Maharashtra

Satara

CC/11/19

Shri ShaShiKant Balasaheb Shinde - Complainant(s)

Versus

Yashodeep Gramin Bigar Sheti Sah Pat. Sanstha Ltd Mayani Manager Shri Madhukar S. Lavand - Opp.Party(s)

Nivandakar

30 Apr 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 11 of 19
1. Shri ShaShiKant Balasaheb ShindeA/p Jakhangav Tal Khathav Dist satara ...........Appellant(s)

Vs.
1. Yashodeep Gramin Bigar Sheti Sah Pat. Sanstha Ltd Mayani Manager Shri Madhukar S. LavandPusegaon Tal Khathav Dist satara2. Chairman .S.S, PatilMayani .Tal Khathavsatara3. V.Chairman . C.L. PawarSatarasatara4. Dr. Shri D. M. yelgavkarMayani Satara ...........Respondent(s)


For the Appellant :Nivandakar, Advocate for
For the Respondent :

Dated : 30 Apr 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.14
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 19/2011
                                          नोंदणी तारीख – 28/1/2011
                                          निकाल तारीख – 30/4/2011
                                          निकाल कालावधी – 92 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
(श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
श्री शशिकांत बाळासाहेब शिंदे
मु.पो.जाखणगाव ता.खटाव जि. सातारा                 ----- अर्जदार
                                          (अभियोक्‍ता श्री.एम.डी.निवंडकर)
      विरुध्‍द
1. यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या.
   मायणी ता.खटाव शाखा पुसेगाव करिता व्‍यवस्‍थापक
   श्री मधुकर शामराव लावंड
   मु.पो. खातगुण, ता.खटाव जि. सातारा
2. यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या.
   मायणी ता.खटाव करिता चेअरमन
   श्री शिवाजीराव शंकरराव पाटील
3. यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या.
   मायणी ता.खटाव करीता व्‍हा.चेअरमन
   श्री चंद्रकांत लक्ष्‍मण पवार
   रा.औंध, ता.खटाव जि. सातारा
4. यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या.
   मायणी ता.खटाव संचालक
   डॉ श्री दिलीप मुरलीधर येळगावकर
   वरील क्र.1 ते 4 रा. मु.पो. मायणी
   ता.खटाव जि. सातारा                                ----- जाबदार
                                             (अभियोक्‍ता श्री मिलींद ओक)
 
न्‍यायनिर्णय
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेमध्‍ये रक्‍कम रु.30,000/- मुदत ठेव मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्‍कम ठेव म्‍हणून ठेवलेली आहे. तसेच अर्जदार यांचे बचत खात्‍यामध्‍ये काही रक्‍कम शिल्‍लक आहे. सदरच्‍या ठेवीची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्‍याजासहित देय झालेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्‍यात यावयाची रक्‍कम न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे ग्राहक आहेत. त्‍यामुळे जाबदार संस्‍थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्‍ये अर्जदार यांनी ठेवीची व्‍याजासहित होणारी रक्‍कम तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 7,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 5,000/- ची मागणी केलेली आहे.
 
2.    प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र.1 ते 4 यांना झालेनंतर जाबदार हे वकीलांचेमार्फत हजर झाले. परंतु त्‍यांनी नेमले तारखेस त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबतचा योग्‍य असा आदेश नि.1 वर पारीत केला आहे.
3.    अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्‍दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 5 सोबत दाखल केलेली मूळ ठेवपावती व बचत खात्‍याचे पासबुक पाहिले.
 
4.    अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्‍पष्‍ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्‍थेमध्‍ये मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्‍कम रु.30,000/- ठेव म्‍हणून ठेवलेली होती व आहे.  सदरच्‍या ठेवींची मुदत पूर्ण झालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्‍कम व त्‍यावर ठेव पावतीमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे होणा-या व्‍याजाची रक्‍कम देण्‍याची होती.  तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केलेली आहे. तसेच बचत खात्‍यातील रक्‍कमही दिलेली नाही. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्‍या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्‍पष्‍ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्‍हणजे ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या रकमेवर व्‍याजासहित देय झालेली रक्‍कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही तसेच बचत खात्‍यातील रक्‍कमही मागणी करुन दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्‍कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे.
 
5.    एक गोष्‍ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र. 2 जे यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था या संस्‍थेचे चेअरमन आहेत, अशा या जबाबदारीच्‍या पदावर काम करणा-या व्‍यक्‍तीने प्रस्‍तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस मिळालेनंतर नेमलेल्‍या तारखांना या मंचासमोर हजर होणे जरुरीचे होते. तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र. 2 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 2 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. जाबदार यांनी अर्जदार यांचे अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले अथवा खोडून काढलेले नाही. सबब, अर्जदार यांचे या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्‍ये केलेली विनंती अंशतः मान्‍य करणे जरुरीचे आहे. 
 
6.    या सर्व कारणास्‍तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्‍यात येत आहे.
आदेश
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिकरित्‍या व
    संयुक्‍तरित्‍या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्‍यात.
    अ. ठेवपावती क्र.26771 वरील मूळ रक्‍कम ठेवपावतीमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे
       देय होणा-या व्‍याजासह द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून    
       संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍केंप्रमाणे व्‍याजासह द्यावी.
    ब. बचत खाते क्र.1355 मधील शिल्‍लक रक्‍कम बचत खात्‍याचे नियमाप्रमाणे देय
       होणा-या व्‍याजासह द्यावी.   
    क. मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- द्यावेत.
    ड. अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 30/4/2011
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)         (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER