Maharashtra

Nagpur

CC/229/2017

Shri Ajay Nilkanth Moon - Complainant(s)

Versus

Yashwant Madhavrao Ingle - Opp.Party(s)

Adv. S.K.Paunikar

26 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/229/2017
( Date of Filing : 17 May 2017 )
 
1. Shri Ajay Nilkanth Moon
R/o. Halodi, Post Dahegaon, Tah. Seloo, Dist. Wardha
WARDHA
Maharashtra
2. Sujay Nilkanth Moon
R/o. Halodi, Post Dahegaon, Tah. Seloo, Dist. Wardha
WARDHA
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Yashwant Madhavrao Ingle
R/o. 18, Shriniwas, Hiltop, Ram Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Prosper Real Estate Management Group, A Partnership Firm
Regd. Address- 1/B, Kohale Bhawan, Behind Batukbhai Jwellers, Khare Town, Dharampeth, Nagpur AND Alternate Address - 76, Ram Nagar, Hill Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Prosper Real Estate Management Group, Through Partners, Mukesh Chandrashekhar Kumaran
R/o. 1/A, Lake View Apartment, Hindustan Colony, Amravati Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
4. Smt. Suman Vitthalrao Ikhankar
R/o. 49-A, Hill Road, Gokulpeth, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 26 Dec 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- सुभाष.आर. आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ श्री यशवंत इंगळे हा जमिन मालक आहे व त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ते४ यांना मौजा पेवठा, पटवारी हलका नंबर ४१, खसरा क्रमांक १२८/१/२/३, तहसिल जिल्‍हा नागपूर येथील लेआऊट विकण्‍याचे अधिकार दिले आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ प्रॉस्‍पर रिअल इस्‍टेट ही नोंदणीकृत फर्म आहे.  विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हा प्रॉस्‍पर रिअल इस्‍टेट चा मुकेश चंद्रशेखरण हा भागीदार आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे कार्यालयात जाऊन त्‍यांच्‍या मौजा पेवठा, पटवारी हलका नंबर ४१, खसरा नंबर १२८/१/२/३, तहसिल जिल्‍हा नागपूर येथील भुखंड क्रमांक ६५, एकूण क्षेञफळ १५०० चौ. फुट हा रुपये १,४२,५००/- मध्‍ये  खरेदी करण्‍याचे ठरविले व त्‍याकरीता विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ला दिनांक २७/११/२००५ रोजी रुपये १,०००/- दिले व ठरल्‍याप्रमाणे उर्वरीत रक्‍कम रुपये १,४१,५००/- तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडे वेळोवेळी भरणा केली. तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांनी विरुध्‍द पक्षाला दिनांक ९/१/२००७ पर्यंत रक्‍कम रुपये १,४१,५००/- विरुध्‍द पक्षाकडे जमा केली अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे ठरल्‍याप्रमाणे संपूर्ण रक्‍कम रुपये १,४२,५००/- जमा केले परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला आजपर्यंत नोंदणीकृत विक्रीपञ करुन दिले नाही अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे म्‍हणून तक्रारकर्त्‍याने मंचासमक्ष तक्रार दाखल केली आहे.
  3. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षाने सेवेत ञुटी केल्‍याचे घोषित करावे, विरुध्‍द पक्षाने प्‍लॉट क्रमांक ६५ चे खरेदीखत तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवूण द्यावे किंवा ते शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने अकृषक भुखंडाची शासकीय दराने रक्‍कम द्यावी. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारीरीक ञासापोटी व तक्रारीचा खर्चापोटी नुकसान भरपाई म्‍हणून असे एकूण रुपये ५०,०००/- मिळावे अशी विनंती केली आहे.  
  4. विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना नोटीस मिळूनही मंचात हजर झाले नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेविरुध्‍द दिनांक २६/६/२००९ ला एकतर्फी आदेश पारीत करण्‍यात आला तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १,२ व ४ यांचे विरुध्‍द दिनांक ०२/१०/२०१९ रोजी दैनिक भास्‍कर या वृत्‍तपञातुन जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्‍यात आली तरी देखील विरुध्‍द पक्ष क्रमांक १,२ व ४ प्रकरणात हजर झाले नाही त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द निशानी क्रमांक १ वर दिनांक १४/११/२०१९ रोजी एकतर्फी प्रकरण पुढे चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला. 
  5. तक्रारकर्त्‍याच्‍या वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला. सदर प्रकरणी दाखल करण्‍यात आलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंचासमक्ष खालिल मुद्दे विचारार्थ उपस्थित झाले व त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे..

  अ.क्र.                           मुद्दे                                                         उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?             होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

    दिली काय ?                                                                       होय

  1. काय आदेश ?                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1,2 व 3 बाबत- तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन मौजा पेवठा, पटवारी हलका नंबर ४१, खसरा क्रमांक १२८/१/२/३, तहसिल जिल्‍हा  नागपूर येथील भुखंड क्रमांक ६५, एकूण क्षेञफळ १५०० चौ.फु. हा रुपये १,४२,५००/- मध्‍ये खरेदी करण्‍याचा करारणामा केला. त्‍याप्रमाणे विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन रुपये १,४२,५००/- स्विकारले असल्‍याचा पावत्‍या  अभिलेखावर दाखल केल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे दिनांक १३/०९/२००५ रोजी विरुध्‍द पक्ष श्री यशवंत महादेवराव इंगळे व मुकेश चंद्रशेखर कुमारण यांनी नोंदणीकृत MEMORANDUM OF UNDERSTANDING  करुन दिल्‍याचे अभिलेखावर दाखल आहे. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिद्ध होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन भुखंडापोटी संपूर्ण रक्‍कम रुपये १,४२,५००/- स्विकारले आहे तरीही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नावे नोंदणीकृत विक्रीपञ करुन दिले नाही या सर्व गोष्‍टीवरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याप्रती अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केल्‍याचे सिद्ध होते. सबब खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येते.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांनी वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तरीत्‍या तक्रारकर्ता कडुन मौजा पेवठा, पटवारी हलका नंबर ४१, खसरा क्रमांक १२८/१/२/३ तहसिल जिल्‍हा नागपूर येथील भुखंड क्रमांक ६५, एकूण क्षेञफळ १५०० चौ. फुट तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदणीकृत खरेदीखत नोंदवून भुखंड ताब्‍यात द्यावा व नोंदणीचा खर्च तक्रारकर्त्‍याने करावा.
  3. किंवा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांना वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या सदर भुखंडाची नोंदणीकृत खरेदीखत तांञिक दृष्‍टया करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने भुखंड क्रमांक ६५ या भुखंडाच्‍या विक्रीपोटी तक्रारकर्त्‍याकडुन स्विकारलेली रक्‍कम रुपये १,४२,५००/- दिनांक ०९/०१/२००७ पासून १४ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांना वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारीरीक ञासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावे.
  5.  वरील आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासुन ३० दिवसाचे आत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांनी वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या करावी.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.