Maharashtra

Satara

CC/10/285

Arvind Dattajirao. Jadhav - Complainant(s)

Versus

yashodha gramin bigar shethi sahakari pathsantha Chairman Shri Shivajirao sankarrao - Opp.Party(s)

Gaykawad

10 Mar 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 285
1. Arvind Dattajirao. JadhavA/p Pusegaon Tal Khathav Dist satarasatara ...........Appellant(s)

Vs.
1. yashodha gramin bigar shethi sahakari pathsantha Chairman Shri Shivajirao sankarrao Mayni Tal Khathav Dist Satarasatara2. yashodha gramin bigar shethi sahakari pathsantha Chairman Shri Shivajirao sankarrao Maynisatara3. V.chairman Chandrkant L. PawarMaynisatara4. Manager Shri Madhukar S. LavandMaynisatara5. Shri Javed Ganibhai MulaMaynisatara6. Sou Urmila yegankar SanchalikaMaynisatara7. Shri Makrnd R. ToroMaynisatara ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 10 Mar 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.22
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 285/2010
                                          नोंदणी तारीख – 29/12/2010
                                          निकाल तारीख – 10/3/2011
                                          निकाल कालावधी – 70 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
श्री अरविंद दत्‍ताजीराव जाधव
रा.मु.पो. पुसेगाव (भवानीनगर)
ता.खटाव जि. सातारा                         ----- अर्जदार
                                       (अभियोक्‍ता श्री विक्रम गायकवाड)
      विरुध्‍द
1. यशोदिप ग्रा.बि.शे.सह.पत.मर्या.मायणी
   ता.खटाव जि. सातारा तर्फे चेअरमन
2. श्री शिवाजीराव शंकरराव पाटील
   चेअरमन, रा.मायणी ता.खटाव जि. सातारा
3. श्री चंद्रकांत लक्ष्‍मण पवार, व्‍हा.चेअरमन
   रा.औंध, ता.खटाव जि. सातारा
4. श्री मधुकर शामराव लावंड, शाखाधिकारी,
   यशोदिप ग्रा.बि.शे.सह.पत.मर्या.
   शाखा पुसेगाव ता.खटाव जि. सातारा
5. श्री जावेद गनीभाई मुल्‍ला, व्‍यवस्‍थापक,
   रा.मायणी ता.खटाव जि. सातारा
6. सौ उर्मिला दिलीप येळगावकर, संचालिका
    रा.मायणी ता.खटाव जि. सातारा   
7. श्री मकरंद रामचंद्र तोरो, संचालक
    यशोदिप ग्रा.बि.शे.सह.पत.मर्या.मायणी
    ता.खटाव जि. सातारा
    रा. मायणी ता.खटाव जि. सातारा
8. डॉ महेश गणेश गुरव, संचालक
    रा.मायणी ता.खटाव जि. सातारा   
9. श्री अजित अशोकराव सिंहासने, संचालक
    रा.मायणी ता.खटाव जि. सातारा   
10. श्री संजय धोंडिराम मोरे, संचालक
    रा.मायणी ता.खटाव जि. सातारा                  ----- जाबदार
                                                  ( एकतर्फा )
 
 
न्‍यायनिर्णय
 
1.     अर्जदार यांनी जाबदार पतसंस्‍थेत रक्‍कम रु.1 लाख मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्‍हणून ठेवलेली आहे. अर्जदार यांना रकमेची गरज असल्‍याने त्‍यांनी ठेवीची मुदत संपणेपूर्वी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्‍कम परत दिली नाही. सबब ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्‍हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे.
2.    जाबदार क्र. 1 ते 4, 6, 7, 9, 10 यांना प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्‍या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. जाबदार क्र. 5 व 8 यांनी प्रस्‍तुत तक्रारअर्जाची नोटीस स्‍वीकारली नाही. नोटीस न स्‍वीकारलेबाबतचे पोस्‍टाचे शेरे असलेले लखोटे प्रस्‍तुतकामी दाखल आहेत. जाबदार क्र.1 ते 10 हे याकामी हजर झाले नाहीत तसेच त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.
3.    अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि. 5   सोबत नि.6 कडे ठेव पावतीची मूळ प्रत दाखल केली आहे. प्रस्‍तुत ठेव पावतीचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेत ठेव ठेवलेचे स्‍पष्‍ट होते. सदरचे ठेवपावतीची मुदत जरी अद्याप संपलेली नसली तरी अर्जदार यांना रकमेची आवश्‍यकता आहे. ठेवीची मुदत संपलेनंतर अगर संपणेपूर्वी ठेव रक्‍कम परत मिळण्‍याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र पाहिले असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्‍पष्‍ट दिसते. सबब अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्‍कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत‍ आहे. सबब जाबदारने अर्जदारच्‍या प्रस्‍तुत तक्रारीतील फेरिस्‍त नि. 5 सोबतच्‍या नि. 6 कडील ठेवीची रक्‍कम मुदतपूर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
4.    जाबदार क्र.4 व 5 हे अनुक्रमे शाखाधिकारी व व्‍यवस्‍थापक असून संस्‍थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र.4 व 5 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्‍कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्‍थेसाठी त्‍यांना रक्‍कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 10 यांना स्‍वतंत्र व संयु‍क्‍तरित्‍या व जाबदार संस्‍थेतर्फे जाबदार क्र. 4 व 5 यांना अर्जदारच्‍या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
5.    सबब आदेश.
आदेश
 
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 10. यांनी स्‍वतंत्र व संयु‍क्‍तरित्‍या व जाबदार
    संस्‍थेतर्फे जाबदार क्र. 4 व 5 यांनी अर्जदार यांना त्‍यांची ठेव पावती क्र.21000  
    कडील रक्‍कम मुदतपूर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह द्यावी.
3. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्‍कम
    रु. 5,000/- द्यावी.
4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्‍यांना या न्‍यायनिर्णयाची सत्‍यप्रत
    मिळाल्‍यापासून 30 दिवसात करावे.
5. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 10/3/2011
 
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)           (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER