Maharashtra

Chandrapur

CC/20/49

Manabendra Anilbaran Datta - Complainant(s)

Versus

Vyavasthapak Samrudha Jiwan Multipurpose co-operative Society Ltd - Opp.Party(s)

Dr.N.R.Khobragade

28 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/20/49
( Date of Filing : 02 Jul 2020 )
 
1. Manabendra Anilbaran Datta
Maynus Qua.No.M.1/7, Sasti Dhoptala,Rajura,Tah.Rajura Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Vyavasthapak Samrudha Jiwan Multipurpose co-operative Society Ltd
Durga Tower,Bhanapeth ward,Chandrapur Tah.Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 28 Apr 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

(आयोगाचे निर्णयान्वये, श्री अतुल डी. आळशी, मा. अध्‍यक्ष,)

                    (पारीत दिनांक २८/०४/२०२२)

 

                       

  1. प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालिलप्रमाणे. 
  2. तक्रारकर्ता हा राजुरा, जिल्‍हा चंद्रपूर येथील रहिवासी असून नोकरी करतो. विरुध्‍द पक्ष ही मल्‍टीपरपज को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी असून ग्राहकांकडून रक्‍कम स्‍वीकारुन ती मुदत ठेव योजनेनुसार मुदत ठेव स्‍वरुपात गुंतवितात. तक्रारकर्ता  यांनी मुदत ठेव रजिस्‍ट्रेशन क्रमांक C३८३१३०३४८१०, पावती क्रमांक FD ३८३१३०३५७६६ यानुसार दिनांक ३०/०९/२०१३ रोजी रक्‍कम रुपये १,००,०००/- तसेच पुन्‍हा मुदत ठेव रजिस्‍ट्रेशन क्रमांक C३८३१३०३४८१०, पावती क्रमांक FD ३८३१४००७९५८ यानुसार दिनांक ०१/११/२०१४ रोजी रक्‍कम रुपये १,००,०००/- मुदत ठेव स्‍वरुपात विरुध्‍द पक्ष यांचेकडे जमा केले. उपरोक्‍त दोन्‍ही रक्‍कम परिपक्‍व तारखेनंतर तक्रारकर्त्‍याला देय होणार होती आणि याबाबत विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला प्रमाणपञामध्‍ये लेखी हमी दिली आहे की विरुध्‍द पक्षाकडे जमा असलेली रक्‍कम मुदत संपताच तक्रारकर्त्‍याला देण्‍यात येईल. परंतु   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला परिपक्‍व रकमेची मागणी केली असता विरुध्‍द पक्षाने रक्‍कम परत दिली नाही. त्‍यानंतर सुध्‍दा  वारंवार रकमेची मागणी केली असता आजतागायत विरुध्‍द पक्षाने ती दिली नाही. विरुध्‍द पक्षाने रक्‍कम परत न केल्‍याने तक्रारकर्त्‍याला शारीरिक व मानसिक ञास झाला तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. विरुध्‍द पक्षाची ही कृती अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करणारी असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक ५/२/२०२० रोजी अधिवक्‍ता श्री नागपुरे यांचे मार्फत विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविली परंतु विरुध्‍द पक्षाने नोटीस ची दखल घेतली नाही. यामुळे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या अन्‍याय विरुध्‍द दाद मागण्‍यासाठी या आयोगासमोर तक्रार दाखल करावी लागली.
  3. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षाने मुदत ठेवी प्रमाणे परिपक्‍वता रक्‍कम रुपये २,५४,६५४/- दिनांक ३१/१२/२०१६  पासून १८ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला अदा करावे तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्‍कम रुपये १,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करण्‍याचे आदेशीत व्‍हावे.
  4. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍यात आले. नोटीस प्राप्‍त होवून सुध्‍दा विरुध्‍द पक्ष हे आयोगासमक्ष हजर झाले नाही. करिता दिनांक ४/१/२०२२ रोजी विरुध्‍द पक्षाविरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, तक्रारकर्त्‍याची तक्रार व दाखल दस्‍तावेज यातील मजकुरालाच तक्रारकर्त्‍याचे शपथपञ समजण्‍यात यावे अशी पुरसिस दाखल यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमीमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

 

    अ.क्र.                 मुद्दे                          निष्‍कर्षे

    १.  तक्रारकर्ता  हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ         होय

    २.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याप्रति न्‍युनतापूर्ण सेवा दिली      होय

        आहे काय ॽ

      ३.  आदेश काय ॽ                            अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •  

 

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

  1. तक्रारकर्त्‍याने मुदत ठेव रजिस्‍ट्रेशन क्रमांक C३८३१३०३४८१०, पावती क्रमांक FD ३८३१३०३५७६६ यानुसार दिनांक ३०/०९/२०१३ रोजी रक्‍कम रुपये १,००,०००/- तसेच पुन्‍हा मुदत ठेव रजिस्‍ट्रेशन क्रमांक C३८३१३०३४८१०, पावती क्रमांक FD ३८३१४००७९५८ यानुसार दिनांक ०१/११/२०१४ रोजी रक्‍कम रुपये १,००,०००/- मुदत ठेव स्‍वरुपात विरुध्‍द पक्ष यांचेकडे जमा केल्‍याबाबत प्रमाणपञ प्रकरणात निशानी क्रमांक ४ वर दाखल आहे. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष यांचा ग्राहक आहे, हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे गुंतविलेली रक्‍कम परिपक्‍वता तारीख उलटून गेल्‍यावरही परत केली नाही. तक्रारकर्त्‍याचा हा आक्षेप विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढलेला नाही तसेच आपल्‍या समर्थनार्थ कोणतेही म्‍हणणे प्रकरणात दाखल केले नाही. अशा परिस्थितीत विरुध्‍द पक्षाने गुंतवणुकीची परिपक्‍वता रक्‍कम परत न करुन तक्रारकर्त्‍याप्रति दिलेली न्‍युनतापूर्ण सेवा दिल्‍याचे सिध्‍द होत असल्‍याचे आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक ३ बाबतः-

  1. मुद्दा क्रमांक १ व २ च्‍या विवेंचणावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.   

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची  तक्रार क्र. ४९/२०२० अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला परिपक्‍वता रक्‍कम रुपये २,५४,६५४/-  व यावर ६ टक्‍के द.शा.द.शे. व्‍याज निकाल तारखेपासून ते तक्रारकर्त्‍याच्‍या  प्रत्‍यक्ष हातात पडेपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
  4. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावेत.

 

    

 

    (किर्ती वैद्य (गाडगीळ))     (कल्‍पना जांगडे (कुटे))       (अतुल डी. आळशी)

            सदस्‍या                सदस्‍या                  अध्‍यक्ष

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.