Maharashtra

Kolhapur

CC/10/218

A) Shri Krishnarao Shanakarrao Desai B) Sou.Pushpmala Krishnrao Desai - Complainant(s)

Versus

Yeshwant Patil Nagari Sah Pat Sanstha Maryadit, - Opp.Party(s)

P.K.Patil

24 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/218
1. A) Shri Krishnarao Shanakarrao Desai B) Sou.Pushpmala Krishnrao Desair/o.'Yashoda Niwas', Gargoti, Tal.Bhudargad, Kolhpaur.2. Shri Mangesh Krishnarao Desai through Power of Attorney-Krishnarao Shankarrao Desair/o. "Yashoda Niwas", Gargoti, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Yeshwant Patil Nagari Sah Pat Sanstha Maryadit, At Post Gargaoti, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur2. Shri Bal Alias Anandrao Vitthal Desai, Chairmanr/o.At Post Gargoti, J.P.Naik Colony, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur3. Shri Pandurang Dhondiba Killedar, Vice Chairmanr/o.At Post Gargoti, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur4. Shri Maruti Tukaram Desai, Directorr/o.At Post Sonali, Gargoti, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur5. Shri Sunil Satappa Mangale, Directorr/o. At Khanapur, Post Gargoti, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur6. Shri Vishwasrao Dattajirao Sarnobat, Directorr/o.At Padkhambe, Post Vengrul, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur7. Shri Dattatray Hari Powar, Directorr/o. At Akurde, Post-Gorgoti, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur8. Shri Madhav Ganpati Sonar, Directorr/o. At Madilage Khurd, Post Madilage, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur9. Shri Ramchandra Namdeo Desai, Directorr/o.At Girgaon, Post Gargoti, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur10. Sou.Sarita Sanjay Patil, Directorr/o. At Pal, Post Gargoti, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur11. Sou.Bhagyashri Vishwas Patil, Directorr/o. At Post Karadwadi, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur12. Shri Sayaji Tukaram Desai, Managerr/o. At Post Mhasave, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :P.K.Patil, Advocate for Complainant P.K.Patil, Advocate for Complainant
Manager for himself and OP Sanstha

Dated : 24 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.24.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 3 व 12 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी व सामनेवाला संस्‍थेच्‍या मॅनेजर यांनी युक्तिवाद केला. उर्वरित सामनेवाले गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे कॉल डिपॉझिट व मुदत बंद ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
1.
362
15000/-
01.07.1198
2.
1048
27765/-
17.07.2002

 
(3)        सदर ठेवी मागणीनुसार परत करण्‍याचे सामनेवाला यांनी अभिवचन दिले होते. सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. त्‍यानंतर सामनेवाला यांनी जिकीरीने तक्रारदार क्र.1 यांचे नांवे असलेल्‍या ठेवीपोटी रुपये 4,460/- तक्रारदारांना अदा केलेले आहेत. त्‍यानंतर तक्रारदारांनी दि.02.01.2004 व दि.05.12.2007 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे व इतर अनुषंगिक हुकूम तक्रारदारांच्‍या नांवे व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, ठेव मागणी अर्ज व वटमुखत्‍यापत्र इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सामनेवाला भुदरगड संस्‍थेवर प्रशासक नियुक्‍ती झाली असलेने ठेवीदार व कर्जदार यांचा गैरविश्‍वास निर्माण झालेने पतसंस्‍थांचे व्‍यवहार ठप्‍प आहेत. सामनेवाला संस्‍थेच्‍या कर्जदारांकडून कर्ज वसुलीसाठी सहकार न्‍यायालयामध्‍ये म.स.कायदा कलम 91 खाली कर्ज वसुलीचे दावे चालू आहेत. कर्ज वसुली होताच तक्रारदारांची ठेव रक्‍कम अदा करत आहेत. तक्रारदारांचे रुपये 42,765/- एकाचवेळी देणे सद्याच्‍या परिस्थितीमध्‍ये अडचणीचे आहे. प्रतिमहिना रुपये 1,000/- अदा करत आहोत. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(6)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 11 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.12 हे संस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांची केवळ संयुक्तिक‍ जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(7)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता ठेव पावती क्र.001048 ही  मुदत बंद ठेव आहे व तिची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तसेच, तक्रारदारांनी कॉल डिपॉझिट पावती क्र.362 च्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कम ठेवली आहे. म्‍हणजेच, तक्रारदारांनी सदर पावत्‍यांची रक्‍कम मागणी करताच सामनेवाला यांनी रक्‍कम व्‍याजासह देणे आवश्‍यक होते. तथापि, तसे सामनेवाला यांनी केलेले नाही. तक्रारदार यांनी सदर कॉल डिपॉझिट पावत्‍यांची रक्‍कम ही त्‍यांनी प्रथमत: सामनेवाला यांचेकडे दि. 02.01.2004 रोजीच्‍या अर्जाने मागणी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर कॉल ठेव रक्‍कम ठेव तारखेपासून 02.01.2004 रोजीपर्यन्‍त ठेव पावत्‍यांवर नमूद म्‍हणजेच द.सा.द.शे.17 टक्‍के व्‍याजासह व त्‍यानंतर द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजाने मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.12 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना कॉल डिपॉझिट पावती क्र.362 ची रक्‍कम रुपये 15,000/- (रुपये पंधरा हजार फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर ठेव तारखेपासून दि. 02.01.2004 रोजीपर्यन्‍त द.सा.द.शे.17 टक्‍के व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.12 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मुदत बंद पावती क्र.001048 ची रक्‍कम रुपये 27,765/- (रुपये सत्‍तावीस हजार सातशे पासष्‍ट फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर ठेव पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.12 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER