Maharashtra

Nagpur

CC/547/2021

MOHSIN AHMAD MUQEEM AHMAD KHAN - Complainant(s)

Versus

XIAOMI TECHNOLOGIES INDIA PVT. LTD. - Opp.Party(s)

SELF

09 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/547/2021
( Date of Filing : 24 Sep 2021 )
 
1. MOHSIN AHMAD MUQEEM AHMAD KHAN
GOMTI TRADER, OPP. RAJHEIGHTS, JAI BHIM SQUARE, BESIDE MEHENDI CENTRE SHANTINAGAR NAGPUR-440002
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. XIAOMI TECHNOLOGIES INDIA PVT. LTD.
XIAOMI TECHNOLOGY INDIA PVT. LTD.8TH FLOOR, TOWER, UMLYA BUSINESS BAY MARATHA HALL- SARJAPUR, OUTER RING ROAD, BANGLORE-560103
BANGALORE
KARNATAKA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:SELF, Advocate for the Complainant 1
 
Dated : 09 Feb 2022
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35(1) नुसार प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाने निर्मित केलेला Redmi Note 9 (Aqua Green, 4 GB RAM 128 GB Storage)-48MP Quad Camera & Full HD+Display) B08696ZMPF HSN:8517  दि. 10.09.2020 ला ऑनलाईन ऑर्डर द्वारे बुक करुन रुपये 13,528/- ला विकत घेतला. तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये काही तांत्रिक दोष असल्‍यामुळे  सदरच्‍या मोबाईलचा उपभोग घेता आला नाही,  म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि. 14.08.2021 ला ई-मेल द्वारे विरुध्‍द पक्षाकडे  तक्रार केली. तसेच कस्‍टमर केअरला देखील त्‍यांच्‍या त्‍याचे नं. 18001036286 वर दि. 10.08.2021 ला तक्रार केली असता वि.प.ने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे त.क.ने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की,  विरुध्‍द पक्षाने दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मोबाईल खरेदीची किंमत रुपये 13,528/- परत करण्‍याचे आदेशित करावे. त्‍याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाला आयोगा आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष आयोगासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 07.01.2022 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

             मुद्दे                                           उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द  पक्षाचा ग्राहक आहे काय ?         होय
  2. विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय
  3. काय आदेश ?                               अंतिम आदेशानुसार

 

  • कारणमीमांसा

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍द पक्षाने निर्मित केलेला Redmi Note 9 (Aqua Green, 4 GB RAM 128 GB Storage)-48MP Quad Camera & Full HD+Display) B08696ZMPF HSN:8517  दि. 10.09.2020 ला ऑनलाईन ऑर्डर द्वारे बुक करुन रुपये 13,528/- ला विकत घेतला असल्‍याचे नि.क्रं. 2(1) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये काही तांत्रिक दोष असल्‍याबाबतची विरुध्‍द पक्षाकडे दि. 14.08.2021 ला ई-मेल द्वारे तक्रार केली असल्‍याचे नि.क्रं. 2(2) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते.  तसेच तक्रारकर्त्‍याने दि. 10.08.2021 ला कस्‍टमर केअरच्‍या क्रमांक 18001036286 वर तक्रार केली असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते.
  2.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत प्रकरणात कोणताही तज्ञ अहवाल सादर न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची मोबाईलची किंमत परत मिळण्‍याची विनंती नामंजूर करण्‍यात येते. परंतु तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि. 14.08.2021 ला ई-मेल द्वारे मोबाईल हॅन्‍डसेटबाबतची तक्रार करुन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेणे ही विरुध्‍द पक्षाची सेवेतील त्रुटी असल्‍याचे दिसून येते.

 

      सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 5,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.