तक्रार दाखलकामी आदेश.
1. तक्रारदार यांचे वकील श्रीमती. किमया प्रजापती यांना तक्रार दाखलकामी ऐकण्यात आले. त्यांनी त्यांच्या युक्तीवादाच्या पृष्ठर्थ मा. राष्ट्रीय आयोगानी तक्रार क्र 97/2016 अमरीश कुमार शुक्ला अधिक 21 विरूध्द फेरॉस इन्फ्रास्ट्रक्चर लि. निकाल तारीख 07/10/2016, तक्रार क्र 104/2016 नविन कुमार विरूध्द युनिटेक निकाल तारीख. 11/01/2018 व मा. दिल्ली राज्य आयोगानी तक्रार क्र. 977/2017 रिमा कुमरा विरूध्द दिल्ली डेव्हलोपमेंट अॅथोरेटी निकाल तारीख. 09/08/2017 दाखल केले आहे.
2. तक्रार व त्यासोबतची दाखल केलेली कागदपत्रे पाहण्यात आली . तक्रारदारानी सामनेवाले क्र 1 उत्पादित वाहन, सामनेवाले क्र 2 यांच्याकडून रक्कम अदा करून, विकत घेतले होते. परंतू त्यामध्ये दोष आढळून आले. त्याबाबत वाद निर्माण झाल्यामूळे हि तक्रार दाखल करण्यात आली व नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली.
3. तक्रारदारानी तक्रारीच्या परिच्छेद क्र 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे वाहनाचा मोबदला रू. 6,70,643/-,आहे. तक्रारदारानी तक्रारीच्या परिच्छेद क्र 36 मध्ये विविध मागण्या केल्या आहेत. क्लॉज ‘बी’ प्रमाणे तक्रारदारानी उत्पादित दोष, मानसिक त्रास व इतर बाबीकरीता रू. 17,70,643/-,व क्लॉज ‘डि’प्रमाणे तक्रारीचा खर्च म्हणून रू. 1,00,000/-,अशा मागण्या केल्या आहेत. ग्रा.सं.कायदयाच्या कलम 11 प्रमाणे मंचाचे पिक्युनरी अधिकार क्षेत्र ठरवितांना वस्तु/सेवेचे मुल्य व मागणी केलेली नुकसान भरपाईची रक्कम विचारात घेणे आवश्यक आहे. या तक्रारीमध्ये वाहनाचे मुल्य व मागणी केलेली नुकसान भरपाईचा विचार करता, एकुण रक्कम रू. 20,00,000/-,पेक्षा जास्त होते. त्यामुळे, हि तक्रार या मंचात चालु शकत नाही व याकरीता आम्ही उपरोक्त नमूद अमरीश कुमार शुक्ला व 21 इतर या न्यायनिवाडयाचा आधार घेत आहोत.
4. तक्रारदारानी दाखल केलेले इतर दोन न्यायनिवाडे त्यांना सहाय्यक ठरत नाही व आमच्या मते त्या न्यायनिवाडयामध्ये नमूद केलेला निर्णय हा सुध्दा तक्रारदारांच्या विरोधात जातो. सबब, खालील आदेश.
आदेश
1. तक्रार क्र 493/2017 पिक्युनरी अधिकार क्षेत्राअभावी तक्रारदार यांना परत करण्यात येते.
2. तक्रारदारांनी लिमीटेशनच्या तरतुदींच्या अधीन राहून योग्य त्या मा. आयोगात/न्यायालयात तक्रार दाखल करावी.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
5. अतिरीक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-