जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 135/2008. प्रकरण दाखल तारीख - 02/04/2008 प्रकरण निकाल तारीख - 27/08/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. पाटील नितीन जयदेवराव वय 24 वर्षे धंदा व्यवसाय अर्जदार. रा. एन डी 2, क्रांती चौक सिडको, नवीन नांदेड. विरुध्द. 1. यामाहा मोटर इंडिया सेल्स प्रायव्हेट ए-3 सुरजपूर इंडस्टीयल एरिया, नॉयडा दादरी रोड सुरजपूर उतरप्रदेश. गैरअर्जदार 2. यामाहा टूटेजा ऑटोमोटिव्ह बाफना पेट्रोज पंपासमोर नांदेड अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.पी.एस. हिंगोले. निकालपञ (द्वारा - मा.श्री. सतीश सामते,सदस्य ) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या अनूचित प्रकाराबददल व सेवेच्या ञूटीबददल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, अर्जदार यांनी दि.03.08.2007 रोजी यामाहा ही मोटार बाईक नंबर एम.एच.-26-श्ू-5017 जी त्यांच्या वडिलांच्या नांवावर खरेदी केली. गैरअर्जदार क्र. 2 यांनी गाडीची पासींग विलंबाने केली. ही गाडी टूटेजा शोरुम वरुन खरेदी केली. परंतु गाडीची मूळ किंमत रु.48,010/- एवढी असताना त्यांच्याकडून रु.60,320/- घेतले असा आरोप केला आहे. दि.5.1.2008 रोजी अर्जदार यांची मोटार सायकलचा टिप्पर सोबत अपघात झाला व गाडीचे खुप नुकसान झाले. व यानंतर अपघातग्रस्त मोटार सायकल दि.10.1.2008 रोजी दूरुस्तीसाठी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे दिली. परंतु गैरअर्जदारानी ही मोटार बाईक दूरुस्त करण्यासाठी रु.10,000/- आगाऊ रक्कम घेऊन चार महिने गाडी दिली नाही. त्यांच्याकडे स्पेअर पार्टस नाही व ते कंपनीकडून मागविले आहेत व कंपनीकडून ते अद्याप आलेले नाहीत. यासबबीवरुन त्यांनी अनेक चकरा मारावयास लावल्या. मोटार बाईक्स दूरुस्त करुन देण्यास विलंब होत असल्याकारणाने त्यांनी एम.एस 23 जी 4900 ही बाईक तात्पूरती वापरण्यास दिली. परंतु ही गाडी खराब असल्या कारणाने अर्जदारांना पेट्रोल जास्त लागुन नूकसान झाले व शिवाय किक खराब असल्यामूळे बूट खराब झाला अश्या अनेक अडचणी आल्यामूळे नूकसान भरपाईची मागणी केली आहे. याप्रमाणे अपमान व वाईट वर्तणूकी बददल रु.5,000/- दयावेत, खर्च म्हणून रु.1,000/- गाडीच्या हप्त्याचे व्याजाबददल रु.12400/- इत्यादी अनेक मागण्या केलेल्या आहेत. गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्यासाठी जवाब दाखल केला आहे. यावर गैरअर्जदार क्र.1 यांची सही नसल्या कारणाने यांला गैरअर्जदार क्र.2 यांचे लेखी म्हणणे म्हणता येईल. अर्जदाराने त्यांच्यावर केलेले आरोप त्यांना माहीत नाही. अर्जदाराने कर्ज कोणाकडून घेतले यांच्याशी त्यांचा काही संबंध नाही. अर्जदारानी त्यांच्याकडून यामाहा ही मोटार बाईक विकत घेतली हे त्यांना मान्य आहे. दूचाकी खरेदीमध्ये फसवणूक केली व अयोग्य वर्तणूकीला सामोरे जावे लागले यांचा कोणताही पूरावा सादर नाही. अर्जदार यांनी फायनान्स कंपनीकडून किती पैसे घेतले हे त्यांना माहीत नाही, फक्त डाऊन पेमेंन्ट बददलचा त्यांचा संबंधी आहे. नवीन वाहन दिल्यानंतर गाडीच्या पासिंग बददल नमूद केलेला मजकूर चूकीचा आहे, या बददल चूक तक्रार आहे. गाडीचे कागदपञ दिल्यानंतर आर.टी.ओ. कडून यांची पासिंग करावी लागते व यासाठी रहीवासी प्रमाणपञ आवश्यक आहे. तो रहीवासी दाखला अर्जदार यांनी उशिरा दिल्या कारणाने पासिंगसाठी वेळ लागला यात त्यांचा काही दोष नाही. त्यामूळे जे काही परीणाम अर्जदाराने भोगले ही जबाबदारी त्यांचे वर आहे. अर्जदाराच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर इन्शूरन्स क्लेमसाठी गैरअर्जदार जबाबदार नाहीत. अपघातानंतर मोटार बाईक गैरअर्जदार यांच्या शोरुममध्ये नेण्यात आली परंतु वाहनाचे स्पेअर पार्टस उपलब्ध नसल्याकारणाने ते कंपनीकडून मागवून घेऊनच व पार्ट आल्यानंतरच वाहनाची दूरुस्ती होईल असे अर्जदारांना सांगण्यात आले व यासाठी रक्कम लागेल म्हणून अर्जदाराकडून घेण्यात आली. उलट सहानभूतीच्या दृष्टीकोनातून अर्जदार यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना गैरअर्जदारांनी स्वतःची मोटार बाईक तात्पूरत्या स्वरुपात वापरण्यासाठी दिली हे उपकार अर्जदार विसरले. गैरअर्जदार क्र.1 चे म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 यांनी दि.10.4.2008 रोजी अर्जदाराचे वाहन दूरुस्त करुन त्यांना दिले व यासंबंधी रु.16,990/- खर्च झालेला आहे. यामाहा कंपनीचे अधिकारी महेंद्र साहेब यांच्या समोर कोणतीही शिवीगाळ केली नाही. अर्जदाराचा अपमानही केला हे पूर्णतः चूक आहे. अपघातग्रस्त वाहन दूरुस्त करण्यासाठी विलंब हा स्पेअर पार्टस उशिरा आल्याकारणाने झालेला आहे यासाठी अर्जदाराने ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या तत्वहीन आहेत व यासंबंधी कोणताही पूरावा दाखल केलेला नाही. त्यामूळे ते मान्य करण्याजोगे नाही म्हणून अर्जदार यांची मागणी खर्चासह फेटाळावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचे सर्व आरोप त्यांनी अमान्य केले आहेत. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ही कंपनी उत्पादीत कंपनी असल्याकारणाने सरळ त्यांच्याशी संबंध नाही. म्हणून अर्जदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. गैरअर्जदार क्र.2 हे त्यांचे अधिकृत डीलर आहेत व त्यांनीच रक्कम घेतली व त्यांनी मोटार सायकल दिली. त्यामूळे त्यांची कृतीस गैरअर्जदार जबाबदार नाहीत. उत्पादक कंपनीची जबाबदारी ही वॉरंटीमध्ये जे पार्ट येतात फक्त त्याबददलच आहे, परंतु अर्जदार यांची मोटार सायकलचा अपघात झालेला आहे त्यामूळे त्या झालेलया पार्टसच्या नूकसानीबददल गैरअर्जदार जबाबदार नाहीत. दि.5.1.2008 रोजी अर्जदाराच्या मोटार सायकलचा अपघात झाला व त्यांनी गैरअर्जदार नंबर 2 यांच्याकडे दि.10.1.2008 रोजी मोटार दूरुस्तीसाठी दिली. यानंतर सर्व्हेअरनी दि.26.1.2008 रोजी सर्व्हे केला व गाडीचे काय नूकसान झाले हे पाहिजे , यात एक महिना गेला. यानंतर दूसरा सर्व्हे दि.10.2.2008 रोजी झाला यात सर्व पार्ट पाहण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 यांनी पार्टस बदलण्याची रक्कम मागितली ती अर्जदाराने दिली नाही. दि.4.3.2008 रोजी अर्जदार गैरअर्जदार यांच्या एरिया अधिका-याला भेटले व का विलंब होत आहे असे विचारले तेव्हा अधिका-याने आवश्यक असलेले स्पेअर्स पार्टस उपलब्ध करुन लवकर पाठविण्यात येतील असे आश्वासन दिले. यानंतर स्पेअर्स पार्टस दि.3.4.2008 रोजी उपलब्ध झाल्यानंतर वाहन दूरुस्त करुन अर्जदार यांचे समाधान करुन दि.10.4.2008 रोजी त्यांना मोटार सायकल देण्यात आली. अर्जदार यांचे रु.1,25,000/- ची मागणी ही केवळ बेकायदेशीरच नसून पैसे उकळण्याच्या दृष्टीने केली गेलेली आहे म्हणून त्यांची विरुध्दचा दावा खारीज करण्यात यावा अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र. 1 व2 यांनी पूरावा म्हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहेत. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- गैरअर्जदार क्र.2 यांच्यामार्फत अर्जदार यांनी यामाहा ही मोटार सायकल दि.3.8.2007 रोजी विकत घेतली. व गैरअर्जदार क्र.2 यांना रक्कम देण्यात आली एकूण किती रक्कम दिली या बददलचे बिल अर्जदाराने दाखल केलेले नाही. फक्त डिलेव्हरी चॅलान दाखल केलेले आहे. यामूळे नेमकी किती रक्कम जास्त घेतली हे सिध्द होऊ शकत नाही. वाहनाची जी किंमत असते म्हणजे रु.48010/- इतकीच रक्कम अर्जदार यांने दिली असणार. जास्त रक्कम देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही व हे सिध्द न झाल्याकारणाने गैरअर्जदार यांनी अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असे म्हणता येणार नाही. वाहन दिल्यानंतर आर.टी. ओ. मध्ये त्यांची नोंद किती दिवसांनी केली त्यासाठी आर.सी. बूक दाखल नाही. त्यामूळे पासींगला किती विंलब झाला हे कळणे शक्य नाही. उलटपक्षी गैरअर्जदार क्र.2 यांनी असे सांगितले की, अर्जदार यांनी रहीवासी प्रमाणपञ न दिल्याकारणाने आर.टी.ओ. कार्यालयात नोंद घेण्यास विलंब झालेला आहे. यांत त्यांची काहीही चूक नाही. यांला अर्जदाराने काहीही प्रतिउत्तर दिलेले नाही.त्यामूळे येथे देखील गैरअर्जदार क्र.2 यांनी ञूटीची सेवा दिली हे सिध्द होत नाही. दि.5.1.2008 रोजी अर्जदाराच्या मोटार सायकलचा अपघात झाला या बददलचे पोलिस कागदपञ दाखल केलेले आहेत. नंतर दि.10.1.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे अपघातग्रस्त वाहन दूरुस्तीसाठी देण्यात आले. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने साधारणतः 3 महिने वाहन दूरुस्तीसाठी लावले. व गैरअर्जदार क्र.2 यांचे म्हणणे की, यात त्यांची काही चूक नाही कारण कंपनीकडून स्पेअर्स पार्टस येण्यास वेळ लागला. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या म्हणण्यात ही गोष्ट कबूल केली आहे. मोटार सायकलला लागणारे पार्टस त्यावेळेस उपलब्ध नव्हते व नंतर दि..3.4.2008 रोजी वाहनाचे स्पेअर्स पार्टस गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे पाठविण्यात आले व त्यानंतर त्यांनी दि.10.4.2008 रोजी वाहन दूरुस्त करुन अर्जदाराच्या ताब्यात दिले. यात गैरअर्जदार क्र.2 यांची चूक किंवा सेवेतील ञूटी आम्हास आढळून येत नाही. उलट त्यांनी अर्जदाराच्या सोयीसाठी स्वतःची मोटार सायकल त्यांस वापरण्यास दिली परंतु गैरअर्जदार क्र.1 ही उत्पादक कंपनी आहे जे वाहन ते विकतात त्यांचे स्पेअर्स पार्टस तयार ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मार्केट मधे जे नियमितपणे वाहन विकले जाते त्यांचे स्पेअर्स पार्टस उपलब्ध करण्यासाठी त्यांना दोन ते तीन महिने लागतात म्हणजे ग्राहकाना विक्री नंतरची सेवा योग्य प्रयकारे देऊ शकत नाही हे सिध्द होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी स्पेअर्स पार्टस पूरविण्यात विलंब लावला म्हणून गैरअर्जदार क्र.2 हे अर्जदाराचे वाहन वेळेत दूरुस्त करु शकले नाहीत. यात गैरअर्जदार क्र.1 यांची जबाबदारी व सेवेतील ञूटी आढळून येते म्हणून अर्जदारास होणा-या मानसिक ञासाबददल व विलंबाबददल गैरअज्रदार क्र. 1 हे दोषी आहेत. अर्जदाराने जया विवीध मागण्या केलेल्या आहेत,याबददलचे कोणतेही पूरावे त्यांनी सादर केलेले नाहीत व अपघातग्रस्त वाहन दूरुस्तीसाठी दिल्यानंतर त्याबददल अर्जदारांना गैरअर्जदार यांनी अतिरिक्त पूरावेही दिले नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मजूंर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचे वाहनास स्पेअर्स पार्टस विलंबाने पूरविल्या बददल त्यांना झालेल्या मानसिक ञासाबददल रु.10,000/- दयावेत. 3. गैरअर्जदार क्र. 2 बददल आदेश नाही. 4. दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.विजयसिंह राणे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक |