तक्रारकर्त्यातर्फे वकील ः- श्री. पी.टी.तोलानी
विरूध्द पक्ष 1 तर्फे वकी लः- श्री.एस.बी.राजनकर/ श्री. श्रींकांत सावजी
विरूध्द पक्ष क्र 2 ः- एकतर्फा.
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 29/03/2019 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्ते यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये विरूध्द पक्ष यांनी कोणतेही कारण न दर्शविता, व्हिजा नामंजूर केल्याबाबत तसेच दुबई झुरीच यात्रेसाठी केलेली बुकींग रद्द झाल्यानंतर पैसे परत न केल्यामूळे सदरची तक्रार या मंचात दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्ते नवविवाहित दांम्पत्य आहे विरूध्द पक्ष क्र 1 हॉलीडे ट्रीपखाली फ्रेंन्च परदेशीचे ऑनलाईन विज्ञापन देऊन ग्राहकास आकर्षित करतात त्यामुळे दि. 17/10/2017 रोजी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षांकडे पॅरीस- दुबई - झुरीच यात्रेसाठी ऑनलाईन बुकींग करून रू. 10,000/-,जमा केले. सदरची सहल दि. 26/04/2018 ते 03/05/2018 हवाई तिकीटाचा पर्यंतची होती. त्यात व्हिजा, राहणे, खाण्याचा समावेश होता. विरूध्द पक्ष क्र 2 हे, विरूध्द पक्ष क्र 1 ची सिस्टर कन्संर्न असून व्हिजा करून दयायची हमी दिली होती. दि. 09/12/2017 रोजी तक्रारकर्त्याने रू. 50,000/-,जमा केले व त्यानंतर व्हिजा करीता रू. 16,890/-, जमा केले. विरूध्द पक्ष यांनी दि. 15/03/2018 रोजी कुठलेही कारण न दर्शविता, व्हिजा रद्द झाल्याचे कळविले. म्हणून तक्रारकर्त्याने दि. 07/04/2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून विरूध्द पक्षाला व्हिजा का रद्द झाला यांचे कारण विचारले आणि भरलेल्या रकमेची परताव्यासाठी मागणी केली. सदर कायदेशीर नोटीस विरूध्द पक्ष क्र 1 यांनी स्विकारला. परंतू विरूध्द पक्ष क्र 2 यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानूसार व्हिजाकरीता लागणारे सर्व दस्ताऐवज व व्हिजा करीता फि भरण्यास तयार होते व आहे तरी सुध्दा विरूध्द पक्षांनी त्याचे प्रतिउत्तर दिले नाही म्हणून सदरची तक्रार दाखल करून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षांकडे जमा केलेली हॉलीडे पॅकेजसाठी व व्हिजाकरीता भरलेली रक्कम रू. 76,890/-,परत करण्याचा आदेश व्हावा. तक्रारकर्ते जे की, नवविवाहित दांम्पत्य असून त्यांचे लग्नानंतर त्यांना परदेशी जाण्यास न मिळाल्यामूळे मानसिक त्रासाबद्दल रू. 2,00,000/-, तक्रारीचा खर्च रू. 10,000/-,व कायदेशीर नेाटीस पाठविण्याचा खर्च रू. 5,000/-,दयावे अशी मागणी केली आहे.
3) विरूध्द पक्ष क्र 1 यांनी त्यांचा लेखीजबाब या मंचात दाखल केले परंतू विरूध्द पक्ष क्र 2 यांना मंचातर्फे पाठविण्यात आलेली नोटीस घेण्यास नकार दिला. म्हणून या मंचाने डिंम्ड सर्व्हिस ग्राहय धरून विरूध्दपक्ष क्र 2 हजर न झाल्यामूळे त्यांचेविरूध्द एकतर्फा आदेश दि. 10/10/2018 रोजी पारीत केलेला आहे. विरूध्द पक्ष क्र 1 यांनी त्यांचे लेखीजबाब या मंचात दि. 06/08/2018 रोजी दाखल केलेला आहे परंतू भरपूर संधी दिल्यानंतरही त्यांनी आपले पुराव्याचे शपथपत्र या मंचात दाखल न केल्यामूळे, दि. 28/11/2018 रोजी प्रकारणात होत असलेल्या विलंबामूळे त्यांचेवर रू. 500/-,दंडाची रक्कम जिल्हा ग्राहक कल्याण निधीमध्ये जमा करण्याच्या अटीवर मुदत देण्यात आली होती. तरी, देखील विरूध्द पक्ष क्र 1 यांनी दि. 18/12/2018, 02/01/2019 पर्यंत भरली नाही. म्हणून विरूध्द पक्ष क्र 1 यांनी मंचात दाखल केलेले पुराव्याचे शपथपत्र ग्राहय धरता येणार नाही, असे दि. 02/01/2019 च्या आदेशामध्ये नमूद केले आहे.
4. तक्रारकर्त्यातर्फे विद्वान वकील श्री. पी.टी. तोलानी व विरूध्द पक्ष क्र 1 तर्फे विद्वान वकील श्री. श्रीकांत सावजी यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रारकर्त्याचे पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद तसेच विरूध्द पक्ष क्र 1 यांनी त्यांची लेखीकैफियत, पुराव्याचे शपथपत्र (दि. 02/01/2019 च्या आदेशानूसार दंडाची रक्कम न भरल्यामूळे त्यांचे पुराव्याचे शपथपत्र ग्राहय धरण्यात आले नाही. ) विरूध्द पक्ष क्र 2 यांचेविरूध्द एकतर्फा आदेश आहे. या मंचानी सर्व दस्ताऐवजाचे वाचन केले आहे. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | विरूध्द पक्ष यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला तसेच सेवा देण्यात कसुर केला आहे का ? | होय. |
2. | तक्रारकर्ते हे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | होय. |
3 | अंतीम आदेश | तक्रार अंशत मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2ः-
6. दोन्ही पक्षामध्ये पॅरीस - दुबई - झुरीच या सहलकरीता भरलेली रक्कमेविषयी वाद नाही. तसेच विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखीजबाबासोबत जोडलेले सहलीच्या अटी व शर्तीनूसार व्हिजा गायडंसमध्ये असे नमूद आहे की, “VISA GUIDANCE: we provide you vise guidance services for which we will charge you. Such charges may include not only the actual visa charges and costs incurred but also our services charge. Please note that UK and US visa will have to be obtained by you directly; however we may assist you in preparing and submitting the visa application basd on documents provided by you. Even if you do not get your visa, you will be liable to pay the applicable cancellation charges plus visa fees. If you already possess a visa or wish to do the visa/s on your own, you would be entitled only for the refund of actual visa/s cost and the portion of charges attributable to our services charges will still have to be paid by you.” विरूध्द पक्ष क्र 1 यांनी, तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष क्र 2 कडे पैसे जमा करण्यास सांगीतले होते. त्यानूसार तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 2 कडे व्हिजा करीता रू. 16,890/-,जमा केले. तसेच वरील नमूद अटीनूसार विरूध्द पक्ष क्र 1 यांनी मान्य केले आहे की, UK & US सोडून बाकी परदेशाकरीता ते व्हिजा घेण्यासाठी सेवा पुरवतील व त्याकरीता चॉर्जेस फि घेतील. तसेच विरूध्द पक्ष क्र 1 त्यांच्या लेखीजबाबात Reply on Merits च्या परिच्छेद क्र 3 व 4 मध्ये असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने व्हिजा करीता लागणारे दस्ताऐवज विलंबाने पुरविले होते. तसेच व्हिजा पुरविणारी embassy यांनी दि. 19/03/2018 तक्रारकर्त्याला “ The Intention to stay is not reliable” असे कारण दाखवून त्यांचे व्हिजा देण्यास नामंजूर केला होता. परंतू विरूध्द पक्ष क्र 1 यांनी नामंजूर करण्याचा पत्र या मंचात दाखल केले नाही.
7. विरूध्द पक्ष क्र 1 यांनी या मंचाचे आदेश दि. 02/01/2019 अनुसार दंडाची रक्कम न भरल्यामूळे, त्यांनी दाखल केलेले पुराव्याचे शपथपत्र कायदेशीर ग्राहय धरता येणार नाही. म्हणून त्यांनी आपल्या लेखीजबाबात घेतलेले आक्षेप शपथपुरावा अभावी फेटाळण्यात येते. तरी देखील या मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने सहलीकरीता ऑनलाईन बुकींग करून ऑनलाईन पेमेंट केल्यामूळे या मंचाला हि तक्रार ऐकण्याचा अधिकार आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, Denial Should be Specific असायला पाहिजे परंतू विरूध्द पक्ष क्र 1 यांनी कोणत्याही स्पष्टीकरणाचा कारण दिलेला नाही. म्हणून त्यांनी तक्रारकर्त्याला लग्नानंतर सहल रद्द झाल्यामूळे भरपूर मानसिक त्रास झालेला आहे हे सिध्द होत आहे.
विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या विरूध्द अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला तसेच सेवा देण्यात कसुर केली आहे हि बाब सिध्द होत आहे. म्हणून मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहोत. त्यामुळे सदर प्रकरणात मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केला आहे हे जाहिर करण्यात येते.
3. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारकर्त्याकडून सहलकरीता स्विकारलेली रक्कम रू. 60,000/-, (हॉलीडे पॅकेजसाठी) व व्हिजासाठी फि रू. 16,890/-,तक्रारकर्त्याला तक्रार दाखल दि. 31/05/2018 पासून द.सा.द.शे 4 टक्के व्याजाने परत करावे तसेच शारीरीक व मानसिक त्रासाबद्दल रू. 10,000/-,व दाव्याचा खर्चाबाबत रक्कम रू. 2,000/-, दयावे.
4. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे. तसे न केल्यास, वरील नमूद आदेश क्र.(3) प्रमाणे रकमेवर द.सा.द.शे 6 टक्के व्याज अदा करावे.
5. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
6. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्याला परत करावी.