Maharashtra

Nagpur

CC/378/2020

PRABHAKAR PRAVIN DONGRE - Complainant(s)

Versus

XIAOMI TECHNOLOGIES INDIA PVT. LTD. - Opp.Party(s)

ADV. H.D. KAMBLE

15 Nov 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/378/2020
( Date of Filing : 29 Sep 2020 )
 
1. PRABHAKAR PRAVIN DONGRE
R/O. PLOT NO.123, KIRAN BHAVAN, AT TARABODI, POST METPANJARA, TALUKA KATOL, NAGPUR-441302
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. XIAOMI TECHNOLOGIES INDIA PVT. LTD.
8TH FLOOR, TOWER 1, UMIYA BUSINESS BAY MARTHAHALLI- SARJAPUR OUTER RING ROAD, BANGALORE, KARNATAKA-560103
BANALURU
KARNATAKA
2. QDIGI SERVICES LTD.
SHOP NO.104 AND 105, MANGALAM ARCADE, DHARAMPETH EXTENSION, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
3. DIYA MOBILE BAZAR
HONEY ARCHANA COMPLEX, MEDICAL ROAD, UNTKHANA, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. H.D. KAMBLE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 15 Nov 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा.आजने यांच्‍या आदेशान्‍वये -   

     

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 Redmi Note 9 हया मोबाईल हॅन्‍डसेटचा निर्माता असून विरुध्‍द पक्ष 2 हे वि.प. 1 चे अधिकृत सर्विस सेंटर आहे व विरुध्‍द पक्ष 3 हे सदरच्‍या मोबाईलचे वितरक आहेत. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 ने  निर्मित केलेला Modal No. Redmi Note 9, Flash Group Handset Mobile विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडून रुपये 17,600/- मध्‍ये दिनांक 20.08.2020 ला विकत घेतला होता व त्‍याचा    IME No. 862921043303498 असा आहे. सदरचा मोबाईल हँडसेट विकत घेतल्यानंतर मोबाईल हॅंडसेटचा सीलबंद बॉक्स उघडला, त्यावेळी बॉक्‍स मध्‍ये Silica Gel Sachet आढळले नाही, जे moisture absorbs करते. सदरचा मोबाईल हँडसेट हा माहे ऑगस्ट 2020 ला निर्माण करण्यात आला आणि पावसाळ्यात पॅक बंद करण्यात आल्‍याने बॉक्समध्ये Silica Gel Sachet न ठेवल्यामुळे मोबाईल हँडसेट moisture absorbs केल्याची शंका नाकारता येत नाही. तक्रारकर्त्याचा मोबाईल हँडसेट दिनांक 07.09.2020 पर्यंत व्यवस्थित कार्यरत होता, परंतु दिनांक 07.09.2020 ला बाहेरून आलेला दूरध्वनी कॉल प्राप्त झाला असता मोबाईल हँडसेट चालू बंद व्हायला सुरुवात झाली आणि  तक्रारकर्त्याच्या मोबाईलचे कार्यात अनियमितता व व्यवस्थित कार्य करीत नसल्यामुळे तक्रारकर्त्याने त्याचा मोबाईल हँडसेट काही काळ पर्यंत बंद ठेवला व त्यानंतर सुरू केला त्यावेळी मोबाईल हँडसेटचे सर्व फिचर कार्यरत होते, परंतु मोबाईल नेटवर्क दाखवित नव्हता. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि. 08.09.2020 ला तात्‍काळ विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 च्‍या अधिकृत सर्विस स्टेशनला दुरुस्‍तीकरिता आणला असता विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याला सहा दिवसानंतर म्हणजे दिनांक 14.09.2020 ला (appointment) अपॉइंटमेंट दिली, त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने सदरचा मोबाईल हँडसेट विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 कडे दुरुस्तीकरिता सादर केला असता विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडील सेवा देणाऱ्या व्यक्तीने तक्रारकर्त्याचा मोबाईल हँडसेट तपासला असता सांगितले की, सदर मोबाईल हँडसेट हा पाण्यामुळे डॅमेज झालेला आहे. त्‍यामुळे mother board बदलावा लागेल व त्‍याकरिता रुपये 11,795.28 पैसे इतके अदा करावे लागेल असे सांगितले. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 ते 3 हे सदरचा दोषपूर्ण मोबाईल हॅंडसेट दुरुस्‍त करुन / बदलून देण्‍यास वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या जबाबदार आहेत.  सदरचा मोबाईल हॅंडसेट हा वॉरन्‍टी कालावधीत असतांना ही विरुध्‍द पक्षाने तो दुरुस्‍त करुन अथवा बदलून न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने  सदरची तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण असलेला मोबाईल हॅंडसेट दुरुस्‍त करुन अथवा बदलून द्यावा किंवा मोबाईल हॅंडसेटची किंमत रुपये 17,600/- 12 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचा तसेच शारीरिक,मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.  
  2.      विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ते आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे विरुध्‍द  पक्ष क्रं. 1,  2  व  3  विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 23.02.2021 ला पारित करण्‍यात आला.
  3.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेज, त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

         अ.क्रं.   मुद्दे                                                            उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?           होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?   नाही

 

3. काय आदेश ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •                                                                                    निष्‍कर्ष
  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -     तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ने निर्मित केलेला मॉडेल नं. Redmi Note 9, Flash Group Handset Mobile विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडून रुपये 17,600/- मध्‍ये दिनांक 20.08.2020 ला विकत घेतला होता हे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेला मोबाईल हॅंडसेट सीलबंद बॉक्स मधून काढल्‍यानंतर तो दि. 20.08.2020  ते 07.09.2020 पर्यंत  व्‍यवस्‍थीत कार्य करीत होता.  त्‍यानंतर  सदरच्‍या मोबाईल मध्‍ये बिघाड आल्‍याने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 कडे मोबाईल हॅंडसेटची तपासणी केली असता विरुध्‍द पक्ष 2 ने दिलेल्‍या सर्विस रिपोर्टमध्‍ये  Inspection Remarks या मथळयाखाली  Problem found main board, sub board  and main fpc. Fault Description From Customer या मथळयाखाली  No Service Dual Sim and Sometime Headphone symbole stuck असे नमूद आहे हे नि.क्रं.2(4) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या मोबाईल हा moisture absorbs मुळे डॅमेज झाला हे आपले म्‍हणणे सिध्‍द करण्‍याकरिता कोणत्‍याही तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही. यावरुन तक्रारकर्त्‍याच्‍या गैरवापरामुळे सदरचा मोबाईल हॅन्‍डसेट हा डॅमेज झालेला असल्‍यामुळे तो कोणतीही नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.   

       सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज .

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.