त.क. यांनी तक्रारीत मागणी केली आहे की,नकाशानुसार ब्रम्हा व विष्णू-महेश सहनिवास यांच्यामध्ये भिंत घालून स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करुन देण्याबाबत वि.प. यांना निर्देश देण्यात यावे असे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम व हलक्या प्रतीचे बांधकामात साहित्य वापरल्याबाबत वि.प. यांनी अनुचित व प्रतिबंधीत व्यवहार केल्याचे ठरविण्यात यावे असे मंचास विनंती केली. त.क. यांनी मागणी केली की, त्यांना करारपत्रानुसार सर्व सोयी व सुविधा पुरविण्याबाबत निर्देश देण्यात यावे. तसेच प्रत्येक त.क. यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानभरपाईकरिता रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.25,000/- देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
10 विरुध्द पक्ष यांना मंचातर्फे प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजाविण्यात आली. वि.प. यांनी खालीलप्रमाणे आपले उत्तर दाखल केले आहे.
11 सदर प्रकरणामध्ये त.क. यांनी पार्किंगची भिंत त्वरित घालून देण्याचे निर्देश मिळण्याबाबत अंतरिम अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने नकाशाप्रमाणे पार्किंग व्यवस्था सुरक्षित होण्याच्या अनुषंगाने ब्रम्हा व विष्णू–महेश इमारतीच्या मध्ये भिंत घालून देण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती केली होती. सदर अर्जाला वि.प. यांनी उत्तर दिले व त.क. यांनी तज्ञांचे नेमणूकी बाबत सुध्दा अर्ज सादर केला. या दोन्ही अर्जाला वि.प. यांनी उत्तर दिले असून त्यांनी आपल्या उत्तरात मेंटनंन्सची जबाबदारी सदनिकाधारकांची असल्यामुळे व 4 वर्षापासून मेंटनन्स नसल्यामुळे इमारतीच्या पाईप व नाल्या या क्षती पोहचल्याचे म्हटले आहे. तसेच विष्णू-महेश इमारतीमध्ये भिंत नकाशानुसार असणे हे विधान चुकीचे असल्याचे आपल्या उत्तर नमूद केले आहे.
12 वि.प.क्रं. 1 व 2 यांनी संयुक्त लेखी उत्तर दाखल केले असून त्यात बरेचशे म्हणणे नाकारले असून करार व विक्रीपत्राबाबतचा व्यवहार वि.प. क्रं.1 यांच्याशी झालेला आहे. वि.प. 2 यांना विनाकारण गोवण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यांनी मान्य केले की, इमारतीच्या नकाशाच्या बांधकामास ग्रामपंचायत साठोडा यांच्याकडून रीतसर मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यांनी पुढे नमूद केले आहे की, सदनिकेचे विक्रीपत्र करुन देण्यात आले असून फक्त श्री. बुरांडे यांनी कायदेशीररित्या विक्रीपत्र होण्याआधी स्वतःचे नावे 7/12 उता-यात फेरफार करुन घेतल्यामुळे तांत्रिक अडचण येत असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, त.क. यांनी आपआपल्या सदनिकेचा ताबा 3-4 वर्षापूर्वी घेतला असून त्याचे रखरखावीची जबाबदारी वि.प.यांची नसून त.क. यांची आहे. ती त्यांनी न केल्यामुळे इमारतीच्या बांधकामास क्षती पोहचल्यास त्यास त.क. जबाबदार आहे. त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, मंजूर नकाशामध्ये दाखविलेली पार्किंगची जागा विष्णू-महेश सहनिवासमधील सदनिकाधारकांच्या सुविधांकरिता उपलब्ध करुन दिलेली आहे. इतर अपार्टमेंट मधील सदनिकाधारकांना या पार्किंग जागेचा उपयोग करण्याकरिता वि.प. त्यांना अडवू शकत नाही. तसा हक्क व अधिकार वि.प. यांच्याकडे नसलयामुळे सदर जबाबदारी वि.प. यांच्यावर टाकणे अयोग्य असल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. तसेच त्यांनी त.क.च्या तक्रारीतील सर्व कथन अमान्य केले असून चुकिचे व खोटे असल्याचे नमूद केले आहे व सदर तक्रार ही खारीज करण्याची विनंती केली आहे.
13. सदर प्रकरणात उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. तसेच त्यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, प्रतिज्ञालेख यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षा प्रत पोहचले.
-: कारणे व निष्कर्ष :-
14 सदर प्रकरण 16 तक्रारकर्ते यांनी मंचासमक्ष दाखल केले. त्यामध्ये त.क. यांनी एकत्रित तक्रार दाखल करण्याबाबतचा विनंती अर्ज मंचासमक्ष दाखल केला होता. सदर अर्ज मंजूर करण्यात आला. त.क. 1, 2, 3 ते 16 यांनी विरुध्द पक्ष क्रं. 1 यांच्याकडून सदनिका खरेदी केल्या होत्या. याबाबतचे उभय पक्षांचे कथन व मंचासमक्ष दाखल केलेले दस्ताऐवज यावरुन स्पष्ट होते की, त.क. क्रं. 1 ते 16 यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून सदनिका खरेदी केल्या होत्या. तसेच विरुध्द पक्ष यांचा सदनिका बांधणे व विकसित करणे व विकणे हा व्यवसाय असल्याचे दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. तसेच सदर सदनिकेचे बांधकाम वि.प. क्रं. 2 यांनी केले असल्याने त.क. हे वि.प. 1 व 2 चे ग्राहक ठरतात असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
15 तक्रारकर्ता यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले की, त.क. क्रं. 1 शंकरराव जयरामजी गंधलवार, त.क.क्रं.3 सौ. रुपाली यशवंत पांडे व त.क.क्रं.4 गोविंद व्यंकटराव साखरे, यांना करारनामा दि. 20.07.2009 रोजी करुन दिला असून विक्रीपत्र झाले नसल्याचे म्हटले आहे. त.क.क्रं.2 सुनिल पुंडलीकराव खोडे यांचा करारनामा दि. 11.01.2011 रोजी झाला असल्याचे नमूद केले असून विक्रीपत्र झाले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. त.क.क्रं.5 नरेंद्र व्यंकटराव बुराडे यांचा करारनामा दि. 20.10.2008 रोजी त.क. क्रं. 6 पुरोषोत्तम गजानन नरखेडे यांचा करारनामा दि. 21.10.2008 रोजी , त.क.क्रं.7अजय रामराव भस्मे यांचा करारनामा 18.08.2009 व त.क. क्रं. 15 प्रदिप निळकंठराव मेंढे यांचा करारनामा 21.07.2008 रोजी झाला असून त्यांचे विक्रीपत्र झाले नसल्याचे नमूद आहे. त.क. क्रं. 8 भास्कर कचरुजी पंचवटे, त.क.9 देवेंद्र विश्वनाथ वाघ(भूसारी),त.क. 10 अतूल यशवंत चौधरी, त.क.11 सौ. मेघा गजानन कुकडे, त.क.12 भास्कर पंजाबराव चौधरी, त.क.क्रं.13 राजेश मारुती झाडे, त.क.क्रं.14 मुकुंद सुधाकर देशकर व त.क.16 लक्ष्मीकांत वासुदेवराव पिदडी यांना विक्रीपत्र करुन दिल्याचे नमूद आहे.
16 वि.प. यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये श्री. बुराडे यांना विक्रीपत्र करुन दिले नाही असे नमूद केले आहे. त्यांनी आपल्या उत्तरातील बचावा मध्ये असे नमूद केले की, श्री. नरेंद्र व्यंकटराव बुराडे यांनी 7/12 उतारा फेरफार घेवून स्वतःचे नांव नमूद केल्यामुळे तांत्रिक कारणामुळे त्यांना विक्रीपत्र करुन दिले नाही. ही बाब वि.प. यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केली आहे. विक्रीपत्रबाबतचा दोन्ही पक्षात असलेला वाद त.क. यांनी सदर प्रकरणात केलेली मागणी दि. 21.01.2014 रोजी मागे घेतली. त्यामुळे विक्रीपत्रबाबतच्या आदेशाकरिता कोणताही निष्कर्ष घेणे व आदेश देण्याची गरज नसल्याचे मंचाचे मत आहे.
17 सदर प्रकरणात उभय पक्षातील मुख्य वाद ब्रम्हा अपार्टमेंट व विष्णू-महेश अपार्टमेंट मध्ये पार्किंगची व्यवस्था करुन देण्याची असल्याची प्रकरणावरुन दिसून येते. त्याबाबत त.क. यांनी मंचासमक्ष मंजूर नकाशा दाखल केला. सदर नकाशाचे अवलोकन केले असता , त्यामध्ये स्पष्टपणे पार्किंगकरिता जागा सोडल्याचे दिसते. सदर जागा ही 180.00 sq.m. दर्शविलेली आहे. त.क. नुसार त्यांच्या पार्किंगच्या जागेत बाजुच्या ब्रम्हा अपार्टमेंटमधील रहिवासी पार्किंग करीत असल्याने त्यांना त्रास होतो. त्यामुळे दोन्ही अपार्टमेंटच्या मध्ये भिंत घालून देण्याचे म्हणणे असून त.क. च्या वकिलांनी युक्तिवादाच्या वेळी सदर मुद्यावर विशेष भर दिला. या उलट वि.प. यांनी
युक्तिवादाच्या वेळी सदर प्रकरणात ब्रम्हा अपार्टमेंटच्या सदनिका धारकांना पक्षकार करणे आवश्यक होते असे विधान केले.
मंचाने दस्ताऐवज क्रं. 5 (मंजूर नकाशा )चे अवलोकन केले असता त्यामध्ये पार्किंगची जागा स्पष्टपणे दर्शविली आहे. सदर जागा ही विष्णू-महेश सहनिवास इमारती मध्ये दर्शविली आहे. वि.प. यांनी ब्रम्हा अपार्टमेंटच्या सदनिका धारकांना पक्ष करणे आवश्यक आहे असे युक्तिवादाच्या वेळी केलेले कथन अमान्य करण्यात येते. कारण त.क. हे ब्रम्हा अपार्टमेंटमधील रहिवासी यांचे ग्राहक नाही. तसेच या प्रकरणात त्यांचा कोणताही संबंध येत नसल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. मंचाचे मते त.क. ज्यांचे ग्राहक आहेत त्यांना पक्ष करणे अनिवार्य असते. त.क. व ब्रम्हा सहनिवासामधील रहिवाश्यांचा काही संबंध येत नाही. मंजूर नकाशाचे अवलोकन केले असता पार्किंगची जागा ही विष्णू-महेश सहनिवासाकरिता आहे, हे स्पष्ट आहे. जर वि.प. यांनी सदर जागा ब्रम्हा व विष्णू-महेश सहनिवासातील रहिवाश्यांकरिता पार्कींग म्हणून आहे असे सिध्द केले असते तरच ब्रम्हा सहनिवासामधील रहिवाश्यांना आवश्यक पक्ष करणे न्यायोचित होते. परंतु वि.प. यांनी सदर पार्कींग जागा ही ब्रम्हा सहनिवासकरिता राखीव आहे ही बाब सिध्द केली नाही. त्यामुळे ब्रम्हा सहनिवासमधील रहिवाश्याना पक्ष करणे आवश्यक आहे हा वि.प. यांनी घेतलेला आक्षेप अमान्य करण्यात येतो.
सदर प्रकरणात वास्तविकता जाणून घेण्याकरिता निरीक्षकाची नेमणूक करण्यातआली होती. सदर निरीक्षकाने आपलाअहवालसादरकेलाअसून त्याअहवालावर उभय पक्षानीघेतलेले आक्षेप चुकीचेअसून तथ्यहीन असल्याचे मंचाचेमतआहे. त्यामुळेनिरीक्षकयांनी दाखलकेलेला अहवाल विचारात घेतानिरीक्षक,श्री. आदमणेयांनी आपल्या अहवालातील क्रं.1मध्येब्रम्हा अपार्टमेंटमधील लोक विष्णू-महेश अपार्टमेंट मधील इमारतीत गाडया पार्किंग करतात ही बाब स्पष्टपणे नमूद केली. तसेच त्यांनी आपल्या अहवालात नकाशातील भाग लाल रंगाने दर्शविलेली जागा पार्किंगकरिता होतीव त्या ठिकाणी भिंत बांधून दिली नाही हे सुध्दास्पष्टपणेनमूदकेले आहे.सर्वातआश्चर्याची बाब म्हणजेयुक्तिवादाच्या वेळी वि.प.च्या वकिलांनी मंचासमक्षविधान केलेकी, ब्रम्हा अपार्टमेंटमधील रहिवासी यांना वि.प. यांनी विष्णू-महेश इमारतीच्या पार्किंगच्या जागेवर पार्कींग करण्याची परवानगी दिली आहे. तशी परवानगी वि.प. यांना देता येत नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच त्यांनीआपल्या उत्तरातनमूद केलेकी, ग्रामपंचायतने परवानगी दिल्यासते भिंत बांधून देण्यास तयार आहे. भिंत बांधण्याची परवानगी घेण्याची जबाबदारी वि.प. यांचीच असतांना सुध्दा त्यांनी परवानगी मिळण्याबाबत कोणताही दस्ताऐवजमंचासमक्ष सादर केलानाही.या उलट ग्रामपंचायत साठोडा यांनी वि.प. यांनापत्र पाठवून जुन्या व नविन बिल्डींग मधील भिंत बांधलेली नाही याबाबतनोटीस दिलेला आहे. सदरनोटीस निशाणी क्रं.2, दस्ताऐवजक्रं. 9 वर असूनप्रकरणातत.क. यांनी दाखलकेलेलेआहे. यावरुन भिंतबांधण्याची जबाबदारी ही विरुध्द पक्षाचीअसतांना ते टाळाटाळ करीत आहे हे स्पष्ट होते.भिंत बांधण्याकरिता परवानगी नमागणे व ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध न करुन देणेही वि.प. यांच्यासेवेतील त्रृटी असून याकरिता दोन्ही विरुध्द पक्ष जबाबदार असल्याचेमंचाचे स्पष्ट मतआहे.
मा. राष्ट्रीय आयोगाचा न्याय निवाडा
Sri B. Venu Madhav Vs. Sri Ch. Mohana Rao, 2011(4) CPR 466 (NC) त.क. यांनी दाखल केला असून सदर प्रकरणाशी सुसंगत आहे.
सदर प्रकरणात वि.प. यांनी त.क. जर प्रकरण मागे घेतील तर त्यांना भिंत बांधून देण्यात येईल ही बाब नमूद केली व युक्तिवादाच्या वेळी तसे कथन केले. यावरुन वि.प. हे दबाव तंत्र वापरण्याच्या प्रवृत्तीचे आहे, हे प्रकर्षाने जाणवते. प्रकरण मागे घेतल्याशिवाय भिंत बांधून देण्यात येणार नाही ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. यावरुन न्याय मागणा-या व्यक्तीवर दबाब टाकून स्वतःची सुटका करण्याचा वि.प. चा मानस स्पष्ट होतो.
19 त.क. यांनी आपल्या तक्रारीत वि.प.यांनी सदोष व निकृष्ट बांधकाम करुन दिले असे आक्षेप घेतले आहे. याबाबत वि.प.यांनी आपल्या युक्तिवादाच्या वेळी स्पष्ट केले की, त.क. यांनी टेरेसवर सोलर वॉटर हिटर लावले व त्याची धार सुरु ठेवतात, त्यामुळे दोष निर्माण झाला. वि.प.यांनी युक्तिवादाच्या वेळी निरीक्षकाने दाखल केलेल्या अहवालात मंचाचे लक्ष केंद्रीत केले असून स्लॅबवर पाणी जमा झाल्यामुळे स्लॅब खराब झाल्याचे म्हटले . सदर युक्तिवादातील हे म्हणणे नाकारण्यात येते. कारण निरीक्षक यांनी स्लॅबवर पाणी दिसले असे जरी नमूद केले तरी त्यामुळे स्लॅब खराब झाल्याचे म्हटलेले नाही. निरीक्षकाने स्लॅबला उतार काढणे जरुरीचे आहे ही बाब आपल्या अहवालात नमूद केली आहे. त्यामुळे वि.प.यांनी स्लॅबला उतार काढले नसून बांधकाम योग्य प्रकारे केले नाही ही बाब स्पष्ट होते.
20 पान क्रं. 37 वर करारनामा दाखल असून त्याच्या कलम 6 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, बांधकाम ताबा देईपर्यंत व हस्तांतरण करेपर्यंत त.क. यांना कोणतेही कामकाज अथवा बांधकाम करण्याची परवानगी नाही, यावरुन हे स्पष्ट होते की, वि.प. यांनी त.क. यांना बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व ताबा पत्र दिल्याबाबत कोणतेही दस्ताऐवज दाखल केलेले नसल्यामुळे त.क. यांनी ताबा घेवून योग्य काळजी घेतली नाही हे वि.प.चे म्हणणे ग्राहय धरण्यात येत नाही. वि.प. यांनी ताबा पत्र न दिल्यामुळे सहनिवासातील रहिवाश्यांची सोसायटी नोंदणीकृत करता आला नाही हे त.क. यांचे म्हणणे सिध्द होते. त्यामुळेच त.क. हे इमारतीची योग्य काळजी घेवू शकत नव्हते, ही बाब ही बाब सुध्दा ग्राहय धरण्यात येते.
21 वि.प.यांनी आपल्या युक्तिवादाच्या वेळी पैसे बाकी असल्याचे नमूद केले आहे.परंतु त्यासंबंधी कोणताही पुरावा मंचासमक्ष दाखल केलेला नाही. तसेच वि.प.यांनी लेखी उत्तर हे शपथपत्रवर दाखल केले नाही. वि.प.यांनी आपल्या युक्तिवादाच्या वेळी विक्रीपत्र करुन देण्याची अनुबंध दर्शविले आहे. त्यानुसार त्यांनी विक्रीपत्र करुन द्यावे ही बाब स्वयंस्पष्ट आहे. परंतु त्याबाबतची त.क. यांनी केलेली मागणी मागे घेतली आहे. त्यामुळे त्याबाबत मंच कोणताही आदेश पारित करीत नसून सदर बाबतीत कोणताही निष्कर्ष घेतलेला नाही.
22 तज्ञ अहवालाचे अवलोकन केले असता त्यामध्ये शौचालयाच्या भिंतीला भेगा पडल्या व त्यामध्ये पाणी मुरलेले दिसते असे नमूद केले आहे. तसेच श्री. देशकर यांच्या सज्जाला पाणी मुरलेले दिसते असे नमूद केले आहे . पुढे असे ही नमूद केले की, प्लॅस्टरला भेगा पडल्या असून भिंती मध्ये पाणी मुरलेले दिसते.वि.प.यांनी लेखी उत्तरात नमूद केले की, त.क. हे 3 ते 4 वर्षापासून सदर इमारतीमध्ये राहतात. त्या इमारतीची योग्य काळजी न घेतल्यामुळे दोष निर्माण झालेत. सदर वि.प. यांचे म्हणणे ग्राहय धरता येत नाही. कारण 3-4 वर्षातच स्लॅब गळणे व प्लॅस्टरला भेगा दिसून येणे अपेक्षित नाही. यावरुन वि.प. यांनी सदोष बांधकाम केले ही बाब स्पष्ट होते. यासर्व बाबींचा विचार करता ही बाब स्पष्ट होते की, वि.प.यांनी त.क. यांना आवश्यक सुख सोयीसह सदनिका बांधून दिलेल्या नाही. तसेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले आहे. त्यामुळे मंचाचे स्पष्ट मत आहे की, वि.प. यांनी नकाशानुसार ब्रम्हा अपार्टमेंट व विष्णू-महेश अपार्टमेंट या दोन्ही इमारतीच्या मध्ये भिंत आदेश पारित झाल्यापासून 60 दिवसात घालून द्यावी व तसे बांधकाम केल्याबाबतचा अहवाल ग्रामपंचायत साठोडा यांच्याकडे सादर करावा.
23 वि.प.यांनी केलेले सदोष व निकृष्ट बांधकाम दुरुस्त करुन द्यावे व करारपत्रानुसार सुख-सुविधा त.क. यांना पुरवाव्या ही बाब सुध्दा स्वयंस्पष्ट आहे. तसेच निरीक्षकाच्या अहवालानुसार सर्व दुरुस्त्या करुन द्याव्या. त्या न करुन दिल्यास प्रति तक्रारकर्ता रुपये10,000/- वि.प.हे त.क. यांना देण्यास बाध्य राहील.
24 त.क. यांनी आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रु.1,00,000/- ची मागणी केली आहे. सदर मागणी ही अवाजवी आहे असे मंचाचे मत आहे. परंतु त.क. यांना सदनिकेचा ताबा पत्र दिले नाही , आवश्यक सुखसोयी पुरविलेल्या नाही हे दिसून येते. तसेच पार्किंगची व्यवस्था करुन दिली नाही. त्यामुळे त.क. यांना झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्हणून प्रति तक्रारकर्ता रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च प्रति तक्रारकर्ताम्हणून रुपये 500/- द्यावे असे मंचाचे मत आहे.
उपरोक्त सर्व विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या आदेश पारित झाल्यापासून 60 दिवसाच्या आंत ब्रम्हा अपार्टमेंट व विष्णू-महेश अपार्टमेंट या दोन्ही इमारतीच्या मध्ये भिंत घालून द्यावी. सदर भिंतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याबाबतचा अहवाल ग्रामपंचायत साठोडा कडे सादर करावा.
3) विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या निरीक्षकाच्या अहवालानुसार प्रत्येक तक्रारकर्त्याच्या सदनिकामधील निकृष्ट बांधकामाच्या त्रृटया दुरुस्त करुन द्यावा. निरीक्षक यांनी अहवालात फक्त काही तक्रारकर्त्यांचा उल्लेख केला असला तरी सर्व तक्रारकर्त्यांच्या सदनिकेत असलेले दोष वि.प. यांनी आदेश पारित झाल्यापासून 60 दिवसात दुरुस्त करुन द्यावे. अन्यथा प्रति तक्रारकर्ता रु.10,000/- नुकसान भरपाई द्यावी.
4) वि.प. क्रं. 1 व 2 यांनी मंजूर नकाशानुसार बांधकाम पूर्ण झाले याबाबतचा अहवाल ग्रामपंचायत साठोडा यांना द्यावा व त्यानुसार ग्रामपंचायतकडून बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र व ताबापत्र त.क. यांना आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवसात द्यावे.
5) तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिरित्या आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासापोटी प्रति तक्रारकर्ता रुपये 5000/- द्यावे व तक्रारीचा खर्च म्हणून प्रति तक्रारकर्ता रु.500/- द्यावे. सदर रक्कम आदेश पारित झाल्या पासून 30 दिवसात त.क. यांना द्यावी.
6) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून
जाव्यात.
7) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.