Maharashtra

Satara

CC/10/187

Shri Ashok Laxman Bagal - Complainant(s)

Versus

yashodeep Gra. Big. sheti sah. pat sanstha Ltd. Mayani shri DhanajiKisan Mane Vyavasthapak - Opp.Party(s)

jadhav

25 Nov 2010

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 187
1. Shri Ashok Laxman Bagal A/p Katarkhatav tal Khatav dist satarasatara ...........Appellant(s)

Vs.
1. yashodeep Gra. Big. sheti sah. pat sanstha Ltd. Mayani shri DhanajiKisan Mane Vyavasthapak A/p mayani tal khatav dist satarasatara2. shri shivajrao shankar patilmayanisatara3. chandrakant Laxman pawarmayanisatara4. Dr. Dilip murlidhar yelgawkar mayanisatara5. chandrakant A. ghadage mayanisatara6. Prakash Bapurao Kanasemayani satara7. Anil Vishnu yalmar mayanisatara8. rajaram vilas kacharemayanisatara ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 25 Nov 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि. 20
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 187/2010
                                          नोंदणी तारीख – 9/8/2010
                                          निकाल तारीख – 25/11/2010
                                          निकाल कालावधी – 106 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
श्री अशोक लक्ष्‍मण बागल 
मु.पो. कातरखटाव, ता.खटाव
जि.सातारा                                        ----- अर्जदार
                                         (अभियोक्‍ता श्री.डी.एल.जाधव)
      विरुध्‍द
1. यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था
    मर्यादित मायणी ता.खटाव तर्फे
    श्री धनाजी किसन माने, व्‍यवस्‍थापक   
    वडूज, ता.खटाव जि.सातारा
2. श्री‍ शिवाजीराव शंकरराव पाटील
    चेअरमन, यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी
    पतसंस्‍था मर्यादित मायणी
3. श्री चंद्रकांत लक्ष्‍मण पवार
    रा.औंध, ता.खटाव जि. सातारा
    व्‍हा.चेअरमन, यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी
    पतसंस्‍था मर्यादित मायणी
4. डॉ श्री दिलीप मुरलीधर येळगावकर(संचालक)
5. श्री चंद्रकांत आनंदराव घाडगे (संचालक)
    रा.पाचवड ता.खटाव जि. सातारा
6. श्री प्रकाश बापूराव कणसे (संचालक)
7. श्री अनिल विष्‍णू यलमर (संचालक)
8. राजाराम विलास कचरे (संचालक)
    नं.1, 3, 5 ते 7 सर्व रा.मु.पो.मायणी
    ता.खटाव जि. सातारा                           ----- जाबदार
                                                (एकतर्फा )
 
 
न्‍यायनिर्णय
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेमध्‍ये दीडपट ठेव योजनेअंतर्गत रक्‍कम रु.30,000/- ठेव म्‍हणून ठेवलेली आहे. सदरच्‍या ठेवीची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्‍याजासहित देय झालेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. अर्जदार यांनी जाबदार यांना दि.23/3/2010 रोजी पत्र पाठवून रकमेची मागणी केली. सदरचे पत्र जाबदार यांना मिळाले. तथापि जाबदार यांनी त्‍यास उत्‍तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्‍कमही परत दिलेली नाही. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्‍यात यावयाची रक्‍कम न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे ग्राहक आहेत. त्‍यामुळे जाबदार संस्‍थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्‍ये अर्जदार यांनी एकूण रक्‍कम रु. 45,000/- व त्‍यावरील व्‍याज तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- ची मागणी केलेली आहे.
 
2.    प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र.2 ते 6 व 8 यांना झालेली आहे. नोटीस मिळालेची पोचपावती प्रस्‍तुतकामी दाखल आहे. जाबदार क्र.1 यांनी प्रस्‍तुत तक्रारअर्जाची नोटीस स्‍वीकारली नाही. नोटीस न स्‍वीकारलेबाबतचा पोस्‍टाचा शेरा असलेला लखोटा प्रस्‍तुतकामी दाखल आहे. जाबदार क्र.1 ते 6 व 8 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबतचा योग्‍य असा आदेश दि.30/10/2010 रोजी नि.1 वर पारीत केला आहे.
3.    जाबदार क्र.7 यांना अर्जदार यांचे नि.17 चे अर्जावरील आदेशानुसार प्रस्‍तुत प्रकरणातून वगळण्‍यात आले आहे.
4.    अर्जदा‍रतर्फे दाखल कागदपत्रे तसेच नि.19 ची पुरसि‍स पाहिली.
5.    अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्‍पष्‍ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेमध्‍ये दीडपट ठेव योजनेअंतर्गत रक्‍कम रु.30,000/- ठेव म्‍हणून ठेवलेली आहे. सदरच्‍या ठेवीची मुदत संपलेली आहे. सदरच्‍या ठेवीची मुदत पूर्ण झालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची देय रक्‍कम रु. 45,000/- देण्‍याची होती. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्‍या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्‍पष्‍ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्‍हणजे ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या रकमेवर व्‍याजासहित देय झालेली रक्‍कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्‍कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे.
 
6.    एक गोष्‍ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र.2 जे यशोदिप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था या संस्‍थेचे चेअरमन आहेत, अशा या जबाबदारीच्‍या पदावर काम करणा-या व्‍यक्‍तीने प्रस्‍तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस/सूचना स्‍वीकारणे व नेमलेल्‍या तारखांना या मंचासमोर हजर होणे जरुरीचे होते. तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र.2 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 2 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. जाबदार यांनी अर्जदार यांचे अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले अथवा खोडून काढलेले नाही. सबब, अर्जदार यांचे या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्‍ये केलेली विनंती अंशतः मान्‍य करणे जरुरीचे आहे. 
 
7.    या सर्व कारणास्‍तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्‍यात येत आहे.
 
आदेश
 
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र.1 ते 6 व 8 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करणेत
   येत आहे.
2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 6 व 8 यांनी वैयक्तिकरित्‍या व
    संयुक्‍तरित्‍या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्‍यात.
    अ. ठेवपावती क्र.9141 वरील मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम ठेवीची मुदत
        संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9   
        टक्‍केंप्रमाणे व्‍याजासह द्यावी.
    ब. मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- द्यावेत.
    क. अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 25/11/2010
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)         (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER