Maharashtra

Nagpur

CC/11/143

Shri Sharad Laxmanrao Dadhe - Complainant(s)

Versus

Yadav Brothers Builders and Developers, Through Shri Prabhakar Yadav - Opp.Party(s)

Adv.Mrs.Rohilla

16 Jan 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/143
 
1. Shri Sharad Laxmanrao Dadhe
Ward No. 2, Bazar Chowk, Dhapewada, Ta. Kalmeshwar
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Yadav Brothers Builders and Developers, Through Shri Prabhakar Yadav
98, Radhakrushna Mandir, Hudkeshwar Road,
Nagpur
Maharashtra
2. ---------------------
----
----
----
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HON'ABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv.Mrs.Rohilla, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                  (पारित दिनांक :16/01/2012)
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दि.15.03.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍याप्रमाणे गैरअर्जदार वाडी येथील खसरा नं.213, टेकडी वाडी, तालुका जिल्‍हा नागपूर येथील जागेचा मालक असुन या जागेचे अकृषक शेतजमीनीत परिवर्तन करुन त्‍या जागेवर प्‍लॉट पाडून व त्‍यावर डूप्‍लेक्‍स/ रो हाऊसेस उभारुन ते विक्रीस उपलब्‍ध असल्‍याचे दर्शविल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍यांचेशी संपर्क करुन डूप्‍लेक्‍स घराकरीता बयाणा दाखल रु.1,00,000/- एवढी रक्‍कम धनादेशाव्‍दारे दिली होती व सदर धनादेश दि.15.09.2010 रोजी वटला. गैरअर्जदाराले पुढे भंखंडाचे अकृषकात रुपांतर झाल्‍याचा दाखला, गृह मंजूरी व नगरविकास मंजूरी आराखडयानुसार नकाशा देण्‍याचे कबुल केले होते. मात्र तक्रारकर्त्‍याने वारंवार कागदपत्रांची मागणी केल्‍यावर गैरअर्जदाराने अकृषक परवाना, नगरविकास आराखडयाचा मंजूर नकाशा इत्‍यादी कागदपत्रे देण्‍यांस अस‍मर्थता दर्शविली आणि शेवटी रु.50,000/- व रु.48,000/- चे दोन धनादेश तक्रारकर्त्‍यास परत दिले व उर्वरित रक्‍कम रु.2,000/- आणि वरील रकमेवरील व्‍याज देण्‍याचे मान्‍य केले होते. परंतु सदरचे धनादेश वटविण्‍याकरीता तक्रारकर्त्‍याने बँकेत जमा केले असता ते “Payment stoped”,  या कारणास्‍तव परत आले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन डूप्‍लेक्‍सचे विक्रीपत्र करुन ताबा द्यावा किंवा आजच्‍या बाजार भावाप्रमाणे डूप्‍लेक्‍सची किंमत परत करावी किंवा रु.1,00,000/- द.सा.द.शे. 24% व्‍याजासह परत करावे. तसेच त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.10,000/- देण्‍याबाबत आदेश व्‍हावा अशी मंचास विनंती केलेली आहे.
3.          तक्रारकर्त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात अनुक्रमांक 1 ते 23 दस्‍तावेजांच्‍या छायांकित प्रती जोडलेल्‍या आहेत.
 
4.          गैरअर्जदारांना नोटीस देण्‍यांत आले असता त्‍यांना नोटीसची सुचना मिळूनही स्विकारली नाही या कारणास्‍तव परत आली असुन त्‍याबाबतचे प्रमाणपत्र तक्रारकर्त्‍याने पोष्‍ट खात्‍याकडून मिळवुन दाखल केलेले आहे. त्‍यामुळे मंचाने त्‍यांचे विरुध्‍द दि.15.09.2011 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने पारित केला.
 
5.          प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.09.01.2012 रोजी आली असता तक्रारकर्त्‍याचे वकील हजर, गैरअर्जदार एकतर्फी, मंचाने तक्रारकर्त्‍याचा युक्तिवाद त्‍यांचे वकीलामार्फत ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
                -// नि ष्‍क र्ष //-
 
6.          यातील गैरअर्जदारांनी प्रकरणात हजर होऊन आपला बचाव कोणत्‍याही प्रकारे केला नाही व उत्‍तर दाखल केले नाही. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या प्रतिज्ञालेखावरील तक्रार व त्‍यासोबत दाखल दस्‍तावेजांवरुन ही बाब स्‍पष्‍ट झालेली आहे की, तक्रारकर्त्‍याकडून गैरअर्जदाराने रु.1,00,000/- धनादेशाव्‍दारे स्विकारले होते. तसेच डूप्‍लेक्‍सचे विक्रीपत्र करुन न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास रु.50,000/- व रु.48,000/- चे दोन धनादेश दिले, सदर धनादेश वटविण्‍याकरीता टाकले असता गैरअर्जदारांनी बँकेला ते ‘वटवु नये’, असे कळविल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास परत आले.
7.          यामधे गैरअर्जदारांनी वरील बाबी खोडून काढल्‍या नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदर बाबी पुरेशा पुराव्‍यानिशी सिध्‍द केलेल्‍या आहे, हे स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदारांनी एखाद्याकडून डूप्‍लेक्‍स विकण्‍याचे कारणावरुन रक्‍कम स्विकारुन त्‍याला डूप्‍लेक्‍सचे विक्रीपत्र करुन न देता रक्‍कम परत देण्‍याबाबतचे धनादेश देऊन खात्‍यात तेवढी रक्‍कम शिल्‍लक न ठेवणे, ही गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी आहे.
 
            वरील सर्व परिस्थिचा विचार करता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
                  -// अं ति म आ दे श //-
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदारांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून डूप्‍लेक्‍सबाबत    स्विकारलेले रु.1,00,000/- दि.15.09.2010 पासुन रक्‍कम अदा होई पर्यंत    द.सा.द.शे.12% व्‍याजासह परत करावी.
3.    गैरअर्जदारांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या     मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/-    अदा करावे.
4.    वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन    30 दिवसांचे आंत करावी. अन्‍यथा पुढील कालावधीकरीता आदेश क्र.2 मधील रकमेवर द.सा.द.शे.12% ऐवजी 15% व्‍याज देय राहील.
 
 
 
[HON'ABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.