Maharashtra

Solapur

CC/10/617

sou zinat nadim shaikh - Complainant(s)

Versus

yashavant kisan shinde chair man s.m. shankarrao mohite patil nagari saha. pat sanstha 2.vyankatesh - Opp.Party(s)

s.y.bhori

11 May 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/617
1. sou zinat nadim shaikhadsha nagar nagane plot barshi tal.barshisolapur maharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. yashavant kisan shinde chair man s.m. shankarrao mohite patil nagari saha. pat sanstha 2.vyankatesh shivaji patil 3.popat dabru gunjal 4dinkar krushana more 5.shrirang sanbhu more 5. babasaheb soudagrat&barlini Tal.madha solapur maharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :s.y.bhori, Advocate for Complainant

Dated : 11 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 

 

                                                                तक्रार दाखल दिनांक : 18/11/2010.    

                                                                तक्रार आदेश दिनांक : 11/05/2011.   

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 617/2010.

 

सौ. झिनत नदीम शेख, वय 28 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम,

रा. आदर्श नगर, नागणे प्‍लॉट, बार्शी.                                          तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 618/2010.

 

1. हिसामुद्दीन अख्‍तयार शेख, वय 76 वर्षे,

   व्‍यवसाय : पेन्‍शनर, रा. आदर्श नगर, नागणे प्‍लॉट, बार्शी.                     

2. सौ. मेहरुन्‍नीसा हिसामुद्दीन शेख, वय 69 वर्षे,

   व्‍यवसाय : घरकाम, रा. आदर्श नगर, नागणे प्‍लॉट, बार्शी.          तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. चेअरमन, स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी ग्रामीण सह.

   पतसंस्‍था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

   श्री. यशवंत किसन शिंदे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 

2. श्री. व्‍यंकटेश शिवाजी पाटील, अ. संचालक, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.  

3. श्री. पोपट डबरु गुंजाळ, व्‍हा. चेअरमन, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 

4. श्री. दिनकर कृष्‍णा मोरे, संचालक, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.     

5. श्री. श्रीरंग संभू मोरे, संचालक, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 

6. श्री. बाबासाहेब सौदागर आवताडे, संचालक, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.  

7. श्री. रामलिंग बाबू ठोंबरे, संचालक, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.      

8. श्री. सौदागर श्रीपती चव्‍हाण, संचालक, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.   

9. श्री. बाबू भवानजी गुंजाळ, संचालक, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.            विरुध्‍द पक्ष

10. सौ. अहिल्‍यादेवी सदाशिव हनवते, संचालक, वय सज्ञान,

    व्‍यवसाय : घरकाम, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.   

11. श्री. मधुकर भाऊराव गपाटे, सचिव, वय सज्ञान,

    व्‍यवसाय : शेती/नोकरी, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

12. प्रशासकीय समिती प्रमुख, श्री. स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी

    ग्रामीण सह. पतसंस्‍था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर,

    सहायक निबंधक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्‍था, माढा,

    ता. माढा, जि. सोलापूर.                                    विरुध्‍द पक्ष

 

                        कोरम          :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                     सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

                   तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ :  एस.आय. भोरी

                   विरुध्‍द पक्ष क्र.11 तर्फे विधिज्ञ :

 

आदेश

 

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, त्‍यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी संस्‍था मर्यादीत, बारलोणी या  पतसंस्‍थेमध्‍ये मासिक व्‍याज प्राप्‍ती योजना व बचत खात्‍यामध्‍ये खालीलप्रमाणे रक्‍कम गुंतवणूक केलेली आहे.

     

      ग्राहक तक्रार क्र.617/2010 मध्‍ये :-

 

तक्रारदार/

ठेवीदाराचे नांव

रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

झिनत नदीम शेख

1,00,000

001059

2/5/08

2/6/09

14 टक्‍के

 

      ग्राहक तक्रार क्र.618/2010 मध्‍ये :-

 

तक्रारदार/

ठेवीदाराचे नांव

रक्‍कम

पावती/ खाते क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

मेहरुनीसा हिसामुद्दीन शेख

55,000

005393

7/6/08

7/7/09

14 टक्‍के

मेहरुनीसा हिसामुद्दीन शेख

45,000

005389

5/6/08

5/7/09

14 टक्‍के

मेहरुनीसा हिसामुद्दीन शेख

4,762

1019

--

30/6/09

--

हिसानुद्दीन अख्‍तयार शेख

95,027

1018

--

18/3/10

--

2.    मुदत पूर्ण झाल्‍यानंतर तक्रारदार यांना ठेव रक्‍कम परत करण्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी टाळाटाळ केली आहे. तसेच तक्रारदार यांना बचत खात्‍यावरील रक्‍कम प्राप्‍त झालेली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन ठेव व बचत खात्‍यावरील रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी अनुक्रमे रु.50,000/- व तक्रार खर्च मिळावा, अशी विनंती केली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.11 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार ते विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेचे सचिव असून पगारी नोकरदार आहेत. ठेव पावत्‍यांवर त्‍यांच्‍या स्‍वाक्ष-या नाहीत आणि ठेव रक्‍कम परत करण्‍याची त्‍यांची जबाबदारी नाही. शेवटी त्‍यांनी तक्रार रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

4.    उर्वरीत विरुध्‍द पक्ष यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी होऊनही ते गैरहजर राहिले आहेत आणि त्‍यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्‍यात आले.

 

5.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष क्र.11 यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.

           

मुद्दे                                उत्‍तर

 

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                         होय. 

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?             होय. 

3. काय आदेश ?                                        शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

6.    मुद्दा क्र. 1 ते 3 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी संस्‍था मर्यादीत, बारलोणी या  पतसंस्‍थेमध्‍ये मासिक व्‍याज प्राप्‍ती योजना व बचत खात्‍यामध्‍ये रक्‍कम गुंतविल्‍याचे रेकॉर्डवर दाखल ठेव पावत्‍या व पासबुक छायाप्रतीवरुन निदर्शनास येते. प्रामुख्‍याने, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत आहे, अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.

 

 

7.    तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी या पतसंस्‍थेच्‍या संचालकांची यादी रेकॉर्डवर दाखल केलेली आहे आणि त्‍याप्रमाणे संचालकांना प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये विरुध्‍द पक्ष म्‍हणून समाविष्‍ठ करण्‍यात आलेले आहे. मंचाने त्‍यांना मंचाची नोटीस बजावल्‍यानंतरही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्‍हणणे दाखल केलेले नाही. विरुध्‍द पक्ष यांनी मंचासमोर हजर होऊन म्‍हणणे दाखल केले नसल्‍यामुळे एका अर्थाने तक्रारदार यांची तक्रार त्‍यांना मान्‍य आहे, यास पुष्‍ठी मिळते.

 

8.    तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे मासिक व्‍याज प्राप्‍त ठेव व बचत खात्‍यामध्‍ये रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. ठेव पावतीची मुदत पूर्ण झाल्‍यानंतर वेळोवेळी मागणी करुनही त्‍यांना ठेव रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. ठेवीच्‍या मुदतीनंतर रक्‍कम व्‍याजासह परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. असे असताना, तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍यामुळे ठेव रक्‍कम मिळविण्‍यासह अप्राप्‍त कालावधीचे व्‍याज मिळविण्‍यास ते पात्र ठरतात. तसेच बचत खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे. 10 टक्‍के व्‍याज दराने देणे उचित ठरते.

 

9.    विरुध्‍द पक्ष क्र.11 हे पतसंस्‍थेचे सचिव असल्‍यामुळे ठेव रक्‍कम परत करण्‍याची त्‍यांची जबाबदारी सिध्‍द झाल्‍याशिवाय त्‍यांना जबाबदार धरता येत नाही. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.12 हे सहायक निबंधक, सहकारी संस्‍था, माढा असून ते सरकारी नोकर असून संवैधानिक कर्तव्‍ये पूर्ण करीत असल्‍यामुळे त्‍यांना ठेव रक्‍कम परत करण्‍याकरिता जबाबदार धरता येत नाही.

 

10.   शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

 

 

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 10 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्‍कम या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

 

     ग्राहक तक्रार क्र.617/2010 मध्‍ये :-

     

ठेवीदार/तक्रारदारांचे नांव

पावती क्रमांक

ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

झिनत नदीम शेख

001059

1,00,000

1/12/2008

14 टक्‍के

 

     ग्राहक तक्रार क्र.618/2010 मध्‍ये :-

     

ठेवीदार/तक्रारदारांचे नांव

पावती / खाते क्र.

ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

मेहरुनीसा हिसामुद्दीन शेख

005393

55,000

7/6/2008

14 टक्‍के

मेहरुनीसा हिसामुद्दीन शेख

005389

45,000

5/6/2008

14 टक्‍के

मेहरुनीसा हिसामुद्दीन शेख

1019

4,762

30/6/2009

10 टक्‍के

हिसानुद्दीन अख्‍तयार शेख

1018

95,027

18/3/2010

10 टक्‍के

ग्राहक तक्रार क्र. 617 व 618/2010 आदेश पुढे चालू....

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 10 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी अनुक्रमे रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

 

(सौ. संजीवनी एस. शहा)                                (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                          ----00----

 (संविक/स्‍व/5511)

 


[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT