(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून पायातील बूट खरेदी केले. बूट मोठे असल्यामुळे त्यांनी ते बदलून देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी त्यास नकार दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्यांनी दि.05.10.2010 रोजी गैरअर्जदार यांच्याकडून 2495/- रुपयास बूट खरेदी केले. दुकानात त्यांना दाखविण्यात आलेले बूट व्यवस्थित होते, परंतू त्यांना पॅकींग करुन देण्यात आलेले बूट मोठे असल्यामुळे त्यांनी ते बदलून देण्याची मागणी गैरअर्जदार यांच्याकडे केली. गैरअर्जदार यांनी ही मागणी मान्य (2) त.क्र.560/10 न केल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने योग्य मापाचे बूट व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबात म्हटले आहे की, अर्जदाराने बूट विकत घेतल्यानंतर 8-10 दिवसानंतर ते बदलून देण्याची मागणी केली. त्यांनी सदरील बूट बदलून देण्याऐवजी दुरुस्त करुन देण्याची तयारी दर्शविली. पण अर्जदाराने त्यास नकार देऊन दमदाटी केल्याचे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांचे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीसोबत बूट खरेदी केल्याची पावती, बूटाचा क्रमांक इत्यादी कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. गैरअर्जदार यांनी देखील नाव, अधिकारपत्र, तसेच शपथपत्र दाखल न करता अर्जदाराच्या तक्रारीवर अर्धवट जवाब दाखल केला आहे. अर्जदार हे तक्रार दाखल केल्यानंतर एकदाही हजर राहिले नाहीत व कागदपत्रे ही दाखल केलेली नाहीत, त्यामुळे त्यांना सदरील प्रकरण चालविण्याची इच्छा नसल्याचे दिसून येते. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |