Maharashtra

Nagpur

EA/180/2017

Manohar Mahadeorao Medhekar - Complainant(s)

Versus

Wasankar Wealth Management , Through Chief Executive Officer - Opp.Party(s)

MS. GEETA R. BADWAIK

05 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Execution Application No. EA/180/2017
( Date of Filing : 29 Dec 2017 )
In
Complaint Case No. CC/155/2015
 
1. Manohar Mahadeorao Medhekar
R/O. 35-B, TAPOWAN COMPLEX, SOMALWADA, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Appellant(s)
Versus
1. Wasankar Wealth Management , Through Chief Executive Officer
247, Wasankar House, Nina Apartment, Hill Road, SHIVAJI NAGAR, Nagpur
NAGPUR
MAHARASHTRA
2. Prashant Jaydev Wasankar, Manager- Wasankar Wealth Management Ltd.
247, Wasankar House, Nina Apartment, Hill Road, SHIVAJI NAGAR, Nagpur
NAGPUR
MAHARASHTRA
3. Vinay Jaydev Wasankar, Director - Wasankar Wealth Management Ltd.
247, Wasankar House, Nina Apartment, Hill Road, SHIVAJI NAGAR, Nagpur
NAGPUR
MAHARASHTRA
4. Abhijit Jayant Choudhari, Director - Wasankar Wealth Management Ltd.
247, Wasankar House, Nina Apartment, Hill Road, SHIVAJI NAGAR, Nagpur
NAGPUR
MAHARASHTRA
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 05 Mar 2020
Final Order / Judgement

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये -

  1. प्रस्‍तुत दरखास्‍त गैरअर्जदार यांचे विरुध्‍द त्‍याने मंचाच्‍या आदेशाचे पालन केले नाही म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा १९८६  च्‍या कलम २५ अंतर्गत दाखल केली आहे.
  2. अर्जदाराने गैरअर्जदार विरुध्‍द ग्राहक तक्रार क्रमांक १५५/२०१५ मंचात दाखल केली होती. त्‍या  तक्रारीमध्‍ये मंचाने दिनांक २२/१२/२०१५ ला आदेश पारित करुन अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करतांना गैरअर्जदारांनी अर्जदाराला रुपये १,२५,०००/-, दिनांक १७/१०/२०१२ पासुन ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याज व रुपये ४,००,०००/- व त्‍यावर दिनांक २०/१०/२०१२ पासुन ते रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याज दराने व्‍याज व रक्‍कम रुपये १,००,०००/- वर दिनांक ३/११/२०१२ पासुन द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याज द्यावे त्‍याचप्रमाणे अर्जदाराला मानसिक,  शारीरिक व आर्थिक ञासाकरीता रुपये २५,०००/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रुपये १५,०००/- द्यावे असा आदेश होता व सदरच्‍या आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्‍याच्‍या दिनांकापासून एक महिन्‍याचे आत करावयाची होती.
  3. मंचाने तक्रार क्रमांक १५५/२०१५ मध्‍ये दिनांक २२/१२/२०१५ रोजी पारित केलेल्‍या आदेशाप्रमाणे विरुध्‍द पक्षाने ३० दिवसाच्‍या मुदतीत पालन केले नाही आणि मंचाचे आदेशाची अवमानना केली. त्‍यामुळे अर्जदाराने प्रस्‍तुत दरखास्‍त मंचासमोर दाखल केली.
  4. अर्जदाराने सदर दरखास्‍त अर्ज दाखल करुन दिनांक २२/१२/२०१५ रोजीच्‍या  मंचाच्‍या मुळ आदेशाचे पालन करण्‍याकरिता तसेच दरखास्‍त अर्जात मागणी केलेल्‍या रुपये १,२५,०००/-, दिनांक १७/१०/२०१२ पासुन ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याज व रुपये ४,००,०००/- व त्‍यावर दिनांक २०/१०/२०१२ पासुन ते रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याज दराने व्‍याज व रक्‍कम रुपये १,००,०००/- वर दिनांक ३/११/२०१२ पासुन द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याज द्यावे त्‍याचप्रमाणे अर्जदाराला  मानसिक,  शारीरिक व आर्थिक ञासाकरीता रुपये २५,०००/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रुपये १५,०००/- द्यावे असा आदेश मंचाव्‍दारे पारित करण्‍यात आला होता. त्‍यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारांकडुन वसुली प्रमाणपत्र देण्‍याची मागणी केली किंवा महाराष्‍ट्र जमीन महसूल कायद्याच्‍या कलम ४२१ प्रमाणे विरुध्‍द  पक्षाच्‍या संपत्‍तीची / सामांनाची विक्री करुन अर्जदाराची रक्‍कम वसूल करुन देण्‍यात यावी अशी मागणी केली. 
  5. अर्जदाराची दरखास्‍त दाखल झाल्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक १ ते ४ यांना मंचामार्फत नोटीस बजाविण्‍यात आली होती. परंतु गैरअर्जदार मंचात उपस्थित झाले नाही किंवा त्‍यांनी आपले म्‍हणणे सुद्धा दाखल केले नाही त्‍यामुळे गैरअर्जदार क्रमांक १,३ व ४ यांचे विरुध्‍द दिनांक ०६/०५/२०१९ रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला व गैरअर्जदार क्रमांक २  हजर होऊनसुद्धा त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केला नाही. करीता गैरअर्जदार क्रमांक २ यांचे विरुध्‍द दिनांक ३०/०८/२०१९ रोजी बिना लेखी जबाब शिवाय प्रकरण पुढे चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  6. या मंचाद्वारे दिनांक २२/१२/२०१५ रोजी पारित झालेल्‍या आदेशाची अंमलबजावणी करण्‍याकरिता गैरअर्जदार क्रमांक १ ते ४ यांच्‍या चल/अचल मालमत्‍ते मधून जमीन महसूलाच्‍या थकबाकी वसुली पध्‍दती प्रमाणे वसुली करण्‍याकरिता जिल्‍हाधिकारी यांना  खालीलप्रमाणे आदेश देण्‍यात येते. 

         सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. अर्जदाराचा दरखास्‍त अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
  2. जिल्‍हा दंडाधिकारी यांनी गैरअर्जदार क्रमांक १ ते ४ यांच्‍या चल/अचल मालमत्‍ते मधून जमीन महसूलाच्‍या थकबाकी वसुली पध्‍दती प्रमाणे रक्‍कम रुपये रुपये १,२५,०००/-, व त्‍यावर दिनांक १७/१०/२०१२ पासुन ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याज, रुपये ४,००,०००/- व त्‍यावर दिनांक २०/१०/२०१२ पासुन ते रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याज व रक्‍कम रुपये १,००,०००/- व त्‍यावर दिनांक ३/११/२०१२ पासुन द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याज द्यावे. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याला मानसिक, आर्थिक शारीरिक ञासाकरीता रुपये २५,०००/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रुपये १५,०००/- गैरअर्जदारांकडुन वसूल करुन अर्जदारास द्यावा.  
  3. जिल्‍हा दंडाधिकारी, नागपूर यांनी सदरच्‍या आदेशाप्रमाणे वसुली संबंधी योग्‍य ती कार्यवाही करुन त्‍याचा अहवाल जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर यांच्‍याकडे पाठवावा.
  4. प्रबंधक, जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी मंचाचे आदेशाप्रमाणे रक्‍कम वसुलीकरिता जिल्‍हा दंडाधिकारी, नागपूर यांच्‍याकडे विहित नमुन्‍यातील वसुलीचे प्रमाणपत्र पाठवावे.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.