ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1047/2010
दाखल दिनांक. 12/08/2010
अंतीम आदेश दि. 21 /01 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
सोनजी श्रावण नेमाडे, तक्रारदार
उ.व. सज्ञान, धंदा – रिटायर्ड, (अॅड.अनिल नेमाडे)
रा. जळगांव, ता.जि. जळगांव
विरुध्द
वाणिज्य इन्व्हेस्टर्स-अर्बन को-ऑप सो.लि. सामनेवाला
जळगांव. ता.जि. जळगांव. (कोणीही नाही)
तर्फे सौ. रेखा शामकांत वाणी
उ.व. सज्ञान, धंदा – माहीत नाही
रा. जळगांव. ता.जि. जळगांव.
व इतर 12
निशाणी क्र. 01 वरील आदेश
मिलींद.सा.सोनवणे,अध्यक्ष–प्रस्तुत केसचे रेकॉर्ड पाहाता असे दिसून येते की, प्रस्तुत तक्रार दि. 12/08/2010 रोजी दाखल करण्यात आलेली आहे. आमच्या पुर्वाधिकारी मंचाने त्याच रोजी सामनेवाल्यांना नोटीस काढण्यात यावी असे आदेश केलेले आहे. त्या आदेशावरहुकूम या मंचाच्या प्रबंधकांनी सामनेवाल्यांना दि.11/10/2010 रोजी मंचाची नोटीस जारी केलेली आहे. मात्र त्या नंतर तक्रारदाराने सामनेवाल्यां विरुध्द ते मंचात हजर व्हावे यासाठी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाही. दि. 11/07/2011 पासून तक्रारदार व त्यांचे वकील नेमून दिलेल्या प्रत्येक तारखेस गैरहजर आहेत. आज रोजी देखील पुकारा करता ते हजर नाहीत. त्यावरुन असे दिसते की, तक्रारदारास सामनेवाल्यां विरुध्द तक्रार अर्ज चालविण्यास स्वारस्य उरलेले नाही. परिणामी, तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 13 (2) (सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
2. खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
दि. 21/01/2014 (श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव