Maharashtra

Kolhapur

CC/09/751

Kohinoor Tarpolin Indusstries. - Complainant(s)

Versus

VRL Logistics ltd. - Opp.Party(s)

A.A.Bhumkar.

06 Jun 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/751
1. Kohinoor Tarpolin Indusstries.10/11/Y.P.Powarnagar.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. VRL Logistics ltd.Carkithouse Road. Hubali.2. Branch Manager/Claim Officer, V.R.L. Logistics LtdVyapari peth, Shahupuri Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :A.A.Bhumkar., Advocate for Complainant
A.R.Kadam, Advocate for Opp.Party

Dated : 06 Jun 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र:- (दि.06/06/2011) (व्‍दारा-सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या) 

(01)       तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस आदेश झाला सामनेवाला नं 1 व 2 उपस्थित वकिलामार्फत उपस्थित सामनेवाला क्र. 2 यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे.   प्रस्‍तुत सामनेवाला नं. 2 यांचे म्‍हणणे हेच सामनेवाला क्र.1 यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत प्रकरणी वाचणेत यावे म्‍हणून सामनेवाला क्र.1 यांनी पुरसीस दाखल केली आहे. उभय पक्षांच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला. तक्रारदारांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केलेला आहे.  
(02)      तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी- प्रस्‍तुत तक्रारीतील सामनेवाला क्र 1 हे कुरीअर सेवा देणारी कंपनी असून सामनेवाला क्र 2 हे सामनेवाला 1 चे कोल्‍हापूर येथील शाखाधिकारी/ क्‍लेम ऑफीसर आहेत. तक्रारदार यास सामनेवालांनी सशुल्‍क सेवा पुरवली आहे. सबब तक्रारदार सामनेवाला क्र.। यांचे ग्राहक आहेत.तक्रारदार यांचा ताडपत्री उत्‍पादनाचा व्‍यवसाय असून तो त्‍यांचा उपजिविकेचे एकमेव साधन आहे तक्रारदाराने त्‍याचे पुरवठादार दीप रबर प्रॉडक्‍टस, डोंबिवली ईस्‍ट यांचे द्वारे सामनेवाला यांचेमार्फत दिनांक 12/02/2008 रोजी कन्‍साईनमेंट बुक केले होते सदर कन्‍साईनमेंटची किंमत रु.6,469/-इतकी होती. प्रस्‍तुतची कन्‍साईनमेंट सामनेवाला यांनी नमूद तक्रारदारांचे पुरवठादारांकडून कोणतीही मोडतोड न झालेच्‍या स्‍वरुपात स्विकारुन ते तक्रारदारास कोल्‍हापूर येथे पोहच करण्‍याची जबाबदारी स्विकारले. सदर कन्‍साईमेंट एलआर नं- 201484073 व सीआर नं- 63918 बोरीवली येथून कोल्‍हापूर येथे येणार होता.
 
          प्रस्‍तुतची कन्‍साईमेंट म्‍हणजे स्‍टील रोलवर रबर कोटींग केलेले मटेरिअल होते.   जे व्‍यवसायाकरिता तक्रारदार उपयोगात आणत होते   प्रस्‍तुत मटेरिअलची कन्‍साईमेंट   दिनांक 22-02-2008 रोजी तक्रारदारस मिळाले. त्‍याचे पॅकींग असलेली लाकडी पेटी संपूर्णपणे तुटली असल्‍याचे व लाकडी पेटीचे खिळे घुसलेने संपूर्ण रबर रोल खराब झालेचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. सदरची कल्‍पना त्‍याने तत्‍काळ सामनेवाला क्र.2 यांस दिली. तसेच पोहोच पावतीवर त्‍याने त्‍याप्रमाणे शेरा नमुद केला. झालेल्‍या नुकसानीचे सामनेवालांचे कर्मचा-यांसमोर फोटोही काढले. सामनेवाला क्र.2 यांना सदरची बाब सांगितल्‍यावर त्‍याने नुकसान भरपाईची मागणी करणेस सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारदाराने सामनेवालांकडे नुकसान भरपाई अर्जासोबत फोटोची सीडी पाठवून दिली. प्रस्‍तुतचे कन्‍साईनमेंट डॅमेज झालेचे त्‍याने लेखी दिले. मात्र तक्रारदाराचा नुकसानीचा क्‍लेम सामनेवाला यांनी फेटाळून लावला. दि.02/12/2008 रोजी तक्रारदाराने नोटीस पाठविलेनंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास रु.1,500/-इतक्‍या रक्‍कमेचा क्‍लेम मंजूर केलेबाबत पत्र पाठवले. प्रत्‍यक्षात तक्रारदाराचे कन्‍साईनमेंटची किंमत रु.6,469/-इतकी होती. तसेच प्रस्‍तुतचे कन्‍साईनमेंट वेळेत न मिळालेने रु.12,700/-इतके नुकसान झालेले आहे. याचा विचार न करता सामनेवालांनी प्रथमत: क्‍लेम नामंजूर केला व तदनंतर नाममात्र क्‍लेम मंजूर केला. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा अर्ज मे. मंचासमोर दाखल करावा लागलेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करावी व तक्रारदारास सामनेवालांकडून कन्‍साईमेंटची रक्‍कम रु.6,469/- नुकसानीपोटी रु.12,700/-अशी एकूण रु.19,169/-क्‍लेम नाकारले तारखेपासून द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजाने तसेच आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- देणेबाबत हुकूम व्‍हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीसोबत खरेदी व बुक केलेले कन्‍साईनमेंटची पावत्‍या, जकातीची पावती, सामनेवाला यांची पोहोच पावती व त्‍यावर तक्रारदाराने लिहीलेला शेरा, सामनेवाला यांनी तक्रारदारास लिहून दिले डॅमेज सर्टीफिकेट, सामनेवाला यांचेकडे तक्रारदाराने केलेला क्‍लेम, सामनेवाला यास तक्रारदाराने पाठविलेले पत्र, सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांना पाठविलेले पत्र, सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना क्‍लेम नामंजूर केलेचे पाठविलेले पत्र, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांना पाठविलेले पत्र व नोटीस, सदर नोटीस सामनेवाला यांना पोहोचलेची पोहोच पावती, सामनेवाला यांनी तक्रारदारास क्‍लेम मंजूर करुन जूजबी रक्‍कम देऊ केली त्‍याचे पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली.
(04)       सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्‍य केली कथनाखेरीज नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदार हे वाणिज्‍य हेतूने व नफा मिळवणेच्‍या दृष्‍टीने व्‍यवसाय करतात. प्रस्‍तुत तक्रार दाखल करणेबाबत लोकस स्‍टॅन्‍डी नाही. तक्रारदार हा ग्राहक नाही. सामनेवालांनी डॅमेज सर्टीफिकेट दिलेची बाब खरी आहे. सामनेवालांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलेचे कथन खरे आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, प्रस्‍तुतचे तक्रारीत नमुद असणारे कन्‍साईनमेंट हे सामनेवालांकडे आले असता त्‍याबाबतचे दिलेल्‍या रिसीटवर रिस्‍क ऑफ ओनर असे स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे. प्रस्‍तुत डिलीव्‍हरीसाठी आलेले कन्‍साईनमेंट हे ओपन डिलीव्‍हरीचे नव्‍हते. सबब प्रस्‍तुत कन्‍साईनमेंट मध्‍ये काय आहे याची माहिती सामनेवाला यांना नव्‍हती. सबब त्‍याचे नुकसानीबद्दल सामनेवाला जबाबदार नाही. सामनेवाला व तक्रारदार यांचेमध्‍ये बरेच व्‍यवहार पूर्वीपासून झालेले आहेत ही बाब लक्षात घेऊन प्रस्‍तुतचे कन्‍साईनमेंट दुरुस्‍तीनंतर पूर्नवापरास आणता येत असलेने रु.1,500/- तक्रारदारास देऊ केले होते. मात्र ते तक्रारदाराने स्विकारले नाहीत. तक्रारदाराने प्रस्‍तुत कन्‍साईनमेंट दुरुस्‍ती करुन वापरता येत असलेची बाब लक्षात न घेता तसेच त्‍यापोटी रु.1,500/- इतकी रक्‍कम देऊ केली असतानाही सदरची तक्रार दाखल केली आहे. सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(06)       सामनेवाला यांनी आपले म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ केस लॉ दाखल केली आहेत.
(07)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षकारांचे वकीलांनी केलेला अंतिम युक्‍तीवाद विचारात घेता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
 
1. प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे काय? ---होय.
 
2. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?        ---होय.
 
3. काय आदेश ?                               ---शेवटी दिलेप्रमाणे.
 
मुद्दा क्र.1 :- सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणेमध्‍ये तक्रारदाराचा व्‍यवहार हा वाणिज्‍य हेतूने असलेने तसेच तक्रारदारास लोकस स्‍टॅन्‍डी नसलेने व तक्रारदार हा ग्राहक नसलेने प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र नाही असा आक्षेप घेतलेला आहे याचा विचार करता तक्रारदाराचा व्‍यवसाय हा ताडपत्री उत्‍पादनाचा असून हे त्‍याचे उपजिवीकेची उत्‍पन्‍ना बाब असलेचे शपथेवर नमुद केले आहे व सदर व्‍यवसायासाठी लागणारा कच्‍चा माल ते त्‍याचे पुरवठादार दीप रबर प्रॉडक्‍टस डोंबीवली इस्‍ट यांचेकडून घेऊन ते तक्रारदारास पोहोच करणेची जबाबदारी सामनेवाला यांनी स्विकारलेली होती. ती दाखल असणा-या सामनेवालांचे कन्‍साईनमेंटचे पावतीवरुन निदर्शनास येते. तसेच प्रस्‍तुतची सेवा पुरवणेसाठी सामनेवालांनी रु.795/- इतकी रक्‍कम स्विकारलेली आहे. तक्रारदाराचे पुरवठादार हे कन्‍साईनर असून तक्रारदार हा कन्‍साईनी आहे. तसेच प्रस्‍तुतचे कन्‍साईनमेंट हे तक्रारदारास दयावयाचे होते हेही दाखल पावत्‍यांवरुन स्‍पष्‍ट होते. प्रस्‍तुत व्‍यवहारासंबंधातील योग्‍य ते टॅक्‍सीस तक्रारदाराने अदा केलेल्‍या आहेत. त्‍याच्‍या पावत्‍या प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहेत. प्रस्‍तुत कन्‍साईनमेंटची किंमत व्‍हॅटसहीत रु.6,469/- इतकी असलेचे दाखल दि.12/02/2008 च्‍या बील नं.190 वरुन निदर्शनास येते. तसेच सामनेवाला यांचे प्रस्‍तुत कन्‍साईनमेंटच्‍या प्रिंटेड पावतीवर वर्णनाचे कलमामध्‍ये त्‍याची नोंद आहे. सबब तक्रारदार हा प्रस्‍तुत कन्‍साईनमेंट मिळणेस हक्‍कदार आहे. सबब तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे. सबब तक्रारदारास प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणेस लोकस स्‍टॅन्‍डी आहे असे या मंचाचे ठाम मत आहे. सबब वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मु्द्दा क्र.2 :- वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता प्रस्‍तुतची कन्‍साईनमेंट बोरीवलीहून कोल्‍हापूर ये‍थे तक्रारदारास देणेचे होते. कन्‍साईनमेंट एलआर नं- 201484073 व सीआर नं- 63918 असा आहे. सदरचे कन्‍साईनमेंट दि.12/02/2008 रोजी बुक केले होते. कन्‍साईमेंट म्‍हणजे स्‍टील रोलवर रबर कोटींग केलेले मटेरिअल होते. जे व्‍यवसायाकरिता तक्रारदार उपयोगात आणत होते प्रस्‍तुत मटेरिअलची कन्‍साईमेंट दिनांक 22-02-2008 रोजी तक्रारदारस मिळाले. त्‍याबाबतचे चलन प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहे. त्‍याचे पॅकींग असलेली लाकडी पेटी संपूर्णपणे तुटली असल्‍याचे व लाकडी पेटीचे खिळे घुसलेने संपूर्ण रबर रोल खराब झालेचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. सदरची कल्‍पना त्‍याने तत्‍काळ सामनेवाला क्र.2 यांस दिली. तसेच पोहोच पावतीवर त्‍याने त्‍याप्रमाणे शेरा नमुद केला. झालेल्‍या नुकसानीचे सामनेवालांचे कर्मचा-यांसमोर फोटोही काढले. तसेच दि.22/02/2008 रोजी सामनेवाला क्र.2 यांनी डॅमेज सर्टीफिकेट दिलेले आहे. सदर सर्टीफिकेटमध्‍ये खिळे घुसल्‍यामुळे रबरचे नुकसान झालेची बाब नमुद केली आहे. तसेच प्रस्‍तुतचे कन्‍साईनमेंट ही ओनर रिस्‍क असलेने सामनेवाला जबाबदार नसलेची बाबही नमुद केली आहे. तदनंतर तक्रारदाराने दि.23/03/2008 रोजी रितसर नुकसानीची क्‍लेमची रक्‍कम रु.19,169/- ची मागणी केलेली आहे. प्रस्‍तुत मागणी अर्जामध्‍ये कन्‍साईनमेंटची किंमत रु.6,469/- तसेच लाकडी बॉक्‍सचे नुकसान रु.1,200/- तसेच स्टिल रोल लेव्‍हल दुरुसत करणेसाठी वाहतुकीची व दुरुस्‍तीचा खर्च रु.1,500/- व व्‍यावसायिक नुकसानीपोटी रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. दि.14/10/2008 रोजी तक्रारदाराने पुन्‍हा क्‍लेम सेटल करणेबाबत पत्र दिलेले आहे. दि.14/10/2008 चे पत्रानुसार सामनेवाला यांनी प्रस्‍तुतचा क्‍लेम नाकारला असून तक्रारदार हे नियमित ग्राहक असलेने त्‍यांचे क्‍लेमबाबत विचार करणेबाबत विनंती केलेली आहे. तदनंतर दि.17/11/2008 चे पत्रानुसार सामनेवालांचे कन्‍साईनमेंट हे ओनर्स रिस्‍क्‍वर असून कॅरिअर रिस्‍क नसलेने सामनेवालांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला आहे. तसेच दि.02/12/2008 चे पत्रानुसार तक्रारदार व सामनेवाला यांचे दिर्घकालीन संबंध लक्षात घेऊन प्रस्‍तुत क्लेमबाबत म्‍युच्‍यूअल सेटलमेंट करणेबाबत सामनेवालास कळवलेले आहे. दि.05/01/2009 चे पत्रास अनुसरुन रक्‍कम रु.1,500/- इतके फुल अन्‍ड फायनल सेटलमेंट देणेबाबत कळवलेले आहे.
 
           वर नमुद केलेप्रमाणे वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. प्रस्‍तुत प्रकरणी दाखल असलेली कन्‍साइनमेंट पावती ही प्रिन्‍टेड असून सदर पावतीवर बुक्‍ड अट ओनर्स रिस्‍क असे प्रिंट केलेले आहे. तसेच प्रस्‍तुत कन्‍साईनमेंटचा विमा उतरविलेला नाही. प्रस्‍तुत कन्‍साईनमेंटच्‍या नुकसानीसाठी सामनेवाला जबाबदार नाही असे सामनेवाला यांनी प्रतिपादन केलेले आहे. याचा विचार करता प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने दाखल केलेले पूर्वाधार STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION MAHARASHTRA, MUMBAI –Appeal No.1267/1999 Order dtd.21/09/2010 M/s Skypak Couriers Ltd. (now known as M/s Skypak Services Specialists Ltd.) Vs. M/s. Wartsila Diesel India Ltd.Mumbai मध्‍ये Nath Bros. Exim International Ltd. V/S Best Roadways Ltd. [1986-2004Consumer 7377(NS) 7177] या केसचा उल्‍लेख केला असूनत्‍यामध्‍ये
                        “ the liability of the carrier to whom the goods are entrusted for carrage is that of an insurer and is absolute in terms, in the sense that the carrier has to deliver the goods safely, undamaged and without loss at the destination, indicated by the consignor. So long as the goods are in the custody of the carrier, it is the duty of the carrier to take due care as he would be liable. If any loss or damage was caused to the goods on account of his own negligence or criminal act or that of agent and servant.”
 
                        In another case between DHL Worldwide Express (A Division of AFL Ltd.) and another V/s AGG Exports and another, [2009 CTJ 106(CP) (SCDRC), the State Consumer Disputes Redressal Commission Punjab has held that –
 
                        “ printed terms on the receipts whether binding? –Deficiency in service –Consumer Protection Act 1986-Section 2(1)(g)-Section 2(1)(o) –whether the liability of Appellants restricted to US$100 as printed on the back of receipt ? Held No-Appellants not to be absolved from their liability after the deficiency in service found proved- Rather their liability corresponded to the losses suffered by the Consumer and for the harassment and inconvenience suffered.”
 
                        प्रस्‍तुत पूर्वाधाराचा विचार करता सामनेवाला यांनी दिप रबर प्रॉडक्‍टस यांचेकडून सुस्थितीत व योग्‍य अशा पॅकींगमध्‍ये कन्‍साईनमेंट स्विकारलेली आहे. तसेच प्रस्‍तुत कन्‍साईनमेंटमध्‍ये काय आहे याची नोंद प्रस्‍तुत कन्‍साईनमेंट पावतीवर आहे. प्रस्‍तुत कन्‍साईनमेंट ताब्‍यात घेताना सामनेवाला यांनी ते योग्‍य व सुस्थितीत असलेनेच स्विकारलेले आहे. प्रस्‍तुतची कन्‍साईनमेंट मुलत: खराब, योग्‍य पॅकींग नसलेले होते असे सामनेवाला यांचे म्‍हणणे नाही अथवा तसा पुरावा प्रस्‍तुत प्रकरणी नाही. सबब दि.12/02/2008 रोजी प्रस्‍तुत कन्‍साईनमेंट सुस्थितीत सामनेवाला यांनी स्विकारुन दि.22/2/2008 रोजी प्रस्‍तुत कन्‍साईनमेंटची डिलीव्‍हरी तक्रारदारस दिलेली आहे. प्रस्‍तुत कन्‍साईनमेंटची डिलीव्‍हरी स्विकारताना प्रस्‍तुत वुडन बॉक्‍सही फुटलेली असलेचे तसेच सदर वुडन बॉक्‍सचे खिळे घुसून रबर रोल खराब झालेचे निदर्शनास आलेने त्‍याच क्षणी सामनेवाला क्र.2 यांना सदरची बाब निदर्शनास आणून देऊन त्‍यासंदर्भात फोटो काढून तक्रारदाराने नुकसानीची मागणी केलेली आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे.
 
           वस्‍तुत: कन्‍साईनमेंट व्‍यवस्थित व सुस्थितीत पोहोचवणेची जबाबदारी सामनेवाला यांची होती ती त्‍यांनी पार न पाडता उलटपक्षी सामनेवाला हे वर प्रिन्‍टेड रिसीटवर बुक्‍ड अॅट ओनर्स रिस्‍क या बाबींचा आधार घेऊन त्‍यांनी त्‍यांची जबाबदारी झटकली व तक्रारदाराचा क्‍लेम नामंजूर केला ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मु्द्दा क्र.3 :- सामनेवाला यांनी प्रस्‍तुत कन्‍साईनमेंट मधील मटेरियल तक्रारदाराने दुरुस्‍त करुन वापरले असलेने त्‍यासाठी आलेला खर्च रु.1,500/- इतका क्‍लेम तक्रारदाराचे सामनेवालांशी दिर्घकालीन असणारे संबंध लक्षात घेऊन मंजूर केलेला होता. मात्र तक्रारदाराने तो स्विकारलेला नाही. या बाबींचा विचार करता तक्रारदाराने दि.26/03/2008 रोजी सामनेवालांचे क्‍लेम ऑफिसरकडे पाठवलेल्‍या क्‍लेम अर्जामध्‍ये तसेच मुददा क्र.2 मध्‍ये नमुद केले प्रमाणे रु.19,169/- इतक्‍या रक्‍कमेची मागणी केलेली होती. मात्र सामनेवाला यांनी फक्‍त रु.1,500/- मंजूर केले. तसे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल असणारे मंजूर क्‍लेमच्‍या पत्रामध्‍ये प्रस्‍तुत कन्‍सार्इनमेंट दुरुस्‍त करुन घेतलेबाबत रु.1,500/- देत असलेबाबत स्‍पष्‍टपणे नमुद केलेचे दिसून येत नाही. सर्वसाधारण रु.1,500/- मंजूर केलेचे दिसून येते.
           
            1. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI –REVISION PETITION NO 2330 OF 2009. Decided on 2nd   May, 2011.
            2. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI –REVISION PETITION NO 1026 OF 2011 Decided on 3rd   May, 2011.
            3. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI –FIRST APPEAL NO 481 OF 1996.
            4. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI –REVISION PETITION NO 3141 OF 2005 Decided on 3 rd March, 2011.
            5. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – FIRST APPEAL NO 690 OF 2003, Decided on 29 th July, 2010.
            6. STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, MARASHTRA, MUMBAI-Appeal No.1267/1999 Decided on 21/09/2010.
            7. 2005 CTJ 1148 (CP) (SCDRC)-STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, ORISSA, CUTTAK-Appeal No.713/2003 Decided on 25/04/2005.
            8. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI –REVISION PETITION NO 238 OF 1998 Decided on 5th July, 2004.
            9. 2004 CTJ 625 (CP) (NCDRC)- NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI –REVISION PETITION NO 367 OF 2004 Decided on 22nd March, 2004.
         10. 2003(3) CPR 342 GOA STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION PANAJI –Appeal No.58 OF 1999 Decided on 13th Feb, 2003.
         11. 2003 CTJ 621(CP)(SCDRC)-STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, MADHYA PRADESH, BHOPAL-Appeal No.61PG 2001 Decided on 28th June, 2002.
         12. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI –Original Petition No. 66 OF 1992 Decided on 14th December, 2001.         
 
           वरील पूर्वाधारांचा विचार करता तक्रारदार कन्‍साईनमेंटची रक्‍कम रु.6,469/- मिळणेस पात्र आहेत. तसेच त्‍यास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.2,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
                                या सर्व बाबींचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                         आदेश
 
1) तक्रारदाराच तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
 
2) सामनेवालाने तक्रारदाराला कन्‍साईनमेंटची रक्‍कम रु.6,469/-(रु.सहा हजार चारशे एकोणसत्‍तर फक्‍त) अदा करावेत.
 
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु. 2,000/-(रु.दोन हजार फक्‍त)  व तक्रारीच्‍या खर्चाबद्दल रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) दयावे.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT