Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/12/801

Durgendra Narayan Mathur - Complainant(s)

Versus

Vyavasthapak, Reliance Communications, - Opp.Party(s)

Miss Nirmal Sorte

13 Oct 2016

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/12/801
 
1. Durgendra Narayan Mathur
r/o Friends Colony, Niyati Apartment, Swagat Park, Seminary Hills, Nagpur
...........Complainant(s)
Versus
1. Vyavasthapak, Reliance Communications,
Shop No. 3-6, Vijay Archade, North Ambazari Road, Shankarnagar, Nagpur - 440 010
2. Reliance Communications,
H Block, First floor, Dhirubai Ambani Knowldge City, Navi Mumbai - 400 710
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. JUSTICE Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 13 Oct 2016
Final Order / Judgement

                             -निकालपत्र

           (पारित व्‍दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्‍या.)

                  ( पारित दिनांक-03 ऑक्‍टोंबर, 2016)

 

01.   तक्रारकर्त्‍याने ही तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं-1)  व क्रं-2)  रिलायन्‍स कॉम्‍युनिकेशन्‍स यांचे  विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दोषपूर्ण सेवे संबधाने नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

 

 

02.    तक्रारीचे स्‍वरुप थोडक्‍यात खालील प्रमाणे-       

       तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने वकील असून तो मागील तीन वर्षां पासून विरुध्‍दपक्षा कडून रिलायन्‍स नेटची सेवा घेत असल्‍याने ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याचा Relationship No.-2398316244 आणि Reliance Net connect No.-9325893774 असा आहे आणि Reliance Net Connect Plan-SWIFT-30 असा आहे. तक्रारकर्ता नियमित  प्रत्‍येक महिन्‍यात विहित मुदतीत बिलाचा भरणा करतो. तक्रारकर्त्‍याने बिल मिळण्‍या करीता ई-मेल सुविधा घेतलेली आहे परंतु ई मेल कधी कधीच बिले पाठविल्‍या जात होती, त्‍याने य विषयी बरेचदा विरुध्‍दपक्षाकडे तक्रार केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही, त्‍यामुळे त्‍याला प्रत्‍येक महिन्‍यात विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात भेटी देऊन बिल विषयी माहिती घेऊन बिल भरावे लागत असे, त्‍यामुळे विरुध्‍दपक्षा कडून मिळणारी ही दोषपूर्ण सेवा आहे.

        तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-12/06/2012 रेजी त्‍याच्‍या भ्रमणध्‍वनीवर संदेश आला की,  त्‍याचे बिल रुपये-1458.69 असून ते भरण्‍याची मुदत दिनांक-01/07/2012 पर्यंत आहे, त्‍यामुळे दिनांक01/07/2012 पर्यंत बिल जमा करावयाचे आहे अशी तक्रारकर्त्‍या धारणा होती.

         परंतु अशी स्थिती असताना दिनांक-27/06/2012 रोजी त्‍याने इंटरनेट कनेक्‍ट करण्‍याचा बराच प्रयत्‍न करुनही ते कनेक्‍ट झाले नाही. त्‍यानंतरही दिनांक-28/06/2012 ते दिनांक-30/06/2012 या कालावधीत सतत प्रयत्‍न केल्‍या नंतरही इंटरनेट कनेक्‍ट झाले नाही, म्‍हणून विरुध्‍दपक्षाशी संपर्क  साधला असता त्‍याने बिलापोटी रक्‍कम रुपये-2100/- न भरल्‍याचे कारणावरुन सेवा खंडीत करण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यास कुठलीही पूर्वसुचना न देता व मुदतपूर्व तारखे पूर्वी सेवा खंडीत करणे ही विरुध्‍दपक्षाचे सेवे मधील त्रृटी दर्शविते.

        तक्रारकर्त्‍याचे पुढे असे म्‍हणणे आहे की, त्‍याचा वकीलीचा व्‍यवसाय असल्‍याने त्‍याला न्‍यायीक प्रकरणां विषयीची माहिती इंटरनेट व्‍दारे मिळते. इंटरनेट सुविधा खंडीत झाल्‍यामुळे त्‍याच्‍या व्‍यवसाया मध्‍ये अनेक अडचणी निर्माण झालेल्‍या आहेत व त्‍यामुळे त्‍यास मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला दिनांक-02/07/2012 रोजी ई मेल व्‍दारे तसेच स्‍पीड पोस्‍टाने पत्र पाठविले असता विरुध्‍दपक्षा तर्फे स्‍पीडपोस्‍ट पत्राचे उत्‍तर देण्‍यात आले, जे तक्रारक्‍र्त्‍यास दिनांक-25/09/2012 रोजी मिळाले परंतु त्‍यांनी सेवेमधील त्रृटी विषयी काहीही स्‍पष्‍ट केले नाही

 

 

 

 

       म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचात दाखल करुन विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील प्रकारच्‍या मागण्‍या केल्‍यात-

       तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्षांचे दोषपूर्ण सेवे बद्दल झालेल्‍या मानसिक व शारिरीक व आर्थिक त्रासा बद्दल एकूण रुपये-1,00,000/- नुकसान भरपाई   देण्‍याचे आदेशित व्‍हावे. या शिवाय योगय ती दाद तक्रारकर्त्‍याचे नावे देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

03.     मंचाचे मार्फतीने स्पिड पोस्‍टाने दोन्‍ही विरुध्‍दपक्षांना नोटीस पाठविण्‍यात आली असता विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2)  यांना नोटीस मिळाल्‍या बाबत “Post Track Report” अनुक्रमे नि.क्रं-9 आणि क्रं-10 वर दाखल आहे म्‍हणून दोन्‍ही विरुध्‍दपक्षां विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात दिनांक-29/08/2016 रोजी पारीत करण्‍यात आला.

 

04.       तक्रारकर्त्‍याने नि.क्रं-3 वरील यादी प्रमाणे दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने बचतखाते पुस्‍तीकेच्‍या प्रथम पानाची झेरॉक्‍स प्रत, नाकारलेल्‍या विड्रॉल स्‍लीपची प्रत, तक्रारकर्त्‍याने पाठविलेल्‍या नोटीसची प्रत, नोटीस मिळाल्‍या बद्दल विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या पोच, तक्रारकर्त्‍याचे बंद झालेले खातेपुस्‍तक पुर्नजिवित करण्‍यासाठी भरुन पाठविलेल्‍या के.वाय.सी.फॉर्म अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतींचा समावेश आहे. तसेच लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

 

   

 

05.   तक्रारकर्त्‍याची तक्रार आणि  तक्रारी सोबत त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे  तसेच लेखी युक्‍तीवादाचे अवलोकन करण्‍यात आले, त्‍यावरुन खालील प्रमाणे मंचाचा निष्‍कर्ष देण्‍यात येतो-

::निष्‍कर्ष ::

 

06.    तक्रारकर्त्‍याचे निवेदन असे आहे की, त्‍याचे आणि त्‍याच्‍या वडीलांचे  सन-1998-1999 पासून विरुध्‍दपक्ष क्रं-1) स्‍टेट बँक ऑफ इंडीया शाखा काटोल येथे संयुक्‍त बचत खाते क्रं-11335818822 होते. पुढे त्‍याच्‍या वडीलांचे दिनांक-16/10/2001 रोजी  निधन  झाल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍यू प्रमाणपत्राच्‍या आधारावर तत्‍कालीन विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या शाखाधिका-यांनी दिनांक-10/09/2002 रोजी संयुक्‍त खात्‍यावरील त्‍यांचे नाव कमी केले व तशी नोंद  बचतखाते पुस्‍तीकेवर बँके तर्फे सही व शिक्‍क्‍यानिशी घेण्‍यात आली. त्‍यानंतर सन-2003 पासून ते               दिनांक-18 एप्रिल, 2015 पर्यंत तक्रारकर्त्‍याच्‍या एकटयाच्‍याच सहीने विरुध्‍दपक्ष बँकेत व्‍यवहार झालेले आहेत.

        तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुराव्‍यार्थ विरुध्‍दपक्ष क्रं-1) स्‍टेट बँक ऑफ इंडीया शाखा काटोल येथील त्‍याचे संयुक्‍त बचत खाते क्रं-11335818822 च्‍या प्रथम पानाची प्रत दाखल केली, त्‍यावर संयुक्‍त खातेदार म्‍हणून श्री मोहोड शंकर पंजाबराव आणि श्री मोहोड रमेश शंकर यांची नावे नमुद आहेत आणि श्री मोहोड शंकर पंजाबराव यांचे नाव खोडलेले असून “deleted on 10/9” असे हस्‍ताक्षरात नमुद आहे. तक्रारकर्त्‍याचे सत्‍यापना वरील तक्रारी नुसार ते नाव दिनांक-10/09/2002 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेतील तत्‍कालीन शाखाधिका-यांनी त्‍यांच्‍या वडीलांचे मृत्‍यू प्रमाणपत्र पाहूनच संयुक्‍त खात्‍यातील त्‍यांचे नाव कमी केले होते.

      परंतु असेही दिसून येते की, तक्रारकर्त्‍याचे तक्रारीवरील नाव रमेश शामराव मोहोड असे नमुद आहे तर पासबुक वरील प्रथम पानावर तक्रारकर्त्‍याचे नाव मोहोड रमेश शंकर असे नमुद आहे.

        तक्रारकर्त्‍याचे असेही म्‍हणणे आहे की, त्‍यानंतर सन-2003 पासून ते               दिनांक-18 एप्रिल, 2015 पर्यंत तक्रारकर्त्‍याच्‍या एकटयाच्‍याच सहीने विरुध्‍दपक्ष बँकेत व्‍यवहार झालेले आहेत.

 

            पुढे तक्रारकर्त्‍याचे असेही म्‍हणणे की, त्‍याने दिनांक-06/05/2016 रोजी  विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या शाखेत रुपये-20,000/- काढण्‍यासाठी विड्रॉल स्लिप भरुन दिली असता संबधित लिपिकाने डारमेंट अकाऊंट असा शेरा मारुन श्री कदम लेखाधिकारी यांना भेटण्‍यास सुचित केले, त्‍याप्रमाणे श्री कदम यांची भेट घेतली असता त्‍यांनी वडीलांचे मृत्‍यू प्रमाणपत्र दाखविल्‍या शिवाय खाते सुरु करता येणार नाही व विड्रॉल रक्‍कम देता येणार नाही असे सांगितले. त्‍यावर तक्रारकर्त्‍याने संपूर्ण वस्‍तुस्थिती अवगत  करुन वडीलांचे नाव कमी केल्‍या बाबत बँकेचे तत्‍कालीन शाखाधिकारी यांची सही व शिक्‍का सुध्‍दा  दाखविला परंतु संबधित अधिका-याने रुपये-20,000/- रकमेचा विड्रॉल देण्‍याचे नाकारले व अपमानजनक भाषा वापरली. शेवटी तक्रारकर्त्‍याला स्‍वतःचे आजाराचे निदान व औषधोपचार करण्‍या करीता रकमेची गरज असूनही तो विड्रॉल न करता बँकेतून निघून गेला.

      तक्रारकर्त्‍याचे पुढे असेही म्‍हणणे आहे की, त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या शाखेत के.वाय.सी.फॉर्म पॅनकॉर्ड, इलेक्‍शन कॉर्ड, विद्दुत देयक माहे एप्रिल, 2016 दस्‍तऐवजांसह दिनांक-09/05/2016 रोजी सादर केला.  तसेच विरुध्‍दपक्ष क्रं-1) व                क्रं-2) बँकेला दिनांक-09/05/2016 रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविली, नोटीस मिळाल्‍या बाबत पुराव्‍या दाखल पोच दाखल केल्‍यात. परंतु नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्ष बँके तर्फे उत्‍तर देण्‍यात आले नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष बँके तर्फे तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा देण्‍यात आल्‍याचे नमुद केले.

 

      तक्रारकर्त्‍याची तक्रार सत्‍यापनावर दाखल आहे. दोन्‍ही विरुध्‍दपक्ष बँके तर्फे मंचाची नोटीस मिळूनही कोणीही न्‍यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले म्‍हणणे मांडले नाही तसेच तक्रारकर्त्‍याने तक्रारीत केलेली विधाने खोडून काढलेली नाहीत.

      मंचा तर्फे तक्रारकर्त्‍याच्‍या प्रथम पासबुकाचे अवलोकन करण्‍यात आले असता त्‍यावर त्‍यांचे वडीलांचे नाव खोडले असल्‍याचे दिसत असून बाजुला तत्‍कालीन बँकेच्‍या शाखाशिका-यांची सही व शिक्‍का आहे व त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने एकटयाचे सहीने सन-2003 पासून ते सन-2015 पर्यंत एकटयाच्‍या सहीने व्‍यवहार केलेले असताना तक्रारकर्ता दिनांक-06/05/2016 रोजी  विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या शाखेत रकमेची विड्रॉल काढण्‍यासाठी गेला असता त्‍यास वडीलांचे मृत्‍यू प्रमाणपत्र आणण्‍यास बळजबरी करण्‍यात आली, जेंव्‍हा की त्‍याचे वडीलांचे नाव पूर्वीच्‍या तत्‍कालीन बँक                 शाखाधिका-यांनी खोडून बाजुला संक्षीप्‍त स्‍वाक्षरी व शिक्‍का मारलेला आहे. बँके तर्फे एक करता आले असते, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास त्‍यावेळी पत्र देऊन मृत्‍यू प्रमाणपत्राची पुर्तता करण्‍यास त्‍याला सुचित करता आले असते परंतु गरजू ग्राहकास त्‍याच्‍या रकमेचा विड्रॉल न देण्‍याची विरुध्‍दपक्ष बँकेची कृती ही दोषपूर्ण सेवा मोडते. असा विड्रॉल देताना तक्रारकर्त्‍याची नमुना स्‍वाक्षरी बघून सुध्‍दा विड्रॉल देता आला असता, विड्रॉलसाठी वडीलांचे मृत्‍यू प्रमाणपत्राची त्‍वरीत आवश्‍यकता होती असे म्‍हणता येणार नाही. संबधित रकमेचा विड्रॉल देण्‍यासाठी वडीलांचे मृत्‍यू प्रमाणपत्राचाच पुरावा म्‍हणून त्‍वरीत आवश्‍यकता होती, त्‍या शिवाय विड्रॉल देता येणेच शक्‍य नव्‍हते असेही म्‍हणता येणार नाही.

       तक्रारकर्त्‍याचे असेही म्‍हणणे आहे की, त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं-1) बॅकेतून अपमानजनक वागणूक दिली तसेच त्‍याचे नोटीसला सुध्‍दा उत्‍तर दिले नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने के.वाय.सी.फॉर्म सादर करुनही त्‍याला त्‍या संबधाने काहीही कळविलेले नाही. हा सर्व प्रकार पाहता विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँके तर्फे तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते, म्‍हणून तक्रारकर्ता विरुध्‍दपक्ष बँके कडून नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

 

       इतकेच नव्‍हे तर सदर प्रकरणात ग्राहक मंचाची नोटीस मिळून सुध्‍दा विरुध्‍दपक्ष बँके तर्फे  कोणीही मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी म्‍हणणे सुध्‍दा मांडले नाही व कोणतीही तसदी  घेतली नाही, या सर्व प्रकारा वरुन विरुध्‍दपक्ष बँकेचे अधिकारी न्‍यायालयाला सुध्‍दा न जुमानता आपल्‍या ग्राहकां प्रती कशाप्रकारचा व्‍यवहार करतात व कशाप्रकारे ग्राहकांना सेवा देतात ही बाब या प्रकरणातील विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या अधिका-यांच्‍या वागणुकी वरुन दिसून येते. वस्‍तुतः ग्राहकांच्‍या जमा रकमेच्‍या आधारावर बँक आपला व्‍यवसाय करते आणि त्‍यावर नफा कमाविते.

         आदरणीय महात्‍मा गांधी यांनी सन-1890 मध्‍ये दक्षिण आफ्रीकेला ग्राहक आणि  त्‍याला दिल्‍या जाण-या सेवे प्रती सुंदर संदेश आपल्‍या भाषणातून दिलेला आहे, तो संदेश खालील प्रमाणे-

 

In a speech in South Africa in 1890 Mahatma Gandhi said this:

“A customer is the most important visitor on our premises. He is not dependent on us. We are dependent on him. He is not an interruption of our work. He is the purpose of it. He is not an outsider of our business. He is part of it. We are not doing him a favour by serving him. He is doing us a favour by giving us the opportunity to do so.”

    This is a philosophy well worth absorbing and putting at the heart of all customer interactions. If we think of the idea of extending warm, welcoming hospitality to the customer with courtesy and attentiveness, rather than offering cool technical efficiency on a transactional basis, expecting the customer to be polite to us rather than the other way round, then we will get closer to the truth of what customer-satisfying service really is.

 

 

 

नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                         ::आदेश  ::

(01)   तक्रारकर्ता श्री  रमेश शामराव मोहोड यांची,  विरुध्‍दपक्ष क्रं-1) शाखा अधिकारी, स्‍टेट बँक ऑफ इंडीया, शाखा काटोल, जिल्‍हा नागपूर आणि  विरुध्‍दपक्ष क्रं-2) असिस्‍टंट जनरल मॅनेजर (आर.बी.ओ.-1) विभागीय कार्यालय, स्‍टेट बँक ऑफ इंडीया, नागपूर यांचे विरुध्‍दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या  (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)   विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याने भरुन दिलेल्‍या के.वाय.सी.फॉर्म नुसार त्‍याचे खाते पुर्नजिवित (Reactivate) करुन द्दावे. तक्रारकर्त्‍याने सुध्‍दा आपले वडीलांचे मृत्‍यू प्रमाणपत्राची प्रत विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेला आवश्‍यकता असल्‍यास पुन्‍हा पुरवावी.  

(03)   विरुध्‍दपक्ष क्रं-1) बँकेच्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-  (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा व नोटीस खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्त्‍यास द्दावेत.

 

 

 

 

 

 

 

(04)   सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) स्‍टेट बँक ऑफ इंडीया तर्फे संबधित अधिका-यांनी वैयक्तिक आणि  संयुक्तिकरित्‍या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

(05)  प्रस्‍तुत निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध  करुन देण्‍यात याव्‍यात.      

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. JUSTICE Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.