Maharashtra

Beed

CC/10/59

Saudagar Unush Jangumiyan. - Complainant(s)

Versus

Vyavasthapak, Shriram Motor's,Beed & Other-01 - Opp.Party(s)

S.L.Zinzurde

09 Mar 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/59
 
1. Saudagar Unush Jangumiyan.
R/o Chausala,Tq.& Dist.Beed
Beed
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Vyavasthapak, Shriram Motor's,Beed & Other-01
Shivajinagar,Barshi road,Beed,Tq.& Dist.Beed
Beed
Maharastra
2. Vyavasthapak, Sambhavnath Finance No-31,General Mutha Mudaly Street,
General Mutha Mudaly Street, Rainbow Complex, 1St floor, Sawkar Peth,Chennai-60079
Chennai.
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  P. B. Bhat PRESIDENT
  A P Bhosrekar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदारातर्फे       :- वकील -अँड. ए.टी. धनवे.   
             सामनेवालेतर्फे       :- वकील –अँड. ए.सी. कदम.  
                             निकालपत्र         
            तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
      तक्रारदार हा मौजे चौसाळा येथील रहिवाशी असून व्‍यापार करुन आपली उपजिविका भागवतो. सदर व्‍यवसायासाठी तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 कडून सामनेवाले नं. 2 चे कर्ज घेवून फोर्स मिनीडोअर ही गाडी विकत घेतली. त्‍याप्रमाणे गाडी घेतेवेळी सामनेवाले नं. 1 व 2 च्‍या अटी व नियम मान्‍य करुनच तारीख 14/3/2007 ला तक्रारदारांना सामनेवाले नं. 1 च्‍या शोरुम मधून सामनेवाले नं. 2 चे फायनान्‍स चढवून तक्रारदाराचे हक्‍कात गाडी दिली.
      तक्रारदारांना सामनेवाले नं. 1 व 2 कडून फोर्स मिनीडोअर मॉडेल 2007 चे पासींग नं. एम.एच. 23-5343 असा दिला आहे. गाडीची ¼ रक्‍कम रु. 1,19,900/- सामनेवाले नं. 1 चे कार्यालयात भरणा करुन त्‍यास जामीनदार म्‍हणून एका व्‍यक्‍तीची निवड करुन गाडी दिलेली आहे. सदर फायनान्‍सच्‍या अटीनुसार एच.डी.एफ.सी. बँकेचे खाते असलेले खात्‍यावरील चेकबुक गाडीचे हप्‍ते भरण्‍यासाठी दिले होते. कर्जाचा हप्‍ता रु. 10,850/- इतका होता. सदर चेकप्रमाणे सामनेवालेंनी तक्रारदाराकडून 11 चेक प्रमाणे पैसे वसूल केलेले आहेत.
      गाडी घेतेवेळी तक्रारदारांना सामनेवाले नं. 1 ने सांगितले की, सामनेवाले नं. 2 चे फायनान्‍स करते वेळी आमच्‍याकडे स्‍कीम चालू असून त्‍या स्‍कीम अंतर्गत सदर फायनान्‍स कंपनीचे फायनान्‍स घेतल्‍यावर 4 वर्षाचा इन्‍शुरन्‍स व गाडीची पासींगचा खर्च आम्‍ही करुन देतो, असे सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना सांगितले होते. परंतू तसे न करता तक्रारदारास त्‍यांची स्‍कीम न देता खोटे आश्‍वासन देवून फसवणूक केली. तरी सुध्‍दा तक्रारदाराने स्‍वत:च सर्व काही गाडीचा इन्‍शुरन्‍स व पासींग खर्च केलेला आहे.
      तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 च्‍या शोरुममधून सामनेवाले नं. 2 चे फायनान्‍स चढवून घेतल्‍यानंतर नियम व अटीनुसार प्रत्‍येक वेळी ठरल्‍याप्रमाणे फायनान्‍सचे शोरुममध्‍ये व फायनान्‍सचे कार्यालयामध्‍ये गाडी ओढून घेवून जाईपर्यंत तक्रारदाराने आपले हक्‍कात दिलेल्‍या चेकबुक प्रमाणे दरमहा रु. 10,850/- सामनेवाले नं. 2 च्‍या खात्‍यावर वेळोवेळी जमा केलेले आहेत व सामनेवालेंनी प्रत्‍येक तारखेची रक्‍कम उचललेली आहे.
      तक्रारदारास अंधारात ठेवून जाणून-बुजून त्रास देण्‍याचे दुष्‍ट हेतुने तक्रारदाराकडून जास्‍त पैसे उखळण्‍याचे दुष्‍ट हेतुने तक्रारदाराचे ताबा व कब्‍जातील फोर्स मिनीडोअर कसल्‍याही प्रकारची सुचना न देता दि; 23/5/2008 रोजी संगनमताने बेकायदेशीररित्‍या ओढून नेऊन तिची विल्‍हेवाट लावली आहे. याबाबत सामनेवालेंशी संपर्क करण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांनी कसल्‍याच प्रकारची दाद दिली नाही. सुचना किंवा त्‍यांचे ग-हाणे ऐकून घेतले नाही. याचा अर्थ असा होतो की, ग्राहकास मालकाने सेवेत कसूर करुन त्रास दिला आहे व चांगल्‍याप्रकारची सेवा दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदाराचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. त्‍यास सामनेवाले नं. 1 व 2 जबाबदार असून दोघांनी संगनमत करुन तक्रारदाराची गाडी ओढून नेली आहे. आजपर्यंत सामनेवालेने सदर गाडीबाबत कसलीही कल्‍पना न देता तिची बेकायदेशीर विल्‍हेवाट लावून फार मोठा तक्रारदारावर आघात केला आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचे कधीही भरुन न येणारे आर्थिक नुकसान झाले. तेव्‍हा पासून तक्रारदाराच्‍या मनावर गाडी ओढून नेल्‍याचा परिणाम झाला आहे. गाडी घेतल्‍यापासून चेक सहीत 2 ते 3 लाख रुपये जमा करुन घेतले आहेत. गाडी ओढून नेली तेव्‍हा पासून आजपर्यंत आर्थिक नुकसान 5 ते 6 लाख तसेच कार्यालयाशी साधलेल्‍या संपर्काशी झालेला खर्च रु. 20 ते 24 हजार, मानसिक शारिरीक त्रासापोटी रुपये एक लाख तसेच सर्व मार्गांनी मिळून रु. 10,25,000/- चे नुकसान झाले.
      याबाबत तक्रारदाराने सामनेवाले नं; 1 व 2 ला रजिस्‍टर पोस्‍टाने वकीलामार्फत नोटीस पाठवली. सामनेवालेने नोटीसीची दखल घेतली नाही अथवा रक्‍कमही दिली नाही.
      विनंती की, तक्रारदाराला सामनेवालेकडून नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु. 10,25,000/- देवून त्‍यावर 18 टक्‍के व्‍याज आकारण्‍यात यावे.
      सामनेवाले नं. 1 यांनी त्‍यांचा खुलासा तारीख 15/4/2010 रोजी दाखल केला. खुलाशातील सामनेवाले नं. 1 च्‍या संदर्भातील सर्व आक्षेप सामनेवालेंनी नाकारलेले आहेत. परंतू सामनेवाले नं. 1 ने सामनेवाले नं. 2 कडून फायनान्‍स करुन देण्‍याचे सांगितले व त्‍यावर तक्रारदाराने विश्‍वास ठेवून गाडी घेतल्‍याचे तक्रारदाराचे विधान साफ चुक व बिनबुडाचे आहे. सामनेवाले नं. 1 ने तक्रारदारास ब-याच फायनान्‍स कंपन्‍या विषयी माहिती दिली व त्‍यांच्‍या स्‍कीम सांगितल्‍या. त्‍यानुसार तक्रारदाराने संबंधीत फायनान्‍सशी चर्चा करुन स्‍वखुशीने सामनेवाले 2 कडून गाडीवर फायनान्‍स घेण्‍याचे ठरले. गाडी खरेदी करण्‍याबाबतची विधाने मान्‍य आहेत. सामनेवाले नं. 2 ने थकीत आलेल्‍या हप्‍त्‍यापोटी गाडी ओढून नेली काय? व तिची विलेवाट सामनेवाले नं. 2 ने कशी लावली याबाबतची माहिती सामनेवाले नं. 1 ला असण्‍याची अजिबात आवश्‍यकता नाही. डिलर या नात्‍याने सामनेवाले नं. 1 ची जबाबदारी दिलेल्‍या गॅरंटी मध्‍ये जर गाडीचे काही नुकसान झाले तर तिची दुरुस्‍ती करण्‍याची जबाबदारी मालक या नात्‍याने सामनेवाले नं. 1 ची आहे. तक्रारीत तशाप्रकारचे काहीही आरोप नाहीत. सामनेवाले नं. 1 वर कोणतीही जबाबदारी येत नसल्‍याने सामनेवाले नं. 1 ने नोटीसचे उत्‍तर दिलेले नाही.
      विनंती की, तक्रार सामनेवाले नं. 1 विरुध्‍द खर्चासह रदृ करावी व सामनेवाले नं. 1 ला रु. 2,00,000/- देण्‍याबाबत आदेश व्‍हावा.
      सामनेवाले नं. 2 यांनी नोटीस स्विकारली परंतू ते न्‍याय मंचात हजर न झाल्‍याने व त्‍यांनी ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार त्‍यांचा खुलासा मुदतीत दाखल न केल्‍याने न्‍याय मंचाने त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फा तक्रार चालविण्‍याचा निर्णय तारीख 29/12/2010 रोजी घेतला.
      तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद, सामनेवाले नं. 1 चा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने तारीख 14/3/2007 रोजी सामनेवाले नं. 1 डिलर करुन सामनेवाले नं. 2 च्‍या कर्जाने फोर्स मिनीडोअर मॉडेल नं. 2007 हे वाहन विकत घेतलेले आहे. ही बाब सामनेवाले नं. 1 यांना मान्‍य आहे. सदरचे वाहन तक्रारदाराच्‍या शपथपत्रानुसार तारीख 23/5/2008 रोजी सामनेवाले नं. 2 यांनी जप्‍त केलेले आहे व त्‍याची विल्‍हेवाट लावलेली आहे. तारीख 23/5/2008 नंतर तक्रारदाराने तारीख 12/3/2010 रोजी सदरची तक्रार दाखल केलेली आहे. यासंदर्भात वाहन जप्‍त केल्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवाले नं. 2 कडे वाहन सोडविण्‍यासाठी कार्यवाही केल्‍याबाबतची कोणतीही कागदपत्रे तक्रारीत दाखल नाहीत व तसे तक्रारदाराचे म्‍हणणे देखील नाही. तारीख 21/01/2010 रोजी सामनेवाले नं. 2 चे जप्‍त वाहन विक्री बाबतचे पत्र आल्‍यानंतर तारीख 22/1/2010 रोजी तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 व 2 यांना नोटीस दिलेली आहे व त्‍यानंतर तारीख 12/3/2010 रोजी सदरची तक्रार दाखल केल्‍याचे दिसते. तारीख 23/5/2008 ते 22/1/2010 या कालावधीत तक्रारदाराने गाडी सोडविण्‍यासाठी थकलेले हप्‍ते भरण्‍याची कुठलीही तयारी दर्शविलेली नाही व तसे तक्रारदाराचे म्‍हणणेही नाही. तसेच सामनेवाले नं. 1 च्‍या संदर्भात त्‍यांच्‍याकडून डिलर या नात्‍याने वाहनाची किंमत देवून तक्रारदाराने वाहन विकत घेतलेले आहे व यासंदर्भात त्‍यांच्‍या मार्फत सामनेवाले नं. 2 शी सर्व कर्ज घेण्‍यासाठी कार्यवाही झाल्‍याचे तक्रारदाराचे म्‍हणणे असले तरी सामनेवाले नं. 1 यांनी सदरचे म्‍हणणे, विधाने स्‍पष्‍टपणे नाकारलेली आहेत व तक्रारदारांना अनेक फायनान्‍स कंपनीची माहिती दिली होती, या हद्दीपर्यंत सामनेवाले नं. 1 चे विधान आहे. तक्रारदाराकडे हप्‍त्‍याची थकबाकी झाल्‍याने सामनेवाले नं. 2 यांनी वाहन जप्‍त केलेले आहे व सदरचे वाहन विक्रीबाबत तक्रारदारांना नोटीस दिली होती परंतू त्‍या नोटीसीप्रमाणे कार्यवाही न करता तक्रारदाराने तक्रार करण्‍याचा निर्णय घेतला तो मुळातच कायदयाला धरुन नाही. सदरचे वाहन विक्रीच्‍या व्‍यवहारापूर्वी तक्रारदाराने जर हप्‍ते भरण्‍याची तयारी दर्शविली असती तर थकबाकीची रक्‍कम सामनेवाले नं. 2 कडे भरली असती तर निश्चितच तक्रारदारांना गाडी परत मिळाली असती परंतू या सर्व व्‍यवहारात सामनेवाले नं. 1 किंवा 2 यांचा कोठेही सेवेत कसूर असल्‍याचे दिसत नाही, असे न्‍याय मंचाचे मत आहे. सामनेवाले नं. 1 यांना तक्रारदाराने नाहक तक्रारीत पार्टी केलेले आहे. त्‍यांच्‍याशी संबंधीत कर्जाचा भरणा करणे अगर वाहन जप्‍त करणे, याबाबी येत नाहीत. याची जाणीव तक्रारदार व्‍यापारी असल्‍याकारणाने त्‍याला मा‍हीत असूनही त्‍यांना तक्रारीत नाहक पार्टी केलेले आहे, त्‍यामुळे तक्रारदारानेच सामनेवाले यांना रक्‍कम रु. 500/- खर्चाचे देणे उचित होईल, असे न्‍याय मंचाचे मत आहे.
      सबब, न्‍याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
                     आ दे श
1.     तक्रारदाराची तक्रार रदृ करण्‍यात येत आहे.
2.    तक्रारदारांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी सामनेवाले यांना खर्चाची रक्‍कम रु. 500/- (अक्षरी रुपये पाचशे) आदेश मिळाल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत अदा करावेत. 
 
                        (सौ.एम.एस.विश्‍वरुपे)    ( पी.बी.भट )
                               सदस्‍या,            अध्‍यक्ष,
 चुनडे/- स्‍टेनो           जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, बीड जि.बीड
 
 
 
[ P. B. Bhat]
PRESIDENT
 
[ A P Bhosrekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.