Maharashtra

Thane

CC/122/2015

Mr. Sagar Bauva - Complainant(s)

Versus

Xolo Care Code No. 1300249 C.Com Telecommunication s Pvt Ltd - Opp.Party(s)

self

28 Jan 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/122/2015
 
1. Mr. Sagar Bauva
202,Tapscharya C.H.S.,Old Mumbai Road,Thane (W)-400601
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Xolo Care Code No. 1300249 C.Com Telecommunication s Pvt Ltd
F-12, Eternity Mall, Teen Hath Naka, Thane City Thane (w)
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

               न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. स्‍नेहा एस. म्‍हात्रे- मा.अध्‍यक्षा)

        

           तक्रारदारांनी दि. 10/05/2014 रोजी XOLO A1000 OPUS हया मॉडेलचा सफेद रंगाचा मोबाईल हँडसेट रु. 7398/- हया किंमतीस खरेदी केला होता. परंतु त्‍यात सुरुवातीपासूनच दोष आढळल्‍याने त्‍याने तो मोबाईल सामनेवाले यांचे Service Centre XOLO येथे दुरुस्‍त करण्‍यास दिला. त्‍यासाठी आवश्‍यक शुल्‍क भरले. परंतु 1 वर्षापर्यंत तक्रारदारांना त्‍यांचा मोबाईल दुरुसत करुन अथवा सामनेवाले यांनी आश्‍वासन दिल्‍याप्रमाणे बदलून मिळाला नाही. तक्रारदारांनी त्‍याबाबत अनेकवेळा सामनेवाले यांचेकडे ईमेलद्वारे, स्‍वतः भेट देऊन विचारणा केली तसेच XOLO कंपनीकडे त्‍याबाबत अनेकवेळा ईमेलद्वारे विचारणा केली. तेव्‍हा तक्रारदारांचा मोबाईल कंपनीकडून सर्व्‍हीस सेंटरला  पाठविण्‍यात आल्‍याचे तक्रारदारांना वारंवार ईमेलद्वारे सांगण्‍यात आले. परंतु सामनेवाले  सर्व्‍हीस सेंटर यांचेकडे विचारणा केल्‍यावर प्रत्‍येकवेळी तक्रारदारांचा मोबाईल अदयापपर्यंत सर्व्‍हीस सेंटरपर्यंत पोहोचला नसल्‍याचे सांगण्‍यात येऊन तक्रारदारांकडून प्रत्‍येकवेळी 8 ते 10 दिवसांची मुदतवाढ सर्व्‍हीस सेंटरतर्फे मागण्‍यात आली. अशाप्रकारे 1 वर्षभर तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे तक्रारदारांचा मोबाईल मिळवण्‍यासाठी पाठपुरावा करुनदेखील त्‍यांना अदयाप त्‍यांचा मोबाईल मिळाला नाही किंवा मोबाईल वॉरंटीमध्‍ये असतांना त्‍यात दोष आढळला असूनदेखील तो बदलूनही मिळाला नाही. तक्रारदारांनी सामनेवाले यांना पाठवलेली कायदेशीर नोटीस, ई-मेल, पत्रव्‍यवहार इत्‍यादी अभिलेखात उपलब्‍ध आहे.

           सामनेवाले यांना नोटीस मिळाल्‍याचा पोष्‍टाचा ट्रॅक रिपोर्ट तक्रारदारांनी सादर केला आहे. सामनेवाले सुनावणीस हजर न राहिल्‍याने सामनेवालेविरुध्‍द तक्रार एकतर्फा चालविण्‍यात आली.

           सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून 12/07/2014 रोजी तक्रारदारांचा मोबाईल सर्व्‍हीसिंगसाठी घेऊन त्‍याच्‍या दुरुस्‍तीबाबत 310000574572 असा ‘वर्कऑर्डर’ क्रमांक दिला आहे. दि. 12/07/2014 च्‍या सामनेवाले यांनी मोबाईलबाबत दिलेल्‍या जॉबशिटमध्‍ये मोबाईलच्‍या तक्रारीसंदर्भात Mobile Dead म्‍हणजे सतत बंद पडत असल्‍याचे नमूद केले आहे. यावरुन तक्रारदारांचा मोबाईल वॉरंटी कालावधीत असतांना त्‍यात बिघाड आढळून आल्‍याने तक्रारदारांनी सामनेवाले यांच्‍या सर्व्‍हीस सेंटरमध्‍ये तो दुरुस्‍तीसाठी किंवा बदलून देण्‍यासाठी दिला परंतु सामनेवाले यांनी जुलै, 2014 पासून अदयापपर्यंत तक्रारदारांना त्‍यांचा मोबाईल दुरुस्‍त करुन किंवा तो वॉरंटीमध्‍ये असल्‍याने बदलून दिला नाही. केवळ दरवेळी काहीतरी कारणे सांगून 8/10 दिवसांची मुदतवाढ घेतल्‍याचे दिसून येते. XOLO कंपनीने तक्रारदारांना दिलेल्‍या दि. 04/09/2014 रोजीच्‍या ईमेलवरुन कंपनीकडून तक्रारदारांचा मोबाईल दुरुस्‍त झाला असून तो सर्व्‍हीस सेंटरकडे पाठविल्‍याचा संदेश तक्रारदारांना प्राप्‍त झाला आहे (SMS- छायांकीत प्रत). तक्रारदारांनी XOLO कंपनीचे सामनवेाले हे ऑथोराईज्‍ड सर्व्‍हीस सेंटर असल्‍याने त्‍यांच्‍या मॅनेजरच्‍या नांवे दि. 02/01/2015 रोजी मोबाईल परत न दिल्‍यास ग्राहक मंचात तक्रार करण्‍याबाबत पाठविलेली कायदेशीर नोटीस अभिलेखात उपलब्‍ध आहे. परंतु त्‍यानंतरही सामनेवाले यांनी अदयापपर्यंत तक्रारदारांचा मोबाईल दुरुस्‍त करुन अथवा बदलून दिला नसल्‍याचे दिसून येते व केवळ तक्रारदारांना टोलवण्‍यासाठी वारंवार मुदतवाढ घेतल्‍याचे सिध्‍द होते. यावरून सामनेवाले यांनी तक्रारदारांप्रती अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन त्‍यांना सदोषपूर्ण सेवा दिल्‍याचे दिसून येते. सबब तक्रारदार सामनेवाले यांचेकडून त्‍यांनी मोबाईलबाबत भरलेली संपूर्ण रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच 1 वर्षापर्यंत सामनेवाले यांनी मोबाईल दुरुस्‍त करुन अथवा वॉरंटीमध्‍ये असल्‍याने संबंधीत कंपनीशी संपर्क करुन बदलून न दिल्‍याने तक्रारदारांना जो मानसिक त्रास झाला त्‍यासाठी तक्रारदार सामनेवालेकडून रक्‍कम रु. 2,000/- व न्‍यायिक खर्च रु. 2,000/- मिळण्‍यास पात्र आहेत.

 सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येतोः

               आ दे श

  1. तक्रारदारांचीतक्रार क्र. 122/2015 अंशतः मान्‍य करण्‍यात येते.
  2. सामनेवाले यांनी तक्रारदारांप्रती अनुचित व्‍यापारी प्रथा व सदोषपूर्ण सेवा दिल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.
  3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना मोबाईलची संपूर्ण किंमत रु. 7,398/- (अक्षरी रुपये सात हजार तीनशे अठयाण्‍णव) परत करावी व मानसिक त्रासापोटी रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार) व  न्‍यायिक  खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार) असे आदेश सामनेवाले यांना देण्‍यात येतात.
  4. वरील आदेशाचे पालन सामनेवाले यांनी आदेश पारीत तारखेपासून एक महिन्‍यात करावे.
  5. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्‍य पोष्‍टाने पाठविण्‍यात   याव्‍यात.
  6. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.
 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.