Maharashtra

Nagpur

CC/500/2022

SHRI. PRASHANT SUKHADEORAO DERE - Complainant(s)

Versus

YASHRAJ DEVELOPERS, THROUGH ITS PROPRIETOR, VISHAL CHAURAGADE - Opp.Party(s)

ADV. ANURADHA DESHPANDE

20 Apr 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/500/2022
( Date of Filing : 21 Jul 2022 )
 
1. SHRI. PRASHANT SUKHADEORAO DERE
R/O. RAJAT VILLA, HOUSE NO.13, OLD NAVBHARATH PRESS, BEHIND JAYASHREE TALKIES, COTTON MARKET, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHIVKALA SUKHDEORAO DERE
R/O. RAJAT VILLA, HOUSE NO.13, OLD NAVBHARATH PRESS, BEHIND JAYASHREE TALKIES, COTTON MARKET, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. YASHRAJ DEVELOPERS, THROUGH ITS PROPRIETOR, VISHAL CHAURAGADE
SHOP NO.3, FARAS SQUARE, RAM COMPLEX, CHHINDWARA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. ANURADHA DESHPANDE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 20 Apr 2023
Final Order / Judgement

                           आदेश

 

मा. अध्‍यक्ष, श्री. अतुल अलसी यांच्‍या आदेशान्‍वये –

  1.      तक्रारकर्त्‍यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35 नुसार प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त्‍यांनी विरुध्‍द पक्षाच्‍या मौजा – सावरमेंढा, प.ह.नं.1 , खसरा नं. 213/1-2, तह. जि. नागपूर या शेतजमीनीवर  पाडलेल्या ले-आऊट मधील 1200 चौ.फु. प्रमाणे प्लॉट क्रमांक 60 व 61 एकूण क्षेत्रफळ 2400 चौ.फु.  एकूण रक्‍कम रुपये 6,00,000/- मध्‍ये विकत घेण्‍याकरिता दि. 30.01.2014 रोजी तक्रारकर्ता क्रं. 1 च्‍या नांवे बयाणापत्र केला असून त्‍यापोटी अग्रिम राशी म्‍हणून रुपये 25,000/- विरुध्‍द पक्षाला दिले होते व उर्वरित रक्‍कम  2 वर्षाच्‍या आंत अदा करण्‍याचे ठरले होते. अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रक्‍कम दि. 23.01.2014 ते 04.02.2014 पर्यंत एकूण रक्‍कम रुपये 85,000/-  अदा केले.  

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि. 20.11.2012 रोजी  मौजा – सावरमेंढा, खसरा क्रं. 252/253/254, प.ह.नं. 29, तह.सावनेर, जि. नागपूर येथील ले-आऊट मधील प्‍लॉट क्रं. 44 व 45  हा क्षेत्रफळ 1200 व 1380 चौ.फु. याप्रमाणे एकूण 2580 चौ.फु. चा भूखंड एकूण रक्‍कम रुपये 4,25,700/- मध्‍ये विकण्‍याकरिता बयाणापत्र केला असून त्‍याकरिता अग्रिम राशी म्‍हणून रुपये 20,000/- धनादेशा द्वारे अदा केले व उर्वरित रक्‍कम 3 वर्षाच्‍या आंत अदा करावयाची होती. अशा प्रकारे दि. 18.10.2012 ते 03.08.2013 पर्यंत एकूण रक्‍कम रुपये 81,100/- अदा केली होती.

 

  1.        तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे प्‍लॉट क्रं.  60 व 61 आणि प्‍लॉट क्रं. 44 व 45 चे कायदेशीर विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता विनंती केली असता विरुध्‍द पक्षाने टाळाटाळ करण्‍याचा प्रयत्‍न केला, त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला खसरा क्रं. 252 ते 254 मधील प्‍लॉट नं. 24, एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फुटचे चे विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याने  प्‍लॉट क्रं. 60 व 61  पोटी जमा केलेली रक्‍कम रुपये 85,000/- आणि प्‍लॉट क्रं. 44 व 45 पोटी जमा केलेली रक्‍कम रुपये 81,100/- असे एकूण चार प्‍लॉट पोटी जमा असलेल्‍या रक्‍कमेत विक्रीपत्र करुन  देण्‍यास तयार असल्‍याचे सांगितले. परंतु सदरचा प्‍लॉट क्रं. 24 हा 1500 चौ.फु. नसून केवळ 1200 चौ.फुट असून सदरचा एरिया हा विकसित नसल्‍याने त्‍यास नकार दिला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला अनेक वेळा प्‍लॉट क्रं. 60 व 61 आणि प्‍लॉट क्रं. 44 व 45 चे विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता विनंती करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्‍तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करून मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून भूखंडा पोटी असलेली उर्वरित रक्‍कम स्‍वीकारुन भूखंडाचे कायदेशीर विक्रीपत्र करुन प्रत्‍यक्ष ताबा देण्‍याचा आदेश द्यावा. किंवा चार भूखंडा पोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 1,66,100/-, द.सा.द.शे. 24 टक्के दराने व्याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश करावा.

 

  1.      विरुध्‍द  पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त झाल्‍यानंतर ही विरुध्‍द पक्ष आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 02.12.2022 ला पारित करण्यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्ताऐवज व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले .

मुद्दे                                              उत्‍तर

1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ            होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?        होय

3. काय आदेश ॽ                                      अंतिम आदेशानुसार     

  •  

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या मौजा – सावरमेंढा, प.ह.नं.1 , खसरा नं. 213/1-2, तह. जि. नागपूर या शेतजमीनीवर  पाडलेल्या ले-आऊट मधील 1200 चौ.फु. प्रमाणे प्लॉट क्रमांक 60 व 61 एकूण क्षेत्रफळ 2400 चौ.फु.  एकूण रक्‍कम रुपये 6,00,000/- मध्‍ये विकत घेण्‍याकरिता दि. 30.01.2014 रोजी तक्रारकर्ता क्रं. 1 च्‍या नांवे बयाणापत्र केला होता हे नि.क्रं. 2(9) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच मौजा – सावरमेंढा, खसरा क्रं. 252/253/254, तह.सावनेर, जि. नागपूर येथील ले-आऊट मधील प्‍लॉट क्रं. 44 व 45  हा क्षेत्रफळ 1200 व 1380 चौ.फु. याप्रमाणे एकूण 2580 चौ.फु. चा भूखंड एकूण रक्‍कम रुपये 4,25,700/- मध्‍ये विकण्‍याकरिता दि. 20.11.2012 रोजी  बयाणापत्र केला होता हे नि.क्रं. 2(23) वर  दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट क्रं. 60 व 61 च्‍या खरेदी पोटी रुपये 85,000/- व प्‍लॉट क्रं. 44 व 45 च्‍या खरेदी पोटी रुपये 81,100/- अदा केले असल्‍याचे नि.क्रं. 2(18 , 24 व 25) वर दाखल पावत्‍यांवरुन  दिसून येते. अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे चार प्‍लॉट पोटी रुपये 1,66,100/- एवढी रक्‍कम अदा केली असल्‍याचे दिसून येते.

    

  1.      तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे प्लॉट क्रमांक 60 व 61 एकूण क्षेत्रफळ 2400 चौ.फु.  एकूण रक्‍कम रुपये 6,00,000/- मध्‍ये आणि प्लॉट क्रमांक 44 व 45 एकूण क्षेत्रफळ 2580 चौ.फु. एकूण रक्‍कम रुपये 4,25,700/- मध्‍ये विकत घेणार होता. तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट क्रं. 60 व 61 च्‍या खरेदी पोटी रुपये 85,000/- आणि प्‍लॉट क्रं. 44 व 45 च्‍या खरेदीकरिता रुपये 81,100/- असे एकूण रुपये 1,66,100/- अदा केले असल्‍याचे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते.

 

  1.       तक्रारकर्त्‍याने स्‍वतः तक्रारीत नमूद केले आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास प्‍लॉट क्रं. 24, खसरा क्रं. 252 ते 254 चा प्‍लॉटची विक्रीपत्र करुन देण्‍यास तयार होता, परंतु तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या प्‍लॉटचे घरबांधकामाकरिता क्षेत्रफळ कमी असल्‍यामुळे नकार दिलेला आहे.  

 

  1.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून भूखंड विक्रीपोटी असलेली रक्‍कम स्‍वीकारुन ही तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे उपरोक्‍त भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा त्‍याच्‍याकडे जमा असलेली रक्‍कम ही परत केली नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

           

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः. मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडून भूखंड (क्रं. 60 व 61 पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 85,000/- आणि प्‍लॉट क्रं. 44 व 45 पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 81,100/-) असे एकूण मिळून रुपये 1,66,100/- व त्‍यावर तक्रार दाखल दिनांक 10.08.2022 पासून द.सा.द.शे.  12 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.