Maharashtra

Solapur

CC/11/33

Prabhkar vishavnath Bhnage - Complainant(s)

Versus

Yeshvanta kisanshinde and oter 12 - Opp.Party(s)

Kulkarni

09 May 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/11/33
1. Prabhkar vishavnath BhnageBagne building dattapeth Karamala Tal KaramalaSolapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Yeshvanta kisanshinde and oter 12S.M.Shanakarrao Mohite patil sahakari patsanstha barloni Tal. Madha.SolapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :Kulkarni, Advocate for Complainant

Dated : 09 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

          

                                                                  तक्रार आदेश दिनांक : 09/05/2011.   

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 33/2011.         तक्रार दाखल दि. 01/02/2011.

 

1. श्री. प्रभाकर विश्‍वनाथ भणगे, वय 59 वर्षे, व्‍यवसाय : व्‍यापार.

2. सौ. अरुणा प्रभाकर भणगे, वय 57 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम.

3. श्री. हेरंभ नारायण करंदीकर, वय 33 वर्षे, व्‍यवसाय : नोकरी.

4. सौ. पल्‍लवी हेरंभ करंदीकर, वय 31 वर्षे, व्‍यवसाय : व्‍यापार,

   सर्व रा. 20/57, भणगे बिल्‍डींग, दत्‍त  पेठ, करमाळा,

   ता. करमाळा, जि. सोलापूर.                                                तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 54/2011.          तक्रार दाखल दि. 11/02/2011.

 

श्री. आबासाहेब दिगंबर जाधव, वय 43 वर्षे, व्‍यवसाय : नोकरी,

रा. मु.पो. कामोने, ता. करमाळा, जि. सोलापूर.                                    तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. सहकारी महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी

   पतसंस्‍था मर्या., बारलोणी, (शाखा : करमाळा), ता. माढा, जि. सोलापूर.

2. श्री. यशवंत किसन शिंदे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. मु.पो. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. (चेअरमन, सहकारी

   महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., बारलोणी)

3. श्री. व्‍यंकटेश (नाना) शिवाजी पाटील, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : व्‍यापार, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

4. श्री. पोपट डबरु गुंजाळ, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. (व्‍हा. चेअरमन, सहकारी

   महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., बारलोणी)

5. श्री. दिनकर कृष्‍णा मोरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

6. श्री. बाबासाहेब सौदागर आवताडे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.                        

7. बाबू भवानजी गुंजाळ, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.                           

8. श्री. श्रीरंग संभू मोरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

9. श्री. सौदागर श्रीपती चव्‍हाण, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.                            विरुध्‍द पक्ष

 

10. श्री. रामलिंग बाबू ठोंबरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

11. सौ. अहिल्‍यादेवी सदाशिव हनवते, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

12. मॅनेजर, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी

    पतसंस्‍था मर्या., बारलोणी, शाखा : करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर.

13. प्रशासक मंडळ, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी

    सहकारी पतसंस्‍था मर्या., बारलोणी, (शाखा : करमाळा),

    ता. करमाळा, जि. सोलापूर.                               विरुध्‍द पक्ष

 

        गणपुर्ती  :-   सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                  सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

 

 

 

            तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  पी.पी. कुलकर्णी

            विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे गैरहजर / एकतर्फा

 

आदेश

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या दोन्‍ही तक्रारीमधील विषय, उपस्थित विवाद, विरुध्‍द पक्ष इ. मध्‍ये साम्‍य असल्‍यामुळे त्‍यांचा एकत्रित निर्णय देण्‍यात येत आहे.

 

2.    प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्‍यात असा आहे की, त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या करमाळा शाखेमध्‍ये खालीलप्रमाणे रक्‍कम गुंतवणूक केली असून त्‍याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

ग्राहक तक्रार क्र. 33/2011 मध्‍ये :-

 

ठेवीदाराचे नांव

ठेव रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

प्रभाकर विश्‍वनाथ भणगे

50,000

0026268

13/8/08

13/9/2009

14

सौ. अरुणा प्रभाकर भणगे

65,750

0026153

10/11/08

10/12/2009

14

सौ. पल्‍लवी हेरंब करंदीकर

25,000

0026291

27/8/08

27/9/2009

14

हेरंब नारायण करंदीकर

25,000

0026290

27/8/08

27/9/2009

14

 

 

 

 

 

 

 

 

ग्राहक तक्रार क्र. 54/2011 मध्‍ये :-

 

ठेवीदाराचे नांव

बचत खाते जमा रक्‍कम

खाते क्रमांक

रक्‍कम जमा अंतीम तारीख

व्‍याज दर

आबासाहेब दिगंबर जाधव

59,039

619

2/1/2010

--

 

3.    तक्रारदार यांनी वरीलप्रमाणे मुदत ठेव व बचत खात्‍याद्वारे रक्‍कम गुंतवणूक केलेली आहे. तकारदार यांना कौटुंबिक कारणास्‍तव व औषधोपचारासाठी ठेव रकमेची आवश्‍यकता होती आणि त्‍यांनी ठेव रकमेची मागणी केली असता, ठेव रक्‍कम देण्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी टाळाटाळ केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी अनुक्रमे प्रत्‍येकी रु.10,000/- व रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

 

4.    विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 13 यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्‍यात आले.

 

5.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                                 उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                               होय.

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?              होय.

3. काय आदेश ?                                      शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

6.    मुद्दा क्र. 1 ते 3 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष सहकार महर्षी शकंरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी या पतसंस्‍थेच्‍या करमाळा शाखेमध्‍ये मुदत ठेव पावती व बचत खात्‍याद्वारे रक्‍कम गुंतविल्‍याचे रेकॉर्डवर दाखल पावत्‍या व पासबुकावरुन निदर्शनास येते. ठेवीची मुदत पूर्ण झाल्‍यानंतर तक्रारदार यांनी व्‍याजासह ठेव रकमेची मागणी केली असता, विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून रक्‍कम परत करण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत असल्‍याची त्‍यांची प्रमुख तक्रार आहे.

 

7.    तक्रारदार यांनी पतसंस्‍थेच्‍या संचालकांची यादी रेकॉर्डवर दाखल केली असून त्‍याप्रमाणे त्‍यांना तक्रारीमध्‍ये विरुध्‍द पक्ष म्‍हणून समाविष्‍ठ करण्‍यात आलेले आहे. निर्विवादपणे, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष सहकार महर्षी शकंरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी या पतसंस्‍थेच्‍या करमाळा शाखेमध्‍ये मुदत ठेव पावती व बचत खात्‍यावर रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी ठेवीची मुदत पूर्ण झाल्‍यानंतर वेळोवेळी मागणी करुनही त्‍यांना ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍यात आलेली नाही. ठेवीदारांच्‍या मागणीनुसार ठेवीची रक्‍कम मुदत पूर्ण झाल्‍यानंतर परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल न केल्‍यामुळे त्‍यांना तक्रारदार यांची तक्रार मान्‍य आहे, या अनुमानास आम्‍ही येत आहोत. तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे बचत खात्‍यावरील व ठेव पावतीची रक्‍कम व्‍याजासह मिळविण्‍यास तक्रारदार हक्‍कदार ठरतात.

 

 

 

8.    विरुध्‍द पक्ष क्र.12 हे पतसंस्‍थेचे मॅनेजर आहेत. विरुध्‍द पक्ष क्र.13 हे प्रशासक आहेत. ठेव रक्‍कम परत करण्‍याची त्‍यांची वैयक्तिक जबाबदारी सिध्‍द झाल्‍याशिवाय त्‍यांना तक्रारदार यांची ठेव रक्‍कम परत करण्‍याविषयी जबाबदार धरता येणार नाही. शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

 

       1. विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्‍कम या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

 

ग्राहक तक्रार क्र. 33/2011 मध्‍ये :-  

 

ठेवीदार/

तक्रारदारांचे नांव

पावती क्रमांक

देय ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

प्रभाकर विश्‍वनाथ भणगे

0026268

50,000

13/8/08

14

सौ. अरुणा प्रभाकर भणगे

0026153

65,750

10/11/08

14

सौ.पल्‍लवी हेरंब करंदीकर

0026291

25,000

27/8/08

14

हेरंब नारायण करंदीकर

0026290

25,000

27/8/08

14

      

ग्राहक तक्रार क्र. 54/2011 मध्‍ये :-

 

     विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना बचत खाते क्र.619 मध्‍ये जमा असलेली रक्‍कम रु.59,039/- दि.2/1/2010 पासून द.सा.द.शे. 13 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

 

2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्‍येक तक्रारीमध्‍ये रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

 

 

(सौ. संजीवनी एस. शहा)                                (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                          ----00----

 (संविक/स्‍व/2511)

 


[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT