Maharashtra

Satara

CC/14/8

ANKUSH DADASO KATKAR - Complainant(s)

Versus

YASHODEEP GRAMIN BIGAR SHETI PAT SANSHTA - Opp.Party(s)

JADHAV, KALEKAR

09 Jan 2015

ORDER

 

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                               मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                           तक्रार क्र. 8/2014.

                            तक्रार दाखल दि.17-01-2014.

                                    तक्रार निकाली दि.9-1-2015. 

 

अंकुश दादासो. काटकर,

रा.नरवणे, ता.माण, जि.सातारा. 

ह.मु.कातरखटाव, ता.खटाव, जि.सातारा.        ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्‍था मर्या.

   मायणी, ता.खटाव, जि.सातारा तर्फे-

   व्‍यवस्‍थापक.

2. श्री.एम.पी.शहा, व्‍यवस्‍थापक,

   यशोदीप ग्रा.बि.शे.सह.पतसंस्‍था मर्या.

   रा.वडूज, ता.खटाव, जि.सातारा.

3. शिवाजी शंकर पाटील, चेअरमन,

   रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.

4. चंद्रकांत लक्ष्‍मण पवार, व्‍हा.चेअरमन,

   रा.औंध, ता.खटाव, जि.सातारा.

 

 

5. डॉ.मकरंद रामचंद्र तोरो, व्‍हा.चेअरमन,

   रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.

6. डॉ.सौ.उर्मिला दिलीप येळगांवकर, संचालिका,

   रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.

7. डॉ.महेश गणेश गुरव, संचालक,

   रा.वडूज, ता.खटाव, जि.सातारा.

8. प्रकाश बाबुराव कणसे, संचालक,

   रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.

9. संजय धोंडीराम मोरे, संचालक,

   रा.निमसोड, ता.खटाव, जि.सातारा.

10. चंद्रकांत आनंदराव घाडगे, संचालक,

   रा.पाचवड, ता.खटाव, जि.सातारा.

11. राजाराम विलास कचरे, संचालक,

   रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.

12. अजित अशोक सिंहासने, संचालक,

    रा.कातरखटाव, ता.खटाव, जि.सातारा.

13. तुळशीदास पांडुरंग कवडे, संचालक,

    रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.     (वगळणेत आले.)

14. सौ.शांताबाई शिवाजी पाटोळे, संचालिका,

    रा.मायणी, ता.खटाव, जि.सातारा.            ....  जाबदार

 

                   तक्रारदारातर्फे अँड.एस.एस.जाधव.

                 जाबदार क्र.1 ते 12 व 14 एकतर्फा.

                                                                   

 

                        न्‍यायनिर्णय

 

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

       यातील तक्रारदार हे मौ.नरवणे, ता.माण, जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत.   तक्रारदार सध्‍या कातरखटाव, ता.खटाव, जि.सातारा येथे रहात आहेत. तक्रारदार हे शासकीय दूध डेअरीमध्‍ये नोकरीस असून त्‍यांनी त्‍यांच्‍या  नोकरीच्‍या पैशातून बचत करुन स्‍वतःचे नावे जाबदार पतसंस्‍थेत शाखा वडूज येथे दामदुप्‍पट ठेवपावतीद्वारे रक्‍कम ठेवली होती व आहे.  तक्रारदार यानी जाबदार पतसंस्‍थेत शाखा वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथे दामदुप्‍पट ठेवलेल्‍या रकमेचा तपशील खालीलप्रमाणे आहे-  

दामदुप्‍पट ठेव खाते-

ठेवपावती क्र.  ठेव ठेवल्‍याचा दिनांक  ठेव रक्‍कम रु.   देय तारीख    देय रक्‍कम रु.

  7797         27-1-2005      50,000/-      27-6-2011     1,00,000/-

 

        वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदारानी जाबदारांकडे दामदुप्‍पट ठेवपावती योजनेअंतर्गत पॅरा.2 मध्‍ये वर्णन केलेप्रमाणे 6 वर्षे 5 महिने मुदतीसाठी द.सा.द.शे.11 टक्‍के प्रमाणे रक्‍कम गुंतवली होती व आहे.  वर नमूद केलेल्‍या दामदुप्‍पट ठेवपावतीची मुदतीनंतरची एकूण देय रक्‍कम रु.1,00,000/- येणे बाकी असून दि.28-6-11 ते 27-11-13 पर्यंतचे व्‍याज रु.26,220/- येणे बाकी आहे. 

        वरील परिशिष्‍टात नमूद केलेल्‍या ठेवपावतीवरील रक्‍कम मुदत संपलेनंतर तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेत जाऊन सदर  ठेवीच्‍या रकमेची व्‍याजासह वारंवार मागणी केली असता जाबदारानी रक्‍कम अदा केली नाही तर जाणुनबुजून टाळाटाळ करीत आहेत.  प्रस्‍तुत रक्‍कम न मिळाल्‍याने तक्रारदारांना भयंकर मानसिक व शारिरीक त्रास सोसावा लागला आहे, त्‍यामुळे प्रस्‍तुत कामी जाबदारांकडून ठेवपावतीची रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन मिळावी, तसेच मानसिक, त्रासासाठी व अर्जाचा खर्च व नुकसानभरपाई मिळणेसाठी तक्रारदाराने सदर तक्रारअर्ज मंचात दाखल केला आहे.  

2.     तक्रारदारानी सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.6 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे ठेवपावतीची व्‍हेरिफाईड प्रत, नि.6/3 कडे संचालक मंडळाची यादी, नि.6/4 कडे तक्रारदारानी जाबदाराला पाठवलेली नोटीसची स्‍थळप्रत, नि.6/5 कडे जाबदार क्र.1,5,10,12 ला पाठवलेल्‍या नोटीसच्‍या पोहोचपावत्‍या, नि.6/7 ते 6/11 कडे जाबदार क्र.2,3,4,6,7,8,9,11,13,14 याना पाठवलेल्‍या नोटीसचे परत आलेले लखोटे, नि.7 कडे तक्रारदारानी अँड.कालेकर व अँड.जाधव याना दिलेले अधिकारपत्र,  नि.9 ते 15 कडे जाबदाराना तक्रारअर्जाची नोटीस मिळालेल्‍या पोहोचपावत्‍या, नि.16 ते 20 कडे जाबदाराना पाठवलेल्‍या पोस्‍टाच्‍या शे-याने परत आलेले लखोटे, नि.24 ला जाबदार क्र.13 हे मयत असल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द दाद मागणेची नाही अशी दिलेली पुरसीस, नि.21 कडे जाबदार 6 याना फेरनोटीसीसाठी दिलेला अर्ज, नि.22/ए कडे जाबदार 6च्‍या फेरनोटीसचा परत आलेला लखोटा, नि.25 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.28 कडे तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद वगैरे कागद मंचात तक्रारदारानी दाखल केले आहेत. 

3.     तक्रारदारानी सदर कामी जाबदाराकडून वर पॅरा.2 मध्‍ये नमूद केलेप्रमाणे जाबदारांकडे दामदुप्‍पट ठेव योजनेअंतर्गत गुंतवलेले मुद्दल व व्‍याजासह देय रक्‍कम एकूण रु.1,00,000/-, मिळावेत, दामदुप्‍पट ठेवपावतीचे देय रकमेवरील दि.28-6-11 ते 27-11-13 पर्यंतचे द.सा.द.शे.11 टक्‍के दराने होणारे व्‍याज रु.26,220/- तसेच रक्‍कम रु.1,26,200/-वर अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम पदरी पडेपर्यंतचे द.सा.द.शे.12 टक्‍केप्रमाणे होणरे व्‍याज जाबदारांकडून मिळावे, मानसिक व शारिरीक त्रास व अर्जाचा खर्च यासाठी रक्‍कम रु.25,000/-जाबदाराकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर कामी केलेली आहे. 

4.       सदर कामी जाबदार क्र.1 ते 12 व 14 हे तक्रारअर्जाची नोटीस मिळूनही मे.मंचात हजर राहिले नाहीत तसेच त्‍यानी म्‍हणणे दाखल केले नाही त्‍यामुळे जाबदार क्र.1 ते 12 व 14 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारित करणेत आला, तर जाबदार क्र.13 हे मयत असलेने त्‍यांचेविरुध्‍द दाद मागावयाची नसलेबाबतचा अर्ज तक्रारदाराने नि.24 कडे दाखल केला आहे.  त्‍यामुळे प्रस्‍तुत जाबदार क्र.13 यांस सदर कामातून वगळणेत आले आहे.  जाबदारांनी हजर होऊन प्रस्‍तुत तक्रारअर्जातील तक्रारदारांचे कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.

5.      वर नमूद तक्रारदारानी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचा, पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, व लेखी युक्‍तीवाद, तोंडी युक्‍तीवाद यांचा सखोल अभ्‍यास करुन मे.मंचाने प्रस्‍तुत कामी सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.            मुद्दा                                    उत्‍तर

 1.  तक्रारदार व जाबदारांचे दरम्‍यान ग्राहक व सेवादेणार असे

    नाते आहे काय?                                       होय.

 2. तक्रारदाराना जाबदारानी सदोष सेवा पुरवली आहे काय?        होय.

 3. अंतिम आदेश काय?                               शेवटी नमूद केलेप्रमाणे.

विवेचन मुद्दा क्र.1 ते 3-

6.       वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेत पॅरा.1 मध्‍ये दिलेल्‍या कोष्‍टकात नमूद केलेप्रमाणे दामदुप्‍पट ठेव योजनेत रक्‍कम गुंतवली होती व आहे.  ही बाब तक्रारदाराने नि.6 चे कागदयादीसोबत नि.6/1 कडे दाखल केलेल्‍या ठेवपावतीच्‍या व्‍हेरीफाईड प्रतीवरुन सिध्‍द होते.  म्‍हणजेच तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून सर्व जाबदार हे सेवापुरवठादार आहेत हे निर्विवाद सत्‍य आहे म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे. 

7.       वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण वर नमूद ठेवपावतीवरील ठेवीची मुदत संपल्‍यानंतर तक्रारदारांनी त्‍यांनी जाबदाराकडे प्रस्‍तुत दामदुप्‍पट रकमेची वारंवार मागणी केली, परंतु जाबदारानी प्रस्‍तुत रक्‍कम तक्रारदाराला परत अदा केली  नाही व रक्‍कम परत करणेस जाणुनबुजून टाळाटाळ केली आहे ही बाब तक्रारदाराने जाबदाराना वकीलातर्फे पाठवलेली नोटीस नि.6/4 वरुन तसेच नोटीस मिळाल्‍याच्‍या पोहोचपावत्‍या, व अनक्‍लेम्‍ड शे-याने परत आलेले नोटीसीचे लखोटे यावरुन सिध्‍द होते.  प्रस्‍तुत नोटीस जाबदाराना पाठवूनही जाबदारानी नोटीसीला कोणतेही उत्‍तर दिलेले नाही, तसेच ठेवीची रक्‍कमही तक्रारदाराना अदा केलेली नाही.  यावरुन तक्रारदाराना जाबदारानी सदोष सेवा पुरवल्‍याचे साफ निदर्शनास येते.  सबब आम्‍ही मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे. 

8.        प्रस्‍तुत कामी जाबदार क्र.1 ते 12 व 14 हे मे.मंचात हजर राहिलेले नाहीत, तसेच त्‍यानी तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही त्‍यामुळे सदर जाबदारांविरुध्‍द एकतर्फा आदेश पारित झालेला आहे.  सबब सदर तक्रारअर्जाचे काम एकतर्फा चालवणेत आले. 

      वरील विवेचनाचा विचार करता जाबदार क्र.1 ते 12 व 14 यांना तक्रारदारानी मागणी केलेल्‍या ठेवपावत्‍यांची दामदुप्‍पट रक्‍कम प्रस्‍तुत तक्रारदाराना अदा करणेस वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या Co-operative corporate veil  नुसार जबाबदार धरणे न्‍यायोचित होईल असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालील न्‍यायनिवाडयांचा विचार केला- मा.उच्‍च न्‍यायालय मुंबई यांचे रिट पिटीशन क्र.117/2011- मंदाताई संभाजी पवार विरुध्‍द स्‍टेट बँक ऑफ महाराष्‍ट्र. 

9.       सबब आम्‍ही प्रस्‍तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                           -ः आदेश ः-

1.   तक्रारदारांचे खालील परिशिष्‍टात नमूद केलेल्‍या मुदतठेवीची दामदुप्‍पट रक्‍कम तक्रारदारांना अदा करणेसाठी जाबदार क्र.1 ते 12 व 14 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरणेत येते. 

2.    जाबदार क्र.1 ते 12 व 14 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या खालील नमूद ठेवपावत्‍यांची दामदुप्‍पट रक्‍कम तक्रारदाराना अदा करावी- 

दामदुप्‍पट ठेव खाते-

ठेवपावती क्र.  ठेव ठेवल्‍याचा दिनांक  ठेव रक्‍कम रु.   देय तारीख    देय रक्‍कम रु.

  7797       27-1-2005         50,000/-     27-6-2011     1,00,000/-

 

2.   प्रस्‍तुत ठेवीच्‍या दामदुप्‍पट रकमेवर ठेवपावत्‍यांची मुदत संपले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज जाबदार क्र.1 ते 12 व 14 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराना अदा करावे.

3.     तक्रारदाराना झालेला शारिरीक, मानसिक त्रास व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.15,000/- जाबदार क्र.1 ते 12 व 14 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराना अदा करावेत.

4.      वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात जाबदार 1 ते 12 व 14 यांनी करावे.

5.     सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

6.     सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.9-1-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.