Fakirchand S/o Hanumant Sultane filed a consumer case on 25 Feb 2015 against Yesh Enterprises Prop in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/14/364 and the judgment uploaded on 17 Mar 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद
________________________________________________________________________________________________
ग्राहक तक्रार क्रमांक :-364/2014
तक्रार दाखल तारीख :-16/08/2014
निकाल तारीख :- 25/02/2015
________________________________________________________________________________________________
श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष
श्रीमती संध्या बारलिंगे,सदस्या श्री.के.आर.ठोले,सदस्य
________________________________________________________________________________________________
फकीरचंद हनुमंत सुलताने,
रा. लोणवाडी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद …….. तक्रारदार
विरुध्द
यश इंटरपा्रईजेस – प्रोपराईटर
वर्धवामन कॉम्प्लेक्स, मने रोड, सिल्लोड
जि.औरंगाबाद ........ गैरअर्जदार
________________________________________________________________________________________________
तक्रारदारातर्फे – स्वत:
गैरअर्जदारातर्फे – अॅड.नितेश ललवाणी
________________________________________________________________________________________________
निकाल
(घोषित द्वारा – श्रीमती. संध्या बारलिंगे, सदस्या)
तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्ये दाखल केली आहे.
तक्रारदाराने दि.17/2/14 रोजी ‘7.5 HP bear motor जय 3 फेज 5x 2 B पुलीसह’ या वर्णनाची मळण यंत्र चालवण्याकरीता रक्कम रु.14200/- इतक्या किंमतीत इलेक्ट्रिक मोटर विकत घेतली. सदर मोटारीच्या बिलावर मोटर एक वर्षाच्या आत जळाली तर एकदा बदलून मिळेल. त्याबदल्यात ग्राहकाने मोटर कंपनीला येण्याजाण्याचा खर्च व रक्कम रु.400/- द्यावेत, असे नमूद केलेले आहे. गैरअर्जदाराकडून घेतलेली मोटर दोन महिन्याच्या आत जळाली. गैरअर्जदाराने तक्रारदाराची मोटर बदलून दिली. बदललेली मोटर घेऊन मळण यंत्र शेतामध्ये नेल्यावर मोटर चालू होत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने पुन्हा गैर अर्जदाराकडे मोटर नेल्यावर त्याने बदलून देण्यास साफ नकार दिला. तक्रारदाराचा उदर निर्वाहाचा व्यवसाय सदर मोटारीवर अवलंबून आहे. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले आहे. गैरअर्जदाराने दुसर्या वेळेस जी मोटार दिली त्याचा नंबर बिलावर नमूद केलेला नाही. त्यामुळे वारंटी मध्ये बंद पडलेली मोटार बदलून मिळावी अशी तक्रारदाराने मागणी केली आहे आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
गैरअर्जदाराने त्याचा लेखी जवाब दाखल केला. त्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार मळणी यंत्र चालवतो. ज्या शेतामध्ये मळणी करण्यासाठी जातो तिथे जे इलेक्ट्रिकच्या तारा असतात त्या विद्युत प्रवाहावर मळणी यंत्र चालवतो. सदरील तारा उच्च दाबाच्या असल्यामुळे तक्रारदाराची मोटर जळाली आहे. दि.29/2/14 रोजी त्याच कंपनीची तपासणी केलेली इलेक्ट्रिक मोटर सर्व रित्या तपासून व चालवून तक्रारदारास दिलेली होती. इलेक्ट्रिक मोटर घेतल्यानंतर एका वर्षाच्या आत जळाली तर एकदाच कंपनी ती बदलून देते अन्यथा नाही, हे तक्रारदारास समजाऊन संगितले होते. मोटारीमध्ये नेमका दोष काय आहे हे तपासून पाहण्याकरिता मोटर कंपनीला पाठवण्याबाबत तक्रारदारास सुचवले परंतु त्याने ते मान्य केले नाही. तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केली आहे. त्यामूळे ती खारीज करण्याची विनंती केली आहे.
आम्ही दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, गैरअर्जदाराचा लेखी जवाब आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.
तक्रारदाराने मोटर घेतल्याची पावती आणि विद्युत पुरवठा घेतल्याचे कोटेशन फॉर्म दाखल केले आहे.
तक्रारदाराने दि.17/2/14 रोजी 7.5 HP bear motor जय 3 फेज 5 x 2b पुलीसह या वर्णनाची मोटर रु.14,200/- देऊन विकत घेतल्याची पावती मंचासमोर दाखल केली आहे. पावतीवर मोटारीची गॅरंटी 1 वर्षाची असल्याचे लिहिलेले आहे. तसेच एक वर्षाच्या आत जळाल्यास एकदाच बदलून मिळेल. त्या बदल्यात ग्राहकाने मोटर कंपनीला येण्याजाण्याचा खर्च व रु.400/- द्यावेत आणि सिंगल फेज मोटरीची क्लच आणि कंडेन्सर ची गॅरंटी किंवा वारंटी येत नाही, असे नमूद केलेले आहे. दि. 29/4/14 रोजी मोटर बदलून दिल्याचे नमूद आहे.
आम्ही तक्रारदाराने दाखल केलेल्या विद्युत पुरवठा कोटेशन फॉर्मचे निरीक्षण केले. त्याने दि.25/2/14 रोजी कोटेशन भरून 3 फेजचा तात्पुरता वीजपुरवठा घेतलेला आहे. त्यावर लिहिलेले आहे की, ‘कोटेशन भरल्यापासून फक्त 2 महिन्यांसाठी तात्पुरता वीज पुरवठा दिल्या जाईल’. सदर अर्जावर valid up to दि.27/2/14 असे नमूद आहे. याचा अर्थ तक्रारदाराने घेतलेल्या विद्युत पुरवठ्याची वैधता दि.27/2/14 रोजीपर्यंत होती. तक्रारदाराने त्याची मोटर पहिल्यांदा जळाल्यामुळे बदलून घेतल्याची तारीख दि.29/2/14 ही आहे म्हणजेच विद्युत पुरवठ्याची वैधता संपल्यानंतर त्याची मोटर जळाली होती. गैरअर्जदाराने नियमाप्रमाणे ती बदलून दिली होती. गॅरंटीच्या नियमांनुसार मोटर फक्त एकदाच बदलून मिळणार, हे पावतीवर स्पष्ट केलेले आहे. विद्युत पुरवठ्याच्या कोटेशन अर्जावर विशेष सूचना दिली आहे की, ‘ क्रेन व मळणी यंत्र चालवताना विद्युत अपघात झाल्यास कंपनी त्याला जवाबदार राहणार नाही. मळणी यंत्राची जोडणी पाण्याच्या पंपाच्या जोडणीतून करावी, तारेवर आकडे टाकु नये.’
वरील निरीक्षणावरून असे दिसून येते की, तक्रारदाराने घेतलेला विद्युत पुरवठा तात्पुरत्या स्वरूपाचा फक्त 2 महिन्यांकरिता होता. त्यानंतर त्याने विद्युत पुरवठा घेतल्याचा पुरावा दाखल नाही. तक्रारदाराच्या मोटर करिताच्या विद्युत पुरवठ्याची वैधता संपल्यानंतर मोटर जळाली होती. त्यामुळे त्याने अवैध रीतीने विद्युत पुरवठा घेऊन मोटर चालवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नियमाप्रमाणे गैरअर्जदाराने त्याचे मोटर एकदा बदलून दिलेली आहे. गैरअर्जदाराने सेवेमध्ये त्रुटी दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदार स्वतःच्या चुकीकरता वारंवार मोटर बदलून घेण्यासाठी पात्र नाही, असे आमचे मत आहे.
वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
(श्रीमती संध्या बारलिंगे) (श्री.किरण.आर.ठोले) (श्री.के.एन.तुंगार)
सदस्या सदस्य अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.