जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 301/2008. प्रकरण दाखल तारीख - 04/09/2008 प्रकरण निकाल तारीख - 03/11/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य लालपोतू कलेक्शन अर्जदार. मार्फत तुकाराम पांडूरंग लालपोतू वय, 48 वर्षे धंदा, व्यापार रा.एम.जी.रोड, नांदेड. विरुध्द. एक्स.पी.एस. (XPS) एक्सप्रेस सर्व्हीसेस मार्फत, शाखाधिकारी, शाखा तरोडा नाका, नांदेड. गैरअर्जदार. अर्जदारा तर्फे वकील - अड. रशद अहेमद गैरअर्जदार तर्फे वकील - एकतर्फा. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार एक्स.पी.एस. सर्व्हीसेस यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी तक्रार दाखल केली आहे ती खालील प्रमाणे. अर्जदार हे कापड व्यापारी आहे. त्याचे लालपोतू कलेक्शन या नांवाने दूकान आहे. अर्जदार यांनी त्यांचे व्यापारी नांवे मदन सिल्क अन्ड सारीज बँगलोर यांचे नांवे दि.16.5.2008 रोजी रु.2,79,425/- कापड/साडी यांचा गठठा गैरअर्जदार यांची पावती क्र.634779795 यानुसार पाठविला व त्या बाबत त्यांना भाडेही दिले, परंतु दि.30.5.2008 रोजी पर्यत बँगलोर येथील व्यापा-यास हा माल प्राप्त झाला नाही. दि.20.6.2008 रोजी गैरअर्जदार यांना या बाबत सूचना दिली. त्यावेळेस गैरअर्जदार यांनी असे आश्वासन दिले की, सदरचा माल हा दि.30.6.2008 पर्यत कोणत्याही परिस्थितील पोहचविण्यात येईल पण अद्यापपर्यत हा माल दिला नाही. अर्जदाराने स्वतः जाऊन बँगलोर येथे चौकशी केली, गैरअर्जदार यांनी माल तरी दया किंवा रक्कम तरी दया अशी विनंती केली असता त्यांना स्पष्ट नकार दिला, म्हणून मालाची किंमत रु.2,79,425/- तसेच नूकसान भरपाई रु.2,25,000/- व दावा खर्च रु.5,000/- असे एकूण रु.5,04,425/- देण्याचे आदेश करण्यात यावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार यांना नोटीस पाठविण्यात आली, नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही किंवा आपले म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ व दाखल केलेले कागदपञ तसेच वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1) गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी मदन सिल्क अन्ड सारीज बँगलोर यांचे नांवे दि.16.5.2008 रोजी साडी व कापडाचा गठठा वाहतूक करुन बँगलोर येथे पोहचविण्यासाठी गैरअर्जदार एक्स. पी. एस. यांचेकडे माल बूक केला. याप्रमाणे पावती नंबर 9845050201 व डिडब्ल्यूबी नंबर 634779795 याद्वारे रु.566/- देऊन पावती घेतली. यावर मालाची किंमत रु.2,79,425/- अशी लिहीलेली आहे. ही लॉरी पावती दाखल केली आहे. सोबत लालपोतू कलेक्शन यांना पाठविलेली मालाची यादी व बिल सोबत दाखल केले आहे. तक्रार अर्जाप्रमाणे बूक केलेला माल बँगलोर येथे पोहचला नाही. या बाबत दि.10.10.2008 रोजी गैरअर्जदार एक्स. पी. एस. बँगलोर यांना एक पञ लिहीण्यात आले व दि.16.5.2008 रोजी बूक केलेला माल मिळाला नाही अशी तक्रार केली. या बाबतची पोहच एक्स. पी.एस. बॅगलोर यांनी दिलेली आहे. ते पञ अर्जदाराने दाखल केलेले आहे. गैरअर्जदार एक्स.पी.एस. यांनी अर्जदाराला एक पञ लिहून एलआर नंबर 6347797950 चा माल कूठे तरी मिसिंग आहे या बाबतची सूचना देणारे पञ अर्जदाराने दाखल केले आहे. एक बाब यावरुन अतीशय स्पष्ट आहे की. एलआर पावतीवर घोषित केल्याप्रमाणे अर्जदार यांनी रहफ.2,79,425/- चा माल गैरअर्जदार यांनी अद्यापपर्यत बँगलोर येथे पोहचविलेला नाही व गैरअर्जदार यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिलेली असताना त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नाही यांचा अर्थ अर्जदार यांनी केलेले सर्व आरोप त्यांना मान्य आहेत असाच घ्यावा लागेल. अर्जदाराने बूक केलेला माल इच्छित स्थळी म्हणजे बँगलोर येथे पोहचविण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांनी घेतलेली होती. त्या बाबत मोबदलाही स्विकारलेला होता परंतु त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली नाही व या बाबत टाळाटाळ केली, म्हणजे त्यांनी आपल्या सेवेत कसूर केला आहे व हा माल त्यांनी हरवला असेल तर त्यांची नूकसान भरपाई भरुन देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी गैरअर्जदार यांची आहे. सेक्शन 21 (बी) Trasnport Services ------non delivery----complaint allowed. M/s Freight Carriers Vs. John Distilaries CPJ NCDRC --118 यांचा आधार घेता येईल. गैरअर्जदार यांचेकडून माल हरविला आहे म्हणजे मालाची आता नूकसान भरपाई करुन देणे म्हणजे त्यात त्यांचे नूकसान आहे. म्हणून अर्जदार यांची मानसिक व शारीरिक ञासा बददलची मागणी पुर्णताःह मान्य करणे योग्य होणार नाही. नूकसान भरपाईसाठी त्यांना 9 टक्के व्याज देणे उचित राहील. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना मालाची किंमत रु.2,79,425/- व त्यावर दि.01.06.2008 पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत, असे न केल्यास त्यावर दंडणीय व्याज म्हणून 12 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत अर्जदारास दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |