Maharashtra

Nagpur

CC/702/2015

Archana Arun Jain - Complainant(s)

Versus

Xiaomi Inc - Opp.Party(s)

Kamal Satuja

30 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/702/2015
( Date of Filing : 07 Nov 2015 )
 
1. Archana Arun Jain
R/o C/o K.L.S. Associates Gandhi Chowk Sadar Nagpur 440001
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Xiaomi Inc
68, Qinghe Middle Street, Haidian District, Beijing(China)
Beijing
China
2. Flipkart India Pvt. Ltd.
No. 42/1 & 43, Kacherkanahalli Village, Jadigenehalli, Hobli, Hoskote, Bangalore 560067/ Vaishnavi summit no.6/B, 7th main, 80 feet road, 3rd block, Kormangala, Bangalore-560034
Bangalore
Bangalore
3. Ws Retail Services Pvt Ltd
No. 42/1 & 43, Kacherkanahalli Village, Jadigenehalli, Hobli, Hoskote, Bangalore 560067
Bangalore
Bangalore
4. Comwen Information Technologies Prv Ltd
118 A Empress Mall Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Kamal Satuja , Advocate
For the Opp. Party: अॅड. देवपुजारी, Advocate
Dated : 30 Dec 2019
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1.         तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 हा  Redmi 1S या मोबाईलचा निर्माता (उत्‍पादक) असून विरुध्‍द पक्ष 2 हा इम्‍पोर्ट करणारे असून विरुध्‍द पक्ष 3 हे अधिकृत विक्रेत आहे व विरुध्‍द पक्ष 4 हे सदरच्‍या मोबाईल हॅन्‍डसेटचे अधिकृत सर्विस सेंटर आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 1 ने निर्मित केलेला Redmi 1S  विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍या मार्फत ऑनलाईन वरुन दि.14.10.2014 रोजी ID : OD301014194948571500  अन्‍वये विकत मागविला व सदर मोबाईलचा IMEI No. /Sr. No. 865622027822050 हा असून तक्रारकर्तीला विरुध्‍द पक्ष 3 द्वारे invoice No. # BLRWFLD20141001360708 दि. 16.10.2014 अन्‍वये तक्रारकर्तीला दि. 22.10.2015 रोजी प्राप्‍त झाला. तक्रारकर्तीने MI Company चा मोबाईल हा MI Company चे सर्विस स्‍टेशन नागपूर येथे असल्‍याच्‍या कारणानेच खरेदी केला.
  2.         तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, दि. 20.09.2015 ला सदरचा मोबाईल हॅन्‍डसेट हा चार्ज करते वेळी त्‍याचा डिस्‍प्‍ले बंद होऊन स्क्रिन लाईट बंद झाला. त्‍यामुळे दि. 23.09.2015 रोजी तक्रारकर्तीने सदरचा मोबाईल हॅन्‍डसेट विरुध्‍द पक्ष 4 कडे दुरुस्‍तीकरिता घेऊन गेली असता विरुध्‍द पक्ष 4 यांनी तक्रारकर्तीला सांगितले की, ते एम.आय.कंपनीचे अधिकृत सर्विस सेंटर नाही आणि भारतात कुठेही एम.आय.कंपनीचे अधिकृत सर्विस सेंटर नाही. याबाबत तक्रारकर्तीने दि. 23.09.2015 ला सर्व माहिती विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍या Email ID No . Service.in@Xiomi .com (service in @ mi.com) वर पाठविली आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांचे Email Address
  3.      तक्रारकर्तीने पुढे असे नमूद केले की, तिचा मोबाईल हा वॉरन्‍टी कालावधीत असल्‍याने तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांच्‍या Email Address वर दि. 23.09.2015 ला वकिलामार्फत नोटीस पाठविली व सदरचा मोबाईल हॅन्‍डसेट नोटीस मिळाल्‍यापासून 7 दिवसांच्‍या आंत दुरुस्‍तीबाबत किंवा बदलून देण्‍याबाबत व्‍यवस्‍था करण्‍याबाबत सूचित केले. यावर विरुध्‍द पक्ष 2 यांनी Email द्वारे तक्रारकर्तीला कळविले की, ते तिच्‍या तक्रारीची दखल घेऊन तिला त्‍वरित सूचित करतील. त्‍यानंतर दि. 26.09.2015 ला 15.07 वाजता विरुध्‍द पक्ष 1 च्‍या अधिका-यांनी भ्रमणध्‍वनी क्रं. 7314727611 वरुन कळविले की, विरुध्‍द पक्ष 4 हे त्‍यांचे अधिकृत सर्विस सेंटर नाही. मात्र मुंबई व पुणे येथे अधिकृत सर्विस सेंटर आहेत. परंतु तक्रारकर्तीने त्‍या ठिकाणी मोबाईल दुरुस्‍ती करण्‍यास पाठविण्‍यास असमर्थता दर्शविली. त्‍यावेळी संबंधित प्रतिनिधीने तक्रारकर्तीला तिचा मोबाईल दुरुस्‍तीकरिता संबंधित सर्विस स्‍टेशनला पाठविण्‍याची व्‍यवस्‍था करु शकतात. परंतु याकरिता लागणारे चार्जेस तक्रारकर्तीला अदा करावे लागतील असे सांगितले. सदर प्रतिनिधीने त्‍यानंतर तक्रारकर्तीला कळविले की, MI कंपनीच्‍या अधिकृत सर्विस केंद्राची नेमणूक नागपूर येथे करणार आहे आणि तक्रारकर्तीला तिथे भेट देता येईल. परंतु त्‍यानंतर तक्रारकर्तीला कळविण्‍यात आले की, अधिकृत सर्विस स्‍टेशनची नेमणूक नागपूर येथे करण्‍यात आली नाही. ही विरुध्‍द पक्ष 1 ची तक्रारकर्ती प्रति दोषपूर्ण सेवा असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे.
  4.      तक्रारकर्तीने
  5.      तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्ष 2 यांनी पुरविलेला Redmi 1S हा मोबाईल हॅन्‍डसेट हा दोषपूर्ण असून विरुध्‍द पक्षांनी दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्तीला मोबाईल हॅन्‍डसेटची किंमत रुपये 6,001/- व त्‍यावर दि. 16.10.2014 पासून 18 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करण्‍याचे निर्देश द्यावे. त्‍याचप्रमाणे शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई देण्‍याचा आदेश व्‍हावा.

   

  1.         विरुध्‍द पक्ष 1 यांना लेखी उत्‍तर दाखल करण्‍याकरिता पुरेशी संधी देऊन ही त्‍यांनी लेखी उत्‍तर विहित मुदतीत दाखल केले नाही. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 1 तर्फे दि. 21.11.2017 रोजी वकिलांनी वकिलपत्र व लेखी उत्‍तर अभिलेखावर देऊन वकील निघून गेले. परंतु सदर प्रकरणात 45 दिवसानंतर लेखी उत्‍तर दाखल केल्‍यामुळे व 45 दिवसाचा कालावधी संपला असल्‍याने व लेखी उत्‍तरासोबत कोणताही अर्ज सादर केलेला नसल्‍याने लेखी उत्‍तर अभिलेखावर घेण्‍यात आले नाही. 

 

  1.      विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांना पाठविलेली नोटीस पाठविल्‍याचा अहवाल प्राप्‍त.  विरुध्‍द पक्ष  4 यांना पाठविण्‍यात आलेली नोटीस घेण्‍यास नकार या पोस्‍टाच्‍या शे-यासह नोटीस परत. विरुध्‍द पक्ष 2 ते 4 गैरहजर. करिता विरुध्‍द पक्ष 2 ते 4 विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 09.02.2016 रोजी पारित करण्‍यात आला. विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांनी जिल्‍हा मंचाचा दि.09.02.2016 रोजीचा एकतर्फी आदेश रद्द करण्‍याकरिता मा. राज्‍य आयोग, सर्किट बेंच,  नागपूर यांच्‍याकडे अपील दाखल केले होते. मा. राज्‍य आयोग, सर्किट बेंच  नागपूर यांनी अपील क्रं. RP.16/1 व RP. 16/22 मध्‍ये पिटीशनरची अपील मंजूर करुन दोन्‍ही पिटीशनर यांना दि. 13.01.2017 ला मंचासमक्ष हजर राहण्‍याचे आदेशित केले होते.

 

  1.        विरुध्‍द पक्ष 2 यांनी आपला लेखी जबाब दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, ती रजिस्‍टर्ड कंपनी असून ते नगदी घाऊक विक्री लॉजेस्टिक, पोहचविण्‍याचा व्‍यवसाय करतात. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार ही आधारहीन असून चुकिची व दिशाभूल करणारी आहे.  त्‍यांनी पुढे नमूद केले की, तक्रारकर्तीने दि.14.10.2014 रोजी ऑनलाईनने ऑर्डर देऊन मोबाईल बुक केला होता.विरुध्‍द पक्ष क्रं. 2 हे ग्राहकाला वस्‍तू विकत नाही. विरुध्‍द पक्ष 2 हे घाऊक विक्रेता असून  B2B विक्रीमध्‍ये involved आहे. विरुध्‍द पक्ष 2 हे मोबाईल हॅन्‍डसेटचे उत्‍पादक नाही, विक्रेता नाही किंवा दुरुस्‍ती केंद्र सुध्‍दा नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या मोबाईल हॅन्‍डसेट मधील उत्‍पादन दोषाशी विरुध्‍द पक्ष 2 च्‍या कामकाजाशी काहीही संबंध नाही. विरुध्‍द पक्ष 2 व तक्रारकर्ती यांच्‍यामध्‍ये कोणताही गुप्‍त करार झालेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या तक्रारीकरिता विरुध्‍द पक्ष 2 हे जबाबदार नाही. तक्रारकर्तीने दि. 23.09.2015 ला पाठविलेल्‍या नोटीसला उत्‍तर पाठवून नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 2  हा  B2B व्‍यवहारामध्‍ये आहे आणि त्‍याचा तक्रारकर्तीला मोबाईल हॅन्‍डसेट विक्री करण्‍यामध्‍ये काहीही संबंध नाही. विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्तीला व्‍यवस्थित सेवा दिलेली आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 1 च्‍या (Function) कार्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍या विरुध्‍द दाखल केलेली तक्रार ही मंचासमक्ष चालण्‍या योग्‍य नसून ती खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे.

 

  1.         विरुध्‍द पक्ष 3 ने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष  3 ही कंपनी कायदा 1956 अंतर्गत incorporate Company असून तिचे रजि. कार्यालय बंगलोर येथे आहे. विरुध्‍द पक्ष 3 चे कार्य इतरांनी उत्‍पादित केलेल्‍या वस्‍तूंचा विक्रेता आहे. Flipkart.com चे वेब साईडवर ती एक रजिस्‍टर्ड कंपनी आहे आणि इतर उत्‍पादकांनी उत्‍पादित केलेल्‍या व व्‍यापाराच्‍या वस्‍तुंची विक्री वेब साईड मार्फत संबंधित ट्रेर्ड मार्क खाली करते. विरुध्‍द पक्ष 3 यांनी स्‍वतः निर्मित केलेल्‍या कोणत्‍याही वस्‍तूची विक्री करत नाही. विरुध्‍द पक्ष 3 हे सदर तक्रारी मध्‍ये बनविण्‍यात आलेल्‍या पक्षकारांच्‍या वस्‍तुची विक्री करण्‍यासाठी करारबध्‍द आहे. तक्रारीमध्‍ये नमूद केलेल्‍या वादातील वस्‍तुची विक्री विरुध्‍द पक्ष 3 यांनी केली असून त्‍याची उत्‍पादित वॉरन्‍टी उत्‍पादकाने घेतलेली आहे. सदरची तक्रार उत्‍पादक किंवा त्‍याचे अधिकृत सेंटर यांच्‍या विरुध्‍द करावयास पाहिजे होती कारण संपूर्ण तक्रार मोबाईल हॅन्‍डसेटमधील उत्‍पादन दोषाबाबतची आहे. सदर वस्‍तुची विक्री व त्‍यांनतरची जबाबदारी विरुध्‍द पक्ष 3 ची नाही. विरुध्‍द पक्ष 3 हे  उत्‍पादक नाही किंवा अधिकृत सर्विस देणारा नाही त्‍यामुळे सदर तक्रारीत तक्रार दाखल करण्‍याचे कारण विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍या विरुध्‍द उदभवत नाही. तक्रारकर्तीने सदरच्‍या वस्‍तुचा वापर एक वर्षा पेक्षा जास्‍त केलेला आहे. विरुध्‍द पक्ष 3 ग्राहकाला बदलवून देण्‍याकरिता 30 दिवसाची वॉरन्‍टी देतो. तक्रारकर्तीला 30 दिवसात मध्‍ये वादातीत वस्‍तू मध्‍ये प्रॉब्‍लेम आढळला नाही. तक्रारकर्तीचे वस्‍तू हाताळण्‍यामुळे व चुकिमुळे दोष निर्माण झालेला आहे, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 3 यांना दोषी ठरविण्‍यात येऊ नये. विरुध्‍द पक्ष 3 यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍यामुळे त्‍याच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.
  2.      तक्रारकर्त्‍याची तक्रार, नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तऐवज, विरुध्‍द पक्ष  2 व 3 चा लेखी जबाब व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकून मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद करण्‍यात येते.

 

                        अ.क्रं.     मुद्दे                                              उत्‍तर

1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?होय

3. काय आदेश ?अंतिम आदेशानुसार

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 1 ने निर्मित केलेला Redmi 1S मोबाईल हॅन्‍डसेट विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून ऑनलाईन मार्फत दि. 14.10.2014 रोजी ऑर्डर देऊन रुपये 6001/- मध्‍ये मागविला. सदरचा मोबाईल  तक्रारकर्तीला विरुध्‍द पक्ष 3 द्वारे दि. 24.10.2014 रोजी पुरविण्‍यात आला. ही बाब उभय पक्षांना मान्‍य असल्‍यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे ही बाब सिध्‍द होते.
  2.      तक्रारकर्तीने दि. 20.09.2015 ला वरील नमूद हॅन्‍डसेट चार्ज करते वेळी सदरच्‍या मोबाईल हॅन्‍डसेटचा डिस्‍प्‍ले बंद झाला. त्‍यामुळे तक्रारकर्तीने सदरचा मोबाईल दि. 23.09.2015 रोजी विरुध्‍द पक्ष 4 यांच्‍याकडे दुरुस्‍तीकरिता घेऊन गेली असता विरुध्‍द पक्ष 4 हे एम.आय.कंपनीचे अधिकृत सर्विस सेंटर नसल्‍याचे सांगितले असता याबाबतची माहिती तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांना ई-मेल द्वारे कळविले.
  3.      तक्ररकर्तीचा मोबाईल वॉरन्‍टी कालावधी असल्‍यामुळे दि. 23.09.2015 ला विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांना त्‍यांच्‍या ई-मेल पत्‍त्‍यावर वकिलामार्फत नोटीस पाठविली व सदरचा मोबाईल 7 दिवसाच्‍या आत दुरुस्‍तीबाबत/ मोबाईल बदलून देण्‍याबाबत सूचित केले होते. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 1, 2, 3 व 4 यांना नोटीस पाठवून ही विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्तीचे मोबाईल हॅन्‍डसेट दुरुस्‍तीकरिता सेवा उपलब्‍ध करुन दिली नाही. ही विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 हे वादग्रस्‍त मोबाईल हॅन्‍डसेटचे निर्माते असून त्‍यांनी सदरचा मोबाईल विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 यांची सेवा उपलब्‍ध करुन ग्राहकांकरिता बाजारात विक्रीकरिता उपलब्‍ध करुन दिलेला होता. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 यांनी त्‍यांनी आपल्‍या बचावासाठी घेतलेले कथनाशी मंच सहमत नाही. विरुध्‍द पक्षाने मोबाईल हॅन्‍डसेट वॉरन्‍टी कालावधीतील दुरुस्‍तीकरिता व इतर वेळी दुरुस्‍तीकरिता अधिकृत दुरुस्‍ती/सेवा केंद्राची नेमणूक करणे अनिवार्य होते. परंतु विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्तीचा मोबाईल हॅन्‍डसेट वॉरन्‍टी कालावधीत अधिकृत दुरुस्‍ती केंद्राची नेमणूक केलेली नाही ही विरुध्‍द पक्षाची त्रुटीपूर्ण सेवा आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                         अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्तीला  Redmi 1S या मोबाईल हॅन्‍डसेटची किंमत रक्‍कम रुपये 6001/- व त्‍यावर तक्रार दाखल दिनांक पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 2,000/- द्यावे.

 

  1. वर्तमान तक्रार विरुध्‍द पक्ष 4 यांच्‍या विरुध्‍द खारीज करण्‍यात येते.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्तीला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 
 
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.