रथा व सेवेतील त्रुटी झाल्याने तक्रारदार यास मानसिक तसेच शारिरीक त्रासही झालेला आहे यासाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून ही तक्रार दाखल करण्यात आली.
4. विरुध्दपक्ष यांना नोटीस काढल्या नंतर ती न बजावता परत आली. त्यानंतर विरुध्दपक्षा विरुध्द जाहीर नोटीस काढण्यात आली. जाहीर नोटीस प्रसिध्द होऊनही विरुध्दपक्ष हजर न झाल्याने दि. १०.३.२०१५ च्या आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज विरुध्दपक्षाच्या विरुध्द एकतर्फा चालविण्यात आला.
5. तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. मेटानकर यांचा युक्तीवाद ऐकला.
6. तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेल्या बाबी शाबीत करण्यासाठी निशाणी 2 ला दस्त दाखल केले. त्यानुसार निशाणी 2/1 पावती क्र. 1135 रु. १,२०,०००/- दि. २८.५.२०१२ रोजी तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना सदनिका क्रमांक 410 नारायण रेसिडन्सी यांच्या किंमती पैकी विरुध्दपक्ष यांना दिल्याचे दिसते. तसेच विरुध्दपक्ष यांनी वाटप पत्र दिले असून ते तक्रारी
ग्राहक तक्रार क्रमांकः 275/2014
..4..
सोबत दाखल केले. त्यावरुन असे दिसते की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास श्री लक्ष्मी नारायण रेसिडन्सी या नावाने बांधण्यात येणा-या इमारती मध्ये सदनिका क्रमांक 410 तक्रारदारास विकण्याचा व्यवहार केला. यावरुन हे शाबीत होते की, सदनिकेचे वाटप पत्र देवून व सदनिकेची काही रक्कम घेवूनही बांधकाम सुरु न करता त्याचा वापर विरुध्दपक्ष यांनी स्वतःच्या फायद्यासाठी करुन घेतलेला आहे व त्याची ही कृती सेवेत त्रुटी होते.
7. तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेल्या बाबी व त्याच्या पृष्टयार्थ दाखल केलेले दस्त विचारात घेता असा निष्कर्ष काढण्यात येतो की, विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रुटी केली आहे. ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतर व करारनामा केल्यानंतर मुदतीत काम पूर्ण न करणे अथवा काम सुरुच न करणेही कृती विरुध्दपक्ष यांनी केलेली असल्याने तक्रारदारास सहाजिकच मानसिक त्रास सहन करावा लागला व त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष यांची येते. तक्रारदाराने जरी फार मोठया रक्कमेची मागणी नुकसान भरपाई म्हणून केली असली तरी ती मंजूर करणे कसे योग्य आहे याबद्दल समाधानकारक पुरावा किंवा कथन केलेले नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार हा रु. ५,०००/-
ग्राहक तक्रार क्रमांकः 275/2014
..5..
मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु. २,०००/- मिळण्यास पात्र होतो असा निष्कर्ष काढण्यात येतो.
8. वरील विवेचनावरुन तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला रु. १,२०,०००/- (अक्षरी रु. एक लाख विस हजार फक्त) दि. २८.५.२०१२ पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाच्या आत परत करावी.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास मानसीक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. ५,०००/- (अक्षरी रु. पांच हजार फक्त) व या तक्रारीचा खर्च रु. २,०००/- (अक्षरी रु. दोन हजार फक्त) द्यावे व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
- आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामुल्य द्यावी.
दि. 18/06/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष