श्री रामलाल भ.सोमाणी, मा.अध्यक्ष यांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. त.क. उपरोक्त नमुद पत्त्यावर राहतात. यातील वि.प.क्रं -2 हे, वि.प.क्रं 1 निर्माता कंपनीचे वर्धा येथील स्थानिक विक्रेता आहेत. त.क.यांची मुख्य तक्रार ही वि.प.क्रं 1 निर्मित व वि.प.क्रं 2 विक्रेता यांचे कडून खरेदी केलेल्या ए.सी.मधील दोषा संबधिची आहे. 2. त.क. यांनी वि.प.क्रं-2 स्थानिक विक्रेता यांचे कडून, वि.प.क्रं-1 निर्मित कंपनीचा खालील वर्णनाचा रुपये-20,500/- एवढया किंमतीत धनादेशाद्वारे दिनांक 31.03.2008 रोजी खरेदी केला.
Model No.-WASR 12 RKO Serial No.-HS 27 Q 551010 (IU) HS 27 Q 511058 3. वि.प.क्रं 2 विक्रेता यांनी त.क.यांना ए.सी.खरेदी केल्या बाबत बिल क्रं 2033, दिनांक 31.03.2008 रोजीचे दिले. खरेदीचे वेळी वि.प.क्रं 2 यांनी सदर ए.सी.ची वॉरन्टी पाच वर्षाचे कालावधीची असल्याचे सांगितले. अशाप्रकारे त.क. हे उभय वि.प.चे ग्राहक आहेत.
4. त.क.यांनी पुढे असे नमुद केले की, वि.प.क्रं 2 चे प्रतिनिधीने सदर ए.सी.त.क.चे घरी येऊन बसवून दिला व मॅन्युअल मध्ये दिलेल्या माहिती नुसार त.क.ने ए.सी.चा वापर करणे सुरु केले. ए.सी.वापर सुरु असताना घरातील वातावरण हे थंड होत नव्हते, या बाबतची तक्रार त.क.यांनी वि.प.क्रं 2 यांचेकडे केली असता त्यांनी तंत्रज्ञास पाठवून दोषाचे निवारण केले. त्यानंतर काही दिवस पर्यंत ए.सी.व्यवस्थित चालला परंतु त्यानंतर त्यामध्ये पूर्वी प्रमाणेच दोष निर्माण झालेत. त्यानंतरही तक्रार केल्या नंतर वि.प.क्रं 2 चे तंत्रज्ञाने ए.सी.दुरुस्त करुन दिला परंतु काही दिवस व्यवस्थित चालल्या नंतर पुन्हा पूर्वी प्रमाणेच त्यात दोष निर्माण झालेत त्यामुळे वि.प.क्रं 2 कडे तक्रार केली असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष्य केले व कोणतीही कार्यवाही केली नाही.
CC/98/2011 5. त्यानंतर त.क.यांनी वि.प.क्रं 2 विक्रेता यांचेकडे दिनांक 05.10.2009 रोजी तक्रार केली असता त्यांनी ती वि.प.क्रं 1 निर्माता यांचेकडे पाठविली असता, वि.प.क्रं 1 यांनी नोंद घेऊन तक्रारीस नोंदणी क्रमांक एन.पी.101900454 दिला. परंतु तक्रारीवर प्रत्यक्ष्य कोणतीही कार्यवाही न झाल्याने त.क.यांनी स्वतः वि.प.क्रं 1 चे नागपूर कार्यालयास भेट दिली असता त्यांनी तंत्रज्ञ पाठवून ए.सी.मध्ये दुरुस्ती करुन दिली परंतु काही दिवसच ए.सी.व्यवस्थित चालला व नंतर त्यात पूर्वी प्रमाणेच दोष निर्माण झालेत. त्यानंतर त.क.यांनी वि.प.क्रं 1 कडे दिनांक 16.03.2011 रोजी तक्रार केली असता, वि.प.क्रं 1 यांनी तक्रारीस नोंदणी क्रं-एनपी 01311001640 दिला व तंत्रज्ञ पाठवून सुध्दा त्यातील दोषाचे निवारण होऊ शकले नाही. या बाबत संबधित तंत्रज्ञांनी विचारल्या वरुन सदर ए.सी.मध्ये उत्पादकीय दोष असल्याचे सांगितले व तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करुन दिली. त्यानंतरही वि.प.क्रं 1 कडे दिनांक 11.06.2011 रोजी तक्रार केली असता तक्रारीस नोंदणी क्रमांक-एन.पी.061101193 देण्यात आला परंतु वि.प.क्रं 1 यांनी त्यावर काहीही कार्यवाही केली नाही वा तंत्रज्ञास पाठविले नाही. 6. त.क.यांचे असे म्हणणे आहे की, उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे ए.सी.संबधाने वारंवार तक्रारी करुन व दुरुस्ती करुन सुध्दा ए.सी.मधील दोष दुर होऊ शकलेले नाहीत व सदर ए.सी.घरामधील वातावरण थंड करण्यास असमर्थ होता, यावरुन सिध्द होते की, सदर ए.सी.मध्ये निर्मितीचे वेळीच उत्पादकीय दोष होता व तो दुरुस्त होण्यापलीकडील आहे. अशाप्रकारे उभय विरुध्दपक्षांनी त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिलेली असल्याने त.क.यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शेवटी त.क.यांनी अधिवक्ता यांचे मार्फतीने उभय वि.प.नां रजिस्टर पोस्टाने दिनांक 12.07.2011 रोजी नोटीस पाठविली असता सदर नोटीसला उभय वि.प.कडून उत्तर सुध्दा देण्यात आले नाही.
7. म्हणून त.क.यांनी प्रस्तुत तक्रार वि.जिल्हा न्यायमंचा समक्ष दाखल करुन, उभय वि.प.नीं त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात यावे. त.क.यांना त्याच मॉडेलचा सुस्थितीत नविन ए.सी.पुरविण्याचे उभय वि.प.नां आदेशित व्हावे वा ए.सी.ची किंमत खरेदी दिनांका पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक 12 टक्के व्याजासह परत करण्याचे आदेशित व्हावे. त.क.यांना झालेल्या शारिरीक मानसिक त्रासा बद्यल नुकसान भरपाई रुपये-5000/- उभय वि.प.कडून देण्याचे आदेशित व्हावे. या शिवाय योग्य ती अनुषंगीक दाद त.क.यांचे बाजूने मिळावी इत्यादी मागण्यांसह त.क.यांनी प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. CC/98/2011 8. तक्रारकर्त्याने अभिलेखावरील पान क्रं 10 वरील यादी सोबत एकूण 4 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये वादातील ए.सी.चे बिलाची प्रत, वॉरन्टी कॉर्डची प्रत, त.क.यांनी वि.प.नां पाठविलेल्या नोटीसची प्रत, रजिस्टर पोस्टाची पावती व पोच पावती प्रत अशा दस्तऐवजाचा समावेश आहे.
9. प्रस्तुत प्रकरणात यातील उभय विरुध्दपक्षांना न्यायमंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीसेस पाठविण्यात आल्यात.
10. वि.प.क्रं 1 यांना रजिस्टर पोस्टाची नोटीस प्राप्त झाल्या बाबतची पोच पान क्रं 19 वर दाखल आहे. त्यावर वि.प.क्रं 1 ची सही व शिक्का नमुद आहे. परंतु अशी नोटीस प्राप्त झाल्या नंतरही वि.प.क्रं 1 तर्फे कोणीही न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी निवेदन सुध्दा दाखल केले नाही म्हणून वि.प.क्रं 1 विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश वि.न्यायमंचाने प्रकरणात दिनांक 04.01.2012 रोजी पारीत केला.
11. वि.प.क्रं-2 यांना न्यायमंचाची नोटीस मिळाली असता ते दिनांक 13.12.2011 रोजी न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले व लेखी जबाब दाखल करण्यास अल्प मुदत मागणारा विनंती अर्ज केला असता अर्ज मंजूर करण्यात आला. परंतु त्यानंतरही दिनांक 23.12.2011 रोजी वि.प.क्रं 2 न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा लेखी जबाबही दाखल केला नाही. दिनांक 04.01.2012 रोजी पुकारा करुन सुध्दा वि.प.क्रं 2 हे न्यायमंचा समक्ष उपस्थित न झाल्याने त्यांचे विरुध्द प्रस्तुत प्रकरण बिगर लेखी जबाबा शिवाय पुढे चालविण्याचा आदेश वि.न्यायमंचाने प्रकरणात दिनांक 04.01.2012 रोजी पारीत केला. 12. त.क.यांनी दिनांक 09.01.2012 रोजी लेखी पुरसिस न्यायमंचा समक्ष दाखल करुन नमुद केले की, त्यांची लेखी तक्रार हीच लेखी युक्तीवाद समजावा. 13. त.क.ची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज यांचे सुक्ष्म वाचन केल्या नंतर व त.क.चा युक्तीवाद काळजीपूर्वक ऐकल्या नंतर मंचाद्वारे निर्णयान्वित करण्या करीता खालील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर (1) त.क. यांना दोषपूर्ण ए.सी.पुरवून होय. उभय वि.प.नीं त.क.ला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? CC/98/2011 (2) जर होय, तर, त.क. वि.प.कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय? होय. (3) काय आदेश? अंतीम आदेशा नुसार : कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 व 2 14. त.क.ची मुख्य तक्रार ही, वि.प.क्रं 1 निर्मित व वि.प.क्रं 2 स्थानिक विक्रेता यांचे कडून खरेदी केलेल्या ए.सी.मधील दोषा संबधिची आहे. त.क.यांचे मुख्यतः म्हणणे असे आहे की, सदर ए.सी.चालू केल्या नंतरही घरातील वातावरण हे थंड होत नव्हते. या संदर्भात उभय वि.प.कडे वारंवार तक्रारी केल्या नंतर व त्यांचे तंत्रज्ञां कडून दुरुस्ती होऊन सुध्दा, दुरुस्ती नंतर थोडे दिवस ए.सी.व्यवस्थित चालल्या नंतर पुन्हा त्यात तेच दोष निर्माण होत होते. त.क.ची प्रस्तुत तक्रार ही प्रतिज्ञालेखावर दाखल आहे.
15. यातील उभय विरुध्दपक्षांना न्यायमंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता, ती उभय पक्षांना मिळाल्या बाबतची रजिस्टर पोस्टाची मूळ पोच अनुक्रमे पान क्रं 18 व 19 वर उपलब्ध आहे. 16. वि.प.क्रं 2 स्थानिक विक्रेता हे न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले व त्यांना मागणी प्रमाणे लेखी जबाबासाठी मुदत देऊनही त्यांनी विहित मुदतीत न्यायमंचा समक्ष आपला लेखी जबाब सादर केला नाही म्हणून त्यांचे विरुध्द न्यायमंचाने प्रस्तुत प्रकरण बिगर लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्याचा आदेश दिनांक 04.01.2012 रोजी पारीत केला. तर वि.प.क्रं 1 निर्माता यांचे विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 04.01.2012 रोजी पारीत केला. 17. अशाप्रकारे उभय विरुध्दपक्षांना त्यांचे म्हणणे न्यायमंचा समक्ष मांडण्यास पुरेशी संधी देऊनही त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले नाही व आपली बाजू न्यायमंचा समक्ष मांडली नाही वा त.क.चे तक्रारीतील विधानांना व त्यांचे विरुध्दचे त.क.चे आरोपांना कोणताही विरोध दर्शविलेला नाही. तक्रारदार यांची तक्रार प्रतिज्ञालेखावर आहे. अशास्थितीत त.क.यांची तक्रार आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज यावरुन प्रस्तुत प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्यात येत आहे. CC/98/2011 18. त.क.यांचे तक्रारी नुसार असे म्हणणे आहे की, त्यांनी वादातील वि.प.क्रं 1 निर्मित ए.सी. वि.प.क्रं 2 यांचे कडून दिनांक 31.03.2008 रोजी धनादेशाद्वारे खरेदी केला व त्या अनुषंगाने ए.सी.खरेदी केल्या बाबतचे बिल क्रं 2033, दिनांक 31.03.2008 रोजीचे रेकॉर्डवर पान क्रं 11 वर दाखल केले. तसेच पान क्रं 12 वर वि.प.क्रं 2 द्वारे देऊ केलेले ए.सी.वॉरन्टी कॉर्डची प्रत दाखल केली. यावरुन असे सिध्द होते की, त.क.हे उभय वि.प.चे ग्राहक आहेत. 19. त.क. यांचे तक्रारी प्रमाणे मॅन्युअल मधील माहिती नुसार त.क.ने ए.सी.चा वापर केला असता घरातील वातावरण हे थंड होत नव्हते, अशास्वरुपाची तक्रार त.क.यांनी वि.प.क्रं 2 यांचेकडे दोन वेळा केली असता प्रत्येक वेळी त्यांनी तंत्रज्ञास पाठवून तात्पुरत्या स्वरुपात दोषाचे निवारण केले असता काही दिवस पर्यंत ए.सी.व्यवस्थित चालला परंतु त्यानंतर त्यामध्ये पूर्वी प्रमाणेच दोष निर्माण झालेत. त्यानंतर त.क.यांनी वि.प.क्रं 2 विक्रेता मार्फतीने दिनांक 05.10.2009 रोजी तक्रार वि.प.क्रं 1 निर्माता यांचेकडे केली असता वि.प.क्रं 1 यांनी तक्रारीस नोंदणी क्रमांक एन.पी.101900454 दिला. परंतु तक्रारीवर प्रत्यक्ष्य कोणतीही कार्यवाही न झाल्याने त.क.यांनी स्वतः वि.प.क्रं 1 चे नागपूर कार्यालयास भेट दिली असता तंत्रज्ञ पाठवून ए.सी.मध्ये दुरुस्ती करुन दिली परंतु काही दिवसच ए.सी.व्यवस्थित चालला व नंतर त्यात पूर्वी प्रमाणेच दोष निर्माण झालेत. 20. त्यानंतर त.क.यांनी पुन्हा वि.प.क्रं 1 कडे दिनांक 16.03.2011 रोजी तक्रार केली असता, वि.प.क्रं 1 यांनी तक्रार क्रं-एनपी 01311001640 नोंदवून तंत्रज्ञ पाठवून सुध्दा त्यातील दोषाचे निवारण होऊ शकले नाही. या बाबत संबधित तंत्रज्ञांनी सदर ए.सी.मध्ये उत्पादकीय दोष असल्याचे सांगितले व तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करुन दिली. त्यानंतरही वि.प.क्रं 1 कडे दिनांक 11.06.2011 रोजी तक्रार केली असता तक्रारीस नोंदणी क्रमांक-एन.पी.061101193 दिला परंतु वि.प.क्रं 1 यांनी त्यावर काहीही कार्यवाही केली नाही वा तंत्रज्ञास पाठविले नाही. 21. त.क.यांचे असे म्हणणे आहे की, उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे ए.सी.संबधाने वारंवार तक्रारी करुन व दुरुस्ती करुन सुध्दा ए.सी.मधील दोष दुर होऊ शकलेले नाहीत व सदर ए.सी.घरामधील वातावरण थंड करण्यास असमर्थ होता, यावरुन सिध्द होते की, सदर ए.सी.मध्ये निर्मितीचे वेळीच उत्पादकीय दोष होता व तो दुरुस्त होण्यापलीकडील आहे. अशाप्रकारे उभय विरुध्दपक्षांनी त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिलेली असल्याने शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे. C/98/2011 22. त.क. यांनी पान क्रं 12 वर वादातील ए.सी. Model No.-WASR 12 RKO संबधाने वि.प.क्रं 2 द्वारे दिलेले वॉरन्टीकॉर्डची प्रत दाखल केलेली आहे, त्यामध्ये सदर ए.सी.वर 01 year Comprehensive & 04 years Compressor ची वॉरन्टी नमुद केलेली आहे. त.क. यांनी सदर ए.सी. दिनांक 31.03.2008 रोजी खरेदी केलेला असल्यामुळे व त्यामध्ये निर्माण झालेले दोष हे वॉरन्टी कालावधीत निर्माण झाल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. 23. परंतु त.क.यांनी वि.प.कडे तक्रार नोंदविल्या संबधाने प्रती दाखल केलेल्या नाहीत. मात्र उभय वि.प.नां दिनांक 12.07.2011 रोजी अधिवक्ता मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविल्या बद्यल पान क्रं 13 ते 15 वर नोटीसची प्रत, पान क्रं 16 वर पोस्टाच्या पावत्यांच्या व पोच पावत्यांच्या प्रती दाखल असून त्यावरुन उभय वि.प.नां त.क. यांनी रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळाल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. 24. त.क. तर्फे अधिवक्ता यांनी वि.प.यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये सुध्दा वि.प.क्रं 1 द्वारे दिनांक 05.10.2009 तक्रार नोंदणी क्रमांक एन.पी.101900454 त्यानंतर दिनांक 16.03.2011 रोजी तक्रार नोंदणी क्रं-एनपी 01311001640 त्यानंतर दिनांक 11.06.2011 रोजी तक्रार नोंदणी क्रमांक-एन.पी.061101193 अन्वये नोंदविल्याचा मजकूर नमुद केलेला आहे. 25. मार्च, 2008 मध्ये ए.सी.खरेदी केल्या पासून ते सन 2011 पर्यंत त.क.ला वि.प.कडे ए.सी. संबधाने वारंवार तक्रारी कराव्या लागलेल्या आहेत. सदर वादातील ए.सी. मध्ये दोष निर्माण झाल्याने व घरातील वातावरण थंड होत नसल्याने त.क.यांना व त्यांचे कुटूंबियास सदर ए.सी.चा उपभोग घेता आला नाही. ए.सी.मध्ये वारंवार दोष निर्माण झाल्यामुळे वारंवार वि.प.कडे तक्रारी कराव्या लागल्यात व वारंवार ए.सी.दुरुस्त करण्यात आला परंतु उपयोग झाला नाही. अशाप्रकारे त.क.यांना दोषपूर्ण ए.सी.पुरवून वि.प.यांनी दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. वि.प.चे दोषपूर्ण सेवेमुळे त.क. यांना निश्चीतच शारिरीक व मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागलेला आहे व शेवटी प्रस्तुत तक्रार न्यायमंचा समक्ष सादर करावी लागलेली आहे आणि त्यामुळे त.क. आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल व तक्रारीचे खर्चा बद्यल उभय वि.प.कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. CC/98/2011 26. सदर वादातील ए.सी.मध्ये त.क. म्हणतात त्या प्रमाणे उत्पादकीय दोष आहे काय? या बाबीचा येथे विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. त.क. यांनी सदर ए.सी. दिनांक 31.03.2008 रोजी खरेदी केला. त.क. यांनी पान क्रं 12 वर वादातील ए.सी. Model No.-WASR 12 RKO संबधाने वि.प.क्रं 2 द्वारे दिलेले वॉरन्टीकॉर्डची प्रत दाखल केलेली आहे, त्यामध्ये सदर ए.सी.वर 01 year Comprehensive & 04 years Compressor ची वॉरन्टी नमुद केलेली आहे. त.क. यांनी सदर ए.सी.चा मॅन्युअल प्रमाणे वापर करणे सुरु केले असता काही दिवसातच सदर ए.सी.मुळे घरातील वातावरण थंड होत नव्हते त्यामुळे त.क.यांनी वारंवार वि.प.कडे तक्रारी केल्यात. सदर ए.सी.मधील दोष वॉरन्टी कालावधीतच निर्माण झाल्याची बाब पूर्णतः सिध्द झालेली आहे. त.क.यांचे म्हणण्या प्रमाणे ए.सी.स्थापित झाल्या नंतर, वि.प.क्रं 2 यांचेकडे तकार दोन वेळा केली असता प्रत्येक वेळी त्यांनी तंत्रज्ञास पाठवून तात्पुरत्या स्वरुपात दोषाचे निवारण केले असता काही दिवस पर्यंत ए.सी.व्यवस्थित चालला परंतु त्यानंतर त्यामध्ये पूर्वी प्रमाणेच दोष निर्माण झालेत.त्यानंतर त.क.यांनी वि.प.क्रं 2 विक्रेता मार्फतीने दिनांक 05.10.2009 रोजी त्यानंतर वि.प.क्रं 1 कडे दिनांक 16.03.2011 रोजी व त्यानंतरही वि.प.क्रं 1 कडे दिनांक 11.06.2011 रोजी ए.सी.संबधाने तक्रारी केलेल्या आहेत व शेवटी उभय वि.प.नां दिनांक 12.07.2011 रोजी अधिवक्ता मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविल्या बद्यल पान क्रं 13 ते 15 वर नोटीसची प्रत, पान क्रं 16 वर पोस्टाच्या पावत्यांच्या व पोच पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत त्यावरुन उभय वि.प.नां त.क. यांनी रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळाल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. 27. त.क. तर्फे अधिवक्ता यांनी वि.प.यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये सुध्दा वि.प.क्रं 1 द्वारे दिनांक 05.10.2009 तक्रार नोंदणी क्रमांक एन.पी.101900454 त्यानंतर दिनांक 16.03.2011 रोजी तक्रार नोंदणी क्रं-एनपी 01311001640 त्यानंतर दिनांक 11.06.2011 रोजी तक्रार नोंदणी क्रमांक-एन.पी.061101193 अन्वये नोंदविल्याचा मजकूर नमुद केलेला आहे. 28. वि.प.यांना न्यायमंचा मार्फत त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देऊनही, वि.प.क्रं 1 न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत व वि.प.क्रं 2 हे न्यायमंचा समक्ष उपस्थित झालेत परंतु त्यांना योग्य संधी देऊनही त्यांनी लेखी जबाब दाखल केला नाही वा त.क.चे तक्रारीतील विधाने खोडून काढलेली नाहीत. त.क.ची तक्रार CC/98/2011 प्रतिज्ञालेखावर दाखल आहे, अशापरिस्थितीत त.क.चे म्हणणे काही अंशी मान्य करण्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय न्यायमंचा समक्ष नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार गुणवत्तेवर निकाली काढण्यात येत आहे.
मुद्या क्रं-3 29. सर्वसामान्य व्यवहारात कोणत्याही ग्राहकास कोणाविरुध्द विनाकारण तक्रार करण्याचे प्रयोजन नाही. त.क.यांनी खरेदी केलेल्या ए.सी.मध्ये खरेदी पासून ते जवळपास तीन ते चार वर्षाचा कालावधी उलटून सुध्दा वि.प.चे तंत्रज्ञां मार्फत वारंवार दुरुस्ती होऊन सुध्दा त्यातील दोष नष्ठ झालेले नाहीत. सदर ए.सी.मध्ये वारंवार दुरुस्ती होऊन सुध्दा त्यातील दोष नष्ठ होऊ शकलेले नाहीत त्यामुळे सदर ए.सी.मध्ये त.क. म्हणतात त्या प्रमाणे दुरुस्त होण्या पलीकडील उत्पादकीय दोष असल्याची बाब सिध्द होते या निष्कर्षा प्रत वि.न्यायमंच आलेले आहे. 30. दुसरे असे की,उभय वि.प.अनुक्रमे वादातील ए.सी.चे निर्माते व विक्रेते आहे व ते या विषयी जास्त तज्ञ आहेत, असे असूनही त्यांचे वतीने सदर ए.सी.निर्दोष आहे किंवा त्या ए.सी.मध्ये नेमके कोणते दोष आहेत या बाबत मंचा समक्ष मांडण्यात आले असते तर योग्य प्रकारची आनुषंगीक दाद देता आली असती, परंतु उभय वि.प.तर्फे कोणीही न्यायमंचा समक्ष आपली बाजू मांडलेली नाही. प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज वॉरन्टी कॉर्डचे प्रतीवरुन वादातील ए.सी.संबधाने 04 वर्ष कॉम्प्रेसरची वॉरन्टी आहे. ए.सी.मधील महत्वाचा भाग कॉम्प्रेसर आहे आणि अशास्थितीत वॉरन्टी कालावधीत यंत्राच्या थंड करण्याचे (Cooling capacity ) क्षमते बद्यल वाद उपस्थित झालेला आहे आणि म्हणून सदर ए.सी.बदलवून देणे किंवा त्याची किंमत त.क.ला परत करणे असे आदेशित करणे कायदेशीर व न्यायोचित राहिल, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 31. ए.सी.सन-2008 मध्ये ए.सी.खरेदी केल्या पासून ते आज पावेतो म्हणजे जवळपास तीन ते चार वर्षाचा कालावधी उलटून सुध्दा त्यातील दोष नष्ठ होऊ शकलेले नाहीत. त.क. व त्यांचे कुटूंबियांना सदर ए.सी.चा पूर्ण उपभोग घेता आलेला नाही, ए.सी.मध्ये वारंवार बिघाड होऊन वि.प.कडे वारंवार तक्रारी कराव्या लागल्यात, वारंवार दुरुस्ती करण्यात आली परंतु दोष नष्ठ झालेले नाहीत या सर्व प्रकारात त.क.ला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे. तसेच वि.प.नां नोटीस पाठवावी लागली व शेवटी वि.न्यायमंचात प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागलेली आहे आणि त्यामुळे त.क.हे शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल नुकसान भरपाई तसेच नोटीस व तक्रारीचा खर्च वि.प.कडून मिळण्यास पात्र आहेत, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. CC/98/2011 32. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) त.क.ची तक्रार ,उभय वि.प.विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात अंशतः मंजूर करण्यात येते. 2) उभय वि.प.नीं त.क.यास उत्पादकीय दोष असलेला ए.सी.पुरवून दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते. 3) उभय वि.प.नीं वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.यांना बिल क्रं-2033 दि.31.03.2008 नुसार विक्री केलेला व्हर्लपूल ए.सी. Model No.-WASR 12 RKO Serial No.-HS 27 Q 551010 (IU) HS 27 Q 511058 बदलवून देऊन त्याऐवजी त्याच कंपनीचा व त्याच मॉडेलचा नविन सुव्यवस्थित ए.सी.द्यावा. 4) अक्रं 3) मध्ये नमुद केल्या प्रमाणे करणे उभय वि.प.नां शक्य नसल्यास त.क.कडून उपरोक्त नमुद क्रमांकाचा ए.सी.परत घेऊन, त.क.ला ए.सी.ची किंमत रुपये-20,500/- (अक्षरी रुपये विस हजार पाचशे फक्त) परत करावी. 5) उभय वि.प.नीं वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.ला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रु.-1000/-(अक्षरी- रुपये एक हजार फक्त ) तसेच प्रस्तुत तक्रारीचा व नोटीस खर्च म्हणून रु.-1000/-(अक्षरी रुपये-एक हजार फक्त) त.क.ला देय करावे. 6) सदर आदेशाचे अनुपालन, उभय वि.प.नीं वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात सदर निकालपत्र प्राप्त झाल्या पासून तीस दिवसांचे आत करावे, अन्यथा उपरोक्त नमुद ए.सी.रक्कम रु.20,500/- निकाल दि.13.01.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.6 टक्के दराने दंडनीय व्याजासह त.क.ला देण्यास उभय वि.प.जबाबदार राहतील. 7) उभय पक्षांना निकालपत्राची प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी. 8) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. (रामलाल भ.सोमाणी) | (सौ.सुषमा प्र. जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |