जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/148. प्रकरण दाखल तारीख - 12/05/2010 प्रकरण निकाल तारीख –15/06/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. राहूल पि.अशोकराव मूत्तेमवार वय, 33 वर्ष, धंदा स्वयंरोजगार/व्यापार रा. ओमकार एजन्सी, बस स्टँड समोर, नांदेड अर्जदार विरुध्द. 1. मे.व्होडाफोन एस्सार सेल्यूलर लि. सर्कल ऑफिस (मेट्रोपोलीटन) प्लॉट नं.27, सर्व्हे न.21, जूना मूंबई-पूणे महामार्ग, वाकडेवाडी, शिवाजी नगर, पूणे – 411 005. गैरअर्जदार 2. एरिया सेल्स मॅनेजर मे.व्होंडाफोन एस्सार सेल्यूलर लि. मोरे कॉम्प्लेक्स, बँक ऑफ बडोदा समोर, महावीर चौक, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.एम.मान्नीकर. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. आदेश नि.क्र. अ-1 दि.15.06.2010 (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्य ) अर्जदार वकिलामार्फत हजर झाले, अर्जदार यांना कमर्शियल ट्रान्जेक्शन या मूददयावर यूक्तीवाद करण्यास सांगितले असता त्यांनी वकिलामार्फत यूक्तीवाद केला. त्यात त्यांनी अर्जदार यांचे चरिञासाठी ओंकार एजन्सी या नांवाने व्यवसाय केला असे म्हटले आहे. गैरअर्जदार कंपनी मे. व्होडाफोन एस्सार सेल्यूलर लि. यांचे व्होडाफोनचे सिमकार्डस, हॅन्डसेट व इतर उत्पादने विक्री करण्यासाठी अर्जदाराने एजन्सी घेतली व या एजन्सी साठी वरील म्हटल्याप्रमाणे साहित्य विकण्यासाठी उदगीर येथे दूकान सूरु केले. त्याप्रमाणे त्यांनी व्होडाफोन कंपनी यांचेकडून हँन्डसेट, सिमकार्डस व इतर साहित्य खरेदी केले व त्यांचेकडे विक्रीसाठी उपलब्ध केले. यानंतर काही रक्कम गैरअर्जदार यांना पाठविली असता त्यांनी त्या रक्कमेचा माल पाठविला नाही म्हणून त्यांनी ही तक्रार दाखल केली. यात गैरअर्जदार व अर्जदार यांचेतील नाते कंपनी व एजन्सी असे आहे व केवळ व्यावसायासाठी त्यांनी ही एजन्सी घेतली आहे. त्यांनी त्यांचे तक्रार अर्जात त्यांचे जीवन चरिञासाठी एजन्सी घेतली असे म्हटले असले तरी तो मूददा यांस लागू होणार नाही. हे पूर्णतः बिझीनेस ट्रान्जेक्शन आहे. विक्रेता व कंपनी असे नाते असल्याकारणाने विक्रेत्यास कंपनी विरुध्द तक्रार करायची असेल तर त्यांनी योग्य न्यायालयात तक्रार करावी. अशा प्रकारची तक्रार त्यांना ग्राहक मंचात दाखल करता येणार नाही. सबब या मूददयावर अर्जदार यांची तक्रार खारीज करण्यात येते. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री. सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य |