तक्रार क्र. CC/ 101/12 दाखल दि. 27.11.2012
आदेश दि. 13.08.2014
तक्रारकर्ता :- श्री अश्विन सुधाकरराव फाये
वय – 37 वर्षे, धंदा—सोनारी व शेती
रा.महाल वॉर्ड, राष्ट्रीय शाळेसमोर,भंडारा
ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- वोडाफोन सेलुलर लिमीटेड,.
द मेट्रोपोलिटन एफडी नं.27 सर्वे नं.21,
जुना मुंबई-पुणे महामार्ग,वाकडेवाडी,
शिवाजी नगर,पुणे
मार्फत शाखा कार्यालय,व्यवस्थापक,
वोडाफोन मिनीस्टोर्स्,बस स्टॅन्ड चे बाजुला,
भंडारा ता.जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.भुजाडे
वि.प.तर्फे अॅड.मोटवानी
.
(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 13 ऑगस्ट 2014)
1. तक्रारकर्त्याला इंटरनेट वापराचे 3461.95/- रुपयाचे बील हे जास्त रक्कमेचे आल्यामुळे ते रद्द न केल्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्ता हा सोन्याचा तथा शेतीचा व्यवसाय न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात करतो. विरुध्द पक्ष हे इंटरनेट सेवा देणारी मोबाईल कंपनी आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून पोस्टपेड मोबाईल इंटरनेट सेवा New per second billing 199 ही पोस्टपेड सेवा दिनांक 19/6/2012 पासून 300/- अनामत रक्कम विरुध्द पक्षाकडे जमा करुन घेतली.
3. तकारकर्ता हा सोन्याचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्याला इंटरनेटची अत्यंत गरज असल्यामुळे तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार विरुध्द पक्षाने 98/-रुपयात 600/- मेगा बाईट डाटा वापर करण्यासाठी इंटरनेट सेवा तक्रारकर्त्याच्या मोबाइल नंबरवर उपलब्ध करुन देण्यात आली.
4. दिनांक 19/7/2012 ते 18/8/2012 या कालावधीत विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास 600 मेगाबाईट पॅकेज दिले असता विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याने वापर केलेल्या इंटरनेटचे 3461.95/- रुपयाचे चुकीचे बील तक्रारकर्त्यास पाठविले व तक्रारकर्त्याची मोबाईल इंटरनेट सेवा कुठलीही सुचना न देता बंद केली.
5. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षास दिनांक 8/3/2013 ला नोटीस पाठविण्यात आली.
6. तक्रारकर्ता हा सोन्याचा व्यापारी असल्यामुळे व सोन्याच्या भावातील तफावतीची माहिती मिळण्यासाठी त्याने इंटरनेट मोबाईल सेवा घेतल्यामुळे परंतु तक्रारकर्त्याची इंटरनेट सेवा विरुध्द पक्षाने बंद केल्यामुळे तक्रारकर्त्याला अदयावत सोन्याच्या किंमतीची माहिती न मिळाल्यामुळे त्याला 50,000/- रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तसेच तक्रारकर्ता शेतकरी असल्यामुळे विरुध्द पक्षाने इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे तक्रारकर्त्याच्या रोहा येथे असलेल्या शेतीवरील पिकांच्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तक्रारकर्ता औषधोपचार करु शकला नाही म्हणून त्यास 30,000/- रुपयाचे नुकसान झाले.
7. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला अतिरिक्त व जास्त रक्कमेचे बील पाठविल्यामुळे व कोणतीही पुर्वसुचना न देता मोबाईल इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. करीता त्याने त्याला झालेली नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
8. क्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षास दिनांक 27/11/2013 ला नोटीस पाठविण्यात आल्या.
9. विरुध्द पक्ष यांनी आपला जबाब दिनाक 3/1/2013 ला दाखल केला.
10. विरुध्द पक्षाने आपले जबाबात असे म्हटले आहे की तक्रारकर्त्याने खोटी व दिशाभुल करणारी तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने इंटरनेट सेवा ही Commercial Purpose साठी वापरली असल्यामुळे सदरहू न्याय मंचाला प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये application Form मध्ये 7 B प्रमाणे Arbitration Clause असल्यामुळे सदरहू न्याय मंचाला प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही. तसेच तक्रारकर्त्याने Telegraph Act नुसार तक्रार ही संबधित अधिका-याकडे करणे गरजेचे होते. तक्रारकर्त्याने इंटरनेटचा वापर हा जास्त प्रमाणात केल्यामुळे व त्याला प्रत्येक वेळेस Billing Cycle चे SMS पाठवून सुध्दा त्याने Excessive वापर न थांबवल्यामुळे तक्रारकर्त्याला आलेले बील हे त्याने वापर केलेल्या इंटरनेटचे (Correct) योग्य बील आहे. तक्रारकर्त्याला GPRS पॅक प्रमाणे दिनांक 11/8/2012 ला 600 मेगाबाईट डाटा वापराबद्दल 98/- प्रती महिना Billing Cycle प्रमाणे बील देण्यात आले होते. तसेच त्याला दिनांक 11/8/2012 ते 19/8/2012 या कालावधीकरीता 154.83 मेगा बाईट डाटा फ्री वापरण्यासाठी दिला होता. तरी सुध्दा तक्रारकर्त्याने Excessively 505910 मेगाबाईट एवढा Excessive डाटा वापरला. विरुध्द पक्षाने सदरहू डाटा जो दिनांक 19/7/2012 ते 18/8/2012 चा आहे तो पान नं. 42 ते 104 वर दाखल केला आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास त्याने अतिवापर केल्यामुळे दिलेले रुपये 3461.95/- चे बील हे योग्य आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
11. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दिनांक 19/6/2012 चे बील पान नं.16 वर दाखल केले आहे तसेच दिनांक 19/7/2012 चे बील पान नं.20 वर दाखल केले आहे. दिनांक 19/7/2012 ते 18/8/2012 चे Call Duartion चा Data पान नं. 24 वर दाखल केला आहे. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीत शेतीचा 7/12 पान नं. 134 वर दाखल केला आहे व Digital Informtion Data पान नं. 135 वर दाखल केला आहे.
12. तक्रारकर्त्याच्या वकिलांनी दिनांक 4/3/2013 ला पुरसीस दाखल केली, त्यानुसार तक्रारकर्त्याची तक्रार हाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा, असे म्हटले आहे.
12. विरुध्द पक्षाचे वकील अॅड.के.एस.मोटवानी यांनी विरुध्द पक्षाचा जबाब हा युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दिनांक 11/2/2013 ला दाखल केली.
13. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज व तक्रारीसोबतची कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांचा युक्तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – नाही.
कारणमिमांसा
14. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये मोबाईल इंटरनेटचा उपयोग हा सोन्याच्या भावात होणारी तफावत पाहणे याकरीता केला जात होता, असे म्हटले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा इंटरनेटचा उपयोग Commercial Purpose साठी करीत असल्यामुळे सदरहू तक्रार ही न्यायमंचास चालविण्याचा अधिकार नाही.
15. विरुध्द पक्षाने सदरहू प्रकरणात तक्रारकर्त्याच्या इंटरनेटच्या वापराचे दिनांक 19/7/2012 पासून प्रत्येक Call चे व प्रत्येक Durtion ची संपुर्ण माहिती पान नं. 39 ते 104 पर्यंत म्हणजेच दिनांक 18/8/2012 पर्यत दाखल केली असल्यामुळे व त्यामध्ये तक्रारकर्त्याने त्याच्या मोबाईल इंटरनेटचा अतिवापर केल्याचे सिध्द् होते, त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिनांक 11/8/2012 ते 18/8/2012 या कालावधीमध्ये दिलेले 3461.95/- रुपयाचे बील हे योग्य दिले आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्याने काढलेल्या प्लॅन पेक्षा जास्त प्रमाणात वापरण्यात येणारे इंटरनेट बद्दलचे SMS सुध्दा पाठविले होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाचे 3461.95 रुपयाचे बील न भरल्यामुळे दिनांक 21/8/2012 ला तक्रारकर्त्याच्या मोबाईलची Outgoing Service बंद केली व बिलाची रक्कम भरण्याची विनंती केली. परंतु तक्रारकर्त्याने बील न भरल्यामुळे तक्रारकर्त्याची इंटरनेट सर्व्हीस ही दिनांक 18/9/2012 ला तात्पुरत्या स्वरुपात बंद केली व तरी सुध्दा तक्रारकर्त्याने बील न भरल्यामुळे तक्रारकर्त्याची मोबाईल इंटरनेट सेवा कायमस्वरुपी बंद (Disconnect) केली. त्यामुळे विरुध्द पक्षाने केलेल्या कृतीमध्ये कुठल्याही प्रकारे सेवेतील त्रृटी केलेली नाही, असे मंचाचे मत आहे. करीता खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल कुठलेही आदेश नाहीत.