Maharashtra

DCF, South Mumbai

MA/21/129

MRS JHEEL NAKUL KANUNGO NEE MS JHEEL SURESH KOTHARI - Complainant(s)

Versus

VLCC HEALTH CARE LIMITED - Opp.Party(s)

IN PERSON

10 May 2022

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Miscellaneous Application No. MA/21/129
( Date of Filing : 30 Aug 2021 )
In
Complaint Case No. CC/21/293
 
1. MRS JHEEL NAKUL KANUNGO NEE MS JHEEL SURESH KOTHARI
7C PALLANJI HOUSE 2ND FLOOR RAJA RAM MOHAN ROY ROAD KHETWADI MUMBAI 400004
...........Appellant(s)
Versus
1. VLCC HEALTH CARE LIMITED
1 NKM INTERNATIONAL HOUSE BACKBAY HALL BABUBHAI CHEN NARIMAN POINT MUMBAI 400020 2 M14 GREATER KAILASH II COMMERCIAL COMPLEX NEW DELHI 110048
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 10 May 2022
Final Order / Judgement

दवाराः- श्रीमती.एस.एस.म्‍हात्रेअध्‍यक्षा   

      तक्रारदार स्‍वतः हजर. सामनेवाले विरुध्‍द विलंब माफीच्‍या अर्जाबाबत एकतर्फा सुनावणी घेण्‍याचे आदेश दि.16/02/2022 रोजी पारीत करण्‍यात आले आहेत. सदर प्रकरणामध्ये तक्रारदारांनी त्‍यांना प्रस्‍तूत तक्रार दाखल करणेकामी झालेला 398 दिवसांचा विलंब माफ करण्‍यात यावा याकामी अर्ज दाखल केला असून, तक्रारदाराचा सदर अर्जावर दि.16.03.22 रोजी युक्‍तीवाद ऐकण्यात आला. तक्रारदार यांचा पत्‍ता खेतवाडी मुंबई – 400 004 असल्‍याने प्रस्‍तूत तक्रार आयोगाच्‍या भौगोलिक कार्यक्षेत्रात येते तसेच सामनेवाला VLCC Healthcare Ltd. यांचे अनुक्रमे नरीमन पॉईंट व नवी दिल्‍ली येथील दोन पत्‍ते तक्रारदारांनी तक्रारीच्‍या शिर्षकात नमूद केले आहेत.

      तक्रारदार यांनी व्‍हीएलसीसी हेल्‍थकेअर लिमीटेड यांचेकडून रक्‍कम रु.57,500/- ही रक्‍कम सामनेवाला यांना अदा करुन लेजर हेअर रिमूव्‍हल बाबत सामनेवाला यांचेकडून 06 सेशन्‍स मध्‍ये सेवा घेण्‍याचे उभय पक्षात ठरले होते.  परंतु तक्रारदारांनी नमूद केल्‍याप्रमाणे एवढया मोठया प्रमाणात तक्रारदारांनी सामनेवाला यांना रक्‍कम अदा करुन देखील सामनेवाला यांनी तक्रारदारांना योग्‍यवेळी व योग्‍यप्रकारे सेवा दिली नाही त्‍यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले व वेळोवेळी ठरलेल्‍या सेशन्‍सनुसार सामनेवाला यांनी तक्रारदारांवर ट्रीटमेंट केली नसल्‍याने तसेच त्‍याबाबत सामनेवाला यांनी काहीवेळा सामनेवाला यांचेकडील अपुरा स्‍टाफ तसेच लेझर हेअर रिमूव्‍हलसाठी आवश्‍यक असणारी मशिन तक्रारदारांना सामनेवाला यांनी त्‍याकरिता नियोजित वेळ दिली असताना देखील उपलब्‍ध करुन दिली नसल्‍याने तक्रारदाराच्‍या शरीरावर,  चेह-यावर, मानेवर इत्‍यादी ठिकाणी अनावश्‍यक केस वाढू लागले व त्‍याकरिता तक्रारदारांना वेगळा खर्च करुन त्‍यावर उपचार घ्‍यावे लागले असे तक्रारदारांनी नमूद केले आहे. 

      सदर अर्जामध्‍ये तक्रारदाराचे तक्रार दाखल करण्‍याचे कारण 27.07.2018 असल्‍याचे तक्रारदारांनी निवेदन केले. तसेच दि.09.10.2019 रोजी तक्रारदाराची पहिली डिलेव्‍हरी झाली असल्‍याने त्‍या प्रस्‍तूत तक्रार दाखल करण्‍यासाठी आयोगा समक्ष येऊ शकल्‍या नाहीत. मार्च-2020 पासून कोवीड- 19 च्‍या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर झाल्‍याने त्‍यांना तक्रार दाखल करता आली नाही तसेच दि.29.06.21 रोजी तक्रारदाराच्‍या दुस-या मुलाचा जन्‍म झाल्‍याने तक्रारदारांना विहीत मुदतीत प्रस्‍तूत तक्रार दाखल करता आली नाही व तक्रारदारांनी प्रस्‍तूत तक्रार 30 ऑगस्‍ट 2021 रोजी दाखल केली असल्‍याने तक्रारदारांना प्रस्‍तूत तक्रार दाखल करणेकामी झालेला 398 दिवसांचा विलंब माफ करावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे. सदर  अर्जासह त्‍यांनी त्‍यांच्‍या दोन्‍ही मुलांच्‍या जन्‍म दाखल्‍याच्‍या छायांकित प्रती सादर केल्‍या आहेत.  तसेच मार्च, 2020 पासून टाळेबंदी जाहीर झाल्‍याने मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने विहित मुदतीचा कालावधी SMW 3/2020 नुसार तसेच त्‍यानंतर वेळोवेळी पारीत करण्‍यात आलेल्‍या त्‍याबाबतच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाचे आदेशानुसार वाढवून दिलेला असल्‍याने तसेच प्रस्‍तूत तक्रार गुणवत्‍तेवर‍ निकाली काढणे योग्‍य असल्‍याचे आयोगाचे मत असल्‍याने न्‍यायहिताच्‍या दृष्‍टीने तक्रारदाराचा प्रस्‍तूत तक्रार दाखल करणेकामी झालेला 398 दिवसांचा विलंब माफ करण्‍यात येतो. तक्रार दाखल युक्‍तीवादाकामी पु.ने.ता.24/05/2022.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.