Maharashtra

Additional DCF, Thane

CC/19/152

M/S. KISHORECHANDRA KALYANJI AGRI LLP THROUGH ITS PARTNER SHRI. ASHIT K CHHEDA - Complainant(s)

Versus

YES BANK LTD. - Opp.Party(s)

SAVINA BANGERA

09 Jul 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/19/152
( Date of Filing : 27 May 2019 )
 
1. M/S. KISHORECHANDRA KALYANJI AGRI LLP THROUGH ITS PARTNER SHRI. ASHIT K CHHEDA
HAVING ADDRESS AT- K-11, 12, APMC MARKET-2, PHASE-2, DANA BUNDER, NAVI MUMBAI
...........Complainant(s)
Versus
1. YES BANK LTD.
SHOP 18, SATRA PLAZA, PALM BEACH ROAD, SECTOR-19D, VASHI, NAVI MUMBAI 400703
2. NATIONAL BULK HANDLING CORP. P. LTD. (NBHC)
7TH FLOOR, A WING, DYNASTY BUSINESS PARK, ANDHERI KURLA ROAD, CHAKALA, ANDHERI EAST, MUMBAI 400059
3. M/S. VIDHI LOGISTICS
PLOT 1/2, RUBY COMPOUND KALABOLI MUMBRA ROAD, OPP. ASHOK LEYLAND, ADIVALI, TALOJA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MR. Tryambak A. Thool MEMBER
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 09 Jul 2019
Final Order / Judgement

तक्रारदार व त्‍यांचे वकील गैरहजर.

सदरची तक्रार स्विकृतीपूर्व युक्‍तीवादासाठी नेमण्‍यात आलेली आहे. परंतु तक्रारदार व त्‍यांचे वकील दिलेल्‍या तारखांना गैरहजर राहीले. सामनेवाले क्रमांक 1 येस बॅंक, सामनेवाले क्रमांक 2 नॅशनल बल्‍क हॅण्‍डलिंग कॉर्पोरेशन प्रा. लि. (एनबीएचसी) व सामनेवाले क्रमांक 3 मेसर्स विधी लॉजिस्टिक्स यांच्‍या वतीने दिवाणी संहितेचे आदेशिका क्रमांक 29 व 30 प्रमाणे कोणावर नोटीस बजवावी त्‍या इसमाचे नांव तक्रारीत नमूद केलेले नाही.

तसेच तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 बॅंकेकडून त्‍यांच्‍या वाणिज्‍य व्‍यवसायासाठी रक्‍कम रुपये 2,80,92,217/- चे कर्ज घेतले. त्‍या कर्जाला सुरक्षितता रहावी म्‍हणून सामनेवाले क्रमांक 2 व 3 यांच्याकडे ठेवण्‍यात आलेल्‍या वस्‍तुंवर (Commodity) ठेवण्‍यात आली. त्‍याबाबतीत त्रिपक्षीय करार झाला, परंतु सामनेवाले क्रमांक 3 यांनी ठेवलेल्‍या वस्‍तुपैकी 1703 पिशव्‍या, 83.460 वजनाच्‍या गहाळ केल्‍या. त्‍यानंतर सामनेवाले क्रमांक 1 ने कर्जाच्‍या रकमेपैकी रुपये 24,66,254/- रकमेची मागणी केली. सबब तक्रारदाराचे असे म्‍हणणे आहे की, सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी संगनमताने तक्रारदाराने ठेवलेल्‍या वस्‍तु सामनेवाले क्रमांक 3 च्‍या मदतीने गहाळ केल्‍या. तरीही कर्जाची रक्‍कम वसूल करुन मागितली. सबब तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी आपसात खोटे कारस्‍थान करुन सामनेवाले क्रमांक 3 च्‍या मदतीने त्‍यांची फसवणूक केल्याबद्दल कथन केले आहे.

तक्रारीसोबत त्रि‍पक्षीय कराराच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत.

तक्रार व त्‍यासोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रातील कथनांचा विचार केल्‍यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 बॅंकेकडून नमूद केलेल्‍या कर्जाची रक्‍कम “व्‍यापारी प्रयोजना”साठी घेतली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तसेच सामनेवाले क्रमांक 2 हे वेअर हाऊस चालवत असल्‍याने त्‍यांच्‍याकडे तक्रारदारांनी वस्‍तू ठेवल्‍या व त्‍या हाताळण्‍याकामी सामनेवाले क्रमांक 3 ची नेमणूक केली. परंतु सामनेवाले क्रमांक 3 ने तक्रारदाराची वस्‍तु      त्रि-हाईतास दिली व तक्रारदाराची फसवणूक केली असे कथन केले आहे. सबब वर नमूद केलेल्‍या कारणास्‍तव ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(ड) प्रमाणे तक्रारदार हा “ग्राहक” या संज्ञेत मोडत नाही. त्‍यामुळे सदर व्‍यवहार हा वाणिज्‍य कारणासाठी झालेला असल्‍याने तक्रारीची दखल हे मंच घेऊ शकत नाही. वरील बाबींशिवाय तक्रारीतील मुद्दे अत्‍यंत गुंतागुंतीचे, वस्‍तू चोरी करणे, तक्रारदाराची फसवणूक करणे असे कथन असल्‍याने सदर  बाबींचा निपटारा संक्षिप्‍त पध्‍दतीने चालविल्‍या      जाणा-या तक्रारीमध्‍ये होऊ शकत नाही या कारणास्‍तवही तक्रार स्विकृतीपूर्वी रद्द करण्‍याशिवाय दुसरा पर्याय नाही. सबब वर नमूद केलेल्‍या कारणास्‍तव  तक्रार स्‍वीकृतीपूर्व रद्द करण्‍यात आली.                                                                                      

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Tryambak A. Thool]
MEMBER
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.