नि.16 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
तक्रार क्र.80/2011 नोंदणी तारीख -09/06/2011 निकाल तारीख -19/11/2011 निकाल कालावधी-163 दिवस
श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) --------------------------------------------------------------------------------- 1. श्री. वामन शंकर पाठक, रा. हिंगणे,ता.खटाव,जि.सातारा ----- तक्रारदार (वकील श्री.पी.आर.इनामदार) विरुध्द
1. यशोदीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मायणी रा.मायणी ता. खटाव जि. सातारा तर्फे चेअरमन श्री शिवाजीराव शंकरराव पाटील यांचेवर समन्स बजावणी करणेत यावी. 2. श्री शिवाजीराव शंकरराव पाटील, चेअरमन यशोदीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मायणी रा.मायणी ता. खटाव जि. सातारा 3. श्री. मधुकर शामराव लावंड, वडूज शाखाप्रमुख, यशोदीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मायणी ता. खटाव जि. सातारा रा.वडूज, ता. खटाव जि. सातारा ----- जाबदार (एकतर्फा ) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत व सेव्हींगखातेमध्ये ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. ठेवींची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी मुदत ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे.
2. जाबदार क्र. 1 ते 3 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी या कामी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
3. अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहीली तसेच नि. 15 कडील पुरसीस पाहीली. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.5 सोबत नि.नि 5/1 ते 5/3 कडे मुदत ठेव पावत्यांच्या मूळ प्रती व सेव्हींग खाते पासबुक दाखल केल्या आहेत. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि. 5/4 व 5/5 कडील ठेव रक्कम मागणीबाबतचा अर्जदार यांनी जाबदार यांना दिलेली नोटीस पाहिली असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. तसेच जाबदार यांनी मे. मंचात हजर होवून अर्जदार यांचे कोणतेही कथन नाकारले नाही. सबब जाबदाराने अर्जदाराच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 5 सोबतच्या नि. 5/1 ते 5/3 कडील मुदत ठेवींच्या रकमा द्याव्यात तसेच सदर ठेवपावतीवर दि.04/10/2010 पासून पावतीवरील मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवरील नमुद टक्क्याने व्याज द्यावे व ठेवीची मुदत संपले तारखेपासून सदर संपूर्ण रक्कम अर्जदाराचे पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्याव्यात. त्याचप्रमाणे सेव्हींग खातेमधील रक्कम सेव्हीगखातेच्या व्याजदराने होणा-या व्याजासह द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
4. जाबदार क्र. 3 हे व्यवस्थापक असून संस्थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र. 3 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्थेसाठी त्यांना रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र.1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तरित्या तसेच जाबदार संस्थेसाठी जाबदार क्र. 3 यांना संयुक्तीकरित्या अर्जदारच्या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
5. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेसाठी जाबदार क्र.3 यांनी संयुक्तिकरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. मुदत ठेव पावती क्र. 25217, 25218, 25219, 22031 व 22032 कडील ठेव रकमा द्याव्यात. तसेच सदर ठेव पावतीवर दि. 04/10/2010 पासून पावतीवरील मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवरील नमूद टक्क्याने व्याज द्यावे. तसेच संपूर्ण रक्कम अर्जदारांचे पदरी पडेपर्यंत सदर रकमेवरती द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. ब. सेव्हींग खाते क्र. 1547 मधील शिल्लक रक्कम रु. 3,845/- सेव्हींगखातेच्या व्याजदराने होणा-या व्याजासह द्यावी. क. मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी एकूण रक्कम रु.5,000/- द्यावेत. 3. जाबदार क्र.1 ते 3 यांनी या निर्णयाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसांचे आत करावी. .4. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 19/11/2011.
(श्री. महेंद्र एम. गोस्वामी) (श्रीमती. सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |