(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून वाहन कर्ज घेतले असून, कर्जफेडीचे थकलेले हप्ते नियमितपणे भरण्यास तयार आहेत. गैरअर्जदार यांनी ही मागणी मान्य न करता वाहन जप्त केले, म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. (2) त.क.868/09 अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून 2,53,000/- रुपयाचे वाहन कर्ज घेतले. सुरुवातीचे काही हप्ते भरल्यानंतर मुलीच्या लग्नामुळे काही हप्ते भरु शकले नाहीत. वाहनास अपघात झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी संगनमताने विमा रक्कम न घेता, त्यांना 8,771/- रुपये भरण्यास भाग पाडले. थकीत हप्त्याची रक्कम भरण्यास तयार असतानाही गैरअर्जदार यांनी सदरील वाहन जप्त केले असून, ते वाहन विक्री करण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. योग्य तो न्याय देण्याची मागणी अर्जदाराने मंचास केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने सदरील वाहन कमर्शियल कारणासाठी विकत घेतले असल्यामुळे त्यांना ग्राहक म्हणता येत नाही. अर्जदाराच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर दुरुस्तीचे 8,771/- रुपयाचे बिल त्यांना देण्यात आले. सदरील रक्कम इन्शुरन्स कंपनीकडून किंवा अर्जदाराने भरावी, याच्याशी त्यांचा संबंध येत नाही. कर्ज फेडणे, वाहन जप्ती या बाबीही त्यांच्याशी संबंधीत नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने वाहनाचा कमर्शियल वापर करण्यासाठी त्यांच्याकडून कर्ज घेतले. दि.27.07.2009 रोजी अर्जदाराच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्यांनी क्लेम फॉर्म दाखल केला नाही व विमा रकमेची मागणी केली नाही. अर्जदाराने, वाहन दुरुस्तीचे 8,771/- रुपये भरु शकत नसल्याचे कळविल्यामुळे त्यांनी ही रक्कम गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे भरली आहे. दि.15.02.2010 पर्यंत अर्जदाराकडे 1,05,155/- रुपये थकबाकी असून, अर्जदाराने स्वतःच वाहन त्यांच्या ताब्यात दिले असल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून वाहन कर्ज घेतले आहे. गैरअर्जदार क्र.1 हे या वाहनाचे उत्पादक आहेत. सदरील वाहनाचा क्रमांक एम.एच.20 ए.टी. 7652 असा असल्याचे वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरुन दिसून येते. अर्जदाराने सदरील वाहन राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य जनजागृती अभियान योजनेत व्यापारी तत्वावर दिले असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ, हे वाहन व्यापारी कारणासाठी वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट होते. दि.27.07.2009 रोजी वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्याबाबत कोणतीही माहिती किंवा क्लेम फॉर्म त्यांनी गैरअर्जदार क्र.2 (3) त.क्र.868/09 यांच्याकडे दिल्याचा पुरावा मंचात दाखल केलेला नाही. त्याचप्रमाणे कर्जफेडीचे हप्ते नियमितपणे भरले नसल्याचे अर्जदाराने आपल्या तक्रारीत मान्य केले आहे. वरील सर्व बाबीवरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास देण्यात येणा-या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र.1 यांचा कर्जफेडीबाबत, तसेच वाहन परत करण्याबाबत संबंध येत नाही. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |