जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, अमरावती
ग्राहक तक्रार क्र.241/2014
दाखल दिनांक : 13/11/2014
निर्णय दिनांक : 25/02/2015
दिपक केशवराव चिंचे, :
वय 45, व्यवसाय – नोकरी, :
रा. के.एन.गोराटे, लक्ष्मी नगर, : .. तक्रारकर्ता..
व्ही.एम. व्ही. रोड, :
विरुध्द
योगेश नारायणराव राणा, :
- , राणा लॅन्डमार्कस प्रा.लि. : ..विरुध्दपक्ष...
वय 40 वर्षे, धंदा – व्यापार, :
लक्ष्मी नारायण निवास, कॅम्प, :
अमरावती, ता.जि.अमरावती. :
गणपूर्ती : 1) मा.श्री.मा.के.वालचाळे, अध्यक्ष
2) मा.श्री.रा.कि.पाटील, सदस्य
तक्रारकर्त्यातर्फे : अॅड.श्री.पुरोहीत विरुध्दपक्षातर्फे : एकतर्फी
: न्यायनिर्णय :
( दिनांक 25/02/2015 )
मा.श्री.मा.के.वालचाळे, अध्यक्ष यांचे नुसार :-
1.. तक्रारकर्त्याने सदरचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत कलम 12 अन्वये दाखल केलेला आहे.
..2..
ग्रा.त.क्र.241/2014
..2..
तक्रारकर्ता याच्या कथनाप्रमाणे विरुध्दपक्ष यांनी श्री लक्ष्मी नारायण रेसिडन्सी या नांवाने शेगांव, कठोरा टाऊनशिप, अमरावती,जि.अमरावती येथे टाऊनशिप प्रोजेक्ट सुरु केला होता व त्यातील सदनिका क्रमांक एफ-109 रु.8,51,000/- या किंमतीत तक्रारकर्ता याने खरेदी करण्याचा करार विरुध्दपक्षासोबत केला होता. या सदनिकेच्या किंमतीपैकी रु.2,12,000/- तक्रारकर्ता याने दि.25/05/2012 रोजी विरुध्दपक्ष यांना दिले होते, ज्याबद्दलची पावती विरुध्दपक्ष यांनी दिली होती. तसेच विरुध्दपक्ष यांनी दिनांक 21/02/2013 रोजी तक्रारकर्ता याच्या सोबत केलेल्या कराराप्रमाणे दोन वर्षाच्या आत सदनिकेचे बांधकाम पूर्ण करुन त्याचा ताबा तक्रारकर्त्याला द्यावयाचा होता. तक्रारकर्ता याच्या कथनाप्रमाणे तो कराराप्रमाणे राहीलेली रक्कम देण्यास तयार होता, परंतू विरुध्दपक्ष यांनी बांधकाम सुरु केलेले नव्हते व याबद्दल तक्रारकर्ता याने विरुध्दपक्षाला वेळोवेळी विचारणा केली होती. शेवटी दिनांक 11/10/2014 रोजी तक्रारकर्ता याने विरुध्दपक्षाला नोटीस पाठवून विरुध्दपक्ष यांनी करार करुन तसेच रक्कम घेवून
..3..
ग्रा.त.क्र.241/2014
..3..
सदनिकेचे बांधकाम हे सुरु केलेले नाही व ती रक्कम स्वतःच्या फायदयासाठी वापरत आहे. विरुध्दपक्ष यांनी कराराचा भंग करुन अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. याबद्दल तक्रारकर्ता याने ही तक्रार दाखल केली.
2. विरुध्दपक्ष यांना रजिस्टर्ड पोस्टाने पाठविलेली नोटीस ही Not claimed या शे-यासह परत आली. त्यानंतर तक्रारकर्ता याने निशाणी 10 ला शपथपत्र दाखल करुन त्यात असे नमूद केले की, विरुध्दपक्ष हे प्रकरणातील नमूद पत्यावर कायमचा राहत आहे. यावरुन दिनांक 02/01/2015 च्या आदेशाप्रमाणे विरुध्दपक्ष यांचे विरुध्द हा तक्रार अर्ज एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यांत आला.
3. तक्रारकर्त्यातर्फे अॅड.श्री.पुरोहीत यांचा युक्तीवाद ऐकला.
4. तक्रारकर्ता याने तक्रार अर्जात नमूद केलेल्या बाबी शाबीत करण्यासाठी निशाणी 2 ला दस्त दाखल केले. त्यानुसार तक्रारकर्ता याने रु.2,12,000/- विरुध्दपक्ष यांना सदनिका क्रमांक एफ-109, कठोरा टाऊनशिप याच्या किंमती पैकी विरुध्दपक्ष यांना दिल्याचे दिसते व त्यासाठी त्याबद्दल विरुध्दपक्ष यांनी पावती
..4..
ग्रा.त.क्र.241/2014
..4..
दिलेली आहे. तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता याच्या सोबत केलेल्या करारानाम्याची प्रत जी तक्रारी सोबत दाखल केले त्यावरुन असे दिसते की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यास कठोरा टाऊनशिप येथे बांधण्यांत येणा-या इमारतीमधे सदनिका क्रमांक एफ-109 तक्रारकर्ता यास विकण्याचा सौदा केला होता. तक्रारकर्ता याने विरुध्दपक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठवून फ्लॅटचे बांधकाम करुन दिल्यास उर्वरीत रक्कम तो देण्यास तयार आहे. याची कोणतीही दखल विरुध्दपक्ष यांनी घेतलेली दिसून येत नाही. यावरुन हे शाबीत होते की, विरुध्दपक्ष यांनी आजपर्यंत बांधकाम सुरु केलेले नाही. करारनाम्याप्रमाणे दिनांक 21/02/2013 पासून दोन वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण करुन सदनिकेचा ताबा तक्रारकर्ता यास द्यावयाचा होता. यावरुन हे शाबीत होते की, करार करुनही व सदनिकेची काही रक्कम घेवूनही बांधकाम सुरु न करता त्याचा वापर विरुध्दपक्ष यांनी स्वतःच्या फायदयासाठी करुन घेतलेला आहे व त्याची ही कृती सेवेत त्रुटी होते.
5. तक्रारकर्ता याने जरी विरुध्दपक्ष यांना रु.2,12,000/- दिले व याबद्दल निशाणी 2/3 ला दाखल असलेल्या विरुध्दपक्ष
..5..
ग्रा.त.क्र.241/2014
..5..
यांनी दिलेल्या पावती क्रमांक 985 वरुन त्यांनी रु.2,12,000/- विरुध्दपक्ष यांना दिल्याचे शाबीत होते.
6. तक्रारकर्ता याने तक्रार अर्जात नमूद केलेल्या बाबी व त्याच्या प्रृष्टयार्थ दाखल केलेले दस्त विचारात घेता असा निष्कर्ष काढण्यांत येतो की, विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रुटी केली आहे. ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतर व करारनामा केल्यानंतर मुदतीत काम पूर्ण न करणे अथवा काम सुरुच न करणे ही कृती विरुध्दपक्ष यांनी केलेली असल्याने तक्रारकर्ता यास सहाजिकच मानसिक त्रास सहन करावा लागला व त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष यांची येते. तक्रारकर्ता याने जरी फार मोठया रकमेची मागणी नुकसान भरपाई म्हणून केली असली तरी ती मंजूर करणे कसे योग्य आहे याबद्दल समाधानकारक पुरावा किंवा कथन केलेले नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता हा रु.10,000/- मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्यास पात्र होतो असा निष्कर्ष काढण्यांत येतो.
7. वरील विवेचनावरुन तक्रार ही खालील आदेशाप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यांत येतो.
..6..
ग्रा.त.क्र.241/2014
..6..
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यास रु.2,12,000/- त्यावर दिनांक 25/05/2012 पासून द.सा.द.शे.9% व्याज दराने या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत परत करावी.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यास मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- द्यावेत.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यास या तक्रारीचा खर्च रु.2,000/- द्यावेत. स्वतःचा खर्च स्वतः सहन करावा.
- उभय पक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यांत याव्यात.
दि.25/02/2015 (रा.कि.पाटील ) (मा.के.वालचाळे)
सदस्य अध्यक्ष