Maharashtra

Nagpur

CC/131/2015

Nilesh V. Awari - Complainant(s)

Versus

Xolo Mobile Company - Opp.Party(s)

R. B. Dhoke

11 Apr 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/131/2015
 
1. Nilesh V. Awari
Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Xolo Mobile Company
A-56 Sector 64 Noida 201301
Noida
Noida
2. H.D. Cellular Services
Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 11 Apr 2017
Final Order / Judgement

 

आदेश

(आदेश पारित व्दारा - श्री  विजय सी प्रेमचंदानी,  मा.अध्यक्ष )

 

  1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
  2. तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी आहे की, तक्रारकर्त्याने XOLO Q006S पांढ-या रंगाचा मोबाईल स्नॅपडील डॉट काम या वेबसाईट वरुन दिनांक 4.6.2014 रोजी खरेदी केलेला होता. त्याकरिता तक्रारकर्त्याने त्याची किंमत 7,499/- रुपये भरले असुन तक्रारकर्त्यास मोबाईल हँन्डसेट दिनांक 12.6.2014 रोजी प्राप्त झाला. दिनांक 8.4.2014 रोजी अचानक भ्रमणध्‍वनीचा स्क्रीन टच बंद झाला म्हणुन XOLO सर्व्हीस सेंटर सिताबर्डी नागपूर येथे वादातीत मोबाईल हॅन्‍डसेट दुरुस्तीकरिता देण्‍यात आलेला होता. सदर भ्रमणध्‍वनी दुरुस्त करुन आल्याने सर्व्हिस सेंटर ने एक महिन्यानंतर तक्रारकर्त्याला दिला व सर्व्हीस सेंटरचे एक्झीकेटीव्हने तक्रारकर्त्याला लक्षात आणून दिले की, तक्रारकर्त्याचा भ्रमणध्‍वनी बदलेला होता. तो दिल्ली येथे पुन्हा पाठवून नंतर दुसरा जुना असलेला मागील कव्हर नसलेला XOLO दुस-या मॉडेलचा भ्रमणध्‍वनी दिला. परंतु त्यास नेल्यानंतर बॅटरी चार्जिंग केल्यावर तो फार गरम झाला त्यामुळे असे लक्षात आले की, भ्रमणध्‍वनी मधे चार्जिंग प्राब्लेम आहे. अशाप्रकारे भ्रमणध्‍वनीची किंमत घेऊन नंतर वॉरन्टीची सेवा दिली नाही ही विरुध्‍द पक्षाचे सेवेतील त्रुटी आहे म्हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्‍यात आलेली आहे.
  3. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्यास भ्रमणध्‍वनीची घेतलेली किंमत परत करावी व तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी, तक्रारीच्या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळण्‍याचे आदेश व्हावे.  
  4. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. विरुध्‍द पक्ष नोटीस मिळूनही प्रकरणात हजर झाले नाही म्हणुन सदर तक्रार त्यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 30.01.2016 रोजी नि.क्रं.1 वर पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तऐवज, तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन करता  मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतो.

निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्त्याची दाखल तक्रार, दस्तावेजांवरुन असे निर्देशनास येते की, तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाकडुन XOLO Q006S या मॉडेलचा भ्रमणध्‍वनी विकत घेतला होता व त्यात बिघाड झाला असल्याने विरुध्‍द पक्ष क्रं.2 कडे दुरुस्तीकरिता दिलेला होता. परंतु त्यांचे काही समाधान झाले नाही. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे असे सिध्‍द होते. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचा भ्रमणध्‍वनी दुरुस्‍त करुन दिला नाही व भ्रमणध्‍वनी बदलवून दिला नाही हे तक्रारकर्त्याने तक्रारीत दाखल शपथपत्रावरुन सिध्‍द होते. विरुध्‍द पक्षाला नोटीस मिळुनही विरुध्‍द पक्ष तक्रारीत हजर झाले नाही यावरुन तक्रारकर्त्याचे तक्रारीतील आरोप सिध्‍द होतात तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकत्या्रचे प्रती न्युनतम सेवा दिलेली आहे ही बाब सिध्‍द होते. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

1.    तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   विरुध्‍द पक्षाचे तक्रारकर्त्याला भ्रमणध्‍वनीची किंमत रुपये

7,499/-, दिनांक 08.06.2014 पासून द.सा.द.शे.9टक्के व्याजासह

परत करावी.

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरिक

त्रासापोटी रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या   

   खर्चापोटी रुपये 2,500/-(रुपये दोन हजार पाचशे फक्त)

   द्यावे.

4.   तक्रारकर्त्याला तक्रारीतील ब व क प्रत परत करण्‍यात यावी.

5.   वरील आदेशाचे पालन विरुध्‍द पक्षाने  संयुक्तीक  अथवा  

वैयक्तीकरित्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.

 

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.