Maharashtra

Satara

CC/14/10

MADHUKAR DNYANDEV DESHMUKH - Complainant(s)

Versus

YASHODEEP GRAMIN BIGAR SHETI PAT SANSHTA - Opp.Party(s)

JADHAV, KALEKAR

09 Jan 2015

ORDER

 

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                             मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                           तक्रार क्र. 10/2014.

                                                                                                          तक्रार दाखल दि.6-02-2014.

                                                                                                           तक्रार निकाली दि.9-1-2015. 

 

1. मधुकर ज्ञानदेव देशमुख.

2. सविता सहदेव कापसे.

   1 व 2 रा.श्री.साईरंगलिला 163/2/1

   अयोध्‍या कॉलनी. जगतापवाडीजवळ,

   शाहुनगर, सातारा.

3. श्रीमती सरस्‍वती अंकुश फडतरे.

   रा.मु.पो.पळसगांव, ता.खटाव, जि.सातारा.

4. सौ.सुलोचना शालिग्राम उर्फ शालिकराम पाटील.

   रा.उंडाळे, ता.कराड, जि.सातारा.

5. श्रीमती सुनंदा उर्फ नंदिनी जालिंदर जाधव.

   रा.सिंदी खु. ता.माण, जि.सातारा. 

6. सौ.आशालता अंकुश काटकर.

   रा.कातरखटाव, ता.खटाव, जि.सातारा.

   अ.क्र.1,2 व 4 ते 6 चे कुलमुखत्‍यार

   म्‍हणून तक्रारदार क्र.3.                       ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्‍था मर्या.

   मायणी, ता.खटाव, जि.सातारा तर्फे-

   व्‍यवस्‍थापक.

2. श्री.एम.पी.शहा, व्‍यवस्‍थापक,

   यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्‍था मर्या.

   रा.वडूज, ता.खटाव, जि.सातारा.

3. व्‍यवस्‍थापक,

   यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्‍था मर्या.

   शाखा मायणी, रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.

4. शिवाजी शंकर पाटील, चेअरमन,

   रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.

5. चंद्रकांत लक्ष्‍मण पवार, व्‍हा.चेअरमन,

   रा.औंध, ता.खटाव, जि.सातारा.

6. डॉ.मकरंद रामचंद्र तोरो, व्‍हा.चेअरमन,

   रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.

7. डॉ.सौ.उर्मिला दिलीप येळगांवकर, संचालिका,

   रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.

8. डॉ.महेश गणेश गुरव, संचालक,

   रा.वडूज, ता.खटाव, जि.सातारा.

9. प्रकाश बाबुराव कणसे, संचालक,

   रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.

10. संजय धोंडीराम मोरे, संचालक,

    रा.निमसोड, ता.खटाव, जि.सातारा.

11. चंद्रकांत आनंदराव घाडगे, संचालक,

    रा.पाचवड, ता.खटाव, जि.सातारा.

12. राजाराम विलास कचरे, संचालक,

   रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.

13. अजित अशोक सिंहासने, संचालक,

    रा.कातरखटाव, ता.खटाव, जि.सातारा.

14. तुळशीदास पांडुरंग कवडे, संचालक,

    रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.     (वगळणेत आले.)

15. सौ.शांताबाई शिवाजी पाटोळे, संचालिका,

    रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.            ....  जाबदार

 

                   तक्रारदारातर्फे अँड.एस.एस.जाधव.

                 जाबदार क्र.1 ते 13 व 15 एकतर्फा.

                                                                  

                        न्‍यायनिर्णय

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

       तक्रारदार क्र.1 ते 6 हे एकमेकांचे नातलग असून तक्रारदार क्र.3 ते 6 या सख्‍या बहिणी आहेत.  त्‍यांना लिला नावाची बहिण होती ती मयत झालेली आहे.  तक्रारदार क्र.1 हे तिचे पती आहेत व तक्रारदार क्र.2 तिची मुलगी आहे.  तक्रारदार क्र.3 ते 6 यांचे आईचे नाव रुक्मिणी आबाजी ऊर्फ आबासाहेब निंबाळकर या मयत आहेत.  तर त्‍यांचे वडिलांचे नाव आबासाहेब उर्फ आबाजी निंबाळकर असे असून तेही मयत आहेत.  त्‍यांना तक्रारदार क्र.1 ते 6 हे एकमेव कायदेशीर वारस असून त्‍यांनी मे.कोर्टाकडून रितसर वारस दाखला मिळवलेला आहे.  कै.‍ रुक्मिणी आबाजी निंबाळकर यांनी त्‍यांचे हयातीत जाबदार पतसंस्‍थेत दामदुप्‍पट मुदतठेव योजनेत वेगवेगळया ठेवपावत्‍यांद्वारे रक्‍कम गुंतवली होती व आहे.  त्‍यांचे पश्‍चात सदर रक्‍कम मिळणेसाठी तक्रारदाराना वारसा दाखला मिळाला आहे.  प्रस्‍तुत ठेवीचे वर्णन खालीलप्रमाणे-          

अ.क्र.

पावती क्र.

ठेव ठेवलेची तारीख.

ठेवीची रक्‍कम रु.

मुदत संपलेची तारीख

देय रक्‍कम रु.

1

8803

23-08-05

66,457/-

23-01-12

1,32,914/-

2

9019

04-11-03

62,000/-

04-05-09

1,24,000/-

3

9020

07-06-05

19,193/-

07-11-11

 38,386/-

4

9021

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

5

9022

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

6

9023

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

7

9024

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

8

9025

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

9

9027

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

10

16660

03-03-06

82,500/-

03-03-09

1,10,963/-

11

16661

03-03-06

82,500/-

03-03-09

1,10,963/-

12

22627

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

13

22628

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

14

22629

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

15

22630

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

16

22631

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

17

22632

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

18

22633

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

19

22634

31-07-08

21,200/-

31-05-12

 31,800/-

20

22635

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

21

22636

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

22

22637

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

23

22638

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

24

22639

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

25

22640

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

26

26905

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

27

26906

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

28

26907

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

29

26908

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

30

26909

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

31

26910

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

32

26911

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

33

26912

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

34

26913

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

35

26914

22-09-08

16,348/-

22-12-09

 18,902/-

36

26915

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

                          एकूण रु.    9,82,398/-     एकूण रु.    15,33,578/-

        वर नमूद केलेप्रमाणे अ.क्र.1 च्‍या ठेवीच्‍या रकमा जाबदार पतसंस्‍थेत शाखा मायणी येथे ठेवली असून अ.क्र.2 ते 36 या ठेवपावत्‍यांच्‍या रकमा जाबदार पतसंस्‍थेत शाखा वडूज येथे ठेवल्‍या आहेत. 

         दि.19-7-2009 रोजी रुक्मिणी आबाजी निंबाळकर या मयत झाल्‍यानंतर जाबदार क्र.3 ते 6 व तक्रारदार क्र.1 च्‍या पत्‍नी व क्र.2 च्‍या आई लिला यानी वर नमूद ठेवपावत्‍यांना वारस म्‍हणून नोंद करणेसाठी प्रस्‍तुत जाबदार पतसंस्‍थेत अर्ज देऊन योग्‍य ती सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती, परंतु तक्रारदार क्र.3 ते 6 व कै.लिला जाबदाराने वारसा नोंदी न करता तक्रारदाराना मे.कोर्टातून वारसा दाखला घेणेस सांगितले.  त्‍यामुळे तक्रारदारानी मे.वडूज येथील सि.ज.सि.डी.यांचे कोर्टातून वारसा दाखला मिळवला आहे.  वरील परिशिष्‍टात नमूद केलेल्‍या ठेवपावत्‍यांची मुदत संपलेनंतर तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेत जाऊन सदर  ठेवींच्‍या रकमांची व्‍याजासह वारंवार मागणी केली असता जाबदारानी रक्‍कम अदा केली नाही तर जाणुनबुजून टाळाटाळ करीत आहेत.  प्रस्‍तुत रक्‍कम न मिळाल्‍याने तक्रारदारांना भयंकर मानसिक व शारिरीक त्रास सोसावा लागला आहे, त्‍यामुळे प्रस्‍तुत कामी जाबदारांकडून ठेवपावत्‍यांची रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन मिळावी, तसेच मानसिक, त्रासासाठी व अर्जाचा खर्च व नुकसानभरपाई मिळणेसाठी तक्रारदाराने सदर तक्रारअर्ज मंचात दाखल केला आहे.  

2.     तक्रारदारानी सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/36 कडे सर्व ठेवपावत्‍यांच्‍या व्‍हेरिफाईड प्रती, नि.5/37 कडे वारसा दाखला, नि.5/38 कडे संचालक मंडळाची यादी, नि.5/39 कडे तक्रारदारानी जाबदाराला पाठवलेली नोटीसची स्‍थळप्रत, नि.5/41 व 5/42 कडे जाबदार क्र.1,6,11,13 ला पाठवलेल्‍या नोटीसची पोहोचपावती, नि.5/43 ते 5/48 कडे जाबदार क्र.2 ते 5, 7 ते 10, 12 व 14,15 याना पाठवलेल्‍या नोटीसचे परत आलेले लखोटे, नि.5/49 कडे तक्रारदार क्र.4 ते 6 यानी तक्रारदार क्र.3 याना दिलेले मुखत्‍यारपत्र, नि.5/50 कडे तक्रारदार क्र.1 व 2 यानी तक्रारदार क्र.3 ला करुन दिलेले मुखत्‍यारपत्र, नि.6 ते 12 कडे जाबदाराना तक्रारअर्जाची नोटीस मिळालेल्‍या पोहोचपावत्‍या, नि.13 ते 20 कडे जाबदाराना पाठवलेले पोस्‍टाच्‍या शे-याने परत आलेले लखोटे, नि.24 ला जाबदार क्र.14 हे मयत असल्‍याने त्‍याना सदर कामातून वगळणेसाठी दिलेली पुरसीस, नि.25 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.28 कडे तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद वगैरे कागद मंचात तक्रारदारानी दाखल केले आहेत. 

3.     तक्रारदारानी सदर कामी जाबदाराकडून वर पॅरा.1 मध्‍ये नमूद केलेले सर्व ठेवपावत्‍यांची एकूण दामदुप्‍पट रक्‍कम रु.15,33,578/- वसूल होऊन मिळावी, प्रस्‍तुत रकमेवर ठेवपावत्‍यांची मुदत संपले तारखेनंतर रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याज तक्रारदाराना जाबदाराकडून मिळावे, तक्रारदारास रक्‍कम रु.1,00,000/- वारसा दाखला मिळवणेसाठी झालेला खर्च जाबदाराकडून मिळावा, मानसिक व शारिरीक त्रास व अर्जाचा खर्च यासाठी रक्‍कम रु.25,000/-जाबदाराकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर कामी केलेली आहे. 

4.       सदर कामी जाबदार क्र.1 ते 13 व 15 हे तक्रारअर्जाची नोटीस मिळूनही मे.मंचात हजर राहिले नाहीत तसेच त्‍यानी म्‍हणणे दाखल केले नाही त्‍यामुळे जाबदार क्र.1 ते 13 व 15 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारित करणेत आला, तर जाबदार क्र.14 हे मयत असलेने त्‍यांना सदर कामातून वगळणेबाबत अर्ज तक्रारदाराने नि.27 कडे दाखल केला आहे.  प्रस्‍तुत जाबदार क्र.14 यांस वगळणेस मे.मंचाने तक्रारदाराना परवानगी दिल्‍याने जाबदार क्र.14 यांस सदर कामातून वगळणेत आले आहे.  जाबदाराने प्रस्‍तुत तक्रारअर्जातील तक्रारदारांचे कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.

5.      वर नमूद तक्रारदारानी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचा, पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, व लेखी युक्‍तीवाद, तोंडी युक्‍तीवाद यांचा सखोल अभ्‍यास करुन मे.मंचाने प्रस्‍तुत कामी सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.            मुद्दा                                    उत्‍तर

 1.  तक्रारदार व जाबदारांचे दरम्‍यान ग्राहक व सेवादेणार असे

    नाते आहे काय?                                       होय.

 2. तक्रारदाराना जाबदारानी सदोष सेवा पुरवली आहे काय?        होय.

 3. अंतिम आदेश काय?                               शेवटी नमूद केलेप्रमाणे.

विवेचन मुद्दा क्र.1 ते 3-

6.       वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदार क्र.3 ते 6 यांचे आईने व तक्रारदार क्र.1 चे सासूबाईंनी व तक्रारदार क्र.2 चे आजीने म्‍हणजे कै.रुक्मिणी आबाजी निंबाळकर यांनी जाबदार पतसंस्‍थेत पॅरा.1 मध्‍ये दिलेल्‍या कोष्‍टकात नमूद केलेप्रमाणे दामदुप्‍पट ठेव योजनेत वेगवेगळया ठेवपावत्‍यांमध्‍ये रक्‍कम गुंतवली होती व आहे.  ही बाब तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/36 कडे दाखल केलेल्‍या ठेवपावत्‍यांच्‍या व्‍हेरीफाईड प्रतीवरुन सिध्‍द होते.  म्‍हणजेच तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून सर्व जाबदार हे सेवापुरवठादार आहेत हे निर्विवाद सत्‍य आहे म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे. 

7.       वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण वर नमूद सर्व ठेवपावत्‍यांच्‍या मुदती संपल्‍यानंतर तक्रारदार हे मयत रुक्मिणी आबाजी निंबाळकर यांचे सरळ कायदेशीर वारस असल्‍याने त्‍यांनी जाबदाराकडे प्रस्‍तुत दामदुप्‍पट रकमेची वारंवार मागणी केली, परंतु जाबदारानी प्रस्‍तुत रक्‍कम तक्रारदाराला परत अदा केली  नाही व रक्‍कम परत करणेस जाणुनबुजून टाळाटाळ केली आहे ही बाब तक्रारदाराने जाबदाराना वकीलातर्फे पाठवलेली नोटीस नि.5/40 वरुन तसेच नोटीस मिळाल्‍याच्‍या पोहोचपावत्‍या, व अनक्‍लेम्‍ड शे-याने परत आलेले नोटीसीचे लखोटे यावरुन सिध्‍द होते.  प्रस्‍तुत नोटीस जाबदाराना पाठवूनही जाबदारानी नोटीसीला कोणतेही उत्‍तर दिलेले नाही, तसेच ठेवीची रक्‍कमही तक्रारदाराना अदा कली नाही.  यावरुन तक्रारदाराना जाबदारानी सदोष सेवा पुरवल्‍याचे साफ निदर्शनास येते.  सबब आम्‍ही मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे. 

8.        प्रस्‍तुत कामी जाबदार क्र.1 ते 13 व 15 हे मे.मंचात हजर राहिलेले नाहीत, तसेच त्‍यानी तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही त्‍यामुळे सदर जाबदारांविरुध्‍द एकतर्फा आदेश पारित झालेला आहे.  सबब सदर तक्रारअर्जाचे काम एकतर्फा चालवणेत आले.  तक्रारदारानी ठेवीदारांचे (कै.रुक्मिणी आबाजी निंबाळकर) कायदेशीर वारस असल्‍याचा वारसा दाखला मे.दिवाणी कोर्टातून घेतलेल आहे, तो या कामी दाखल आहे. 

      वरील विवेचनाचा विचार करता जाबदार क्र.1 ते 13 व 15 यांना तक्रारदारानी मागणी केलेल्‍या ठेवपावत्‍यांची दामदुप्‍पट रक्‍कम प्रस्‍तुत तक्रारदाराना अदा करणेस वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या Co-operative corporate veil  नुसार जबाबदार धरणे न्‍यायोचित होईल असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालील न्‍यायनिवाडयांचा विचार केला- मा.उच्‍च न्‍यायालय मुंबई यांचे रिट पिटीशन क्र.117/2011- मंदाताई संभाजी पवार विरुध्‍द स्‍टेट बँक ऑफ महाराष्‍ट्र. 

9.       सबब आम्‍ही प्रस्‍तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                            आदेश

1.   तक्रारदारांचे खालील परिशिष्‍टात नमूद केलेल्‍या सर्व ठेवींची दामदुप्‍पट रक्‍कम तक्रारदारांना अदा करणेसाठी जाबदार क्र.1 ते 13 व 15 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरणेत येते. 

2.    जाबदार क्र.1 ते 13 व 15 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या खालील नमूद ठेवपावत्‍यांची दामदुप्‍पट रक्‍कम तक्रारदाराना अदा करावी-  

अ.क्र.

पावती क्र.

ठेव ठेवलेची तारीख.

ठेवीची रक्‍कम रु.

मुदत संपलेची तारीख

देय रक्‍कम रु.

1

8803

23-08-05

66,457/-

23-01-12

1,32,914/-

2

9019

04-11-03

62,000/-

04-05-09

1,24,000/-

3

9020

07-06-05

19,193/-

07-11-11

 38,386/-

4

9021

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

5

9022

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

6

9023

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

7

9024

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

8

9025

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

9

9027

07-06-05

28,700/-

07-11-11

 57,400/-

10

16660

03-03-06

82,500/-

03-03-09

1,10,963/-

11

16661

03-03-06

82,500/-

03-03-09

1,10,963/-

12

22627

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

13

22628

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

14

22629

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

15

22630

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

16

22631

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

17

22632

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

18

22633

12-05-08

20,000/-

12-03-12

 30,000/-

19

22634

31-07-08

21,200/-

31-05-12

 31,800/-

20

22635

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

21

22636

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

22

22637

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

23

22638

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

24

22639

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

25

22640

31-07-08

20,000/-

31-05-12

 30,000/-

26

26905

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

27

26906

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

28

26907

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

29

26908

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

30

26909

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

31

26910

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

32

26911

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

33

26912

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

34

26913

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

35

26914

22-09-08

16,348/-

22-12-09

 18,902/-

36

26915

22-09-08

20,000/-

22-12-09

 23,125/-

                          एकूण रु.    9,82,398/-     एकूण रु.    15,33,578/-

2.   प्रस्‍तुत ठेवीच्‍या दामदुप्‍पट रकमेवर ठेवपावत्‍यांची मुदत संपले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज जाबदार क्र.1 ते 13 व 15 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराना अदा करावे.

3.     तक्रारदाराना झालेला शारिरीक, मानसिक त्रास व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.15,000/- जाबदार क्र.1 ते 13 व 15 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराना अदा करावेत.

4.      वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात जाबदार 1 ते 13 व 15 यांनी करावे.

5.     सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

6.     सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.9-1-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.