ORDER | निकालपत्र ( पारीत दिनांक : 11/08/2014) ( मा. प्रभारी अध्यक्ष, श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये).) तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द दाखल केली असून, तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे आहे. तक्रारकर्ता वर्धा येथील रहिवासी असून वि.प. ही सहकारी कायद्या अंतर्गत नोंदणीकृत संस्था असून तिचा नोंदणी क्रमांक 318/92 असल्याचे त.क. यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त.क. यांनी पुढे नमूद केले की, वि.प.ही लोकांचे पैसे बचत ठेवून तसेच मुदत ठेवीत गुंतवणूक करण्याचे काम करतात व कर्ज वाटप करतात. त.क. यांना वि.प.यांनी 12% दराने व्याज मुदत ठेवीवर देण्यात येईल असे सांगितले. त्यानुसार त.क. यांनी वि.प. यांच्याकडे खालीलप्रमाणे रक्कम गुंतविली.
अ.क्रं. | मुदती ठेव क्रं. | ठेवीदाराचे नांव | कालावधी | मुदती ठेवीची तारीख | मुदती ठेव संपण्याची तारीख | रक्कम | 01 | 010 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 01/08/10 | 30/07/11 | 78,540/- | 02 | 012 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 17/08/10 | 16/08/11 | 48,680/- | 03 | 011 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 10/05/10 | 09/05/11 | 1,21,580/- | 04 | 036 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 22/09/10 | 21/09/11 | 1,00,350/- | 05 | 037 | पुष्पा सुभाष तायडे | 12 महिने | 26/09/10 | 25/09/11 | 78,680/- | 06 | 035 | पुष्पा सुभाष तायडे | 12 महिने | 18/09/10 | 17/09/11 | 72,020/- | 07 | 025 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 16/11/10 | 15/11/11 | 70,000/- | 08 | 024 | परिमल सुभाष तायडे | 12 महिने | 16/11/10 | 15/11/11 | 1,00,000/- | 09 | 066 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 08/03/11 | 07/03/12 | 1,50,000/- | 10 | 065 | परिमल सुभाष तायडे | 12 महिने | 08/03/11 | 07/03/12 | 1,50,000/- |
सदर ठेवीवर संस्थेच्या व्यवस्थापकाची सही असल्याचे त.क. यांनी नमूद केले. त.क. यांनी ठेवलेल्या मुदत ठेवीची वेळोवेळी मागणी केली. परंतु वि.प. यांनी ती दिली नाही. त.क. यांना त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम परिपक्वतेच्या तारखेनंतर ही वि.प. यांनी न दिल्यामुळे दि. 17.01.2012 रोजी वि.प. यांना नोटीस पाठवून त्यामध्ये मुदत ठेवीची रक्कम परत मागितली. सदर नोटीस वि.प. यांना दि. 18.01.2012 रोजी मिळून सुध्दा वि.प.यांनी त.क. यांची मुदत ठेवीची रक्कम परत केली नाही. त्यामुळे त.क. यांनी रुपये 3,00,000/- नुकसान भरपाई मिळावी तसेच वि.प. यांच्याकडे मुदत ठेवीची असेलेली रक्कम 12% दराने व्याजासह मिळावी या मागणीसह तक्रार दाखल केली. सदरची तक्रारीची नोटीस वि.प. यांना मंचामार्फत बजाविण्यात आली. वि.प. यांनी सदर तक्रारीला उत्तर दाखल केले. वि.प. यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, पत संस्थे मध्येआर्थिक गैरव्यवहार, अनियमितता झाली व त्यामुळे जिल्हा उपनिबंधक, यांनी प्रशासकांची नियुक्ती केली व आजच्या स्थितीत संस्था प्रशासक यांच्या नियंत्रणात असल्याचे आपल्या उत्तरात नमूद केले. त्यांनी आपल्या उत्तरात मान्य केले की, सदर संस्था ही यशवंत महाविद्यालय कर्मचारी हे त्याचे मुख्य सदस्य असतात व पतसंस्थेमध्ये आपली गुंतवणूक करतात. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, राजेन्द्र अनंतराव तेलंग यांनी आपल्या उत्तरामध्ये एन.डी. खडसे, महाविद्यालयातील विश्वस्त प्राध्यापक यांच्याकडे सर्व हिशोब होता व त्यांच्यावर विश्वास ठेवून संस्थेचा कारभार सुरु होता. त्याचा गैरफायदा एन.डी. खडसे यांनी घेतला व संस्थेमध्ये अनियमितता केली असे आपल्या उत्तरात संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष राजेन्द्र अनंतराव तेलंग यांनी नमूद केले. सध्या स्थितीत संस्थेवर प्रशासक असल्याचे आपल्या उत्तरात नमूद केले आहे. सध्यास्थितीत संस्थेचा कारभार प्रशासकाकडे असल्यामुळे कोणतेही भाष्य करु शकत नसल्याचे उत्तरात नमूद केले. सदर प्रकरणामध्ये प्रशासक यांची नियुक्ती झाल्यामुळे प्रशासकाला पक्षकार करण्यात आले व त्यानुसार प्रशासक यांनी मंचामार्फत नोटीस बजाविण्यात आली. सदर नोटीस तामिल होऊन ही प्रशासक मंचासमोर उपस्थित न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द नि.क्रं. 1 वर दि. 20.01.2014 रोजी एकतर्फी प्रकरण चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. उभय पक्षांचे कथन, युक्तिवाद व त्यांनी दाखल केलेले दस्ताऐवजांचे मंचाने अवलोकन केले असता, खालील बाबी विचारार्थ उपस्थित झाल्या. कारणे व निष्कर्ष तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यशवंत महाविद्यालय सेवकाची सहकारी पतसंस्था मर्यादित वर्धा यांच्याकडे खालीलप्रमाणे रक्कम गुंतविलेली होती. ही बाब त.क.च्या तक्रारीवरुन व त.क. यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. त.क. यांनी खाली रकान्यामध्ये नमूद रक्क्मा वि.प. यांचेकडे गुंतविल्या व त्यांचा परिपक्वतेचा दिनांक रकान्यात नमूद आहे.
अ.क्रं. | मुदती ठेव क्रं. | ठेवीदाराचे नांव | कालवधी | मुदती ठेवीची तारीख | मुदती ठेव संपण्याची तारीख | रक्कम | 01 | 010 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 01/08/10 | 30/07/11 | 78,540/- | 02 | 012 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 17/08/10 | 16/08/11 | 48,680/- | 03 | 011 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 10/05/10 | 09/05/11 | 1,21,580/- | 04 | 036 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 22/09/10 | 21/09/11 | 1,00,350/- | 05 | 037 | पुष्पा सुभाष तायडे | 12 महिने | 26/09/10 | 25/09/11 | 78,680/- | 06 | 035 | पुष्पा सुभाष तायडे | 12 महिने | 18/09/10 | 17/09/11 | 72,020/- | 07 | 025 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 16/11/10 | 15/11/11 | 70,000/- | 08 | 024 | परिमल सुभाष तायडे | 12 महिने | 16/11/10 | 15/11/11 | 1,00,000/- | 09 | 066 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 08/03/11 | 07/03/12 | 1,50,000/- | 10 | 065 | परिमल सुभाष तायडे | 12 महिने | 08/03/11 | 07/03/12 | 1,50,000/- |
त्यामुळे त.क. हा वि.प.यांचा ग्राहक ठरतो. सध्या स्थितीत संस्थेवर प्रशासक नियुक्त केले आहे. ही बाब उभय पक्षांना मान्य असल्यामुळे प्रशासक यांना सदर प्रकरणात पक्षकार करण्यात आले व ते आवश्यक पक्षकार आहेत असे मंचाचे मत आहे. सदर प्रकरणामध्ये वि.प. क्रं. 1 यांच्या वतीने तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र अनंतराव तेलंग यांनी उत्तर दाखल केले व आपण काहीही सांगू शकत नाही असे नमूद केले. सदर प्रकरणामध्ये त.क. यांनी यशवंत महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित वर्धा (वि.प.क्रं.1) यांच्याकडे रक्कम गुंतविलेली होती ही बाब स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे संस्थेतील अनियमिततेमुळे त.क.ची रक्कम न देणे हे अनुचित व्यापार प्रथा असून सेवेतील त्रृटी असल्याचे मंचाचे मत आहे. प्रशासक यांना सदर प्रकरणामध्ये नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी आपले कोणतेही मत मंचासमक्ष सादर केलेले नाही. आजच्या स्थितीला संस्थेची कार्यप्रणाली व प्रशासन व्यवहार ही प्रशासकच्या स्वाधीन असतांना व सहकारी कायद्यानुसार प्रशासकाला त्याच्या जबाबदारीचे निर्वाहन करावयाचे असते ते योग्यरित्या केले नाही. त्यामुळेच त.क. यांना रक्कम मिळू शकली नाही. आजच्या स्थितीत संस्थेची आर्थिक स्थिती काय आहे ? याबाबतचा कोणताही खुलासा प्रशासक यांनी मंचासमोर केलेला नाही. सदर प्रकरणातील तथ्य व दस्ताऐवजांचा विचार करता मंच या निष्कर्षा प्रत पोहचतो की, त.क. यांचे वि.प. यांच्याकडे असलेली मुदत ठेव रक्कम , रकान्यामध्ये दर्शविल्यानुसार.
अ.क्रं. | मुदती ठेव क्रं. | ठेवीदाराचे नांव | कालावधी | मुदती ठेवीची तारीख | मुदती ठेव संपण्याची तारीख | रक्कम | 01 | 010 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 01/08/10 | 30/07/11 | 78,540/- | 02 | 012 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 17/08/10 | 16/08/11 | 48,680/- | 03 | 011 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 10/05/10 | 09/05/11 | 1,21,580/- | 04 | 036 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 22/09/10 | 21/09/11 | 1,00,350/- | 05 | 037 | पुष्पा सुभाष तायडे | 12 महिने | 26/09/10 | 25/09/11 | 78,680/- | 06 | 035 | पुष्पा सुभाष तायडे | 12 महिने | 18/09/10 | 17/09/11 | 72,020/- | 07 | 025 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 16/11/10 | 15/11/11 | 70,000/- | 08 | 024 | परिमल सुभाष तायडे | 12 महिने | 16/11/10 | 15/11/11 | 1,00,000/- | 09 | 066 | सुभाष लक्ष्मणराव तायडे | 12 महिने | 08/03/11 | 07/03/12 | 1,50,000/- | 10 | 065 | परिमल सुभाष तायडे | 12 महिने | 08/03/11 | 07/03/12 | 1,50,000/- |
मुदत संपण्याच्या तारखेत दिली नाही. त्यामुळे आदेश पारित झाल्यापासून सदर मुदत ठेवींची परिपक्वतेची रक्कम 30 दिवसाच्या आत द्यावी. अन्यथा सदर रक्कमेवर त.क. यांना रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 10% दराने व्याजसह देय राहील. त.क. यांनी सदर प्रकरणामध्ये नुकसान भरपाईकरिता रुपये 3,00,000/-ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव आहे. परंतु नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार करता तक्रारकर्त्याची मुदत ठेव रक्कम मुदतीनंतर सुध्दा ठेवून वि.प.यांनी त.क. यांनाशारीरिक, मानसिक त्रास दिलेला आहे. तसेच त्यामुळे त.क. यांचे भविष्यातील नियोजन उरमडले व त्यामुळे आर्थिक नुकसान त.क.यांना झालेले आहे. त्याकरिता त.क. हे रुपये 50,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. वरील निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश 1) तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या परिच्छेद क्रमांक 11 मधील तक्ता मध्ये दर्शविलेली ठेवीची परिपक्वेतची रक्कम आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तक्रारकर्ता यांना द्यावी. अन्यथा सदर रक्कमेवर द.सा.द.शे.10%दराने व्याज प्रत्यक्ष रक्कम तक्रारकर्ता यांना अदा होईपर्यंत देय राहील. 3) विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्ता यांना आर्थिक नुकसान, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.5000/- द्यावे. 4) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.
| |