Complaint Case No. CC/20/48 | ( Date of Filing : 02 Jul 2020 ) |
| | 1. Shaista Parvin Shafiulla Khan | Santoshi mata ward,Ballarpur,Tah.Ballarpur,Dist.Chandrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Vyavasthapak Samrudha Jiwan Multipurpose co-operative Society Ltd | Durga tower,Bhanapeth ward, Chandrapur, Tah.Dist.Chandrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, श्री अतुल डी. आळशी, मा. अध्यक्ष,) (पारीत दिनांक २८/०४/२०२२) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ती ही बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून गृहीणी आहे. विरुध्द पक्ष ही मल्टीपरपज को-ऑपरेटीव्ह सोसायटी असून ग्राहकांकडून रक्कम स्वीकारुन ती मुदत ठेव योजनेनुसार मुदत ठेव स्वरुपात गुंतवितात. तक्रारकर्ती हिने मुदत ठेव रजिस्ट्रेशन क्रमांक ०३८०००३०५३८, पावती क्रमांक ३०८९४० यानुसार दिनांक ३१/१२/२०१३ रोजी रक्कम रुपये १,००,०००/- तसेच पुन्हा मुदत ठेव रजिस्ट्रेशन क्रमांक ०३८०००२९६७६, पावती क्रमांक ३०८८०२ यानुसार दिनांक १८/०९/२०१३ रोजी रक्कम रुपये १,००,०००/- मुदत ठेव स्वरुपात विरुध्द पक्ष यांचेकडे जमा केले. उपरोक्त दोन्ही रक्कम परिपक्व तारखेनंतर तक्रारकर्ती हिला देय होणार होती आणि याबाबत विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती हिला प्रमाणपञामध्ये लेखी हमी दिली आहे की विरुध्द पक्षाकडे जमा असलेली रक्कम मुदत संपताच तक्रारकर्ती हिला देण्यात येईल. परंतु दिनांक १/७/२०१९ तसेच दिनांक १८/०९/२०१९ नंतर तक्रारकर्ती हिने विरुध्द पक्षाला परिपक्व रकमेची मागणी केली असता विरुध्द पक्षाने दिली नाही. त्यानंतर सुध्दा वारंवार रकमेची मागणी केली असता आजतागायत विरुध्द पक्षाने ती दिली नाही. विरुध्द पक्षाने रक्कम परत न केल्याने तक्रारकर्ती हिला शारीरिक व मानसिक ञास झाला तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. विरुध्द पक्षाची ही कृती अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करणारी असल्यामुळे तक्रारकर्ती हिने दिनांक ५/२/२०२० रोजी अधिवक्ता श्री नागपुरे यांचे मार्फत विरुध्दपक्षाला नोटीस पाठविली परंतु विरुध्द पक्षाने नोटीस ची दखल घेतली नाही. यामुळे तक्रारकर्ती हिला झालेल्या अन्याय विरुध्द दाद मागण्यासाठी या आयोगासमोर तक्रार दाखल करावी लागली.
- तक्रारकर्ती हिने आपल्या तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्षाने मुदत ठेवी प्रमाणे परिपक्वता रक्कम रुपये ३,००,०००/- दिनांक १८/०९/२०१९ पासून १८ टक्के व्याजासह तक्रारकर्ती हिला अदा करावे तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्कम रुपये १,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करण्याचे आदेशीत व्हावे.
- तक्रारकर्तीची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्यात आले. नोटीस प्राप्त होवून सुध्दा विरुध्द पक्ष हे आयोगासमक्ष हजर झाले नाही. करिता दिनांक ४/१/२०२२ रोजी विरुध्द पक्षाविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्ती हिची तक्रार व दाखल दस्तावेज यातील मजकुरालाच तक्रारकर्तीचे शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसिस दाखल यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे १. तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय? होय २. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली होय आहे काय? ३. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्ती हिने मुदत ठेव रजिस्ट्रेशन क्रमांक ०३८०००३०५३८, पावती क्रमांक ३०८९४० यानुसार दिनांक ३१/१२/२०१३ रोजी रक्कम रुपये १,००,०००/- तसेच पुन्हा मुदत ठेव रजिस्ट्रेशन क्रमांक ०३८०००२९६७६, पावती क्रमांक ३०८८०२ यानुसार दिनांक १८/०९/२०१३ रोजी रक्कम रुपये १,००,०००/- मुदत ठेव स्वरुपात विरुध्द पक्ष यांचेकडे जमा केल्याबाबत प्रमाणपञ प्रकरणात निशानी क्रमांक ४ वर दाखल आहे. यावरुन तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष यांची ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - तक्रारकर्ती हिने विरुध्द पक्षाकडे गुंतविलेली रक्कम परिपक्वता तारीख उलटून गेल्यावरही परत केली नाही. तक्रारकर्तीचा हा आक्षेप विरुध्द पक्ष यांनी तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढलेला नाही तसेच आपल्या समर्थनार्थ कोणतेही म्हणणे प्रकरणात दाखल केले नाही. अशा परिस्थीतीत विरुध्द पक्षाने गुंतवणुकीची परिपक्वता रक्कम परत न करुन तक्रारकर्तीप्रति दिलेली न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे सिध्द होत असल्याचे आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेंचणावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार क्र. ४८/२०२० अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती हिला परिपक्वता रक्कम रुपये ३,००,०००/- व यावर ६ टक्के द.शा.द.शे. व्याज निकाल तारखेपासून ते तक्रारकर्तीच्या प्रत्यक्ष हातात पडेपर्यंत अदा करावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.
(किर्ती वैद्य (गाडगीळ)) (कल्पना जांगडे (कुटे)) (अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष | |