(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, गैरअर्जदार क्र.1 व्होडाफोन स्टोअर हे गैरअर्जदार क्र.2 व्होडाफोन एसार सेल्युलर लिमिटेड यांचे अधिपत्याखाली व्यवसाय (2) त.क्र.538/09 करतात. तक्रारदार गैरअर्जदारांचे ग्राहक असून त्याने प्रीपेड मोबाईल सेवा घेतलेली आहे. दि.22.06.2009 रोजी गैरअर्जदार क्र.2 ने त्याच्या मोबाईलमधे कॉलर टयुन सेवा अक्टीव्हेट करुन, 30 महिन्याचे भाडे म्हणून त्याचे प्रीपेड अकाऊंटमधून कपात केले. त्याने याबाबत गैरअर्जदारांकडे तक्रार केली असता गैरअर्जदारांनी कॉलर टयुन सेवा डिअक्टीव्हेट केली परंतू त्याचे प्रीपेड खात्यामधून कपात केलेली रक्कम रु.30/- परत त्याचे खात्यात क्रेडीट केले नाहीत. गैरअर्जदारांनी आश्वासन देऊनही 8 दिवसात रु.30/- परत केले नाहीत. अशा प्रकारे गैरअर्जदारांनी त्याची फसवणूक करुन त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदारांना त्याच्या मोबाईलचे प्रीपेड खात्यामधे रु.30/- क्रेडीट टाकावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकत्रित लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, इंडियन टेलिग्राफ अक्टचे कलम 7-ब नुसार प्रस्तुत तक्रार या मंचात चालू शकत नाही. तक्रारदाराने key हे बटन प्रेस केल्यामुळे त्याच्या मोबाईलची कॉलर टयुन सेवा अक्टीव्हेट झाली आणि रु.30/- चार्जेस कपात करण्यात आले. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर त्याच दिवशी सदर सेवा डिअक्टीव्हेट करुन रु.30/- दि.14.07.2009 रोजी त्याचे प्रीपेड खात्यात क्रेडीट केले आहेत. गैरअर्जदारांनी कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. मा.सर्वोच्च न्यायालय यांनी General manager Telecom V/s M.Krishnan & ors. 2009 STPL (web) ssc या प्रकरणातील निवाडयाद्वारे टेलिफोन बिलासंदर्भातील वाद आणि टेलिग्राफ रुल्सचे रुल 413 नुसार टेलिफोनशी संबंधित घेतलेल्या सेवा या संदर्भातील प्रकरण चालविण्याचा ग्राहक मंचाला अधिकार नसल्याचे म्हटले आहे. तक्रारदाराने कॉलर टयुन सेवेसाठी मोबाईलच्या प्रीपेड खात्यामधून रक्कम रु.30/- गैरअर्जदारांनी कपात केले, परंतू सदर रक्कम पुन्हा त्याचे खात्यात क्रेडीट केले नाहीत या संदर्भात तक्रार दाखल केली. तक्रारदार आणि गैरअर्जदार यांच्यामधील वाद टेलिफोन बिलाशी संबंधित असुन मा.सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या उपरोक्त (3) त.क्र.538/09 निवाडयानुसार सदर तक्रार या मंचात चालू शकत नाही. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च उभयपक्षांनी आपापला सोसावा.. 3) उभयपक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |