Rajaram Mahadev Dorugade filed a consumer case on 10 Dec 2010 against Vyapari Gramin Bigar Sheti Pat Sanstha Maryadit, in the Kolhapur Consumer Court. The case no is CC/09/621 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Kolhapur
CC/09/621
Rajaram Mahadev Dorugade - Complainant(s)
Versus
Vyapari Gramin Bigar Sheti Pat Sanstha Maryadit, - Opp.Party(s)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीसीची बजावणी झाली आहे; तथापि त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे दामदुप्पट ठेवीच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :-
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
व्याजदर
1.
0001283
12000/-
29.09.2000
30.05.2005
15.75%
2.
0001553
30000/-
12.11.2001
13.05.2006
16%
3.
0000044
20000/-
03.05.2002
04.11.2006
16%
(3) तक्रारदारांनी सदरची रक्कम प्रापंचिक गरज व उतारवयातील औषधोपचारसाठीची अडचण निभावून काढणेच्या उद्देशाने व भविष्याची तरतूद म्हणून संसारात काटकसर करुन गुंतविलेली आहे. सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.18.04.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
(4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(5) सामनेवाला क्र.1 ते 13 यांना या मंचाने संधी देवूनही त्यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. सबब, सामनेवाला क्र.1 (संस्था) ते 13 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांची ठेव रक्कम व्याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(6) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या त्यांच्या मुदतीचा विचार करता दामदुप्पट ठेवींच्या असून त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे दामदुप्पट ठेव पावत्यांवरील मुदतपूर्ण रक्कमा मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(7) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
(3) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर कोष्टकात नमूद तारखेपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे.
अ.क्र.
ठेव पावती क्र.
देय दामदुप्पट रक्कम
व्याज देय तारीख
1.
0001283
24000/-
30.05.2005
2.
0001553
60000/-
13.05.2006
3.
0000044
40000/-
04.11.2006
(4) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.