जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –194/2012 तक्रार दाखल तारीख – 28/12/2012
निकाल तारीख - 05/02/2015
कालावधी - 02 वर्ष , 01 महिना 07 दिवस.
श्री व्यंकटेश एजन्सीज लातुर,
प्रो. जगदीश पंढरीनाथ भराडीया,
वय – 54 वर्षे, धंदा – व्यापर,
रा. लोखंड गल्ली, सराफ लाईन,
लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) व्यवस्थापक,
व्हि.आर.एल.लॉगीस्टीक्स ली.,
मंठाळे नगर, लातुर.
2) मुख्य व्यवस्थापक,
व्हि.आर.एल.लॉगीस्टीक्स ली.,
गिरीराज अॅनेक्स सर्कीट हाऊसरोड,
हुबळी, 580029, कर्नाटक. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. अनिल क. जवळकर.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे :- अॅड.आर.एन.पाटील/बी.पी.चव्हाण.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हे लातुर येथील रहीवाशी असुन त्यांचा श्री व्यंकटेश एजन्सीज या नावाने दुकान असुन अर्जदार हे स्वत: सदर दुकानाचे प्रोपरायटर आहेत. अर्जदाराने प्रभादीप एंटरप्रायजेस जळगाव यांना विको मेडीसीनची ऑर्डर दिली होती. एकुण 11,453/- रुपयाचे ऑर्डर होती. प्रभादीप एंटरप्रायझेस यांनी अर्जदारास जळगाव येथुन गैरअर्जदार क्र. 2 च्या जळगाव शाखेतुन एकुण 3 डाग दि. 31/07/2012 रोजी माल पाठवुन दिला. सदर मालापोटी गैरअर्जदार क्र. 2 च्या जळगाव शाखेत रु. 210/- ट्रान्सपोर्टसाठीचा खर्च भरला. सदर 210/- रुपयात 160/- रुपये ट्रान्सपोर्ट भाडे, 25/- रुपये स्टीचींग चार्जेस, 5/- रुपये व्हॉल्यु सरचार्ज, 10/- हमाली चार्जस व डब्ल्यु/पी चार्जस असे एकुण रु. 210/- होतात. प्रभादीप एंटरप्रायजेस यांनी दि. 31/07/2012 रोजी पाठविलेला संपुर्ण माल दि. 06/08/2012 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे आला. सदरचा माल आनत असताना गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराकडुन विनाकारण दि. 06/08/2012 रोजी रु. 29/- हमाली व किरकोळ खर्च म्हणुन मागणी केली. अर्जदाराने सदरची रु. 29/- रुपये देण्यास नकार दिल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 याने माल देण्यास नकार दिला. तेव्हा अर्जदाराने नाविलाजास्तव रक्कम रु. 29/- दिले. सदरची रक्कम मिळाल्या बाबत गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास पावती क्र. 181282 दिला. त्यानंतरच अर्जदाराने स्वत: होवुन सदरचा माल गैरअर्जदार क्र. 1 यांच्या ऑफीसमधुन स्वत: उचलुन स्वखर्चाने आणला. अर्जदाराने प्रभादीप एंटरप्रायजेस जळगाव यांना दि. 05/11/2012 रोजी ट्रान्सपोर्टसाठी भरलेली रक्कम रु. 210/- अदा केले.
अर्जदाराने स्वत:हुन गैरअर्जदार क्र. 1 च्या दुकानातुन माल स्वखर्चाने आणला. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 ने रु. 29 कशासाठीचे घेतले ते सांगितले नाही. दि. 06/08/2012 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यास लेखी पत्र देवून रु. 29/- चुकीचे घेतले आहेत असे कळविले व सदरची रक्कम व्याजासह परत करावी असे सुचविले. गैरअर्जदाराने सदरचे पत्र घेवून ही पत्रात मागणी केल्याप्रमाणे रु. 29/- व्याजासह दिले नाहीत अथवा नोटीसचे उत्तर ही दिले नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांनी जाणुन बुजुन अर्जदाराकडुन जास्तीचे रु. 29/- वसुल केल्यामुळे अर्जदारास जो मानसीक व शारिरीक त्रास झाला त्याची किंमत रुपयात तोलता येत नाही. तरीपण गैरअर्जदारांना एक प्रकारे अर्थिक दंड व्हावा या उद्देशाने अर्जदाराने सदरच्या तक्रारीत रु. 5,000/- ची मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या अर्जदारास रु. 29/- व त्यावर रक्कम घेतलेल्या तारखेपासुन 18 टक्के दराने व्याज संपुर्ण रक्कम अर्जदाराच्या पदरी पडेपर्यंत देण्याचा आदेश गैरअर्जदारांना करण्यात यावा. अर्जदारास झालेल्या मानसिकव शारिरीक त्रासापोटी रु. 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 3,000/- असे एकुण रु. 8,000/- देण्याचा आदेश दोन्ही गैरअर्जदाराना करण्यात यावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत व्हि.आर.एल.लॉगीस्टीक्स ची पावती, व्हि.आर.एल.लॉगीस्टीक्स ची पावती, श्री व्यंकटेश एजन्सीज पत्र, प्रभादीप एंटरप्रायजेस पत्र, बँक स्टेटमेंट, प्रभादीप एंटरप्रायजेस पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदाराची तक्रार ही ग्राहक या संज्ञेत बसत नाही. म्हणून फेटाळण्यात यावी. तसेच अर्जदाराने लिहिलेल्या तक्रारीतील मजकुर खोटा असत्य आहे. सत्य परिस्थिती अशी की, दि. 31/07/2012 रोजी अर्जदाराने दिलेली तीन काईन दिलेल्या पत्यावर घेवून गेला असता ते दुकान बंद होते. म्हणून ते परत गैरअर्जदार क्र. 1 ने आपल्या गोडाऊन मध्ये आणुन ठेवले. तसेच गैरअर्जदार क्र. 1 ला कळवले असता त्यांनी घरी आणून देण्यास सांगितले तेव्हा गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदारास सांगितल. सदरचे दोघातील करारानुसार दिलेल्या पत्यावर काईन पोहचाव याचे होते ते काम गैरअर्जदार क्र. 1 ने केले मात्र अर्जदाराने घरपोच देण्यास सांगितले असता गैरअर्जदार क्र. 1 ने त्याच्या अटी व शर्तीनुसार आपल्या गोडाऊन मध्ये सदरचे 3 काईन ठेवण्यास लागलेले 20 रुपये व मजूरीचे 9 रुपये गैरअर्जदाराकडुन घेतले. त्यानुसार अर्जदारास पावती देखील दिली. त्यामुळे अर्जदाराने सदरची खोटी केस गैरअर्जदार क्र. 1 वर केली असल्यामुळे फेटाळण्यात यावी. व अर्जदारास खोटी केस केली म्हणून रु. 20,000/- दंड लावण्यात यावा.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. ही बाब गैरअर्जदाराने देखील मान्य केले आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदाराच्या सेवेत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी कोणतीही चुक केलेली नाही. अर्जदाराने जो पत्ता गैरअर्जदार क्र. 1 ला लिहून दिला होता. त्या पत्त्यावर अर्जदाराच्या कामाच्या वेळेत गैरअर्जदार क्र. 1 ने 3 कार्टूनची पोच देण्यास गेला असता सदरचे दुकान बंद होते. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 ला आपल्या गोडाऊन मध्ये सदरचे कार्टुन ठेवावयास लागले व गैरअर्जदार क्र. 1 ने ही बाब अर्जदाराच्या निर्दशनास आणून दिली असता त्यांनी ती पोच घरी आणून देण्यास सांगितली जी गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या नियम व अटीचे भंग करणारी आहे. कारण गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदाराचे ते तीन कार्टुन अर्जदारास देण्यासाठी दुस-यांदा आपल्या माणसाला घेवून गोडाऊन मधून अर्जदारास नेवून दिले. ते गैरअर्जदार क्र. 1 च्या अट व शर्थी VRL लॉजीस्टीक च्या पावतीच्या पाठीमागे अट क्र. 9 मध्ये लिहिलेले आहे. गोडाऊन चार्जेस 30 रुपये परंतु गैरअर्जदार क्र. 1 ने तर ते चार्जेस रु. 29/- घेतले यात गैरअर्जदार क्र. 1 ने कोणतेही त्रुटी अर्जदाराच्या सेवेत केलेली नाही. जर अशा पध्दतीचा व्यवहार प्रत्येक कंपनी करु लागली तर तिला आपले दुकान बंद करावे लागेल. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या कामाचा मोबदला हा मिळालाच पाहिजे जर अर्जदाराची दुकान बंद झाली नसती तर त्यास अर्जदाराचे तीन कार्टून गोडाऊन मध्ये ठेवण्याची गरजच पडली नसती. उलट तो माल व्यवस्थित ठेवून रितसर परत पोच केला याबद्दल गैरअर्जदार क्र. 1 ने कोणतीही चुकीचे वर्तणुक केलेली नाही. म्हणून अर्जदाराची सदरची तक्रार ही योग्य दिसून येत नाही. व अर्जदाराचा अर्ज हा खर्चासह नामंजुर करण्यात येत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.