ग्राहक तक्रार क्रमांकः-464/2009 तक्रार दाखल दिनांकः-12/08/2009 निकाल तारीखः-17/04/2010 कालावधीः-0वर्ष08महिने05दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.गजानन नारायण शेटये. राहणार-ए विंग, रुम नं.406, यशवंत प्लाझा को.ऑप.हौसिंग सोसायटी, कात्रप, बदलापूर जि.ठाणे. ...तक्रारकर्ता विरुध्द यशवंत प्लाझा को.ऑप.हौसिंग सोसायटी, कात्रप, बदलापूर जि.ठाणे. तर्फे चेअरमन/सेक्रेटरी, श्री.प्रकाश साळुंखे. ए/106,पहिला मजला, यशवंत प्लाझा, कात्रप बदलापूर.जि.ठाणे. ...वि.प. उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.आर.पी.मुधोळकर विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्रीमती एस.एस.खोलम गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.सौ.भावना पिसाळ, मा.सदस्या 3.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-17/04/2010) श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य यांचेद्वारे आदेशः- 1)तक्रारदाराची सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986अंतर्गत दाखल केली असुन त्यातील कथन संक्षिप्तपणे खालीलप्रमाणे. तक्रारदार असे कथन करतात की, त्यांनी सदरची सदनिका महाराष्ट्र मालकी हक्क सदनिका कायदा1963 नुसार खरेदी केली असुन ते 4थ्या माळयावर वास्त्यव्यास आहेत. सोसायटीला एक मोकळी गच्ची असुन सदनिकाधारक तेथे कपडे सुकविणे व इतर कामाकरीता तिचा उपभोग घेत आहेत व त्यासंबंधी कोणीही हरकत घेतली नाही. 2/- परंतु दिनांक15/12/2008 रोजी संस्थेच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावून सोसायटीचे गच्चीच्या मार्गाला बंद केले आहे व त्याची किल्ली श्री साळुंके 1ल्या माळयावर राहतात त्याचे ताब्यात देण्यात आली आहे. तक्रारदाराला गच्चीचा वापर करण्यासाठी किल्ली दिली नाही. म्हणुन तक्रारदाराने दिनांक25/12/2008 रोजी संस्थेच्या चेअरमनकडे तक्रार केली. त्या तक्रारीची त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून तक्रारदाराने सदरची बाब ही तक्रारदार व सहकारी गृहसंस्था मधील अंतर्गत बाब असल्यामुळे त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही व तक्रारदाराचा अर्ज दिनांक07/02/2009 रोजी खारीज केला. त्यामुळे तक्रारदाराने दिनांक13/03/2009 रोजी आणि दिनांक12/04/2009 रोजी चेअरमन सहकारी गृह संस्थेला पत्र लिहून ''संस्थेच्या गच्चीचा वापर करणे सर्व सभासदांचा कायदेशीर अधिकार आहे आणि त्याचा उपयोगापासून कोणीही तक्रारदारास प्रतिबंद करु शकत नाहीत व तसे करणे म्हणजे सभासदाचे अधिकारावर गदा आणणे होय.'' विरुध्द पक्षकाराचे त्रुटीयुक्त व दोषपुर्ण सेवेमुळे तक्रारदाराने तक्रार दाखल करुन ही तक्रार 2वर्षाचे कालावधीमध्ये दाखल केली आहे व तक्रारीचे ठिकाण बदलापूर येथे घडले असल्यामुळे या मंचाला ही तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा पुर्ण अधिकार आहे. तक्रारदाराची प्रार्थना खालील प्रमाणे. 1)विरुध्दपक्षकाराने तक्रारदारास गच्चीची डुप्लिकेट चाबी द्यावी.2)विरुध्दपक्षकाराने तक्रारदारास रुपये10,000/- मानसिक नुकसानी व रुपये10,000/- नुकसान भरपाई असे एकुण रुपये20,000/- द्यावे.3)विरुध्दपक्षकाराने तक्रारदाराची सतत गैरसोय केल्यामुळे प्रतिमाह रुपये1000/-द्यावे. 2)वरील तक्रारीची मंचाची नोटीस नि.5वर विरुध्दपक्षकारास पाठविली. विरुध्दपक्षकाराने लेखी जबाब दाखल करण्यास नि.6नुसार वेळ मिळण्याची विनंती केली व नि.7नुसार वकीलपत्र दाखल केले. विरुध्दपक्षकाराने नि.8वर लेखी जबाब दाखल केले व नि.9वर कागदपत्रे दाखल केले. तक्रारदाराने त्याचे प्रत्युत्तर नि.10वर दाखल केले. तक्रारदाराने नि.11वर लेखी युक्तीवाद दाखल केला. नि.12वर विरुध्दपक्षकाराने लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्दपक्षकाराचे लेखी जबाब व लेखी युक्तीवादातील कथन खालील प्रमाणे. सदरची संस्था ही एक को.ऑप सोसायटी अँक्ट नुसार1960 व नियम61नुसार नोंदणी झालेली असुन तिचे श्री.यशवंत प्लाझा 3/- को.ऑप.हाऊसिंग सोसायटी लि.असुन ती नोंदणीकृत झालेली आहे. तिचा नोंदणी क्रमांक टिएनए/एबीएन/एचएसजी/(टीसी)/20005/2008 -2009 असुन सर्व्हे नं.1हिस्सा नं.1(ए)मौजे कात्रप एमआयडीसी रोड, कुळगांव बदलापूर(पू) ता.अंबरनाथ जि.ठाणे येथे स्थित असुन तिला स्वतःचे नियम व पोटनियम आहेत. त्यानुसार तिचा सर्व व्यवहार चालतो. व त्यासाठी सोसायटीने त्यांचे मेंबर निवडून दिलेले होते व आहेत. त्यांच्या मार्फत(अध्यक्ष,उपाध्यक्ष, खजिनदार व इतर सदस्य)मार्फत सर्व कारभार पाहिले जातात. सदर सोसायटीमध्ये एकुण 60 सभासद रहिवाशी असुन तेथे गाळे/शॉप आहेत. सोसायटी एकुण 3विंगची आहे. सदनिका विकत घेण्यासंबधी व्यवहार हा बिल्डर व तक्रारदार यांचेमध्ये झाला असल्यामुळे तक्रारदार ग्राहक या संज्ञेत सोसायटीविरुध्द येत नाहीत. सोसायटीचे पुर्वी रजिस्ट्रेशन झाले नव्हते. त्यामुळे नियम व कार्याकारीनीला बाधा आणण्याचे कोणतेही कारण नव्हते. परंतु सदरच्या संस्थेचे रजिस्ट्रेशन झाल्यामुळे नियमाचे पालण करण्यासाठी नोटीस लावली व त्यामुळे गच्चीचा वापर परवानगीशिवाय कोणत्याही सभासदास करता येत नाही. गच्चीचा वापर परवानगीनंतर वैयक्तीक/ प्रासंगिक स्वरुपात व सोसायटीच्या प्रासंगिक स्वरुपात उपयोग करण्यात हारकत नाही. एका सदस्याने/सभासदाने नियमाचे उल्लंघन केल्यास दुस-या सभासदाकडून काही अघटित घडल्यास सोसायटीला जबाबदार धरता येणार असल्यामुळे सर्वांना समान न्याय यासाठी तक्रारदाराची तक्रार योग्य नाही. सबब तक्रार रद्द ठरवावी. 3)या तक्रारीसंबधी तक्रारदाराने तक्रारीसोबत बरेचशे कागदपत्र सादर केले आहेत. व प्रत्युत्तर, प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच विरुध्दपक्षकाराने लेखी जबाब, लेखी युक्तीवाद व कागदपत्रे दाखल केले आहेत. त्या सर्व कागदपत्रांची सुक्ष्मरितीने अवलोकन व पडताळणी केली असता न्यायिक प्रक्रियेसाठी एकमेव मुद्दा उपस्थित होतो तो खालीलप्रमाणे. अ)विरुध्दपक्षकाराने सेवेमध्ये त्रुटी,न्युनता,कमतरता,बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्द करु शकले काय.? उत्तर-नाही. कारण मिमांसा तक्रारदाराने सदरच्या सोसायटीचे बिना तारखेचे एक पत्र दाखल केले. त्या पत्रातील दुस-या परिच्छेदातील कथन स्वयंस्पष्ट आहे ते खालील प्रमाणे. ''आपणास सोसायटीच्या गच्चीचा वापर करावयाचा असल्यास नेमुन दिलेल्या पदाधिका-याकडे- रजिस्टरमध्ये तशी नोंद करुन चावी घेऊन जावी व परत करावी. यापुढे सोसायटीच्या नियमाचे पालन करुन त्याचे उल्लंघन होणार नाही 4/- याची कृपया दक्षता घ्यावी व सोसायटीस सहकार्य करावे. सही सही (सचिव) (अध्यक्ष) विरुध्दपक्षकाराने दाखल केलेल्या कागदपत्रातील दिनांक07/02/2010 रोजी झालेल्या सभेमधील ठराव खालीलप्रमाणे. ''आज दिनांक07/02/2010 रोजी यशवंत प्लाझा को.ऑप.हौसिंग सोसायटीमध्ये अध्यक्ष श्री.प्रकाश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत तातडीची मिटींग भरविण्यात आली. त्या मिटींगमध्ये श्री.गजानन शेटये हयांना सोसायटीतील 'सदस्य' म्हणुन (कमिटी मेंबर)मान्यता देण्यात आली.'' ''तसेच सोसायटीविरुध्द श्री.गजानन शेटये यांची जी कोर्ट केस मंचात दाखल केली आहे ती दोघांच्या सहमतीने म्हणजेच सोसायटी व श्री.गजानन शेटये यांनी सहमती दर्शविल्याने माघार घेण्याचे ठरविले. तसेच ए विंग मध्ये टेरेसची चावी अध्यक्ष श्री.प्रकाश साळुंखे व सोसायटी सदस्य श्री.गजानन शेटये यांचेकडे ठेवण्याचे सर्वाच्या सहमतीने ठरविण्यात आले. सदरच्या ठरावावर एकंदर 20सभासदाच्या सहया आहेत व त्यासोबत तक्रारदार श्री.गजानन शेटये यांचीही सही (स्वाक्षरी)आहे. त्यामुळे सदरच्या सोसायटीच्या गच्चीच्या चाव्या तक्रारदाराकडे दिल्यामुळे तक्रारीचे कारण संपुष्टात आले आहे असे या मंचास वाटते. त्याप्रित्यर्थ हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. -आदेश - 1)तक्रार क्रमांक 464/2009 ही रद्दबातल ठरविण्यात येत आहे. 2)खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही. 3)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. दिनांकः-17/04/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे |