Maharashtra

Nagpur

CC/10/395

Ramsakha Ramshankarji Shukla - Complainant(s)

Versus

Wardhman Urban Co-op. Bank Ltd. - Opp.Party(s)

Adv. A.P.J.P. Dubey

13 Apr 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/395
1. Ramsakha Ramshankarji ShuklaNagpurNagpurMAHARASHTRA ...........Appellant(s)

Versus.
1. Wardhman Urban Co-op. Bank Ltd.NagpurNagpurMAHARASHTRA2. MANAGER, I.D.B.I. BANK LTD. CIVIL LINE, NAGPURNAGPURMAHARASHTRA3. MANAGER, I.D.B.I. BANK LTD.KOOL ROAD BRANCH, JALANDHAR JALANDHAR PUNJAB4. SENIOR POST MASTER,OFFICE OF THE SENIOR POST MASTER NAGPUR CITY, NAGPURNAGPURMAHARASHTRA ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 13 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये श्री. मिलिंद केदार, सदस्‍य
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 13/04/2011)
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्‍याची तक्रार अशी आहे की,  त्‍यांना जालंधर येथील श्री अशोककुमार यांचे नावाने रु.98,5550/- रकमेचे पाच अधिकोषीय धनादेश गैरअर्जदार क्र. 1 ला निर्गमित करण्‍याची विनंती केली. गैरअर्जदार क्र. 1 ने ते गैरअर्जदार क्र. 2 यांचेमार्फत गैरअर्जदार क्र. 3 यांचे शाखेत प्राप्‍त असणारे पाच अधिकोषीय धनादेश क्र. 253395 दि.22.11.2006 रु.19,975/-, 253394 रु.19,975/- दि.22.11.2006 चे 254052 रु.19,975/- व 254054 रु.19,975/- व 254053 रु. रु.19,975/- दि.27.11.2006 तक्रारकर्त्‍याला प्रदान केले. सदर पाचही धनादेश श्री. अशोक कुमार, 30-31, अमन नगर, इंडस्ट्रीयल एरीया, जालंधर येथे पाठविण्‍याकरीता टपाल पोच देयसह गैरअर्जदार क्र. 4 ची सेवा घेतली. परंतू सदर धनादेश हे गैरअर्जदार क्र. 1 ते 3 च्‍या दुर्लक्षाने व गैरअर्जदार क्र. 4 च्‍या निष्‍काळजीपणामुळे मे. योगेश ट्रेडींग कंपनी मेरठ, श्री. विनोदकुमार मुजफ्फरनगर यांचे खात्‍यात जमा झाले. तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार क्र. 4 ला याबाबत चौकशी करण्‍याकरीता विचारणा केली असता त्‍यांनी सदर अधिकोषीय धनादेश मार्गस्‍थ असतांना हरविले आहेत असे सांगितले. याबाबत तक्रारकर्त्‍याने सतत गैरअर्जदारांशी पत्रव्‍यवहार केला, परंतु आजतागायत त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे प्रकरणाची तसदी घेतली नाही. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ने कुठलीही पडताळणी न करता सदर धनादेश शोधन केले. तक्रारकर्त्‍यांच्‍या मते गैरअर्जदार क्र. 4 ने योग्‍य पत्‍यावर धनादेश दिले नाही व गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी त्‍याचे शोधन करतांना छाननी न करता कृती केलेली असल्‍याने त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी आहे व त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची रक्‍कम ही अन्‍य व्‍यक्‍तीला देय झालेली आहे, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार दाखल करुन विविध शिर्षकांतर्गत मागणी करुन रु.3,00,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.
2.    सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांना पाठविली असता त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले.
3.    गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी उत्‍तरामध्‍ये प्राथमिक आक्षेप उपस्थित करुन, सदर तक्रार ही कालबाह्य असल्‍याचे नमूद केलेले आहे. तसेच धनादेशांचे शोधन हे मंचाचे कार्यक्षेत्राबाहेर झाल्‍याने मंचामध्‍ये सदर तक्रार चालू शकत नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने आधी एकाच धनादेशाची रक्‍कम न देण्‍याकरीता सांगितले व नंतर पाच धनादेशांचा उल्‍लेश केल्‍याने उर्वरित चार धनादेशांच्‍या शोधनाची जबाबदारी गैरअर्जदार क्र. 1 वर येत नाही. निगोशिएबल इंस्‍ट्रुमेंट एक्‍ट, कलम 10 अन्‍वये धनादेशाचे शोधन करणा-यांवर सदर जबाबदारी येते.
 
      गैरअर्जदार क्र. 1 ने आपल्‍या परिच्‍छेदनिहाय उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्त्‍याचे मागणीप्रमाणे अधिकोषीय धनादेश श्री अशोककुमार यांचे नावे तयार करुन दिल्‍याची बाब मान्‍य केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने धनादेश प्राप्‍त झाल्‍यानंतर 50 दिवसांनंतर धनादेशाचे भुगतान थांबविण्‍याकरीता आवेदन पत्र दिले होते. परंतू गैरअर्जदार क्र. 2 ला याबाबत जेव्‍हा सुचित केले, तेव्‍हा सदर धनादेशाचे भुगतान आधिच झालेले होते.
 
      अधिकच्‍या उत्‍तरात गैरअर्जदार क्र. 1 ने नमूद केले आहे की, ते अधिकोषीय धनादेश हे लोकांच्‍या मागणीनुसार, आय.डी.बी.आय. बँकेतर्फे त्‍यांना Payable at Par सुविधा दिल्‍याने, ते बनवून देतात. तक्रारकर्त्‍याच्‍या मागणीनुसार त्‍यांनी सदर अधिकोषीय धनादेश दिले. पुढे हे धनादेश अन्‍य व्‍यक्‍तीच्‍या खात्‍यात शोधन झाल्‍याने उद्भवलेल्‍या प्रकरणात गैरअर्जदार क्र. 1 दोषी ठरत नाही व न्‍यायालयीन कारवाईला पात्र नाही. तक्रारकर्त्‍याला सदर प्रकरणी गैरअर्जदार क्र. 1 ने संपूर्ण मदत केलेली असल्‍याने सदर तक्रार त्‍यांच्‍याविरुध्‍द खोटी दाखल करण्‍यात आल्‍याचे नमूद केलेले आहे. तसेच तक्रारकर्त्‍याचे इतर सर्व म्‍हणणे नाकारुन, तक्रार कालबाह्य असल्‍याने खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.
 
4.    गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने आपल्‍या उत्‍तरात प्राथमिक आक्षेपामध्‍ये नमूद केले आहे की, तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍याकडून सेवा घेतलेली नसल्‍याने तक्रारकर्ता ग्राहक संज्ञेत येत नाही. तक्रार कालबाह्य आहे. त्‍याच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. आपल्‍या परिच्‍छेदनिहाय उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्त्‍याचे संपूर्ण म्‍हणणे अमान्‍य केले आहे आणि सदर प्रकरण खारीज करण्‍याची विनंती केली आहे.
 
5.    गैरअर्जदार क्र. 4 ने लेखी उत्‍तरात ही बाब मान्‍य केली आहे की, तक्रारकर्त्‍याने रजिस्‍टर पत्र पाठविले होते, परंतू त्‍यात कुठले कागदपत्र होते हे तपासून पाहण्‍याची तरतूद त्‍यांच्‍या नियमावलीत नसल्याने तक्रारकर्त्‍याचे त्‍याबाबत म्‍हणणे नाकारले आहे. तक्रारकर्त्‍याने जेव्‍हा त्‍यांच्‍याकडे तक्रार केली, त्‍यासोबत रजिस्‍टरची मुळ पावती किंवा झेरॉक्‍स प्रत दाखल केली नाही, त्‍यामुळे प्राप्‍तकर्त्‍यांचे नाव व पत्‍ता तपासता आला नाही. संबंधित डिलीवरी ऑफिस/जालंधर-4 पोस्‍ट ऑफिसला याबाबत चौकशी केली असता त्‍यांना रजिस्‍टर पत्र प्राप्‍त झाले नाही असे कळविण्‍यात आले व तसे उत्‍तर तक्रारकर्त्‍याला दि.07.02.2007 ला पाठविण्‍यात आले. सदर रजिस्‍टर पत्र गहाळ झाल्‍याची सुचना दिल्‍याबरोबर तक्रारकर्त्‍याने संपूर्ण धनादेशांचे पेमेंट थांबविले पाहिजे होते. परंतू तक्रारकर्त्‍याने तशी कारवाई केली नाही. त्‍यानंतर तीन वर्षाच्‍या कालावधीनंतर स्‍मरण पत्र पाठविले. इंडियन पोस्‍ट ऍक्‍ट 1898 च्‍या सेक्‍शन 6 प्रमाणे कोणतेही पोस्‍टर आर्टीकल किंवा रजिस्‍टर पत्र गहाळ झाल्‍यास पोस्‍ट ऑफिस जबाबदार राहत नाही. तसेच त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार ही कालबाह्य असल्‍याचे नमूद करुन तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली आहे.
6.    सदर तक्रार मंचासमोर युक्‍तीवादाकरीता दि.30.03.2011 रोजी आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकीलांमार्फत ऐकला. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी पुरसिस दाखल करुन त्‍यांचा लेखी जवाब हा लेखी युक्‍तीवाद समजण्‍यात यावा असे नमूद केले. गैरअर्जदार क्र. 1 व 4 ने लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
7.    तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 मार्फत गैरअर्जदार क्र. 2 आणि 3 अधिकोषीय धनादेश घेतले होते व सदर अधिकोषीय धनादेश हे गैरअर्जदार क्र. 3 यांचे येथे शोधन प्रदानकरीता व गैरअर्जदार क्र. 4 यांचे डाकेमार्फत पाठविला होता ही बाब मंचासमक्ष दाखल दस्‍तऐवज व कथनावरुन स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 1 ते 4 चा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. कारण तक्रारकर्त्‍याने धनादेशाकरीता गैरअर्जदार क्र. 1 यांना रु.98,550/- दिले होते व गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्‍यांची शाखा जालंधर येथे नसल्‍यामुळे आय.डी.बी.आय.बँकेमार्फत गैरअर्जदार क्र. 2 नागपूर मार्फत सदर अधिकोषीय धनादेश तक्रारकर्त्‍यास प्राप्‍त करुन दिले होते व ते धनादेश गैरअर्जदार क्र. 2 ची दुसरी शाखा आय.डी.बी.आय.बँक लिमिटेड येथे शोधन प्रदान होते. या व्‍यवहाराकरीता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना तक्रारकर्त्‍याकडून कमिशन मिळाले होते व त्‍यांनी सेवा दिलेली होती आणि ते धनादेश गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडे शोधन प्रदान असल्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 3 ने सेवा दिल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा त्‍यांचा ग्राहक ठरतो. तसेच सदर धनादेशाची डाक गैरअर्जदार क्र. 4 मार्फत पाठविली होती ही बाबसुध्‍दा दस्‍तऐवजांवरुन स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र. 4 चा ग्राहक ठरतो.
 
8.    सदर प्रकरणामध्‍ये तक्रारकर्त्‍याने पाठविलेली डाक ही गैरअर्जदार क्र. 4 मार्फत पाठविली होती व ती डाक जालंधर येथील कार्यालयाला प्राप्‍त झालेली नाही. याबाबत तक्रारकर्त्‍यास गैरअर्जदार क्र. 4 ने 07.02.2007 ला कळविल्‍याचे गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवज क्र. 1, पृष्‍ठ क्र. 69 वरुन स्‍पष्‍ट होते व ही बाब तक्रारकर्त्‍याचे कथनावरुन सुध्‍दा स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 4 विरुध्‍दची कोणतीही तक्रार करावयाची असल्‍यास, तेव्‍हापासून तक्रारकर्त्‍याने दोन वर्षाच्‍या आत करणे गरजेचे होते. परंतू तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ही गैरअर्जदार क्र. 4 विरुध्‍द तीन वर्षानंतर केलेली असल्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 4 विरुध्‍दची आक्षेप व तक्रार ही कालबाह्य ठरते.
9.    सदर प्रकरणामध्‍ये गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडून अधिकोषीय धनादेश तक्रारकर्त्‍याला श्री. अशोक कुमार जालंधर यांचे नावाने देण्‍यात आले होते. त्‍याकरीता दस्‍तऐवज क्र. 1 ते 5 मंचासमक्ष दाखल करण्‍यात आलेले आहेत. या सर्व धनादेशांचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये अशोककुमार यांचे नाव खोडाखाड करुन मे. योगेश ट्रेडिंग कंपनी व विनोद कुमार असे लिहिले आहे. जर अधिकोषीय धनादेश खोडाखाड झालेले होते व ती साध्‍या डोळयांनी दिसण्‍या सारखी असतांना अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र. 3 यांनी सदर अधिकोषीय धनादेशांचे शोधन करण्‍यापूर्वी गैरअर्जदार क्र. 2 यांचेशी संपर्क साधावयास पाहिजे होता. परंतू त्‍यांनी तसे केले नाही. तसेच सदर नावात बदल केला, त्‍याठिकाणी सदर धनादेशांवर स्‍वाक्षरी असणे गरजेचे होते व ती दोन्‍ही बाजूने असणे आवश्‍यक होते. तरीहीसुध्‍दा गैरअर्जदार क्र. 3 यांनी योग्‍य रीतीने निरीक्षण केले नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.
 
10.   सदर प्रकरणामध्‍ये गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ने सदर प्रकरण हे कालबाह्य असल्‍याचे नमूद केले आहे. सदर अधिकोषीय धनादेशांचे शोधन हे दुस-या व्‍यक्‍तीला केल्‍या गेल्‍याबद्दलची माहिती तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदार क्र. 1 मार्फत 08.03.2010 ला दिली. त्‍यामध्‍ये सदर अधिकोषीय धनादेशांचे अन्‍य व्‍यक्‍तीस भुगतान झाल्‍याची कल्‍पना दि.08.03.2010 ला तक्रारकर्त्‍याला मिळाली. त्‍या दिवसापासून ख-या अर्थाने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 च्‍या विरुध्‍द तक्रारीचे कारण सुरु झाले आणि त्‍या अनुषंगाने सदर तक्रार ही कालातीत असल्‍याचे मंचाचे मत आहे.
11.    सदर प्रकरणामध्‍ये गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्‍याला जी सेवा दिली, त्‍यामध्‍ये गैरअर्जदार क्र. 2 कडून अधिकोषीय धनादेश प्राप्‍त करुन घेतले व तक्रारकर्त्‍याने जेव्‍हा गैरअर्जदार क्र. 1 यांना सदर धनादेशांचे भुगतान थांबविण्‍याची विनंती केली तेव्‍हा त्‍याबाबतची कारवाईसुध्‍दा गैरअर्जदार क्र. 1 यांनी तत्‍परतेने केली असून तशी गैरअर्जदार क्र. 2 यांना सुचना दिली. परंतू तत्‍पूर्वीच गैरअर्जदारा क्र. 2 ची शाखा असलेले गैरअर्जदार क्र. 3 ने सदर अधिकोषीय धनादेशांचे भुगतान केले होते. त्‍यामुळे सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र. 1 ची तशी त्रुटी आढळून येत नाही व त्‍यांनी आपल्‍या सेवेत कसूर केलेला नाही.
 
12.   गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 द्वारे तक्रारकर्त्‍याला अधिकोषीय धनादेश दिले होते ही बाब स्‍पष्‍ट आहे व ते धनादेश गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडे शोधन प्राप्‍त होते. गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे एकच बँकेची शाखा आहे. अशा परिस्थितीत जर अधिकोषीय धनादेशांमध्‍ये काही खोडाखाड असली तर त्‍याबाबतची चौकशी करणे हे गैरअर्जदार क्र. 3 चे कर्तव्‍य होते. ते त्‍यांनी केलेले नाही. तसेच सदर धनादेशांमध्‍ये केलेली खोडाखोड ही सकृतदर्शनी गैरकायदेशीर व हेतूपुरस्‍सरपणे केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे मंचाचे असे मत आहे की, सदर प्रकरणामध्‍ये गैरअर्जदार क्र. 2 व 3 या एकाच बँकेचे शाखा आहेत व त्‍यांनी सदर धनादेशाचे शोधन करतांना आवश्‍यक ती काळजी घेतली नाही ही त्‍यांच्‍या सेवेतील निष्‍काळजीपणा दर्शवितात आणि सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला ज्‍याला रक्‍कम द्यावयाची होती, त्‍या व्‍यक्‍तीस त्‍याचे शोधन होऊ शकले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे रु.98,550/- नुकसान झाले. त्‍याकरीता तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 2 व 3 कडून सदर रक्‍कम मिळण्‍यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे.
 
13.   सदर प्रकरणामध्‍ये तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्‍तव वाटत असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा न्‍यायोचितदृष्‍टया रु.10,000/- मिळण्‍यास पात्र ठरतो व तक्रारीच्‍या खर्चादाखल रु.3,000/- मिळण्‍यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. वरील सर्व निष्‍कर्षांचे आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला  रु.98,550/- ही रक्‍कम आदेश प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावी अन्‍यथा सदर रकमेवर द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याज देय राहील.
3)    गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक त्रासाकरीता    रु.10,000/- आणि तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- द्यावे.
4)    गैरअर्जदार क्र. 1 व 4 यांचेविरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
5)    सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने आदेश पारित  झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT