Maharashtra

Nagpur

CC/11/95

Shri Satishkumar Hardayal Pashine - Complainant(s)

Versus

Western Coal Field Ltd. - Opp.Party(s)

Adv. Jayesh Vora

23 Jan 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/95
 
1. Shri Satishkumar Hardayal Pashine
158, Shankarnagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Western Coal Field Ltd.
Coal Estate, Civil Lines, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. CRIMS HOSPITAL
275, Central Bazar Road, Ramdaspeth
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. Jayesh Vora, Advocate for the Complainant 1
 
श्री. रमेश देवरस (गैरअर्जदार क्र.1 तर्फे).
श्री. मुकेश शुक्‍ला, आशिष भिडे
(गैरअर्जदार क्र.2 तर्फे).
......for the Opp. Party
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये)
                          -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 23/01/2012)
 
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दि.28.02.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.                प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यानुसार तो गैरअर्जदार क्र.1 यांचे मुख्‍यालयात उपमुख्‍य कार्मिक प्रबंधक (कल्‍याण) या पदावर कार्यरत होते व ते नोव्‍हेंबर 30, 1997 ला सेवानिवृत्‍त झाले होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्‍याच्‍या सेवानिवृत्‍त झालेल्‍या एक्‍झीक्‍युटीव्‍ह/ अधिकारीकरीता कॉन्‍ट्रीब्‍युटरी पोस्‍ट रिटायरमेंट मेडिकेअर स्किम फॉर एक्‍झीक्‍युटीव्‍ह ऑफ कोल इंडिया लि. ही योजना लागु केली होती. सदर योजनेमधे तक्रारकर्त्‍याने रु.40,000/- गैरअर्जदारांना दि.08.08.2008 रोजी अदा करुन परिवारासह सदस्‍य झाला होता.
3.          सदर योजनेच्‍या अट क्र.3.2.1 च्‍या Indoor Treatment प्रमाणे तक्रारकर्त्‍याला जर शारीरिक व्‍याधीमुळे कंपनीव्‍दारा मान्‍यताप्राप्‍त हॉस्‍पीटलमध्‍ये भर्ती होणा-या स्थितीत विरुध्‍द पक्षाकडून हॉस्‍पीटलमधे लागणारा पूर्ण चिकित्‍सा खर्च रु.5,00,000/- पर्यंत देण्‍याचे प्रावधान आहे.
 
4.          दि.16.12.2008 रोजी तक्रारदाराला गंभीर शारीरिक त्रास झाल्‍यामुळे त्‍याला गैरअर्जदारांचे पॅनल चिकित्‍सक डॉ. व्‍ही.के. गुप्‍ता, रामनगर, नागपूर आणि कार्यकारी मुख्‍य चिकित्‍सक अधिकारी डॉ. मिश्रा यांच्‍याकडे नेण्‍यांत आले. दोन्‍ही चिकित्‍सकांनी तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदार क्र.2 क्रिम्‍स हॉस्‍पीटल येथे भरती होण्‍याचे निर्देश दिले व डॉ. मिश्रा यांनी सदर हॉस्‍सपीटलमधे भरती होण्‍याकरीता आवश्‍यक पत्र (रेफर लेटर) तक्रारकर्त्‍याला दिले, त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍यास गैरअर्जदारांचे हॉस्‍पीटलमधे उपचारासाठी भरती करण्‍यांत आले व दि.26.12.2008 रोजी तक्रारकर्त्‍याला डिस्‍चार्ज देण्‍यांत आला. गैरअर्जदार क्र.2 यांनी चिकित्‍सेपोटी रु.45,899.66/- एवढी रीक्‍कम आकारली, त्‍यावेळेस तक्रारकर्त्‍याने सदर गैरअर्जदार रुग्‍णालय तक्रारकर्त्‍याकडून खाजगी दराने बिलाची मागणी करत आहे, असे गेरअर्जदारांच्‍या निदर्शनास आणून दिले, त्‍यावेळेस गैरअर्जदार क्र.2 यांनी आश्‍वासन पत्राप्रमाणे जर तक्रारकर्त्‍याचे प्राधिकारी अधिकारी यांनी लिहुन दिल्‍यास ते जास्‍तीची रक्‍कम तक्रारकर्त्‍यास परत करतील असे आश्‍वासीत केले व तक्रारकर्त्‍याने सदरची रक्‍कम गैरअर्जदार क्र.2 यांना अदा केली.
 
5.          दि. 14.02.2009 रोजी तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र.1 कडे सदर रुग्‍णालयाचे डिस्‍चार्ज रिपोर्ट सदर खर्चाचे बिल/पावत्‍या दाखल केल्‍या. सदर योजनेच्‍या कंडीका 6.2 (अ) प्रमाणे दावा जमा केल्‍यापासुन 45 दिवसांच्‍या आंत तो निकाली काढणे गैरअर्जदारांना बाध्‍य आहे. असे असतांना देखील तकारकर्त्‍याने वारंवार गैरअर्जदारांशी संपर्क साधुनही विहीत मुदतीत गैरअर्जदारांनी सदर रक्‍कम तक्रारकर्त्‍यास दिली नाही. त्‍यानंतर जवळपास सहा महिन्‍यांनी दि.04.09.2009 रोजी गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याचे अकाऊंटमधे सदर रकमेपैकी केवळ रु.29,993/- एवढी रक्‍कम जमा केली. तक्रारकर्त्‍याने उर्वरित रक्‍कम रु.15,906.66/- एवढी रक्‍कम मिळण्‍यासाठी वारंवार गैरअर्जदारांशी संपर्क साधुन प्रयत्‍न केले असतांना देखील सदरची उर्वरित रक्‍कम गैरअर्जदारांनी अदा केली नाही.
 
6.          दि.19.05.2009 गैरअर्जदार क्र.1 यांनी सदरची रक्‍कम तक्रारकर्त्‍यास परत करण्‍याविषयी गैरअर्जदार क्र.2 यांना पत्र दिले असता गैरअर्जदार क्र.2 यांनी दि.16.07.2009 च्‍या पत्राव्‍दारा तक्रारकर्त्‍यास दिलैया उत्‍तरात गैरअर्जदारांच्‍या सेवानिवृत्‍त कर्मचा-यांबाबत त्‍याच्‍याव्‍दारे निश्चित करण्‍यांत आलेल्‍या दराने उपचार करण्‍याबाबत त्‍याचेकडे कुठलीही तरतुद नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने संबंधीत बाबी संदर्भात गैरअर्जदार क्र.1 यांचेशी वारंवार संपर्क केल्‍यानंतर दि.24 व 26.07.2010 च्‍या पत्रान्‍वये गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्‍याची कुठलीही रक्‍कम कपात केलेली नाही, असे कळविले.
 
7.          तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा सदर योजनेप्रमाणे चिकीत्‍सकेचा पूर्ण खर्च गैरअर्जदार क्र.1 यांनी परत केला पाहीजे या संदर्भात गैरअर्जदार क्र.1 यांचेशी संपर्क केला असता दि.29.09.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 यांना त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून निर्धारीत शुल्‍काविना जास्‍त घेतलेली रक्‍कम रु.15,906/- परत करण्‍याचे निर्देश दिले, परंतु अद्यापही गैरअर्जदारांनी सदरची रक्‍कम तक्रारकर्त्‍यास परत केली नाही.
8.          तक्रारकर्त्‍याने दि.30.07.2009 रोजी माहीती अधिकार अधिनियम 2005 चे अंतर्गत गैरअर्जदार क्र.1 यांना त्‍यांनी प्राधिकृत केलेल्‍या रुग्‍णालयांना सेवानिवृत्‍त अधिकारी (जे मेडिकल योजनेमधे समाविष्‍ट आहेत) त्‍यांचेकडून वे.को.फील्‍डने निर्धारीत दराप्रमाणे बिल घेण्‍यांत यावे असे परिपत्रक निर्गमीत केले किंवा नाही. या संदर्भात माहिती मागितली असता संबंधीत अधिका-याने दि.10.08.2009 च्‍या पत्राव्‍दारे गैरअर्जदाराकडून अशा आशयाचे परिपत्रक प्राधिकृत रुग्‍णालयांना कधीच पाठविण्‍यांत आले नाही, असे कळविण्‍यांत आले.
9.          वरील सर्व बाबी लक्षात घेता तक्रारकर्त्‍याने वारंवार मागणी करुनही गैरअर्जदारांनी सदरची उर्वरित रक्‍कम तक्रारकर्त्‍यास परत केली नाही ही गैरअर्जदारांची कृति सेवेतील कमतरता सेवेतील कमतरता असल्‍यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
 
10.         तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात दस्‍तावेज क्र.1 ते 18 च्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत.
11.         गैरअर्जदारांना प्रस्‍तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात उपस्थित झाले असुन त्‍यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
12.         गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्‍या कथनात तक्रारकर्ता हा त्‍यांचे सेवेत उच्‍चपदाधिकारी म्‍हणून सेवेत होता, ही बाब मान्‍य केलेली आहे. गैरअर्जदारांचे कथनानुसार तक्रारकर्ता हा त्‍यांचा ‘ग्राहक’ नाही. तसेच प्रस्‍तुत वाद हा कर्मचारी (सेवानिवृत्‍त) व प्रबंधन यांचेमधील वाद असल्‍यामतुळे इथे उभयपक्षामधे ग्राहक व विक्रेता असे संबंध नसल्‍यामुळे सदरची तक्रार या न्‍याय मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात नसल्‍यामुळे सदरची तक्रार चालविण्‍याचा या मंचाला अधिकार नाही, या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ गैरअर्जदारांनी काही निवाडयांचा उल्‍लेख केलेला आहे.
13.         वरील सर्व बाबी लक्षात घेता सदर वाद योग्‍य तया न्‍याय प्राधिकरणापुढे सोडविण्‍यांत यावे असे आदेश देऊन सदरची तक्रार कॉस्‍टसह खारिज करण्‍यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
14.        गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्‍या कथनात तक्रारकर्त्‍याने उल्‍लेख केलेल्‍या डॉ. मिश्रा यांनी दिलेल्‍या आवश्‍यक पत्राच्‍या आधारावर त्‍यांचे रुग्‍णालयात भरती केल्‍याचे म्‍हणणे, तसेच इतर आरोप नाकारलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांच्‍या कथनानुसार तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र.1 वेस्‍टर्न कोल्‍ड फिल्‍डच्‍या विहीत नमुनयातील Referred Letter Form “B”  आणला नव्‍हता. जेव्‍हा ही सदर फॉर्म वेस्‍टर्न कोल्‍ड फिल्‍डचा आंतररुग्‍ण म्‍हणून भरती करण्‍याकरीता अनिवार्य आहे, तसेच या पत्राची पूर्तता तक्रारकर्त्‍याने अद्यापही केलेली नाही. त्‍यामुळे त्‍यांचा वेस्‍टर्न कोल्‍ड फिल्‍डचे रुग्‍ण म्‍हणून भरती करण्‍यांत आले नाही, तर खाजगी रुग्‍ण म्‍हणून भरती करण्‍यांत आले. त्‍यात उपचार पूर्ण झाल्‍यानंतर दि.26.12.2008 रोजी तक्रारकर्त्‍यास डिस्‍चार्ज देण्‍यांत आला, यासंबंधाने आलेल्‍या खर्चापोटी आकारण्‍यांत आलेले रु.45,899.66 चे बिल व रशिदा दि.14.02.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडे सदरची रक्‍कम मिळण्‍यासाठी जमा केल्‍या. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍यास हे ही सुचित करण्‍यांत आले की, तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र.1 यांच्‍या अधिकृत अधिका-यांकडून योग्‍य आदेश आणल्‍यास खाजगी व वेस्‍टर्न कोल्‍ड फिल्‍डचे दरातील फरक तक्रारकर्त्‍यास परत करण्‍यांत येईल. तसे कुठलेही पत्र वा आदेश तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र.2 यांना दिले नाही.
15.         गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्‍यास वेस्‍टर्न कोल्‍ड फिल्‍डच्‍या सेवानिवृत्‍त अधिका-यांच्‍या योजने अंतर्गत समावेश असल्‍याचे दि.19.05.2009 रोजी कळविले, या पत्राच्‍या संबंधाने गैरअर्जदार क्र.2 यांनी दि.27.05.2009 रोजी तक्रारकर्त्‍यास वेस्‍टर्न कोल्‍ड फिल्‍डचे रुग्‍ण म्‍हणून भरती करण्‍यांत आले नव्‍हते. कारण त्‍याने गैरअर्जदारांच्‍या विहीत नमुन्‍यातील Referred Letter Form “B”  आवश्‍यक असतांनाही परत पाठविला नव्‍हता. गैरअर्जदारी क्र.2 यांच्‍या कथनानुसार ते गैरअर्जदार क्र.1 यांच्‍या पॅनलवर आहे, त्‍यामुळे ते वैद्यकीय सेवा देण्‍यांस कटिबध्‍द असुन तक्रारकर्ता त्‍यांचा ‘ग्राहक’ नसल्‍याचे नमुद केले आहे.
16.         गैरअर्जदारांच्‍या कथनानुसार तक्रारकर्त्‍याने निशाणी क्र. XI वर दाखल केलेल्‍या दस्‍तावेजानुसार तक्रारकर्ता हा वेस्‍टर्न कोल्‍ड फिल्‍डच्‍या कर्मचा-यांना लागणा-या दराच्‍या कक्षेत येत नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदार क्र.1 यांचा कर्मचारी म्‍हणून कुठल्‍याही प्रकारची सवलत देण्‍यांत आली नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी Dy. Chief Medical Officer. W.C.L., यांना तसे पत्र देण्‍याचे अधिकार असल्‍याचे कुठेही नमुद केले नाही. तसेच सदरचे पत्रात उभय पक्षामधे कुठलाही करार असल्‍याचे देखील नमुद केले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास सदर फरकाची रक्‍कम रु.45,899.66/- परत करण्‍यांत आली नाही. त्‍यांनी कुठलीही सेवेत त्रुटी दिलेली नसल्‍यामुळे सदरची तक्रार खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
17.         सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्‍तीवादाकरीता दि.07.01.2012 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.2 चे वकीलांचा मंचाने त्‍यांचा युक्तिवाद ऐकला  गैरअर्जदार क्र.1 गैरहजर. तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचले.
 
                     -// नि ष्‍क र्ष //-
 
18.         गैरअर्जदारांच्‍या मते तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचेमधे ग्राहक व विक्रेता संबंध नाही तर संबंधीत वाद हा कर्मचारी व प्रबंधक यांचेमधील वाद असल्‍यामुळे या मंचाला सदरची तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. परंतु तक्रारकर्त्‍याने घेतलेली सेवा ही सर्व्‍हीस कंडीशनच्‍या संदर्भात घेतलेली सेवा असुन गैरअर्जदारांनी सुरु केलेल्‍या मेडिकेअर स्‍कीम योजने अंतर्गत घेतलेली सेवा आहे व ही सेवा ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ‘सेवा’ या संज्ञेत येते, असे या मंचाचे मत आहे.
 
19.         प्रस्‍तुत तक्रारीतील वस्‍तुस्थिती तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता निर्वीवादपणे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा सेवानिवृत्‍त अधिकारी होता. तसेच दस्‍तावेज क्र.13 वरील दस्‍तावेजानुसार गेरअर्जदारांचा सेवानिवृत्‍त अधि‍कारी यांना लागु करण्‍यांत आलेल्‍या कॉन्‍ट्रीब्‍युटरी पोष्‍ट रिटायरमेंट केडिकेअर स्किम फॉर एन्‍झीक्‍युटीव्‍ह ऑफ इंडिया या योजनेत रु.40,000/- गैरअर्जदारांना अदा करुन तक्रारकर्ता सभासद सामील होता.
 
20.         निर्वीवादपणे तक्रारकर्ता दि.16.12.2008 ते 26.12.2008 या कालावधीकरीता गैरअर्जदार क्र.2 यांच्‍या रुग्‍णालयात भरती होता. तसेच सदर विकित्‍सेच्‍या खर्चापोटी तक्रारकर्त्‍याला रु.45,899.66/- एवढे बिल आकारण्‍यात आले, जे तक्रारकर्त्‍याने स्‍वतः चुकते केले. तक्रारकर्त्‍याचे मते सदरचे बिल हे खाजगी दराने आकारण्‍यांत आले, वास्‍तविक सदरचे बिल हे गैरअर्जदार क्र.1 यांनी निर्धारित केलेल्‍या दरानुसार आकारावयास हवे होते, या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ तक्रारकर्त्‍याने सदर योजनेचे दस्‍तावेज व गैरअर्जदारांशी तक्रारकर्त्‍याने केलेला पत्रव्‍यवहार व त्‍याला गैरअर्जदारांनी दिलेले उत्‍तर व इतर दस्‍तावेज सादर केलेले आहेत.
21.         गैरअर्जदारांच्‍या मते तक्रारकर्त्‍याने तक्रारकर्त्‍याने रुग्‍णालयात भरती होण्‍यापुर्वी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून विहीत नमुण्‍यातील Referred Letter Form “B” भरुन आणला नाही, जो की गैरअर्जदारांचा रुग्‍ण म्‍हणून सेवा देणे आवश्‍यक आहे. तक्रारकर्त्‍याने दिलेले डॉ. गुप्‍ता व डॉ. मिश्रा यांचे पिस्‍क्रीप्‍शन हे Referred Letter  नसल्‍याचे नमुद केले आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने तो गैरअर्जदारांचा अधिकृतरित्‍या लाभधारक आहे यासाठी कुठलेही दस्‍तावेज सादर केले नाही. तसेच गैरअर्जदार क्र.1 वेस्‍टर्न कोल्‍ड फिल्‍डचा सेवानिवृत्‍त व 2 यांच्‍यात सेवानिवृत्‍त अधिका-याशी संबंधीत करार गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्‍यात नसल्‍याने गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारकर्त्‍यास लावलेले रुग्‍ण दर बरोबर आहे. तर गैरअर्जदार क्र.1 यांनी सदरच्‍या तक्रारी संदर्भात मंचास अधिकार नसल्‍याचे प्राथमीक आक्षेप घेतलेला आहे.
22.         वरील सर्व बाबी लक्षात घेता मंचाच्‍या विचारार्थ हे मुद्दे येतात की....
       1.  गैरअर्जदार क्र.1 यांच्‍या कर्मचा-यांना गैरअर्जदारांच्‍या पॅनलवरी हॉस्‍पीटलमधे
            लावण्‍यात येणारा दर हा खाजगी दरानुसार न लावता गैरअर्जदार क्र.1
            यांनी निर्धारीत केलेल्‍या दरानुसार लावावा या संदर्भात गैरअर्जदार क्र.1 व
            2 यामधे कुठला करार आहे का ?
2.                  चिकित्‍सेचा खर्च देण्‍याची जबाबदारी कोणाची ?
 
23.         दस्‍तावेज क्र.2 वरुन या मंचाच्‍या असे निदर्शनास येते की, कॉन्‍ट्रीब्‍युटरी पोस्‍ट रिटायरमेंट मेडिकेअर स्किम फॉर एक्‍झीक्‍युटीव्‍ह ऑफ कोल इंडिया लि. त्‍यांच्‍या सेवानिवृत्‍त झालेल्‍या एक्‍झीक्‍युटीव्‍ह/ अधिकारीकरीता जे या योजनेचे सभासद झाले त्‍यांच्‍याकरीता लागु केलेली होती. त्‍याचप्रमाणे सदर योजनेच्‍या अट नं.3.2.1 नुसार गैरअर्जदार क्र.1 कडून सदर योजनेच्‍या सभासदाला मान्‍यताप्राप्‍त रुग्‍णालयात उपचारासाठी भरती झाल्‍यास चिकित्‍सेचा खर्च देण्‍याचे प्रावधान आहे. तसेच दाखल दस्‍तावेजांवरुन हेही दिसुन येते की, गैरअर्जदार क्र.2 हे हॉस्‍पीटल गैरअर्जदार क्र.1 यांचे पॅनलवरील मान्‍यताप्राप्‍त रुग्‍णालय आहे.
24.         गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍यांच्‍या शपथेवरील जबाबात मान्‍य केलेले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्‍यामधे कोणत्‍याही प्रकारचा वे.को.फिल्‍डच्‍या सेवानिवृत्‍त अधिका-यांशी संबंधी करार नसल्‍याने गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारकर्त्‍यास खाजगी दर लावलेले आहे व यापोटी त्‍यांनी दस्‍तावेज 3.11 चा आधार घेतलेला आहे.
25.         तक्रारकर्त्‍याने माहितीच्‍या अधिकार अधिनियम 2005 च्‍या अंतर्गत माहिती मागितली त्‍या संदर्भात गैरअर्जदारांच्‍या उपमुख्‍य चिकित्‍सा अधिकारी यांनी दि.05.08.2009 रोजीचे पाठविलेले पत्र सीएमएस/143 (दस्‍तावेज क्र.11) ज्‍यामधे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, “There is no circular issued to panel hospitals to charge WCL rates of treatment to retired executives during the period 1998-99 issued by D(P)/Medical Department in our office correspondence files”.
 
                        तसेच गैरअर्जदार क्र.2 हॉस्‍पीटलने गैरअर्जदार क्र.1 यांच्‍या सेवानिवृत्‍त अधिकका-यांसाठी लागु केलेल्‍या योजने अंतर्गत सदस्‍यांना गैरअर्जदार क्र.1 यांनी निर्धारित केलेल्‍या दरानुसार बिल आकारावयास हवे या संदर्भात कुठलाही करार झाल्‍याचे किंवा तसे ठरल्‍याचे उभय पक्षांत ठरल्‍याचे दाखल दस्‍तावेजांवरुन दिसुन ये नाही. एवढेच नव्‍हेतर सदरची योजना ही गैरअर्जदार क्र.1 यांनी सुरु केली असुन त्‍या अंतर्गत चिकित्‍सा खर्चाची परतफेड करण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 यांनी स्विकारलेली दिसुन येते. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी केवळ एक पत्र देऊन सदर फरकाची रक्‍कम देण्‍याची गैरअर्जदार क्र.1 यांना सुचना केली म्‍हणून सदर रक्‍कम गैरअर्जदार क्र.2 यांना परत करण्‍याचा आदेश हे मंच करु शकत नाही.
26.         तसेच सदर योजने अंतर्गत मेडिकल बिलाच्‍या रकमेची परतफेड करण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 यांनी स्विकारलेली आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने उर्वरित परतफेड रकमेची केलेली मागणी चुक आहे असेही गैरअर्जदार क्र.1 यांचे कथन नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास आलेल्‍या एकूण चिकित्‍सेच्‍या खर्चाची रक्‍कम रु.45,999.86/- पैकी केवळ रु.29,993/- एवढया रकमेची कुठलेही कारण न देता परतफेड करण्‍याची कृति निश्चितच गैरअर्जदार क्र.1 यांची सेवेतील कमतरता आहे.
 
27.         वरील वस्‍तुनिष्‍ठ परिस्थिती पाहता गैरअर्जदार क्र.1 हे तक्रारकतर्याच्‍या बिलाच्‍या रकमेची फरकाची रक्‍कम रु.15,707/- तक्रारकर्त्‍यास देण्‍यांस जबाबदार आहे. वास्‍तविक सदर योजनेच्‍या कलम 6.2 (अ) नुसार दावा जमा करण्‍यापासुन 45 दिवसाच्‍या आंत गैरअर्जदारांनी सदर दाव्‍याचा निकाल लावणे आवश्‍यक होते. असे असतांना एकूण रक्‍कम जमा न करता काही रक्‍कम जवळपास दहा महीन्‍यांनंतर जमा करणे व तक्रारकर्ता पूर्ण रकमेचा अधिकारी असतांना उर्वरित रक्‍कम तक्रारकर्त्‍यास न देता केवळ त्‍यास गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेमधे अडकून ठेवणे व आपली जबाबदारी झटकणे. तसेच लागु केलेल्‍या योजनेचे आपणच पालन न करणे ही गैरअर्जदार क्र.1 यांची कृति निश्चितच सेवेतील कमतरता आहे व ते त्‍याकरीता तक्रारकर्त्‍याचे नुकसान भरपाईस जबाबदार आहे, या निष्‍कर्षाप्रत हे मंच येते.
28.         गैरअर्जदार क्र.2 यांनी दिलेल्‍या सेवेत कुठलीही कमतरता दिसुन येत नाही, त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार पुराव्‍या अभावी खारिज होण्‍यांस पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
 
29.         वरील सर्व परिस्थिती पाहता गैरअर्जदारांनी तक्रारकत्‍याला कॉन्‍ट्रीब्‍युटरी पोस्‍ट रिटायरमेंट मेडिकेअर स्किम फॉर एक्‍झीक्‍युटीव्‍ह ऑफ कोल इंडिया लि. या योजने अंतर्गत उपचाराची रक्‍कम न देऊन सेवेत कमतरता दिलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येते.
 
            वरील सर्व बाबींचा विचार करता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत. 
 
      -// अं ति म आ दे श //-
 
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदार क्र.1 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास रु.15,909/-       एवढी रक्‍कम द्यावी. सदर रकमेवर दि.01.04.2009 पासुन ते रक्‍कम मिळेपर्यंत      द.सा.द.शे. 9% व्‍याजासह परत करावी.
3.    गैरअर्जदार क्र.1 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या    शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/-       अदा करावे.
4.    गैरअर्जदार क्र.2 विरुध्‍द कुठलाही आदेश नाही.
5.    वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30       दिवसांचे आत करावे.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.